A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session619474567a0af6289339e24314c82e573dfd67ea3b8f8575a14f33606cd374d9597a9485): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Mazya nokarichi chittarkatha
Oct 22, 2020
स्पर्धा

माझ्या नोकरीची चित्तरकथा

Read Later
माझ्या नोकरीची चित्तरकथा

इराच्या फेसबुक पेजवर प्रेरणादायी कथा स्पर्धेबद्दल वाचलं   आणि मला आठवली ती माझी लाईफ टाइम अचिव्हमेंट ! माझी नोकरी !!

मी LIC मध्ये नोकरीला लागले 28 वर्षांपूर्वी.माझ्या नोकरीची चित्तरकथा आठवली की आजही माझे डोळे पाणावतात.माझी नोकरी हे माझं पहिलं प्रेम.वयाच्या सोळाव्या वर्षी झालेलं.

हो ! हो !! सोळाव्या वर्षीच !!

तर झालं असं की 1987 मध्ये आमची दहावीची परीक्षा आटोपली अन् आम्ही सुट्टीत आजोळी अमरावतीला आलो.तिथे एका परिचितांनी त्यांच्या नातेवाईकांना देण्याकरिता काही सामान दिलं होतं.त्यांची नातेवाईक अकोल्याला रहाते आणि  LIC ऑफिसमध्ये नोकरी करते असं त्यांनी सांगितलं.तिच्या घरचा पत्ताही दिला.त्याकाळी कुरियर सर्विस वगैरे बोकाळली नव्हती. पण लोक आवडीने अशी सेवा देत असत ! 

आम्ही अकोल्याला घरी परतलो अन् सोबत आणलेले ते पार्सल पोहोचवायचे होते.अनायासे टॉवरजवळ दुसरे काम असल्याने ते पार्सल टॉवरजवळ असलेल्या LIC ऑफिसमध्ये नेऊन द्यायचे ठरले अन् आम्ही दोघी बहिणींनी सायकलवरून तिकडे कूच केले.

टॉवरजवळ स्टेट बँकेच्या बाजूला असलेली ती भव्य इमारत पाहून माझे डोळे दिपून गेले. ह्यापूर्वी LIC शी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध कधीच आला नव्हता.पण "लव्ह ॲट फर्स्ट साईट" म्हणतात ना तस्सं झालं अगदी.मग कुठे पेपरमध्ये LIC ची  जाहिरात, LIC चे कॅलेंडर असं काही दिसलं की ओळखीच्या खूण पटू लागली.आपणसुद्धा अशीच LIC त नोकरी करायची ह्या विचाराचं मनात बीज रोवलं गेलं !

मग नोकरभरतीसाठी जागा कधी निघतात, किमान पात्रता काय असते वगैरे (चांभार !)चौकश्या आम्ही सुरु केल्या.चांभार चौकश्या ह्यासाठी की नोकरीसाठी लागणारी वयाची किमान  अट 18 वर्षे आम्ही दोघी बहिणींनी अद्याप पूर्ण केली नव्हती.

1989 मध्ये आम्ही दोघी बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो अन् सुटकेचा श्वास सोडला !!! कारण LIC त नोकरी    करता त्याकाळी किमान पात्रता 12 वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि स्नातक द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण अशी होती !

हुश्श !!! नोकरीची पहिली पात्रता पूर्ण झाली होती ! 1990 साली LIC च्या जागा निघाल्या असे कळले पण वय कमी पडत असल्याने फॉर्म भरता आला नाही.पण आमच्या शेजारी   राहणाऱ्या अपर्णाचे सिलेक्शन LIC त झाले होते.

आतातर  "नोकरी करायची तर LIC तच" पासून "नोकरी तर करायचीच आणि ती पण LIC तच करायची" अशी भीष्मप्रतिज्ञा घेईपर्यंत माझा LIC वरच्या प्रेमाचा प्रवास पूर्ण झाला होता !!
1991 चा मे महिना.शेजारचा मुलगा वर्तमानपत्रातली LIC च्या नोकरभरतीची जाहिरात आणि दोन फॉर्म घेऊन घरी आला.आम्ही दोघी बहिणींनी शुभ मुहूर्तावर फॉर्म भरला आणि पाच रुपयांच्या पोस्टल ऑर्डरसह पोस्टात टाकला.लेखी परीक्षेचा अभ्यासही अगदी धडाक्यात सुरु केला.नन्तर कळले 9000 अर्जामधून गुणवत्तेनुसार सतराशे उमेदवारांनाच लेखी परीक्षेचा कॉल आला होता !
09.06.1991 रोजी रविवारी अमरावतीला लेखी परीक्षा पार पडली.इंग्रजी आणि गणित असे 100-100 मार्कांचे दोन पेपर त्याकाळी होते.मला आजही आठवते त्या दिवशी एकादशी होती आणि आम्ही दोघीनींही पेपर सोडवून होईपर्यंत कडक उपास केलेला !
जुलैमध्ये परीक्षेचा निकाल आला अन् आम्ही दोघीही ही परीक्षा पास झालो होतो ! आता मुलाखतीसाठी बोलावणं आलं.इंटरव्यूकरिता नवीन ड्रेसची खरेदी झाली. मुलाखतीसाठी 27 जुलै 1991 चा दिवस होता. आम्ही पुन्हा अमरावती गाठले.इंटरव्यूसाठी नवीन ड्रेस, केसांना तेल लावून वर बांधलेल्या घट्ट दोन वेण्या अश्या अवतारात आमची स्वारी इंटरव्यूसाठी दाखल झाली.दोघींचेही इंटरव्यू एकापाठोपाठ झाले.माझा आधी आणि बहिणीचा माझ्यानंतर लगेच होता.इंटरव्यूमध्ये समितीने कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली आणि एकांनी मला म्हटलं की  "बेटा, तुझे बाबा बँकेत आहेत नं, मग मस्त कॉलेजलाईफ एन्जॉय कर.आत्ता नोकरीची घाई का करतेस?" मी त्यांना सांगितलं की एन्जॉय करायला आयुष्य पडलंय पण नोकरी आता नाही मिळवली तर पुन्हा मिळणार नाही !"
माझ्या बहिणीला मात्र त्यांनी एका घरातून एकच उमेदवार घेणार असं स्पष्ट सांगितलं होतं मग आम्ही दोघींमधून कोणाला घ्यावं असा प्रश्न विचारला होता !
आणि माझ्या इच्छाशक्तीची परीक्षा पाहणारा तो दिवस उजाडला !!! इंटरव्यूचा निकाल आला आणि त्यात माझं नाव नव्हतं !!! माझ्या बहिणीला मात्र नोकरी मिळाली होती.माझी निवड न झाल्याचे कळलं मात्र मी रडून रडून गोंधळ केला ! नेमके त्या वेळी आईबाबा बाहेर गेलेले.जवळच राहणारी माझी चुलत बहीण सहज आमच्याकडे यायला निघालेली.माझ्या धाय मोकलून रडण्याचा आवाज ऐकून तशीच धावत गेली अन् काका-काकूला घेऊन आली ! आईबाबा येईपर्यंत मग ते माझी समजूत काढत होते.
वय वर्षे एकोणवीस असताना केवळ नोकरी मिळाली नाही म्हणून इतके रडण्यासारखं झालं तरी काय असा प्रश्न सर्वाना पडला होता ! 
पण माझं ठरलं होतं नं -नोकरी तर करायचीच ! LIC तच करायची !! अन् आत्ताच करायची !!!
 माझा विधात्याला एकच प्रश्न होता- "साधी कारकुनी करावी एव्हढीही माझी लायकी नसावी का? अपेक्षाभंगाच्या त्या दुःखात आपण आपल्या बहिणीच्या नोकरीचा आनंद कोणालाही उपभोगू देत नाही आहोत ह्याचे भान त्यावेळी मला नव्हते !
माझी बहीण नोकरीच्या प्रशिक्षणाकरिता आधी अमरावती आणि मग परतवाड्याला रुजू झाली आणि माझे एकाकीपण सुरु झाले.मला नोकरी का मिळाली नाही म्हणून रडले नाही असा एक दिवस गेला नाही !
एक दिवस कुठलासा सिनेमा बघत असताना एक शेर ऐकला -
"खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले 
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है !"
आता मी ठरवलं स्वतःला इतकं बुलंद करायचं की खुदा स्वतः मला विचारेल की तुला काय हवंय आणि मी सांगेन "LIC त नोकरी" !!!
मला खरंच दुसरं काहीच नको होतं ! रात्रंदिवस एकच ध्यास "LIC त नोकरी ! LIC त नोकरी !! LIC त नोकरी" !!!
बाबांच्या म्हणण्याखातर बँकेच्या जागा निघाल्या म्हणून परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेस जॉईन केले होते.पण जीव मात्र LIC तच रंगला होता !
मी सतत देवाला कौल लावत असे.नवस बोलत असे.एकसारखी रडत असे.आईला सतत एकच प्रश्न विचारून भंडावून सोडत असे-"मला नोकरी मिळेल नं???"
माझा बी.कॉम.च्या अंतिम वर्षांचा अभ्यास सुरु होता पण सततच्या विचाराने मन आणि बुद्धी सैरभैर होत असे.कधी कधी मन इतकं निराश होई की अगदी मृत्यूचे विचारही डोक्यात येत.नोकरी न मिळताच मरण आले तर मी LIC ऐवजी DIC त नोकरी करणार असं मी आईला सांगत असे.DIC म्हणजे डेथ इन्शुरन्स कॉर्पोरेशन !!! LIC त मृत्यू झाल्यास वारसाला क्लेम मिळतो तर DIC त पुनर्जन्म झाल्यावर !!!
अशी माझी मुक्ताफळं ऐकून माझ्या मायमाऊलीच्या काळजाला किती वेदना होत असतील हे आता आई झाल्यावर उमजतंय.पण तिने मात्र प्रत्येकवेळी माझ्या नोकरी मिळेल नं ह्या प्रश्नाला अगदी उत्स्फूर्तपणे "नक्की मिळणार" असे उत्तर देऊन मला अक्षरशः तगवलं आणि जगवलंही !
शेवटी मनःशांतीसाठी तिनेच मला संतशिरोमणी श्री गजानन महाराजांची पोथी वाचायला सांगितली.मातृआज्ञा शिरोधार्य मानून मी पारायणाचा संकल्प केला पण डोक्यातील वळवळ स्वस्थ बसू देईना.संकल्प करतानाच गजानन महाराजांना साकडं घातलं की मी थोडे जरी पुण्य गाठीशी बांधले असेल तर पारायण संपायच्या आत मला नोकरी मिळू देत...तसंच एक वचन स्वतःलाही दिलं की मी कधीही माझ्या कर्तव्याशी आणि LIC शी बेईमानी करणार नाही...मी खूप चांगलं काम करेन....माझ्या निवडीचा संस्थेला कधीच पश्चाताप होऊ देणार नाही आणि बरंच काही...कदाचित माझा हा भाबडेपणाच मला इतरांपेक्षा वेगळं आणि  "खास " बनवतो कदाचित !
"गजानन विजय ग्रंथा"च्या पारायणाचा तिसरा दिवस उजाडला.दि.21 जानेवारी 1992.मी सकाळी बँकेच्या क्लासहून घरी येत असतानाच टेलिग्रामवाले काका आमच्या फाटकाशी आले."वैशाली काटे..नोकरीचा कॉल आहे.पेढे द्या हो काकू ss" असा हाकारा करताच आई आणि बहिणी बाहेर आल्या.त्यांचे हे शब्द ऐकताच मी हातातली सायकल फेकून दिली आणि रस्त्यावरच नाचायला सुरुवात केली. अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं होतं ! मला नोकरी मिळाली होती !! माझं प्रेम सफल झालं होतं !!!
वैद्यकीय चाचणी आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दि.04.02.1992 रोजी मी स्वतःला दिलेल्या सर्व वचनांची शिदोरी सोबत घेऊन LIC त रुजू झाले.ह्या माझ्या नोकरीनं माझ्या आयुष्यात सप्तरंग भरलेत- पैसा, ओळख, मान-सन्मान,आनंद, समाधान, सुरक्षितता आणि आत्मविश्वास ... !!!

तर अशी ही माझ्या नोकरीची चित्तरकथा !!! कशी वाटली ते नक्की कळवा !