माझ्या नवर्‍याची...

कथा नवर्‍याच्या खरेदीची


माझ्या नवर्‍याची.........


" तू कितीही वेळा विचारलेस तरी माझे उत्तर नाहीच असणार आहे." अवनी ठामपणे सुजयला सांगत होती.

" असं ग काय करतेस? तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण जवळचं?" सुजय गयावया करत होता.

" त्यासाठी एखादी जवळची शोधलीस तरी चालेल मला. पण मी तुझ्यासोबत येणार नाही म्हणजे नाही."

" किती कठोर, निर्दयी आहेस तू.. श्शी.. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. बाकीचे नवरे बघ बायकांना बाहेर न्यायला घाबरतात, रडतात, भांडतात.. आणि मी.. इथे तुझ्या पाया पडतो आहे, विनवण्या करतो आहे.. हे देवी प्रसन्न हो. चल माझ्या सोबत.. तर तू दातारशास्त्रींच्या कथेतली पाषाणहृदयी स्त्री झाली आहेस." नाटकीपणे सुजय बोलत होता.

" तुझं बोलून झाले? बाजूला हो. मला स्वयंपाक करायचा आहे. मुले आत्ता खेळून येतील आणि भूक भूक म्हणून रडतील. त्यांना काय सांगू? " अवनीने तिचा बाणा सोडला नाही.

" हे तुझे फायनल आहे?" सुजयने आपला पवित्रा बदलला.

" शंभर टक्के.." पण बोलताना आपले शब्द डळमळीत झाल्यासारखे तिला वाटले.

" ठीक आहे. मी जातो एकटाच. पण येताना मी बघ तुझ्यासाठी काय आणतो ते." हे शब्द ऐकताच इतका वेळ वाघीण असलेली ती भिजलेली उंदरीण झाली.

" तू तुझ्यासाठी काहिही कर.. मला नको ना ओढूस.." ती कळवळली.

" असं कसं.. असं कसं.. मी तुला प्रेमात विचारत होतो तेव्हा नाटक केलेस.. आता बघच मी काय करतो ते."

" ठीक आहे. येते मी तुझ्यासोबत. पण एका अटीवर.." अवनीने पुरती शरणागती पत्करली.

" कसली अट?"

" हेच की.. मागच्या वेळेस जसं वागलास.. तसं वागायचे नाही.."

" काय वागलो मी?" सुजयने विचारले.



असा काय वागला असेल सुजय, ज्यामुळे अवनी नकार देते आहे सुजय सोबत जायला, ते बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all