माझ्या लेखणीचा प्रवास

माझ्या लेखणीचा प्रवास
आयुष्यात पहिल्यांदाच लेखन म्हणून लिपिवर लिहिलं २०१९मध्ये, लिपीची खूप सोबत मिळाली जेव्हा मला पुण्यात आल्यावर एकटेपणा जाणवायचा. मी आयुष्यात पहिल्यांदा एक कविता लिहिली ज्ञानोबा माऊली वर, त्यानंतर माझ्या अतरंगी आजी वर एक सत्यकथा लिहिलेली पण आई वगैरे वाचतात म्हणून काढून टाकली. मग मी दिल दोस्ती ची खूप मोठी फॅन असल्याने मधुमालती कादंबरी लिहायला सुरुवात केली. तिची अफाट वाचक संख्या आणि चांगल्या समीक्षा बघून मी माझ्याच लेखनाच्या प्रेमात पडले. ऑफिस मध्ये जाताना आणि येताना जितका वेळ मिळतो तितका वेळात जितकं सुचतंय तितकं लिहू लागले. बऱ्याचदा पुढे काय लिहावं याचा विचार करण्यात देखील खूप वेळ जायचं. जितका विचार प्रॉडक्ट डिझाईनचा  करत नाही तितका दिवसभरात कथेचा विचार असतो. खरतर वाचनाची प्रचंड आवड आहेआणि जरा चांगलं. मनाजोग वाचलं की प्रसन्न वाटत. मग लिहायला ही हुरूप येतो. त्यामुळे एक वाचक म्हणून सुद्धा मला लिहिलेलं आवडायला हवं, याचा ही स्पेशली खूप विचार करत असते. थोडं गचाळ असत लिखाण असत माझं पण हळू हळू थोडं सुधारू लागलंय.

घर , जॉब , इतर अनेक कारणांमुळे वेळेअभावी सगळ्या उपक्रमात सहभागी होता येत नाही. पण तरीही मी अलमोस्ट सगळ्याच (एखादी सोडली तर) स्पर्धेत भाग घेते. त्यामुळे जरा साहित्य पान तयार होत आणि लेखनात बरीच प्रगती झाली आहे.

इथे वेगवेगळे साहित्य प्रकार, कविता प्रकार इथे आल्यावर समजले. नाहीतर पूर्वी फक्त साध्या मुक्तछंद मध्ये कविता लिहीत होते. जे कथा प्रकार हाताळायची भीती वाटायची ते इथे अगदी युज टू झाले. याच अर्थ असा नाही की मी खूप भारी लिहिते. उलट मला अजून सुधारना करायच्या आहे लेखनात. खूप वेळा प्रयत्न करून ही काही सुचत नाही आणि मग कुंजच्या उपक्रमामुळे आयडिया मिळते की आता मला काय लिहायला हवं. जे जॉनर मी कधीच ट्राय केले नव्हते ते सुद्धा लिहिले.

वेगवेगळ्या उपक्रमामुळे लिखाणाला नवनवीन विषय मिळाले. मान्यवर लोकांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी पार्थ सरांमुळे इरा बद्दल देखील समजलं. त्यानंतर इरावरही लेखन करू लागले. आणि त्यात झालेल्या एक स्पर्धेत पार्थ सरांच्या ग्रुप मध्ये मला एन्ट्री मिळाली आणि फायनली संघ देखील जिंकला आणि एक शेवटच्या स्पर्धेत ज्यात ऑन दि स्पॉट लेखन होत की , ऑनलाइन विषय दिला आणि स्व-हस्ताक्षरमध्ये आम्हाला कमी वेळात आणि निर्दोष आणि सुंदर लेखन लिहायचं होत त्यात मला प्रथम क्रमांक मिळाला आणि संघ देखील विजयी झाला.

माझ्या लेखिका मैत्रिणी मधु आणि वृषालीचे विशेष आभार की त्यांनी मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, त्यामुळे माझ्या साहित्यातही बऱ्यापैकी वाढ झाली शिवाय निर्दोष लिहिण्याचा प्रयत्न करू लागले. सोबतच संजना मॅडम चे सुद्धा खूप खूप आभार कि ते इरावर वेगवेगळ्या स्पर्धा यशस्वीपणे राबवत आहे. आपल्या प्रत्येकाच्या लेखणीला धार दिली.

चॅम्पियन ट्रॉफी नंतर राज्यस्तरीय मध्ये ही बऱ्यापैकी साहित्य लिहिलं गेलं आणि English blogger स्पर्धेत ही सहभाग घेऊन पहिल्यांदाच 10 भागाची इंग्रजी कथामालिका लिहिली. अनायासे त्यात जास्त स्पर्धक नसल्याने अर्थातच तिथे ही तिसरा क्रमांक मिळाला.

आता ही अपेक्षा आहे कि आमचा संघ विजेता होऊ शकतो. आणि त्यांदृष्टीने सगळे खूप मेहनत घेत आहेत. अर्थात जॉब, घर, मुलं सांभाळताना सगळ्यांची दमछाक होते पण जिंकण्याची जिद्द मात्र प्रत्येक स्त्रीमध्ये ठासून भरलेली असते. मग स्पर्धा घर पातळी वर असो, वा जगस्तरीय..!!!
काम काहीही असो, आमच्यात उत्साह फार दांडगा असतो मग यश मिळो ना मिळो!!
'आरंभ हैं प्रचंड' च्या ओळी खूप स्फूर्ती देऊन जातात.

कृष्ण की पुकार है
ये भागवत का सार है
कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है!!
कौरोवों की भीड़ हो या
पांडवों का नीड़ हो!
जो लड़ सका है
वो ही तो महान है!!

जीत की हवस नहीं
किसी पे कोई वश नहीं
क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो!
मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यूँ डरें
ये जाके आसमान में दहाड़ दो!!

आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो!
आन-बान शान या कि जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो!!

आरंभ है प्रचंड..