Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

Read Later
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण


स्पर्धा : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग
शीर्षक : माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणआजपर्यंत माझ्या आयुष्यात कुठलाच अविस्मरणीय, उल्लेखनीय प्रसंग आला नाही. त्यामुळे मी आईला विचारले की, तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग मला सांग. आधी तिने थोडी नकारघंटा लावली पण मी हट्ट केला आणि मग तिने मला तिच्या आयुष्यातला असा प्रसंग सांगितला तो ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. आई तिच्या आयुष्यातला चित्तथरारक अनुभव सांगू लागली आणि मी भारवलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होते.

“तुझ्या दादाच्या वेळी मला आठवा महिना सुरू असतानाच पोटात खूप दुखू लागले. मला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अजून माझे दिवस भरले नव्हते पण मला खूप त्रास होत होता. हे बघून डॉक्टरांनी सिझेरियन ऑपरेशन करायचे ठरवले पण ऑपरेशन करण्याआधी डॉक्टर म्हणाले की,

"आम्ही आई किंव्हा बाळ ह्या दोघांपैकी एकाचाच जीव वाचवू शकतो."

ते असं म्हणाल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली पण सुदैवाने ऑपरेशन झाल्यानंतर मी आणि बाळ दोघेही सुखरूप होतो.”

आईने तिचा हा अविस्मरणीय प्रसंग मला सांगितल्यानंतर तो माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय क्षण झाला कारण कदाचित आज माझा मोठा भाऊ किंवा आई ह्या जगात नसती पण सुदैवाने ते दोघेही आहेत.

©कोमल पाटील.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Komal Patil "कृषीकन्या"

कृषी कन्या?

//