माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 6
श्रद्धा मीना बाजूला उभ राहून बोलत होत्या. आदर्श श्रेयस सोबत बोलत होता. त्याने या दोघीं कडे बघितल.
"मीना ना तू? "आदर्शने ओळखल.
"हो सर."
" हे प्रकार करता का तुम्ही दोघी? तू सपोर्ट केला का हिला? मी किती शोधेल हिला. किती त्रास झाला. का अस केल? " आदर्श चिडला.
" नाही सर. "
" तुम्ही सोबत कश्या? पोलिसात देवू का तुला? इतके वर्ष माझी आणि माझ्या बायकोची मुलाची ताटातूट केली. काही वाटत नाही का? मीना पटकन बोल आणि तू श्रद्धा तुला समजत नाही. कोणी दिली होती ही आयडिया? काय अस वागतेस. " आदर्श चांगला ओरडला.
मीना घाबरली होती. ती श्रध्दा कडे बघत होती. "नाही सर मी काही नाही केल."
"मग कोणी केल हे? मला फक्त समजायला पाहिजे. नाही त्या व्यक्तीला बरबाद केल ना तर मी आदर्श नाही. "
"तुमच्या घरच्यांनी केल ." श्रद्धा जोरात बोलली. "तुम्ही का बोलता आहात मीनाला. तिने नाही ताटातूट केली. तिने मला सपोर्ट केला. नाहीतरी माझ काय झालं असत माहिती नाही. तुमच्या घरच्यांनी लहान बाळा सकट मला रात्रीच घरा बाहेर काढल होत. चालत पाच किलोमीटर हिच्या घरी गेले. तेव्हा कुठे होते तुम्ही? अजून घरच्यांना निरोप दिला होता की श्रद्धाला सांग मला तुझ तुझ्या आणि तुझ्या पोराच तोंड ही बघायचं नाही. ही आली माझ्या मदतीला मला गुंडांच्या तावडीतून सोडवल. कदाचित त्या दिवशी मला त्या गुंडांनी जिवंत सोडल नसत. मला सहा महिने नोकरी नव्हती. श्रेयस लहान होता. हिने सांभाळल. श्रेयसच केल. तो खूप आजारी होता. अॅडमिट होता. त्याच हॉस्पिटलच बिल भरल. नाहीतर माझ काय झालं असत काय माहिती? एवढ करून काय ऐकायला मिळाल बिचारीला. सॉरी मीना. यांना काही माहिती नाही. त्यांनी अस नव्हत बोलायला पाहिजे. "
आदर्श ऐकत होता. तो आश्चर्याने मीना कडे बघत होता. तिने हो सांगितल.
" पण कोणी घरा बाहेर काढले तुला? " आदर्शने विचारल.
" तुमच्या आईने, काकूने." श्रद्धा बोलली.
"ते शक्य नाही."
"काही हरकत नाही. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवु मला ते प्रूव्ह नाही करायच. आता मला यात पडायच नाही. तुम्हाला खर वाटो की न वाटो मला आता काही फरक पडत नाही. मी काय सहन केल माझ मला माहिती. आम्ही जाणार आहोत इथून आणि कोणी आम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही श्रेयसला भेटून घ्या. आणि हो जेव्हा केव्हा यायच असेल माझ्या घराचे दरवाजे तुमच्या साठी उघडे असतिल. श्रेयसचे बाबा म्हणून. "
" श्रद्धा एक सांग, तुला कोणी सांगितल की मला तुझ आणि श्रेयसच तोंड बघायच नाही. "
" तुमच्या काकूने. "
" मी अस कधी बोललो नाही. तू मला फोन का नाही केला." आदर्श बोलला.
"केला होता. तुम्ही उचलला नाही. तुम्ही ही माझ्या वर रागवून कुठे तरी गेला होता ना. "
"नाही तुझ्या वर रागवून नाही कामा साठी फॉरेनला गेलो होतो. तुला सांगितल नव्हत का. "
"नाही. त्या आधी आपल भांडण झालं होत ना. " श्रद्धा च्या चेहर्यावर दुःख होत.
"आता विसरता येणार नाही का या गोष्टी श्रद्धा. मी काय करू तू सांग. "
" काही करू नका. मी आता खूप पुढे निघून गेली आहे. "
" श्रद्धा काहीही झाल तरी आपण सोबत राहणार आहोत. अस बोलू नकोस. " आदर्श हट्ट सोडत नव्हता.
या गोंधळात श्रेयस घाबरून मीना कडे पळत आला. तिच्या जवळ अंग चोरून बसला होता.
"श्रद्धा अग हळू बोल श्रेयस घाबरला आहे ." मीनाने त्याला जवळ घेतल.
आदर्शने तिच्या कडे आला त्याने श्रेयसला घेतल. "चल आपण खेळू. मी तुला खाऊ देतो." ते तिकडे गाडी गाडी खेळत होते. आदर्श त्याच्याशी बोलत होता. छान सांभाळत होता.
"आता काय मीना? मला नाही रहायच यांच्या सोबत. हे मला जावू देत नाही. काय करू." श्रद्धाला टेंशन आल होत.
"एक काम कर तू नीट बोलून घे सरांशी. काय म्हणण आहे ते स्पष्ट सांग. मी बाहेर आहे." मीना बोलली.
"नाही तू नको जाऊ. काय बोलणार मी त्यांच्याशी. मला परत त्या घरी जायच नाही. अंगावर काटा येतो. धोका आहे तिकडे. माझा श्रेयु मला हवा आहे. काही तरी कर ना मीना. श्रेयुला त्यांनी न्यायला नको."
" मला नाही वाटत ते त्याला नेतील. "
" अरे तू येण्या आधी पोलिसात फोन केला होता मला अॅरेस्ट करायला. चिडले होते माझ्यावर. " श्रद्धा हळू हळू बोलत होती.
काय?
" हो ना. मी श्रेयू कुठे आहे ते सांगत नव्हते ना म्हणून बोलले तुला पोलिसात देतो. श्रेयसला घेवून जातो. परत कधी भेटू देणार नाही. मीना त्यांनी खरच अस केल तर. मला भीती वाटते. त्यांना विचार ना आम्हाला का त्रास देताय. माझ ऐकत नाही ते. श्रेयुला ते घेवून गेले तर माझ काय होईल."
" माझ पण ग. माझा पण बाळ आहे तो. " मीना पण काळजीत होती.
" आता काय करू या?"
"शांततेत घे थोड. "
मम्मी.. श्रेयस हाक मारत होता. "हे खाऊ का? "
त्याला खूप चॉकलेट मिळाले होते.
त्याला खूप चॉकलेट मिळाले होते.
" हो थोड खा. "
" मीना, श्रद्धा प्लीज इकडे येवून बसा." आदर्शचा आवाज आला.
"मी बाहेर थांबते सर." मीना निघत होती.
"मीना एक मिनिट. आय एम सॉरी. मी अस विचार न करता तुला बोलायला नको होत. थँक्स तू श्रद्धाला सपोर्ट केला. आपण उद्या मुंबई वापस जातो आहे. तुझ सामान घेवून ये."
"मी का सर?"
"तू परत कंपनी जॉईन कर. तुझ्या सारखी हुशार इंजिनिअर हवी आहे आम्हाला. तुला फ्लॅट देतो इथे एकटी राहू नकोस. श्रद्धाला श्रेयुला तुझी गरज आहे चल तिकडे. राग आला असेल तर तू मला बोलू शकतेस. "
" नाही सर मी ठीक आहे. सर मी उद्या फोन करते. मला लगेच येता येणार नाही. मला एका महिन्याचा नोटिस पीरेड आहे. मी सांगते तुम्हाला तस. मी निघते आता. "
" ठीक आहे आपण तुझ्या कंपनीत पैसे भरून टाकू डोन्ट वरी. तयारीला लाग. " आदर्शने डीसिजन घेवून टाकल.
" मावशी कुठे चालली. मी येवू का? "श्रेयस विचारता होता.
"मी उद्या येते बेटा."
" गार्डन मधे जायच होत ना? " श्रेयस तिच्या जवळ आला.
" हो जावू आपण दोघ आणि पिझ्झा पार्टी पण फिक्स." दोघ हसत होते.
" श्रद्धा मी येते उद्या फोन करते."
" थांब ना मीना नको ना जावू. " श्रद्धा अजुनही तिला विनंती करत होती.
" मी कशी राहणार तुमच्या दोघात. आणि सर शांत वाटत आहेत. काळजी करू नकोस."
" ते काय म्हटले उद्या मुंबईला जायच. नाही मला नाही जायच. " श्रद्धाला टेंशन आल होत.
" बोलून बघ तस. "
" ठीक आहे. "
" सर मी येते." मीना आदर्शला सांगत होती. तो उठला तिच्या बरोबर बाहेर आला.
" संग्राम मीनासाठी टॅक्सी बूक कर."
ती गेली.
श्रेयस छान खेळत होता.
"पुरे झाल एवढ चॉकलेट खायच नाही. " श्रद्धा बाकीचे चॉकलेट नीट ठेवत होती.
" ओके मम्मी. "
" काय जेवणार तू श्रेयस पिझ्झा ? "
" हो ये.... थॅन्क्यु अंकल."
" नाही अजिबात नाही. पोळी भाजी खायची."
" दोन वर्षानी भेटला मला माझा मुलगा. थोडे तर लाड करू दे. नंतर शिस्त लाव. आणि श्रेयस मी तुझा डॅडी आहे." आदर्श आनंदाने बोलला.
तो खेळता खेळता थांबला. श्रद्धा कडे बघत होता." मम्मी हा डॅडी आहे? "
" हो बेटा. "
" माझा डॅडी?"
" हो आणि मोठ्यांना अहो म्हणाव. "
आदर्शला छान वाटल. एवढ्या रागात ती मुलाला चांगल शिकवत होती.
" श्रद्धा म्हणू दे त्याला मला हव ते. मी तुझा डॅडी. आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. " आदर्शने त्याला जवळ घेतल. श्रेयस खूप खुश होता. खूप लाड होत होते.
" एक मिनिट आदर्श. तुम्ही त्याला काहीही सांगू नका. श्रेयु नीट वाग. मोठ्यांना अहो म्हणाव. "
" श्रद्धा तू काय खाणार? " आदर्श तिला मेनू कार्ड देत म्हणाला.
"काही नको. मला जायच आहे इथून. "
"आता तुला इथून कुठे जाता येणार नाही. उद्या आपण घरी जाणार. हो ना श्रेयू. मम्मी, डॅडी, श्रेयु हॅप्पी फॅमिली. "
"नाही मी आणि श्रेयस कुठे ही जाणार नाही. आम्ही आमच्या घरी जाऊ. आम्हाला मुंबईला यायच नाही. तुम्ही वाटल तर येत जा इकडे. मी तुमच्या पासून काही लपवणार नाही. " श्रद्धा बोलली तर खर. पण तिला माहिती होत हे ऐकणार नाहीत. पण त्या घरी वापस जायच तिच्या अंगावर काटा आला होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा