माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 40
काका ,काकू ,प्रभाकर राव, मोहिनी ताई एका जागी बसलेले होते. मोहिनी ताई रडत होत्या. बाकीचे त्यांना समजावत होते.
" उद्या सकाळी बघू काय करायचं आहे ते. वहिनी जा तुम्ही आराम करा. टेंशन नका घेवू." काकू बोलल्या.
"हो मोहिनी तू झोप जरा वेळ. चल बर आत." प्रभाकर राव बोलले.
"अहो तुम्ही आदर्शला फोन करा ना." मोहिनी ताई बोलल्या.
"होईल सगळ पण आता नाही. उद्या सकाळी तू शांत हो."
आशा काकू पाणी घेवून आल्या. "त्या पोरीमुळे वहिनींना खूप त्रास होतो आहे. "
" हो ना मला ती पोरगी या घरात नको आता. हिला घराबाहेर काढा. " त्या परत चिडल्या.
"नाही आता असं काही करता येणार नाही. तिचे काहीतरी कारण असतील त्या मागे. ती म्हणते आहे ना काहीतरी सांगायच आहे. आदर्श आल्यानंतर बोलू आपण सगळे. आता तो तिकडे बिझी आहे. जाऊ दे एक दोन दिवसांची गोष्ट आहे." प्रभाकर राव बोलले
दुसऱ्या दिवशी आदर्शचा फोन आला. श्रद्धा रडवेली झाली होती. "काय झालं आहे. तब्येत ठीक आहे ना? "
" मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. "
" आता नाही श्रद्धा. मी खूप बिझी आहे. मीटिंग सुरू होईल एका मिनिटात. " आदर्श घाईत होता.
" तुम्ही नेहमी एवढ्या घाईने का फोन करता." ती थोडी चिडली.
"आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली. तेच सांगायला फोन केला होता. मोठी मीटिंग आहे. त्या आधी तुझ्याशी बोलावस वाटल. "
"ऑल द बेस्ट. "
"थॅन्क्स. तू काळजी घे. श्रेयश कसा आहे?"
" ठीक आहे. तुम्ही कधी येणार आहात? "
"मी येतो आज रात्री घरी मग आपण बोलू. आराम कर तो पर्यंत. "
हो.
दिवसभर श्रद्धा रूम मध्ये होती. सुलभा असल्यामुळे तिला जेवायला तरी मिळालं. रडून रडून ती अर्धी झाली होती. पण सुलभा तीला समजावत होती. "मॅडम खूप रडु नका. नाही तर अंगावरचे दुध आटत. असं काही करू नका. बाळ लहान आहे. "
ती गप्प झाली. श्रेयु साठी तब्येत सांभाळायला हवी.
तीने जेवून घेतलं. आपण काय एवढा त्रास करून घेतो आहोत. आपली काही चुकी नाही. रूपा म्हणून मी तिथे काम करत होती. पण कुठल्या परिस्थितीत हे माझं मला माहिती आहे. ज्यांना जे बोलायच असेल माझ्या विषयी ते बोला. मला माहिती तेव्हा काय परिस्थिती होती. जास्त विचार करायचा नाही.
आई तू का एवढ्या लवकर गेलीस? तुझ्या लेकीला तुझी गरज आहे. ती अगदी एकटी पडली ग. मला कोणाकडे जायला जागा नाही. खूप कंटाळली आहे मी. आई ये ना परत. खरच मुलींसाठी माहेर महत्वाच असत. तो एक आधार असतो. ती परत रडत होती.
"मॅडम शांत व्हा. झोपा बर थोड." सुलभा लक्ष देवून होती.
रात्री आदर्श आला. जेवण झाल. श्रद्धाचा चेहरा उतरलेला होता. तो बघत होता. "श्रद्धा शांत पणे सांग काय झालं ते. "
त्याला मोहिनी ताईंनी आत बोलवलं. "श्रद्धा मी आलोच पाच मिनिटात."
तो आत गेला. प्रभाकर राव, मोहिनी ताई बसलेले होते. "काय झालं आई? मी खूप थकलो आहे झोपतो."
"नाही मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायच आहे. "
आत्ता?
" हो. ही मुलगी कोण आहे?"
"कोणा बद्दल बोलते आहेस तू? " आदर्शला वाटल आई अस काय बोलते आहे.
"श्रद्धा. ती आधी रुपा म्हणून काम करायची का हॉटेल मधे?" मोहिनी ताई बोलल्या. काका, काकू येवून बसले.
काय सुरू आहे हे. आदर्श वैतागला होता. "आई त्याला काही कारण आहेत. तुला कोणी सांगितल हे?"
"हे खर आहे का ते सांग आधी. की ती आधी हॉटेल मध्ये कामाला होती. रुपा खर नाव आहे हीच. आदर्श या पोरीने धोका दिला आपल्याला .तिला घराबाहेर काढ. अश्या नाचणार्या मुली नको. आपल घराण काय? तुमच काय सुरू आहे? हे मला पटल नाही ."
"आई शांत हो श्रद्धा बद्दल काहीही बोलू नकोस. ती तशी नाही साधी आहे ."
"आता तरी डोळ्या वरची पट्टी काढ. किती त्या पोरीला पाठीशी घालणार. "
"हो आई ति हॉटेल मधे कामाला होती. तिने काही चुकीच केल नाही. आईच्या ट्रीटमेंट साठी पैसे घेतले होते त्यासाठी तिला तिथे काम कराव लागल. ते ही थोडे दिवस." आदर्श बोलला.
" आम्हाला हे आधी का नाही सांगितल. सगळीकडे पसरल म्हणजे. तुला कोणी बरी मुलगी भेटली नाही का?" त्या चिडल्या.
"बरी म्हणजे काय आई? काय दोष आहे तिच्यात. श्रद्धा एकदम चांगली जबाबदारी घेणारी मुलगी आहे. ती तिच्या आई साठी हे करत होती. मी बघितली आहे तिची गरिबी, तिची परिस्थिती. तिची आई सिरियस होती. आईला वाचवायच हेच तिच्या मनात होत. नाही सुचलं तिला. त्यात तिला कोणाचा आधार नव्हता. सतीश नानांनी वेळेवर पैसे दिले. ते पैसे वापस करायला ती तिथे काम करत होती. मला सगळं माहिती आहे. खूप त्रासातून गेली आहे ती. माझ्या समोर तिची आई वारली." आदर्श सांगत होता.
"तिने गोड बोलून तुला गुंडाळून ठेवल आहे. "
" आता नको ना तो विषय. श्रद्धा मधे काही प्रॉब्लेम नाही. ती बार डान्सर नाही. आणि ज्या मुली हे काम करतात त्यांच्यावर घराच्या पालनपोषणाची जबाबदारी असते. कर्ज असत. हौस म्हणून कोणी करत नाही हे. मला रीस्पेक्ट आहे त्यांचा. त्यावर त्यांच घर अवलंबून असत. पोटासाठी ते काम करतात. "
एवढ सांगून सुध्दा . सगळे नाराज होते.
" मी जातो. श्रद्धाने काही केल नाही तुम्ही पण मनातून हे काढून टाका. " आदर्श रूम मध्ये वापस आला. तो श्रद्धा कडे बघत होतं. श्रद्धा रडत होती." तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? "
"आदर्श मी इतके दिवस तुम्हाला सांगितलं नाही. पण मला आता इथे राहणं शक्य नाही. आपण परत आपल्या बंगल्यावर वापस जायचं का?" श्रद्धा बोलली.
"घर म्हटलं की भांडण गैरसमज होणारच. मी समजवलं आहे आई-बाबा, काका काकूंना. काळजी करण्यासारखं कारण नाही."
"आहे. काळजी करण्यासारखं कारण आहे. मला इथे त्यांच्यासमोर राहता येणार नाही. सगळे मला खूप बोलतात. " श्रद्धा अजूनही रडत होती. तिच्या कडेवर श्रेयस होता. सुलभा तिच्या बाजूच्या रूम मधे झोपायला गेली होती.
" त्यांना अचानकच हे तुझं हॉटेलच्या कामाचं समजलं ना म्हणून ते चिडले. मी पण सुरवातीला ओरडलो होतो तुला. पण सत्य समजल्यावर मी आज पर्यंत काही बोललो का तुला?" आदर्श तिला समजावत होता.
" नाही. तुम्ही चांगले आहात. पण तुमच्या सारखे तुमच्या घरचे नाहीत. ते एकंदरीतच मला पसंत करत नाही. ते नेहमी माझ्यावर चिडलेले असतात स्पेशली आई आणि काकू. हे मी तुम्हाला कधी सांगत नाही. तुम्ही प्लीज मला समजून घ्या मला इथे राहायचं नाही. "
आदर्श सोफ्यावर जावून बसला. " घरातल्या मोठ्या लोकांना असं बोलायचं नाही श्रद्धा. आता यापुढे आपल्याला वेगळ रहाता येणार नाही. आपल्याला इथेच राहायचं आहे. इथून दुसरीकडे रहायला जायचा विचार करायचा नाही. आपण मोठे आहोत आपल्याला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. आकाश, अदिती आपण वागू तस शिकतील. घरच्यांना अचानक समजलं तु हॉटेलमध्ये कामाला होती म्हणून त्यांना धक्का बसला. ते लोक बोलणारच. "
" नाही आदर्श तुम्हाला समजत नाही आहे. काही गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही. मी इथे राहायला आले त्या दिवसापासून आई मला त्रास देत आहेत. खूप बोलतात. मला मुश्किल झाल आहे. खूप मानसिक त्रास होतो. मला इथून जायचं आहे. "
" काय बोलते आहेस तू श्रद्धा? तुला समजतं का. सेपरेट रहायला अजिबात जमणार नाही. एकत्र राहायच सगळ्यांना सांभाळून घ्यायच. मी परत एकदा सांगतो हा विचार सोड. आई तुझी किती काळजी घेते मला दिसत नाही का? आता ती चिडली आहे. तू शांत पणे बोल तिच्याशी. माफी माग. होईल ठीक. "
"मी बोलणार नाही त्याच्यांशी. मी सांगते आहे ना आदर्श की त्या तुमच्या समोर वेगळं वागता आणि माझ्याशी वेगळं वागतात. थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवा." श्रद्धा चिडली होती आदर्श का ऐकत नाही माझ.
" हे जे तुझ्या मनात चाललं आहे ना ते सगळं काढून टाक. तुला काही काम नाही म्हणून तुझं डोकं भलती कडे चालत. सगळ्यांना सांभाळून घ्यायचं नीट वागायचं तर तुला सारखं असं वाटतं इथून जायला हवं. मला हे अजिबात चालणार नाही. यापुढे असा विचार करायचा नाही समजलं का? मूर्खासारख काहीही बोलशील तर माझ्याहून कोणी वाईट नाही. या पुढे आईशी नीट वागायच. मोठ्यांना मान द्यायचा. तिच्या बद्दल एक ही वाकडा शब्द मी ऐकणार नाही. "आदर्श चिडला होता.
" तुम्ही ही माझ्या वर चिडा आता. तुम्हाला सगळ्यांना नेहमी मीच दिसते का नेहमी रागवायला . ते लोक माझ्याशी कसे हो वागतात ते दिसत नाही. एकदाही त्यांना म्हणत नाही की तू श्रद्धाशी नीट का वागत नाही. मला ना आता खूप कंटाळा आला आहे. उगीच केल हे लग्न. कोणी समजून घेत नाही. तुम्ही ही त्या लोकां सारखेच आहात." श्रद्धा एकदम बोलून गेली.
श्रद्धा... त्याने तिच्यावर हात उगारला. श्रद्धा घाबरली एकदम मागे सरकली. तिच्या कडे श्रेयस होता. ती पडता पडता राहिली. आदर्शने पटकन तिला धरल. ती बाजूला झाली. तो गप्प बसला. हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मूर्खपणा सुरू आहे. त्याने उशी घेतली आणि तो सोफ्यावर जाऊन झोपला.
श्रद्धा बराच वेळ जागी होती. ती विचार करत होती आता माझं कसं होणार? काही खरं नाही या घरात. त्या दोघी मला इथे राहू देणार नाही. आदर्श इथून जावू देणार नाही. मला जगावस वाटत नाही. काय करू काही उपाय सापडत नाही. ती श्रेयस कडे बघत होती तीच्या डोळ्यात पाणी होत. मी गेली तर या पोराच काय होईल. नाही मला अस करता येणार नाही. मला कधीच छान सुखी आयुष्य मिळणार नाही का?
यापुढे बहुतेक मला माझ्या बघावं लागेल. ठीक आहे आता तिने मनाची तयारी केली होती. आदर्शला नाही यायचं ना माझ्या सोबत. काही हरकत नाही त्यांना राहू दे त्यांच्या घरच्यांजवळ. माझा त्यांच्यावर राग नाही. मी यापुढे बघेन मला काय करायचं ते. तेवढी हिंमत आहे माझ्यात.
खूप गरीबी बघितली आहे आणि त्यातनं बाहेर कसं पडायच ते पण माहिती आहे. माझं आयुष्य आहे आता मलाच नीट करायला पाहिजे. बराच वेळ ती विचार करत होती. यातून काही मार्ग सापडत नव्हता.
एक आशा होती आदर्श कडून की तो समजून घेईल आणि इथून सुटका होईल. पण आता त्यांनीही स्पष्ट नकार दिल्यानंतर तिला काही सुचत नव्हतं.
जरा वेळाने ती झोपली सकाळी उठून आदर्श ऑफिसला निघून गेला. ती तिच्या रूम मध्ये होती नेहमीप्रमाणे आता तर बाहेर जायचं काहीही संबंध नव्हता. ती आत मधे सकाळ संध्याकाळचं जेवण घेत होती.
अदिती आत आली. "काय आहे हे वहिनी काय झालं नक्की?"
श्रद्धा तिला सगळं सांगत होती. आकाश आला. तो ही ऐकत होता.
"बापरे वहिनी किती सहन केल तु. आता चांगले दिवस आले तर त्यात ही किती त्रास." अदिती बोलली.
"आम्ही तुझ्या सोबत आहोत वहिनी. तू काही चुकीच काम केल नाही." आकाश बोलला.
"सासुबाई, काकू मला का समजून घेत नाही. "
" मी बोलून बघू का?"
"नको अदिती."
आदर्श खूप बिझी होता. रात्री उशिरा पर्यंत तो ऑफिस मधे थांबत होता. तो तिच्याशी बोलत नव्हता. तिने एकदा दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला. माफी मागितली. स्वतःहून त्याला मिठी मारली. पण काही उपयोग झाला नाही. तो फटकून वागत होता.
एक आठवडा गेला. नंतर श्रद्धानेही काहीच विषय काढला नाही. ती स्वतः बोलली नाही. तिच्या डोळ्यात सारख पाणी येत होत. ती अगदी एकटी पडली होती.
आज नेहमीपेक्षा आदर्श लवकर घरी आला. साडेआठ वाजले असतील. सगळे डायनिंग टेबलवर जेवत होते. श्रद्धा नव्हती. ती नेहमीप्रमाणे आत बसली होती. कोणीही तिला बोलवायला गेलं नाही. तीच बाकीच्यांशी पटत नाही म्हणून अदिती तिला आत जावून भेटून येत होती.
त्या दिवसानंतर ते चौघे तिच्याशी बोललं नव्हते की श्रेयसलाही भेटायला आले नव्हते. श्रद्धाला काही वाटल नाही. उलट शांत वाटत होत. बरेच दिवस झाले तेच सुरू होत घरात.
"श्रद्धा कुठे आहे?" आदर्शने विचारलं.
मोहिनी ताई. काकू एकमेकांकडे बघत होत्या.
" तुम्ही सगळे जेवता आहात. श्रद्धा कुठे आहे. तिला जेवायला का बोलवलं नाही." आदर्शने परत विचारल.
"ती आमच्यात मिक्स होत नाही. तिला बोलवलं तरी येत नाही. आमच्याशी बोलत नाही. चार-पाच दिवस झाले आम्ही तिला बघितलेलं नाही. ती बाळाला आमच्या कडे देत नाही. उलट उत्तर देते. तिची तिची रहाते." मोहिनी ताई बोलल्या.
"काय चाललं आहे हे या घरात. कोणीच कोणाला समजून घेणार नाही का? ती श्रद्धा तशी तुम्ही असे. "आदर्श चिडला.
"हे आम्हाला नाही तुझ्या बायकोला विचार." मोहिनी ताई बोलल्या.
आदर्श रागाने रूम मधे आला. श्रद्धा बसलेली होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा