माझ्या आयुष्यातील 'ती'

प्रत्येकाजवळ आपल्या लहानपणीच्या आठवणी आहेत....प्रत्येकाला लहानपणापासून खूप सारे मित्र मैत्रिणी भेटतात. काही लक्ष्यात राहतात तर काही विसरतात...... अशाच काही लक्षात राहिलेल्या मैत्रिणींबद्दल मी लिहीत आहे.


पंचवीस वर्षे मागे डोकावून पाहिलं तर आजही मला \"ती\" आठवते. देखणी, प्रिय, जिवलग, त्यावेळी मला जीव लावणारी, माझ्यासोबत खेळणारी बागडणारी, अगदी बिनधास्त, माझ्यासाठी भांडणारी, अगदी गुरुजींवर पण रागवणारी \"ती\".....\"ती\" म्हणजे माझी शाळेतील पहिली बालमैत्रिण.

काय दिवस होते ते........ आजही मी ते अगदी मोत्यासारखे जपून ठेवले आहेत. कारण हेच ते दिवस आहेत जे आज मला कोणत्याही परिस्थितीत आठवले की एक वेगळाच आनंद देतात. मनाची पाकळी खुलवतात, गालात खाली पडते आणि एक सुखद हलकीशी लहर आल्यासारखी वाटते. खूप काही देऊन जातात ह्या आठवणी वेगळ्याच जगात घेऊन जातात.

तर सांगायचं कारण म्हणजे....... त्यावेळी ती माझ्यासाठी खूप स्पेशल होती. आत्ताच्या चहाच्या कटिंग सारखी. आजही तिची आणि माझी पहिली भेट आठवते. तो आमचा शाळेचा पहिला दिवस होता. मला माझी आई शाळेत सोडण्यासाठी आली होती....... हातात एक छोटी छकाटी घेऊन. ती मस्त तिच्या वडिलांबरोबर हसत खेळत आलेली. मी जेव्हा गेटमधून आत गेलो तेव्हा तिचे वडील मस्तरांशी काहीतरी बोलत होते आणि ती बाजूलाच उभी होती. मी आपला रडवेला चेहरा घेऊन जरा लांबच उभा राहिलो. आईने गेटजवळूनच मस्तरला आवाज दिला.......मास्तर..... ह्याला घ्या........ लगेच मास्तर बोलले......."ये येरे बाळा......इकडे ये."........मी आजूबाजूला बघतो तोपर्यंत आई परत गेली होती....... मला आणखीनच घाबरल्यासारखं व्हायला लागलं..... मी तिथेच शर्टची कॉलर दातात धरून उभा राहिलो......... तिच्या वडिलांशी बोलून झाल्यावर मास्तरांनी मला आवाज दिला......."तू सतीशचा ना रे".......मी काहीच बोललो नाही....... मग तिचे वडील बोलले, बाळा ये..... अरे हे तुमचे गुरूजी आहेत...... हेच तुम्हाला शिकवणार, छान छान गोष्टी सांगणार...... मी फक्त पहातच राहिलो...... आजूबाजूला पोरं हिकडं तिकडं उड्या मारत होती...... मग तिचे वडील तिला म्हणाले, "सोनू त्याला एक चॉकलेट दे".......तसं तिने माझ्याकडे पाहिलं लगेच मी खाली मान घातली. तिने वडिलांकडे मान वळवली तसे ते बोलले, ".....दे.....अरे तो तुझा वर्गमित्र आहे...... एक दे.....संध्याकाळी घरी आल्यावर आणखी घेऊ आपण".....हे ऐकलं की.....तिने आपल्या खिशातून चॉकलेट काढली व मला दिली. मी खुश झालो तिच्याकडे बघून हसलो........ मास्तर बोलले....."जा आता खेळा तिकडे....... मी लगेच झालो.......तिचे वडील बोलले...... "बाळांनो भांडणं करायची नाहीत बरं....... जा बाळा जा.... तिकडे दप्तर ठेवा आणि खेळा.

त्यादिवसापासून माझी आणि तिची गट्टी जमली. मग एकत्र डब्बा खाणं...... एकत्र दुकानाला जाणं..... ज्याच्याकडे पैसे असतील त्याने चॉकलेट घेणं...... वाटून खाणं..... एकत्र येणं जाणं...... जो लवकर येईल त्याने दुसऱ्याची वाट बघत पाराजवळ बसणं.......
खूप मस्त दिवस होते ते...... ना आजची भीती ना उद्याची चिंता..........

तुमच्याही आयुष्यात अस काही घडलं असेल आठवा जरा.....

शाम भोसले

🎭 Series Post

View all