माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ८

This is a Love Story
भाग ८

संग्राम घरी गेला आहे. त्याला डोक्याला खूप लागल्यामुळे त्याला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला आहे त्यामुळे त्याचा आणि गार्गीचा युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेणं कॅन्सल झालं आहे. अशी जोर दार चर्चा कॉलेज कँपस मध्ये रंगली होती आणि ते ऐकून राजवीर मात्र मनोमन खुश होत होता. त्यातच गार्गी त्याला एक दिवस भेटली आणि म्हणाली.

गार्गी,“ मी थोडे दिवस घरी जाणार आहे.. त्यामुळे आपली भेट नाही होणार आणि मी गोव्याला ही नाही येणार!” ती म्हणाली.

राजवीर,“अगं पण का? काय झालंय अस आणि तुला युथ फेस्टिव्हलला तर यावेच लागेल गार्गी!” तो तिचा हात धरून म्हणाला.

गार्गी,“तो वेंधळा संग्राम पडून बसला की.. किती मेहनत घेतली होती मी या सगळ्यासाठी आणि मग आता कशाला येऊ गोव्याला?” ती नाराज होत म्हणाली.

राजवीर,“ ते ही आहेच म्हणा.. कसा काय पडला हा संग्राम काय माहीत खूप लागले आहे म्हणे त्याला! पण या सगळ्यामुळे तुमचा डान्स कॅन्सल झाला ना!” तो नाटकीपणे बोलत होता.

गार्गी,“ राजवीर तू तर काही केलं नाहीस ना? म्हणजे तुझा विरोध होता मला कारण मी संग्राम बरोबर डान्स करत आहे म्हणून!” तिने साशंकपणे विचारले

राजवीर,“ what? वेडी आहेस का तू? हो मला वाटत होते की तू संग्राम बरोबर डान्स करू नयेस! पण त्यात माझं तुझ्या बद्दल प्रेम होतं मी पजेसिव्ह आहे तुझ्यासाठी! तुला वाटलेच कसे की मी संग्रामला… छा काय अर्थ नाही माझ्या प्रेमाला आणि जगण्याला ही! तुझा माझ्यावर विश्वासच नाही तर!” ड्रामा करत म्हणाला.

गार्गी,“ sorry मी आपलं सहज विचारलं रे! माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे!” ती त्याला समजावत म्हणाली.

राजवीर,“ नाही तुला असे वाटलेच कसे ग?” तो कांगावा करत म्हणाला.

गार्गी,“ sorry ना! मी कँपसमध्ये कुजबुज ऐकली म्हणून... ” ती म्हणाली.

राजवीर,“ आणि तू या गोष्टीवर विश्वास ठेवलास?” तो तिला रागाने म्हणाला.

गार्गी,“ म्हणाले ना sorry माझ्या मनात शंका आली मी ती विचारली. याचा अर्थ माझा तुझ्यावर विश्वास नाही असा होत नाही मी तुला लोक तुझ्या बद्दल काय बोलतात ते सांगितले!ठीक आहे मी जाते” ती ही आता चिडून म्हणाली कारण राजवीरचा हा असा एकच गोष्ट लावून धरण्याचा आणि इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा स्वभाव तिला आता खटकू लागला होता.

राजवीर,“ ok ok! मला ना कोणी काही बोलू दे काही फरक पडत नाही पण तू काय बोलतेस, तुला माझ्या बद्दल काय वाटत याचा फरक पडतो गार्गी!” तो म्हणाला आणि त्याने तिला मीठी मारली.

गार्गीला मात्र त्याचं असं तिच्या जवळ येणं आवडत नव्हतं! राजवीर चा स्पर्श तिला अवस्थ करायचा.. त्याचं ते मिठी मारण, पाठीवरून हात फिरवणे तिला खूप uncomfortable वाटायचं! तेच संग्राम डान्स करताना तिच्या इतका जवळ असायचा तो तिला स्पर्श करायचा पण त्यात तिला आश्वासकता वाटायची! त्याच्या बरोबर ती comfortable असायची! गार्गी न कळतपणे संग्राम आणि राजवीरमध्ये तुलना करायची!

पण तिने आता ही हा सगळा मनातील विचार पाल झटकावी तसा झटकून दिला तिने स्वतःच्या मनाला बजावले.
“गार्गी संग्राम तुझा मित्र आहे आणि राजवीर तुझा बॉयफ्रेंड त्या दोघांची तुलना अशी तू करूच शकत नाहीस कारण दोघांचे स्थान तुझ्या आयुष्यात वेगवेगळे आहे!”

ती विचारातून बाहेर आली आणि स्वतःला राजवीर पासून दूर करत म्हणाली; “मी निघते राजवीर उशीर होईल मला!”

राजवीर,“ ठीक आहे पण गोव्याला तू येते आहेस & it\"s final!” तो म्हणाला.

गार्गीने नुसती होकारार्थी मान हलवली आणि ती निघून गेली.

★★★★

कॉलेजने युथ फेस्टिव्हलला जायला विद्यार्थ्यांसाठी दोन बसची व्यवस्था आणि राहण्यासाठी हॉटेल बुक केले होते. सात वाजता सकाळी लवकरच बस निघणार होती आणि सगळे त्या प्रमाणे कॉलेजमध्ये जमा झाले. सगळे विद्यार्थी बस मध्ये बसले. बस निघायची वेळ झाली तरी गार्गी अजून तरी आलेली नव्हती आणि राजवीर बसच्या बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता आणि तिला सारखा सारखा फोन करत होता पण गार्गी फोन उचलत नव्हती. त्याने या वेळी गोव्याला गेल्यावर गार्गीला त्याच्या जाळ्यात ओढून त्याला हवं ते साध्य करायचे ठरवले होते. पण, गार्गी अजून आली नाही म्हणून तो बेचैन होता. आता सात वाजले आणि बस निघणार तर गार्गी तिच्या भावा बरोबर तिथे पोहोचली आणि राजवीरचा जीव भांड्यात पडला. राजवीरने तिला हात केला आणि ती बॅग घेऊन बसमध्ये चढली. सगळे आलेत का याची खात्री प्रोफेसरर्सनी करून घेतली आणि गोव्याचा प्रवास सुरु झाला... मुबंई मधून गोव्याला जायला तेरा तास लागणार होते म्हणूनच कॉलेजने निघण्याची वेळ सकाळची निश्चित केली होती.

सगळे साधारण संध्याकाळी आठ वाजता गोव्यातील रिसॉर्टवर पोहोचले. रिसॉर्ट समुद्र किनाऱ्या लगत होता. गार्गी साक्षी बरोबर रूममध्ये गेली आणि लगेच फ्रेश होऊन गार्गी साक्षीला घेऊन समुद्र किनाऱ्यावर पोहोचली. तिला अथांग निळाशार समुद्र त्याच्या फेसळणाऱ्या लाटा खूप आवडत. राजवीर मात्र गार्गीला त्याच्या रूम पर्यंत कसे आणता येईल याची प्लॅनिंग करण्यात व्यस्त होता. गार्गी मात्र समुद्र पाहत वेगळ्याच विचारात गढली होती. उद्या म्हापसा बीचवर युथ फेस्टिव्हलची सुरवातच सिंगिंग आणि कपल डान्सने होणार होती. गार्गी आणि साक्षी थोड्यावेळ समुद्र किनारी बसून राहिल्या आणि जेवण करून झोपून गेल्या... दिवस भराच्या प्रवासाच्या थकव्यामुळे दोघींना ही पडल्या पडल्या झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बस म्हापसा बीचवर पोहोचल्या! समुद्र किनाऱ्या पासून थोड्या दूरवर एक भव्यदिव्य स्टेज उभा केला होता. दूर पर्यंत दोहो बाजूनी मोठंमोठ्या लाईटचे खांब उभे करण्यात आले होते. स्टेजच्या मागच्या साईडला मुलां-मुलींना तयार होण्यासाठी जवळजवळ पंधरा-वीस व्हॅनिटी व्हॅन आणि छोट्या छोट्या तात्पुरत्या ड्रेसिंग रूम उभ्या करण्यात आल्या होत्या. बऱ्याच कॉलेज मधून मुलं-मुली तिथे जमा झाले होते त्यामुळे तरुणांची जत्रा भरल्याचा भास तिथे होत होता. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यक्रम संध्याकाळी सहा पासून सुरू होणार होता. सगळे जवळच असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करून आले. सकाळ पासूनच तिथे छोट्या मोठ्या गेम्स आणि बरेच काही सुरू होत. त्यामुळे सगळ्यांचाच वेळ कसा मजेत जात होता. आसपास अनेक छोटे मोठे स्टॉल तिथे लागले होते जे वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे होते.. कुठे हॅन्ड क्राफ्ट तर कुठे, खाण्याचे पदार्थ, कुठे हॅन्डमेड बॅग अशा विविध वस्तू लक्ष वेधून घेत होत्या. गार्गी आणि साक्षी ते सगळं पाहण्यात गर्क होत्या आणि राजवीर इतक्या गर्दीत गार्गीला शोधून वैतागला होता. गार्गी मात्र लंच नंतर जी गायब झाली ती कोणालाच दिसली नाही. राजवीरने गँगला गार्गीला शोधायला पाठले पण ती कुठेच सापडली नाही.

या सगळ्यात संध्याकाळ कशी झाली कोणालाच समजले नाही... सहा वाजले आणि कार्यक्रम सुरू झाला. सुरवात दीप प्रज्वलित करून आणि गणेश वंदना आणि सरस्वती पूजन करून झाली. आता गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. एकसे बढकर एक परफॉर्मन्स सुरू होते आणि तरुणाई गाण्याच्या तालावर डुलत होती. पण राजवीरचे मात्र कशातच लक्ष नव्हते तो गार्गीला शोधत होता पण आता कार्यक्रम सुरु झाल्यामुळे ते शक्य नव्हते. तो गार्गीवर चांगलाच चिडला होता. ती दुपार नंतर कुठे गेली याचा त्याला विचार पडला होता. गाण्याचा कार्यक्रम आणि स्पर्धा आता संपत आली होती आणि कपल डान्स सुरू झाले होते. अँकर येऊन कॉलेज आणि जोडीचे नाव announce करून बॅक स्टेज कडे जात होता आणि एकसे बढकर एक दोन परफॉर्मन्स आता पर्यंत झाल्या होत्या. टाळ्या आणि शिट्याच्या आवाजाने सगळा आसमंत भरून गेला होता आणि तिसऱ्या कॉलेज आणि जोडीचे नाव announce करायला अँकर आला आणि तो म्हणाला.


“और अगली जोड़ी है संघवी इंजीनियरिंग कॉलेज से गार्गी और संग्राम की!” तो म्हणाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

पण राजवीर मात्र आश्चर्य चकित होऊन विस्फारलेल्या डोळ्यांनी स्टेजकडे पाहत होता. तर संग्राम आणि गार्गी त्यांच्या डान्सर सह स्टेजवर आले. गार्गीने ऑफ व्हाईट कलरचा सिल्कचा पाय घोळ ऑफ शोल्डर वनपीस घातला होता त्यावर त्याला साजेसे मोत्याचे नेकलेस, कानात मोत्याच्याच लोम्बत्या इअर रिंग्ज, एका हातात मोत्याचेच ब्रेसलेट ज्याला मोत्याच्या लटकन होत्या. केसांचा मेसी बन आणि काही बटा गालांवर रुळत होत्या. चेरी रेड लिपस्टिक आणि सुंदर मेकअप! एकंदरीत ती काटा दिसत होती. तर संगग्रामने ऑफ व्हाईट शर्ट आणि त्यावर मोती कलरचे ब्लेजर आणि तशीच ट्रावजर घातली होती. एका हातात मोठ्या डायलचे रोलेक्सचे घड्याळ, पायात फॉर्मल शूज, जेल लावून सेट केलेले केस आणि चेहऱ्यावर किलर स्माईल! पण कपाळाला बॅंडेज होती. एकूणच तो किलर दिसत होता. त्याच्या बरोबर बाजूने नाचण्यासाठी चार जोड्या होत्या. त्या मुलांनी ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशनचे कपडे घातले होते तर मुलींचे वन पीस ऑफ पिंक होते. डान्स सुरू झाला स्पॉट लाईट मध्ये संग्राम आणि गार्गी भान हरपून डान्स करत होते. गाणे वाजत होते.


तुमको पाया है तो जैसे खोया हूँ
कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ

तुमको पाया है तो जैसे खोया हूँ
कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ
किसी जबां में भी वो लफ्ज़ ही नहीं
के जिन में तुम हो क्या तुम्हें बता सकूँ
मैं अगर कहूँ तुम सा हसीं कायनात में नहीं है
कहीं तारीफ़ ये भी तो सच है कुछ भी नहीं

शोखियों में डूबी ये अदायें
चेहरे से झलकी हुई हैं
जुल्फ़ की घनी घनी घटायें
शान से ढलकी हुई हैं
लहराता आँचल है जैसे बादल
बाहों में भरी है जैसे चाँदनी रूप की चाँदनी
मैं अगर कहूँ ये दिलकशी है नहीं कहीं,
ना होगी कभी तारीफ़ ये भी तो सच है कुछ भी नहीं



दोघे ही म्युजीकल बॉल मधील बाहुला-बाहुली सारखे दिसत होते आणि इतका वेळ दंगा करणारा मॉब मात्र मंत्र मुग्ध होऊन त्यांचा डान्स पाहत होता. समोर बसलेले जज देखील भान हरपून डान्स पाहत होते. सगळेच मग्न होते पण एक व्यक्ती त्यांना असं डान्स करताना पाहून दात ओठ खात होती. ती म्हणजे राजवीर! शुभमला मात्र त्याला असं पाहून हसायला येत होतं तो त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि बोलू लागला.

शुभम,“ काय रे वीर भाई! प्लॅनिंग प्लॉटिंग फक्त तुलाच करता येते होय? ते आम्ही ही करू शकतो म्हणल! वाटलं नव्हतं रे की तू इतक्या नीच पातळीवर जाशील फक्त का तर आम्हा तिघांना म्हणजेच मला, गार्गीला आणि संग्रामला धडा शिकवण्यासाठी तू संग्रामाच्या जीवाशी खेळलास? तुझ्या विरुद्ध पुरावा नाही... नाही तर!” तो रागाने बोलत होता.

राजवीर,“ नाही तर काय रे?” त्याने रागानेच विचारले.

शुभम,“नाही तर इथे उभा राहून तू मला प्रश्न विचारत नसतास तर तुरुंगात असतास! गार्गीला तुझा खरा चेहरा माहीत नाही पण, ज्यावेळी तिला तो कळेल ना त्या दिवशी ती तुला सोडून गेलीच समज आणि हो गार्गी काय शिल्पा नाही की जिला तू फसवून तिचा फायदा घेशील she know her boundaries! बघच तिला तू जास्त काळ नाही फसवू शकणार!आता तुझ्या जवळ जरा पण स्वाभिमान असेल तर तुझं तोंड काळ कर!” तो रागाने राजवीरला पाहत म्हणाला आणि राजवीर त्याला काहीच उत्तर न देता रागाने निघून गेला.

पण संग्रामला लागल्यामुळे गार्गी आणि संग्रामची परफॉर्मन्स कॅन्सल झाला होता मग अचानक ते असे डान्स फ्लोअरवर कसे काय? ही शिल्पा कोण होती? राजवीर मात्र आता चांगलाच डिवचला गेला होता एवढे सगळे झाल्यावर तो गप्प बसेल का?
सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा.
©स्वामिनी चौगुले
क्रमशः

🎭 Series Post

View all