माझिया प्रियाला पर्व २ भाग १००

क्षितिजा अमोलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकेल का?


इकडे संजयरावांनी सुशांतला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि ते चौघे माथेरानला यायला निघाले. क्षितिजाने रूमचे दार लावून घेतले आणि ती अभिराजजवळ जाऊन बसली. त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत ती बोलत होती.

‛ मला मान्य मी चुकले पण त्याची इतकी मोठी शिक्षा मला आणि त्या ही पेक्षा स्वतःला का देत आहात सर तुम्ही? अमोली तुमच्या योग्य नाही. ती नक्कीच इथे काही तरी घातपात करायला आली आहे. मी ते शोधून काढेनच आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन.’ ती त्याच्या केसातून हात फिरवत मनात बोलत होती आणि अभिराजने झोपेतच तिचा हात धरला.अभिराज झोपेतच बोलत होता.

“माझं चुकलं. मी अंकूच ऐकायला हवं होतं…. मी नाही जगू शकत क्षिती शिवाय! तिला रोज समोर पाहून मी काय गमावत आहे हे मला आत्ता कळतंय पण आता खूप उशीर झाला आहे मी मागे हटू शकत नाही.” तो झोपेत बडबडत होता.त्याचे बोलणे ऐकून क्षितिजाला ही भरून आले तिने आवंढा गिळला आणि भरल्या आवाजात ती त्याचा हात धरून बोलू लागली.

“ राज तू नको काळजी करू तुझं मी त्या अमोलीशी लग्न नाही होऊ देणार आणि हो ती तुझ्या केसांना ही धक्का नाही लावू शकणार माझा शब्द आहे स्वतःलाच!” ती डोळे पुसून निश्चयाने डोळे पुसत म्हणाली.
★★★

रात्री दोन वाजता सुशांत, संग्राम, गार्गी आणि समिधा आले. आदिराज आणि राज्ञी खरं तर झोपलेच नव्हते ते अभिराजच्या रूमच्या बाहेरच बसून होते.चौघे ही धावतच तिथे आले अभिराज विषयी वाटणारी काळजी त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती.

संग्राम,“ अभी कसा आहे राज्ञी?” त्याने विचारले.

राज्ञी,“ तो ठीक आहे पण खूप घाबरला होता आणि त्यामुळे तापपण आला आहे त्याला.” ती म्हणाली आणि गार्गीने दार वाजवले. क्षितिजाने दार उघडले आणि सगळे आत गेले.


झोपलेल्या अभिराजजवळ संग्राम आणि गार्गी जाऊन बसले.त्याच अंग अजून ही तापाने भाजत होतं. संग्रामने मायेने त्याच्या कपाळावरून हात फिरवला.

संग्राम,“ राज्ञी अजून ही ताप आहे याला आणि हे झाले कसे?” तो काळजीने विचारत होता.

राज्ञी,“ सकाळपर्यंत होईल कमी ताप आणि …” ती पुढे बोलणार तर आदिराज बोलू लागला.

आदिराज,“ तुला खरंच काळजी आहे का डॅड त्याची? आणि मी सांगतो ना काय आणि कसे झाले ते.” तो मोठ्याने बोलत होता आणि अभिराज त्याच्या आवाजाने झोपेत दचकला. ते पाहून गार्गी म्हणाली.

गार्गी,“ आपण आमच्या रूममध्ये जाऊन बोलू. अभिला त्रास होतोय आदी!” ती म्हणाली आणि सगळे संग्राम-गार्गीच्या रूममध्ये गेले.

सुशांत,“असं तिरकस बोलण्यापेक्षा काय झालं ते सांग आदी!” तो म्हणाला.

आदिराज,“ तुमच्या होणाऱ्या लाडक्या सुनेमुळे झाले आहे हे! तिचे आणि भाईचे भांडण झाले आणि तिने भाईच्या हाताला झटका दिला. भाई तोल जाऊन पडला स्वीमिंग पूलमध्ये तर त्या मुलीने वळून पाहिले देखील नाही. गेली निघून. क्षितिजा तिथे पोहोचली म्हणून बरं तिने बाहेर काढले भाईला. आता ही एकदा पाहून गेल्या अमोली मॅडम भाईला, नंतर विचारपूस सुध्दा नाही.” तो रागाने तणतणत होता.

संग्राम,“ आदी आरे तिला काय माहीत की अभीला वॉटर फोबिया आहे. इट वॉज एन एक्सिडेंट!” तो त्याला समजावत म्हणाला.

आदिराज,“हो का? तिला माहीत नाही हे मी समजू शकतो डॅड पण तू तुला माहीत आहे की भाईचे क्षितीवर प्रेम आहे तरी तू त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून अमोलीबरोबर लग्न करायला भाग पाडत आहेस आणि वरून क्षितिजाला ही जबरदस्तीने इथे घेऊन आला आहेस. तुला साध्य आणि सिद्ध काय करायचे आहे रे या सगळ्यातून? तुला अशीच गुरुदक्षिणा वसूल करायची होती का त्याच्याकडून? की त्याची तू जबाबदारी घेतलीस लहानाचे मोठे केलंस त्याची वसुली करत आहेस त्याच्याकडून? उद्या माझ्याशी देखील असंच वागणार का तू?” तो जाब विचारण्याच्या सुरात बोलत होता.

सुशांत,“ हे कोणत्या भाषेत बोलत आहेस तू संग्रामशी आदी? माईंड युवर लँग्वेज!” तो रागाने म्हणाला.

आदिराज,“ अच्छा! मीच माईंड करायचे का? आणि हा तुझ्या पोराशी कसा वागतो ते तुला आणि आंटीला दिसत नाही का?की याच्या उपकाराचे पारडे तुझ्या मुलापेक्षा जड झाले?” त्याने रागाने विचारले.

गार्गी,“ काय सुरू आहे रे तुझं? कसा बोलत आहेस तू संग्राम आणि सुशांतशी?” ती रागाने म्हणाली.

आदिराज,“ओ मम्मा तूच राहिली होतीस गं बोलायची!तू तर इतकी तडफदार आहेस. तू भाईला मुलगा मानतेस? तुझं माझ्यापेक्षा त्याच्यावर प्रेम आहे म्हणे. त्याची होणारी कुचंबना त्याची तगमग तुला दिसत नाही का गं? की तू डॅडच्या प्रेमात इतकी आंधळी झालीस की तुला त्याच्याशिवाय काहीच दिसेनास झाले आहे.” तो तिला पाहत म्हणाला.

समिधा,“ तोंड आवर आ आदी आता खूप झाले. किती वेळ झालं तोंडाला येईल ते बोलत आहेस.” ती रागाने म्हणाली.

आदिराज,“ नाही म्हणजे भाई तुमचाच मुलगा आहे का गं आंटी की कचऱ्याच्या पेटीतून उचलून आणले आहे त्याला तुम्ही? म्हणून त्याच्याबरोबर कसं ही वागायची मुभा तुम्ही डॅडला दिली आहे. तो भाईच्या मनाचा, भावनांचा कसला ही विचार न करता त्याच्यावर हे लग्न लादत आहे आणि तुम्ही निमूटपणे सगळं पाहत आहात पण का?”

सुशांत,“ त्याच्यावर संग्राम लग्न लादत आहे? तू नशेत तर नाही ना आदी? अरे संग्रामनेच क्षितिजा आणि त्याला एकत्र आणण्यासाठी काय काय नाही केले. शेवटी क्षितिजाशी लग्नाचा प्रस्ताव पण त्याने त्याच्या समोर मांडला. पण अभीला तिच्याशी लग्न करायचेच नव्हते तो अडून बसला…” तो पुढे बोलणार तर आदिराजने त्याचे बोलणे मध्येच तोडले आणि तो बोलू लागला.

आदिराज,“ हो ना त्याने क्षितिजाशी लग्नाला नकार दिला म्हणून तुम्ही कोणती तरी मुलगी आणून जिला तो ओळखत ही नाही तिच्याशी त्याच लग्न लावून देणार का?फक्त आणि फक्त डॅडची इच्छा आहे म्हणून आरे जगू द्या की त्याला जरा, घेऊ द्या मोकळा श्वास! मी म्हणतो काय गरज काय लगेच त्याच लग्न करायची कदाचित थोडा वेळ त्याला दिला तर तो क्षितिजाला माफ करून होईल तयार लग्नाला पण नाही. तुम्हाला तर त्याच्या मनाची, त्याच्या भावनांची काहीच पडलीच नाही. आज जर तिथे क्षितिजा वेळेवर पोहोचली नसती तर अभी भाई मेला असता की! मग काय त्याच्या प्रेताबरोबर…..” तो तावातावाने बोलत होता आणि इतका वेळ शांत बसलेला संग्राम चिडला आणि त्याच्यावर ओरडला.

संग्राम,“थोबाड रंगवेन आदी तुझं मी काही ही बरळू नकोस.” तो रागाने थरथरत होता गार्गीने त्याला बेडवर बसवले आणि पाणी दिले आणि सुशांतने आदिराजच्या हाताला धरून त्याला ओढतच रूमच्या बाहेर नेले.

सुशांत,“ मूर्खा रागाच्या भरात काय बोलतो आहेस ते तुझं तुला तरी कळतं का? अभिराजवर संग्रामने अमोलीशी लग्न कर म्हणून जबरदस्ती केली नव्हती त्याने फक्त लग्नासाठी अमोलीचे स्थळ त्याला दाखवले होते. अभिराज स्वतः तयार झाला लग्नाला कळले तुला आणि तुला चांगलच माहीत आहे की संग्रामची तब्बेत कशी आहे तरी देखील तू त्याच्याशी वाद घालत आहेस? आता पुन्हा जर एक शब्द जरी बोललास ना त्याच्या विरुद्ध आणि त्याच्यासमोर तर माझ्या इतकं वाईट कोण नाही लक्षात ठेव. आणखीन एक अभिराजवरच नाही तर राज्ञीवर देखील संग्रामचा पूर्ण हक्क आहे. त्याने माझ्यावर उपकार वगैरे केले म्हणून नाही तर तो माझ्यासाठी खूप काही आहे कळलं तुला एका गावाकडून आलेल्या सामान्य तरुणाला त्याने मोठी मोठी स्वप्न पहायला शिकवली एवढंच नाही तर स्वतः बरोबर त्या मित्राला ती स्वप्न पूर्ण करून जगायला शिकवले. सख्खा भाऊ ही करणार नाही इतकं माझ्यासाठी त्याने केलं. तू किती ओळ्खतोस रे तुझ्या बापाला? तो तुला नाही कळला अजून ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी पश्चात्ताप होईल तुला आजचे बोललेले आठवून. जा आता आणि पुन्हा जर तू त्याच्या समोर आवाज चढवशील तर याद राख!” तो त्याला दम देत म्हणाला आणि आदिराज त्याला काहीच न बोलता पण रागातच निघून गेला.

समिधा,“ राज्ञी तू अभी जवळ जा आम्ही संग्राम कसा आहे पाहून येतो.” ती म्हणाली.

संग्राम आदिराज वर भयंकर चिडला होता. आदिराजच्या बोलण्याचा परिणाम त्याच्या तब्बेतीवर तर होणार नव्हता? आणि अभिराजला त्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत होता तरी तो अमोलीशी लग्न करेल का? आणि क्षितिजा अमोलीचा खरा चेहरा लोकांच्यासमोर आणू शकेल का?
©स्वामिनी चौगुले

सॉरी फॉर लेट पोस्ट







🎭 Series Post

View all