माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ७०

राजवीरच्या मनात नेमके काय करायचे होते?


भाग 70

आज आठ दिवस झाले होते गार्गी आणि संग्रामला उटीला येऊन. संग्रामला त्रास झाल्यापासून गार्गीने दोन दिवस झाले त्याला बेडवरून खाली देखील उतरू दिले नव्हते. ती अशीच दुपारी रूममध्ये पुस्तक वाचत बसली होती. संग्राम बेडवर बसला होता. दारावर कोणीतरी नॉक केले आणि गार्गीने दार उघडले. तर समोर रिसॉर्टचा मॅनेजर होता.

मॅनेजर,“ गुड़ आफ्टरनून मॅम!” तो अदबीने म्हणाला.

गार्गी,“ गुड़ आफ्टरनून! कुछ काम था क्या?”तिने विचारले.

मॅनेजर,“ मैं आपको शाम के प्रोग्राम के लिए इंव्हाईट करने आया हूँ। आज रिसोर्ट में राजेश्वर महाराज के कहने पर भक्ति गीत और संत्संग का आयोजन किया गया है।” त्याने सांगितले.

गार्गी,“ थैंक्स और सॉरी हम नही आ पाएंगे क्योंकि मेरे पति की तबियत ठीक नही।”ती म्हणाली.

मॅनेजर,“ ठीक है मॅम लेकिन थोड़ी देर के लिए ही सही सर को लेकर आने की कोशिश जरूर कीजिएगा।”तो म्हणाला.

गार्गी,“ जी धन्यवाद!”

ती म्हणाली आणि तिने दार लावले तर समोर संग्राम उभा होता.

गार्गी,“ तू केंव्हा उठून आलास?” तिने विचारले.

संग्राम,“ जेंव्हा तू त्या बिचाऱ्याला नाही म्हणून सांगत होतीस तेंव्हा!” तो तोंड फुगवून म्हणाला.

गार्गी,“ तुला जर वाटत असेल की तू असं तोंड फुगवण्याने मी तुला आज त्या सत्संग का काय ते? त्याला घेऊन जाईन तर असं काही होणार नाही. त्या दिवशी तुझं ऐकून गेलो होतो प्रोग्रॅमला! साहेब तुमची अवस्था काय होती आणि ते सगळं मी कसं हॅन्डल केलं मला माहित. दोनच दिवस राहिले आहेत परवा आपण निघत आहोत तर गप्प रूममध्ये आराम करायचा कळलं तुला!” ती त्याला दम देत म्हणाली.

संग्राम,“ गार्गी ऐक तर मला ना हा राजेश्वर महाराज उर्फ राजवीर मोरे काय सत्संग करतो ते पहायचे आहे. प्लिज आपण जाऊया ना!” तो डोळे मिचकावून तिलाजवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“ त्या ढोंगी माणसाचे तर तोंड नाही पहायचे मला! करून करून भागला आणि देव पूजेला लागला.” ती तोंड वाकडे करत म्हणाली.

संग्राम,“ तू ना माझ्यावर आल्यापासून नुसती हुकूम चालवत आहेस गार्गी! थोडावेळ जाऊन लगेच माघारी येवुयात ना! असं ही दोन दिवस झाले मी या रूमच्याच काय पण बेडच्या पण बाहेर पडलो नाही. कंटाळा आला आहे मला! थोडं फ्रेश हवेत गेलं तर बरं वाटेल ना आणि तुला नाही का उत्सुकता हा राजवीर काय सत्संग करणार आहे त्याची!” तो हसून म्हणाला आणि गार्गी ही हसायला लागली.

गार्गी,“ तू ना संग्राम! बरं जाऊ आपण पण लगेच यायचे परत.” ती म्हणाली.

संग्राम,“ हो मॅडम!”
★★★★

संध्याकाळी संग्राम तयार होत होता आणि गार्गी साडी नेसण्यासाठी वॉशरूममधून नुसत्या परकर आणि ब्लाऊजवर बाहेर आली. तिचे ते रूप पाहून संग्रामने तिला मिठी मारली. त्याचे ओठ तिच्या कपाळावरून खाली येत तिच्या ओठांवर विसावले. त्यानंतर ते खाली खाली येऊ लागले. गार्गी ही त्याच्या अशा वागण्याने शहारली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली.

थोडा वेळ दोघे ही एकमेकांमध्ये गुंतत राहिले आणि संग्राम तिला कानात हळूच म्हणाला.

संग्राम,“ गार्गी बाकी सगळं आल्यावर!”

गार्गी,“ काही गरज आहे का जायची संग्राम!नको कुठे जायला.” ती त्याला मिठी मारत म्हणाली.

संग्राम,“ लगेच येऊ गार्गी चल ना!” तो तिला म्हणाला.

गार्गी,“ तू ना जी.डी.!मला चाळवलेस! आता तुझ्या बाहु पाशात विसावल्या शिवाय मला चैन नाही पडणार.” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

संग्राम,“ आल्यावर, मग मला नाही म्हणायचं की मी रानबोका आहे म्हणून!” तो तिच्या ओठाचा हलकासा चावा घेत मादक हसत म्हणाला.

गार्गी,“ हाय हाय मी तर आज फिदा या हस्यावर! लव यु!” ती हसून त्याच्या गालावर ओठ ठेवत म्हणाली.

संग्राम,“ अच्छा जी! बरं आवर लवकर.” तो पुन्हा हसून म्हणाला.

गार्गी तयार झाली आणि दोघे ही लॉनमध्ये पोहोचले. आज उघड्यावर कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली होती. गार्गीने दोन शाल आणल्या होत्या. राजवीरचे शिष्य सगळी व्यवस्था पाहत होते. लोक आता गोळा झाले होते. गार्गी आणि संग्राम मुद्दाम थोडे मागे कोपरा गाठून बसले होते. रिसॉर्टचा मालक आणि राजवीर आले आणि राजवीरला हार घालून सत्संगाची सुरुवात झाली. राजवीर गीतेतील श्लोक आणि त्यावर आधारित प्रवचन करत होता पण त्याचे सगळे लक्ष गार्गी आणि संग्रामवर होते. संग्राम आणि गार्गीचे मात्र कुठेच लक्ष नव्हते. थंड हवा दोघांना ही उत्तेजित करत होती आणि संग्राम शालीच्या आडून गार्गीच्या कमरेत हात घालून तिला डिवचत होता. त्याला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण इथे आलो असे झाले होते कारण त्याला आता गार्गीला कधी मिठीत घेईन असे झाले होते. गार्गीने ही ते ओळखले आणि ती त्याच्या कानात गालात हसून हळूच म्हणाली.

गार्गी,“ मला माहित आहे साहेब तुम्हाला आता काय हवे आहे! इथे थांबून उगीच मला डिवचण्यात वेळ घालवण्यापेक्षा चला रूममध्ये!” ती म्हणाली आणि संग्रामने हसून मान डोलावली.

गार्गीने रूममध्ये जातानाच जेवणाची ऑर्डर दिली आणि दोघे ही रूममध्ये निघून गेले. त्यांच्या अशा वागण्याने राजवीर अस्वस्थ झाला पण तो प्रवचनमध्येच सोडून जाऊ शकत नव्हता. रूममध्ये गेल्यावर संग्रामने गार्गीला मिठी मारली.

गार्गी,“ संग्राम आधी जेवण करायचे. औषधं घ्यायची मग नंतर तुला हवे ते!” ती त्याला म्हणाली. तोपर्यंत जेवण आले.

दोघांनी जेवण केले. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. गार्गीने त्याला औषधे दिली.

संग्राम,” झालं ना तुझ्या मनासारखं?”

तो म्हणाला आणि त्याने तिला स्वतःच्या मांडीवर ओढून घेतले. तो बराच वेळ तिच्या ओठांचे मधुरस्पान करत होता. त्याने तिच्या साडीची पिन काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला ती निघत नव्हती. शेवटी गार्गीनेच ती काढली आणि संग्रामने त्याचा चेहरा तिच्या मानेत घातला. बराच वेळ गार्गी ही त्याला प्रतिसाद देत होती आणि अचानक ती भानावर आली आणि त्याच्या कानात म्हणाली.

गार्गी,“ किती वेळ झाले मी तुझ्या मांडीवर बसले आहे. माझं सगळं ओझं तुझ्या पायांवर पडतंय. बेडवर नीट ये बरं! मग तुला काय करायचे ते करू!” ती काळजीने म्हणाली

इकडे राजवीरने त्याचे प्रवचन संपले आणि तब्बेत ठीक नाही हे कारण देऊन तो त्याच्या रूममध्ये आला. त्याने घाईतच लाकडी पेटी उघडली आणि संग्रामच्या हाताची प्रतिकृती काढली. त्यावर त्याने स्वतःचा हात ठेवला आणि डोळे झाकून मंत्र पुटपुटले. आता त्याच्यासमोर गार्गी आणि संग्राम स्पष्ट दिसत होते.


संग्राम बेडवर पूर्ण सरकला. गार्गी त्याच्याजवळ गेली. हळूहळू एक एक कपडा बाजूला पडत होता आणि दोघं ही आवेगात येत होते. संग्रामने गार्गीचा पूर्ण ताबा मिळवला होता. त्याने गार्गीच्या मानेवर हळूच चावा घेतला आणि गार्गी हसून त्याला म्हणाली.

गार्गी,“ हळू ना जी.डी. रानबोका कुठला! किती धसमुसळेपणा रे!”

संग्राम,“ मी म्हणालो होतो ना मला रानबोका नाही म्हणायचे! मी रानबोका तर तू माझी रानमांजर आहेस.” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि दोघे ही हसले.

सगळं जग विसरून दोघे ही एकमेकांमध्ये रत होत होते. दोन्ही शरीरे आवेगात एकमेकांना भिडत होती. दोघांनी ही सुखाचा तो परमोच्च क्षण गाठला आणि संग्राम गार्गीच्या शेजारी झोपला. तो चांगलाच दमला होता. त्याचे श्वास वाढले होते.

गार्गी,“ बघ किती दम लागला तुला! तू ना एकदा सुरू झाला की थांबत नाहीस तुला हवे ते मिळाल्या शिवाय जी.डी.नुसती घाई झालेली असते तुला! बघ किती घाम आला आहे तुला! पाणी पी जरा उठ.” ती काळजीने बेडवर पडलेल्या तिच्या साडीने त्याचा घाम टिपत बोलत होती. तसं तर तिचे ही श्वास वाढले होते पण तिला काळजी संग्रामची वाटत होती.

संग्राम,“ गार्गी तू खुश आहेस ना? तुला जे सुख हवे होते ते मिळाले ना?” त्याने त्याचे वाढलेले श्वास कंट्रोल करत तिचा हात धरून तिच्या डोळ्यात पाहत विचारले.

गार्गी,“ हे काय विचारणे झाले जी.डी.? अरे गेल्या पंचवीस वर्षांपासून मी तुझ्याबरोबर स्वर्ग सुख अनुभवत आहे. तू कायम मला जे पण दिले ते भरभरून दिले. मी तुझा स्पर्श, तुझ्या श्वासांचा सुगंध! तुझा आवेग! तुझं माझ्या डोळ्यात पाहून डोळ्यांनीच तू कन्फर्टेबल आहे का विचारणे? स्वतःला झोकून देऊन माझ्यावर प्रेम करणे आणि माझ्यात उतरण्यासाठी तुला झालेली घाई! परमोच्च क्षण काढल्यानंतर तुझं माझ्या मिठीत विसावणं हे सगळं मला पराकोटीचा आनंद आणि सुख देते. तुला मी रानबोका, धसमुसळा म्हणते पण तुझा तोच रांगडेपणा मला भावतो आवडतो. माझा मेनाहुन ही मऊ असणारा हळवा जी.डी जेंव्हा माझा ताबा घेऊन पावसासारखा बेभान होऊन माझ्यावर त्याच्या उत्कट प्रेमाची उधळण करतो ना तेंव्हा मी तृप्त होते अगदी त्या धरित्री सारखी! लव यु! तू माझ्यासाठी जगातला सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ पुरुष आहेस.” ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली.

संग्राम,“ गार्गी मला तुझ्यासारखं शब्दात व्यक्त व्हायला येत नाही. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहेस.” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला.

दोघे ही बराच वेळ एकमेकांना स्पर्शाने सुखावत होते.

ते सगळं पाहून राजवीरने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात मात्र आग उतरली होती. त्याचा राग अनावर झाला होता. त्याने टेबलवर ठेवलेल्या फुलदाणीकडे रागाने पाहिले आणि क्षणार्धात त्यातल्या फुलांना आग लागली. तो रागाने बोलत होता.

“ संग्राम तू उपभोगत असलेले हे सुख माझे होते. गार्गी माझ्या भाग्यात लिहली होती पण तू मध्ये आलास आणि तिचे उत्कट प्रेम तू माझ्यापासून हिरावून घेतलेस. मी तुला कधीच माफ नाही करणार.” त्याचे शब्द देखील जणू आग ओखत होते.


गार्गी,“ आठ दिवस कसे गेले कळले नाही मला तर! परवा आपण पुन्हा आपल्या जगात जाऊ. या आठ दिवसांनी मला खूप काही दिले आणि काही दिवस तू फक्त माझा असण्याची माझी जी इच्छा होती ती पण पूर्ण झाली.” ती प्रेमाने त्याच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाली.

संग्राम,“ दिज डेज आर व्हेरी प्रेषियस टू मी डार्लिंग!आणि मॅडमला लकीली डायमंड रिंगपण मिळाली.” तो हसून तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटातली अंगठी पाहत म्हणाला.

गार्गी,“ हो ना! जसं काही तू मला कधी डायमंड रिंग दिलीच नाहीस. खूप रिंग्ज आणि ज्वेलरी आहे माझ्याकडे तूच दिलेली. मला त्याचे आकर्षण नाही जी.डि. माझा खरा दागिना तर तूच आहेस. तू माझ्याबरोबर आहेस ना मग मला कशाचीच गरज नाही.” ती त्याचा हात प्रेमाने दाबत म्हणाली.

संग्राम,“ हुंम! गार्गी मला तुझ्याशी अभीबद्दल बोलायचे आहे. आपण महाबळेश्वरवरून आलो आणि क्षितिजाचा विषय बंदच झाला. तसं खूप काही घडत गेलं त्यामुळे तो विषय मागे पडत गेला पण आता गेल्यावर आपल्याला त्याबद्दल काही तरी करायला हवं.” तो म्हणाला.

गार्गी,“ हो दोघांच ही प्रेम आहे एकमेकांवर पण जे काही झाले आहे विशेष करून तुझ्या बाबतीत त्यावरून मला वाटत नाही अभी क्षितिजाला सहजासहजी माफ करेल. शेवटी त्याच्यासाठी जगात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तू आहेस जी.डी. पण त्याच प्रेम आहे क्षितिजावर आणि तिचं देखील; मी माझी झलक पाहिली आहे तिच्यात! दोघे अगदी मेड फॉर इच अदर आहेत. गेल्यावर पाहू काय करायचं ते! आता मात्र तू झोप.” ती म्हणाली.

संग्राम,“ बरं मॅडम झोपतो!” तो हसून म्हणाला.

संग्राम झोपून गेला पण गार्गी मात्र बराच वेळ जागीच होती. ती संग्रामला बिलगून कधी तरी रात्री झोपून गेली.

राजवीरच्या मनात नेमके काय करायचे होते? संग्राम आणि गार्गीला मात्र भविष्यात येणाऱ्या वादळाची यत्किंचितही कल्पना नव्हती.
©स्वामिनी चौगुले







🎭 Series Post

View all