माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ९

This is a love story

भाग ९

डान्स संपला आणि सगळेच दोन मिनिटं स्तब्ध झाले होते. संग्राम आणि गार्गी ही तसेच त्यांच्या फिनिशिंग पोजमध्ये उभे होते. शुभमने टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि सगळे भानावर आले. सगळी कडून एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. गार्गी आणि संग्राम अभिवादन करून बॅक स्टेज गेले पण मुला-मुलींनी एकच गलका सुरू केला...

“Once more! Once more!”

ते पाहून शुभम स्टेजवर केला आणि माईक हातात घेऊन बोलू लागला.

“ मैं संघवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग का कल्चरल हेड हूँ शुभम नाईक! आप सबने हमारे डांस परफॉर्मन्स को इतना सराहा उसके लिए बहुत बहुत धन्यवाद! लेकिन sorry to say but यह परफॉर्मन्स दोबारा नही हो सकता क्युकी हमारा डान्सर संग्राम जख्मी है! कुछ दिनों पहले उसका छोटासा एक्सीडेंट हुआ था इस वजह से उसके माथे पर गहरी चोट आई थी! डॉक्टरने भी उसे बेड रेस्ट करो कहा था! लेकिन उसने जिद नही छोडी और आज परफॉर्म किया! इसी वजह से ये दोबारा परफॉर्म नहीं कर पाएगा! sorry!” तो असं म्हणून स्टेजच्या मागे गेला आणि मॉब शांत झाला.

संग्राम खुर्चीवर बसला होता आणि गार्गी उभी होती. शुभमला पाहून संग्राम त्याच्या जवळ गेला आणि त्याला मिठी मारली आणि आनंदाने म्हणाला.

संग्राम,“we are done it!”

शुभम, “yes! बरं मी सुशांतला बोलवले आहे तो येतोय तू जा हॉटेलवर आणि आराम कर टॅक्सी ही मागवली आहे मी!” तो त्याला म्हणाला आणि सुशांत आला.

सुशांत,“आग लावावी रे तुम्ही दोघांनी स्टेजवर नुसता जाळ आणि धूर!” तो खुश होत म्हणाला.

गार्गी,“ काय रे स्तुती तरी जरा चांगल्या शब्दात करत जा की सुशांत! आणि याला नीट घेऊन जा!” ती सुशांतला म्हणाली.

सुशांत,“ गप्प ये चिऊताई!” तो म्हणाला. गार्गी पुढे काही तरी बोलणार तर शुभम दोघांकडे पाहत म्हणाला

शुभम,“बास करा रे तुमचं! जा रे सुशांत हॉटेलवर याला घेऊन!” तो म्हणाला.

दोघे ही हॉटेलवर पोहोचले संग्रामने जेवण करून औषधे घेतली आणि तो बेडवर आडवा झाला आणि त्याला गेल्या आठ दिवसांत घडलेल्या सगळ्या घटना आठवू लागल्या.

तो जिन्यावरून पडला आणि त्याच्या कपाळाला बरीच खोल जखम झाली त्यामुळे त्याला स्टीचेस घालावे लागले आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितला. त्याचे आई-बाबा त्याला हॉस्टेलवरून घरी घेऊन गेले. सगळ्यांना वाटले आता डान्स परफॉर्मन्स कॅन्सल होणार! त्यामुळे शुभमने ही त्याला जास्त फोर्स केले नाही. पण संग्राम मात्र अस्वस्थ होता कारण या परफॉर्मन्ससाठी आणि या competition साठी त्याने, गार्गीने, शुभम, विभा आणि त्यांच्या बरोबर कडेने नाचायला आणखीन चार जोड्यांनी महिना भर खूप मेहनत घेतली होती आणि आता फक्त त्याला लागले आहे म्हणून ती मेहनत वाया जाणार होती आणि याचंच संग्रामला वाईट वाटत होते. म्हणून त्याने एक निर्णय घेतला आणि त्याने शुभमला घरी फोन करून बोलवून घेतले.

शुभम,“ काय बोलतो आहेस संग्राम अरे स्वतःची अवस्था बघ जरा! काही गरज नाही याची तू आराम कर!”तो त्याला समजावत म्हणाला.

संग्राम,“ अरे मी ठीक आहे इतकं ही नाही लागले मला! आणि आपण महिनाभर घेतलेली मेहनत अशी वाया जाऊ द्यायची का? ते काही नाही फेस्टिव्हलमध्ये मी आपल्या कॉलेजला represent करणार म्हणजे करणार!” तो ठामपणे म्हणाला.

तो पर्यंत संग्रामचे आई-बाबा तिथे आले.

शुभम,“ काकू तुम्ही तरी समजवा याला जरा!” तो म्हणाला.

आई,“ मी समजावून थकले आता!” त्या नाष्टा आणि चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत शुभमकडे पाहत म्हणाल्या.

बाबा, “शुभम तुला आणि हिला संग्रामची काळजी आहे हे मला ही कळत आहे रादर मला ही त्याची काळजी आहेच की पण, तो म्हणत आहे ते ही बरोबरच आहे की! तुम्ही इथे घरात प्रॅक्टिस सुरू करा हवं तर!” ते म्हणाले.

संग्राम,“हो चालेल शुभम आपण असं करू या ना! इथेच प्रॅक्टिस करू या!” तो उत्साहाने म्हणाला.

शुभम,“ ठीक आहे उद्या मी गार्गी आणि विभाशी बोलतो आणि बाकी सगळ्यांशी ही आणि घेऊन येतो त्यांना इथे!” तो म्हणाला.
★★★

दुसऱ्या दिवशी शुभम गार्गी, विभा आणि बाकी टीमला संग्रामाच्या घरी घेऊन आला. पण प्रॅक्टिस सुरू करण्या आधी सर्वांशी शुभमला बोलायचे होते.

गार्गी,“ काय बोलायचे आहे तुला शुभम बोल ना!” तिने विचारले.

शुभम,“ संग्रामचा जो हा ऍक्सीडेंट झाला तो ऍक्सीडेंट नाही तर मुद्दामहुन कोणी तरी त्याला पाडले आहे असा दाट संशय मला आहे म्हणून आपण हा परफॉर्मन्स करणार आहोत हे कोणाला म्हणजे कोणाला ही कळता कामा नये! कोणी ही या बद्दल एक शब्द कॉलेजमध्ये बोलणार नाही! सगळ्यांना असच वाटले पाहिजे की कपल डान्स कॅन्सल झाला! गार्गी तू प्लिज राजवीरला काही सांगू नकोस या बद्दल!” तो गंभीरपणे म्हणाला.

गार्गी,“शुभम तू नको काळजी करुस मी नाही सांगणार त्याला मी तुमच्या टीमची मेंबर आहे त्यामुळे इथली कोणतीच गोष्ट इथून मी बाहेर नेणार नाही! राजवीर माझ्या पर्सनल लाईफ मधला भाग आहे आणि हे आपण प्रोफेशनली आपल्या कॉलेजसाठी करत आहोत त्यामुळे माझ्या दोन्ही लाईफ एकत्र येणार नाहीत याची मी काळजी घेईन असं मी ही आठवडा भर घरी जात आहे माझ्या दादाच्या लग्नाचे चालले आहे त्यामुळे! मी घरूनच इकडे येणार!” तिने शुभमला आश्वस्त केले.

त्या नंतर आठवडा भर संग्रामाच्या घरीच प्रॅक्टिस झाली. संग्रामला दगदग व्हायला नको आणि बारा-तेरा तासांचा प्रवास करायला लागू नये म्हणून संग्रामाच्या वडिलांनी त्याला सुशांत बरोबर गोव्याला फ्लाईटने पाठले तो दुपारीच डायरेक्ट म्हापसा बीचवर पोहोचला होता पण शुभमने त्याला एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये थांबवून ठेवले होते. कार्यक्रमाच्या संयोजकांकडे मात्र आधीच कॉलेज आणि गार्गी-संग्रामाच्या नावाची नोंदणी करून ठेवली होती. तसेच ते सगळे थांबलेल्या हॉटेलमध्ये आधीच एक रूम बुक करून ठेवली होती.

हे सगळं आठवतच संग्रामला रात्री केंव्हा तरी झोप लागली.
★★★


इकडे गार्गी राजवीरला म्हापसा बीचवर शोधून शोधून शेवटी तो हॉटेलवर असेल म्हणून हॉटेलवर आली होती. तिला चांगलच माहीत होतं की तिने राजवीर पासून हे डान्स परफॉर्मन्सच लपवले म्हणून तो तिच्यावर चिडला असणार. तिला आता त्याची मनधरणी करावी लागणार होती म्हणूनच ती त्याला शोधत होती. ती त्याला शोधत त्याच्या रूमवर गेली तर तिथे पक्या एकटाच होता. पक्या कडून तिला कळले की राजवीर मुंबईला निघून गेला. तिला मात्र त्याच्या मागे जाणे शक्य नव्हते कारण, फेस्टिव्हल अजून दोन दिवस चालणार होता आणि शेवटच्या दिवशी विनर घोषित करणार होते. ती तिच्या टीमचा महत्त्वाचा सदस्य असल्या कारणाने निकाल घोषित होई पर्यंत तिला थांबावे लागणार होते.

याच सगळ्या विचारात ती तिच्या रूममध्ये गेली. तर बेसावध गार्गीचे दोन्ही हात धरून साक्षीने एक गिरकी घेतली.

गार्गी,“ सोड बरं साक्षी मला!” ती नाखुषीनेच म्हणाली.

साक्षी,“ काय डान्स केला ग तू आणि संग्रामने! कसले भारी दिसत होतात तुम्ही दोघे एकमेकां बरोबर अगदी म्युजीकल बॉल मधल्या बाहुला-बाहुली सारखे! संग्राम वर तर पोरी फिदा आहेत. बघ तो येडा असा का राहत नाही चंपु बनून राहतो. गार्गी तू जर त्याच्या आयुष्यात आलीस तर you both are looking killer with each other!” ती बडबड करत होती आणि हे ऐकून आधीच टेन्शनमध्ये असलेली गार्गी तिच्यावर भडकली.

गार्गी, “will you please shut up! काय बोलते आहेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? एक तर राजवीर माझ्यावर चिडून निघून गेला आहे परत मुंबईला! आणि संग्राम माझा फक्त मित्र आहे आणि राजवीरशी मी कमिटेड आहे तो माझा bf आहे!” ती रागाने म्हणाली.

साक्षी,“ गार्गी तू प्रेमात आंधळी झाली आहेस तुला राजवीर चांगला मुलगा नाही हेच दिसत नाही. त्यानेच संग्रामला पाडायला लावले होते कारण तू त्याच्याबरोबर डान्स करू नयेस म्हणून! पण तुला ते दिसतच नाही he is not good for you! ज्या दिवशी ही प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावरून हटेल ना त्या दिवशी तुला राजवीरचे खरे रूप दिसेल!” ती ही रागाने बोलली आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता झोपून गेली.

★★★

तिसऱ्या दिवशी म्हणजे फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी सगळ्या स्पर्धेचे रिझल्ट डिक्लेअर झाले आणि गार्गी-संग्रामाच्या परफॉर्मन्सला फस्ट प्राईज मिळाले. सगळेच खूप खुश होते. कारण, युथ फेस्टिव्हलमध्ये आंतरराज्यीय स्पर्धा होत्या. वेगवेळ्या राज्यातून अनेक कॉलेजेस आले होते आणि त्यात कपल परफॉर्मन्ससाठी फर्स्ट प्राईज मिळणे कॉलेजसाठी देखील प्रतिष्ठेची गोष्ट होती. सगळे त्याच रात्री मुबंईला परत आले आणि दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात गार्गी-संग्रामला फस्ट प्राईज मिळाल्याची बातमी अगदी दोघांच्या फोटो सहित छापून आली आणि दोघांच्या ही घरी अभिनंदनाचे फोन दिवस भर येत राहिले.

दुसऱ्या दिवशी गार्गी आणि संग्राम देखील कॉलेजला पोहचले. या वेळी शुभम मुळे कॉलेजच्या एक गायनामध्ये तिसरा क्रमांक, एक नाटकामध्ये उत्तेजनार्थ आणि कपल डान्समध्ये पहिला क्रमांक असे तीन पुरस्कार पदरात पडले होते. म्हणून आज ऑडिटोरिममध्ये शुभम आणि पारितोषिके मिळालेल्या मुला-मुलींनाच सत्कार केला. कार्यक्रम लंच ब्रेकपर्यंत झाला. गार्गी मात्र सकाळी कॉलेजमध्ये आल्या पासून राजवीरला शोधत होती पण तो काही तिला दिसला नाही. गार्गी सगळ्यात असून ही नसल्यासारखी होती. ती मनातून खूपच अस्वस्थ होती. तिने सत्कार संग्राम बरोबर स्वीकारला पण तिला हा कार्यक्रम केंव्हा एकदा संपतो असे झाले होते. एकदाचा कार्यक्रम संपला आणि लंच ब्रेक झाला आणि गार्गी बॉईज होस्टेलकडे निघाली. तिला राजवीरला कधी भेटते, कधी बोलते असे झाले होते.


ती राजवीरच्या रूमवर पोहीचली. पक्या आणि राजवीर जेवत होते. पक्या गार्गीला आलेली पाहून निघून गेला. गार्गी राजवीरच्या समोर जाऊन उभी राहिली. तिला रागाने पाहत राजवीरने विचारले.

राजवीर,“ इथे का आली आहेस तू गार्गी? मला तुझ्याशी बोलायचे नाही!”

गार्गी,“ राज अरे माझे ऐकून तरी घे!” ती खाली मान खालून आर्जव करत म्हणाली.

राजवीर,“ काय ऐकायचे ग तुझे आणि का ऐकायचे! तुझ्या आनंदात माझा आनंद मानून मी तुला संग्राम बरोबर पाहू शकत नसताना ही त्याच्या बरोबर डान्स करू दिला नंतर तो पडला आणि मला कळले की तुम्ही परफॉर्मन्स करणार नाही... तुही माझ्याशी खोटं बोलून घरी निघून गेलीस! गार्गी मला इतकं अंधारात ठेवण्याची काय गरज होती ग?” तो रागाने म्हणाला.

गार्गी,“ मला तुला अंधारात ठेवायचं नव्हतं!” ती आवंढा गिळत म्हणाली.

राजवीर, “मग काय करायचं होतं? की तुला ही बाकीच्यां सारख असं वाटतंय की मी संग्रामचा तो ऍक्सिडंट करावाला?” त्याने अंदाज बांधता विचारले.

गार्गी,“ नाही रे मला माहित आहे राज तू असं कधीच करणार नाहीस! पण, मला शुभमने अट घातली होती की मी तुला काही सांगायचे नाही आणि मी त्यांच्या टीममध्ये असल्याने मला त्याचे ऐकणे भाग पडले!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

राजवीर,“ बस मला हेच ऐकायचे होते गार्गी तुझ्याकडून बाकी कोण माझ्या बद्दल काय विचार करते याचा मला काहीच फरक पडत नाही!” असं म्हणून त्याने तिला नाटकीपणे मिठी मारली.

प्रेम हे अजब रसायन असते. समोरचा माणूस तुझ्या लायकीचा नाही तो चांगला नाही म्हणून प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या किती ही कानी कपाळी ओरडून सांगितले तरी प्रेमात पडलेल्या व्यक्ती पर्यंत कोणताच आवाज पोहोचत नाही. गार्गीचे ही तसेच काहीसे झाले होते. गार्गी राजवीरच्या प्रेमात आंधळी झाली होती आणि संग्रामचे प्रेम तिच्या समोर असून देखील तिला दिसत नव्हते.

संग्रामने मात्र त्याचे गार्गी वरचे प्रेम म्हणजे एक सुखद आठवण एक सुगंध म्हणून त्याच्या मनाच्या एका कोऱ्यात जपून ठेवले होते. त्याला गार्गीचा एक चांगला मित्र म्हणून तिच्या आयुष्यात कायम राहायचे होते. त्याने गार्गी त्याच्या नशिबात नाही हे कुठे तरी स्वीकारले होते. पण, नियतीने त्याच्यासाठी वेगळाच विचार करून ठेवला होता.


गार्गीला राजवीरचे खरे रूप कधी कळणार होते? संग्रामचे प्रेम तिला कधी कळणार होते का?राजवीर आता पुढचे कोणते पाऊल उचलणार होता?



सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download आणि प्रो ब्लॉगचे subscription घ्या आणि वाचत राहा माझिया प्रियाला प्रीत कळेना!
©स्वामिनी चौगुले
क्रमशः

🎭 Series Post

View all