माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ७२

संग्राम क्षितिराजला एकत्र आणण्यासाठी काय करणार होता?


भाग 72
संध्याकाळी पुन्हा सगळे संग्रामच्या रूममध्ये जमले होते. त्यानेच सगळ्यांना बोलवून घेतले होते. अभिराज फक्त तिथे दिसत नव्हता.

सुशांत,“ तुला जरा गप्प बसवत नाही का रे संग्र्या? काही तरी तुझ्या डोक्यात शिजत असणार म्हणून आम्हाला बोलावले आहेस ना तू?” त्याने विचारले.

संग्राम,“ तूच रे तूच माझा मित्र आहेस. किती चांगलं ओळखतो ना मला!” तो हसून म्हणाला.

संजयराव,“ तुमचं दोघांच एकमेकांना तिरकस बोलून झालं असेल तर बोलतो का चिनू आता? सगळे आहेत इथं पण अभी कुठे गेला?” त्यांनी इकडेतिकडे पाहत विचारले.

संग्राम,“ मी मुद्दामच त्याला माझ्या कामासाठी पाठवले आहे कारण मला त्याच्याच विषयी बोलायचे आहे. आदी क्षितिजाचा काही पत्ता? सुशांत तिने पुणे ब्रांचमध्ये जॉईनींग केले का?” त्याने विचारले.

सुशांत,“ हो! ती आपल्या ऑफिसमध्ये आली होती. खरं तर तुलाच भेटायला आली होती पण तू नव्हतास मग अभीला भेटली. त्याने तिला तू आल्यावर ये म्हणून सांगितले आहे.” तो म्हणाला

संग्राम,“ इतकंच बोलणं झालं का दोघांच्यामध्ये?”त्याने विचारले.

आदिराज,“ नाही खूप काही बोलणं झालं दोघांच्यामध्ये! क्षिती भाईला भेटल्यावर मला ही भेटली होती.” तो म्हणाला.

संग्राम,“ मग सांग ना काय बोलणे झाले दोघांच्यामध्ये तुला क्षितिजाने सांगितले का काही?” तो चिडून म्हणाला.

राज्ञी,“ अंकू चिडचिड करू नकोस तो सांगतोय ना जरा शांत रहा ना!” ती त्याला समजावत म्हणाली.

आदिराज,“ क्षितिजाने भाईची माफी मागितली तर भाई तिला म्हणाला की ती त्याच्याबरोबर जे काही वागली त्यासाठी तो तिला एकवेळ माफ करू शकेल पण या सगळ्याचा तुला खूप त्रास झाला आहे. जर तुला काही झालं असतं तर तो सगळ्यांना काय तोंड दाखवणार होता? तो स्वतःला त्यासाठी माफ करू शकत नाही तर तिला कसं माफ करू शकेल. त्याने स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात तिला सांगितले आहे की ती आपल्या फॅमिलीसाठी फिट नाही तर तिने त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नये.” तो म्हणाला.

संग्राम,“ वाटलंच होतं मला हा मुलगा असंच काही तरी वागणार आणि तेच झाले! मग यावर क्षितिजाचे काय म्हणणे आहे?” त्याने विचारले.

आदिराज,“ तिने ती जे काही भाईशी वागली त्यामुळे तुला त्रास झाला त्याची शिक्षा म्हणून त्याचा निर्णय मान्य केला आहे.”

संग्राम,“ हा अभी एक मूर्ख तर ती क्षितिजा शत मूर्ख! दोघांच ही एकमेकांवर प्रेम आहे पण अभी तिला सहजासहजी नाही माफ करणार, तिला शक्यतो स्वतः पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार. तिला फोन करून उद्या किंवा परवा मी भेटायला बोलावले आहे म्हणून सांग. तिचा मोबाईल नंबर तुझ्याकडे असेलच.”

गार्गी,“ उद्या नाही जमणार कारण तुझं चेकअप आहे आणि परवा सचित्तानंद महाराजांनी भेटायला बोलावले आहे आपल्याला ते इथल्या मठात भेटणार आहेत.” ती म्हणाली.

संग्राम,“ बरं मग दोन दिवसांनी भेटायला बोलाव तिला ऑफिसमध्ये पण सुशांत अभीला काही तरी निमित्त काढून बाहेर पाठवण्याची जबाबदारी तुझी आणि समिधा तिच्याशी बोलताना तू ही मला तिथे उपस्थित हवी आहेस.” तो म्हणाला.

समिधा,“ मी आणखीन कशाला तू आणि गार्गी जो निर्णय घ्याल तो अभीच्या भल्याचाच असेल ना!” ती म्हणाली.


गार्गी,“ समिधा तू अभीची आई आहेस आणि मुलावर सगळ्यात जास्त अधिकार तिच्या आईचा असतो. त्याच्याबद्दल कोणता ही निर्णय तुझ्या संमती शिवाय घेतला जाणार नाही त्यामुळे तू हवीस तिथे!”

आदिराज,“ पण तुम्ही सगळे क्षितिजाला ऑफिसमध्ये भेटलात तर भाईला कळायचे राहणार आहे का? आणि तिला असे सगळे ऑफिसमध्ये भेटलात तर ऑफिसमध्ये चर्चेला विषय होईल. तुम्ही दुसरीकडे कुठे तरी भेटा तिला!” तो म्हणाला.

मनिषाताई,“ क्षितिजा घरी जरी आली तरी ते अभीला कळणारच! कारण कोणी ना कोणी नोकर त्याच्यासमोर पचकेलच!” त्या म्हणाल्या.

गार्गी,“ आपण तिला जुन्या फ्लॅटवर भेटू शकतो. तिथे असं ही केयर टेकर शिवाय कोणी नसते.” ती म्हणाली.

सुशांत,“ अरे वा! जिथून आमच्या घरातल्या लवबर्डची लवस्टोरी सुरू झाली तिथूनच जर अभीची लवस्टोरी पुन्हा सुरू झाली तर मग काय सोने पे सुहागा!” तो संग्रामला चिडवत हसून म्हणाला.

संग्राम,“ इथे या सुशाला सून आणण्याचा प्लॅन सुरू आहे आणि हा मला चिडवतोय. देवा कोणत्या जन्माचे पाप आहे माझे!” तो नाटकीपणे म्हणाला आणि सगळे हसायला लागले.

समिधा,“ मग ठरलं तर दोन दिवसांनी आपल्या होणाऱ्या सुनेला भेटायचे. आदी तिला आजच फोन कर आणि कल्पना दे तसेच फ्लॅटची लोकेशन ही सेंन्ड कर तिला!” ती म्हणाली.
★★★

दुसऱ्या दिवशी राज्ञी आणि गार्गी संग्रामला घेऊन हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले. डॉक्टरांनी संग्रामला चेक केले आणि नर्सबरोबर त्याला काही तरी चेक करण्याच्या बहाण्याने पाठवून दिले.

गार्गी,“ डॉक्टर कसा आहे आता संग्राम? काही घाबरण्यासारखे?” तिने आवंढा गिळत विचारले.

डॉक्टर,“ मिस्टर सरनाईकांचा बी.पी आणि बाकी सगळ्या गोष्टी आता नॉर्मल आहेत. खूप लवकर या सगळ्यातून ते रिकव्हर होत आहेत. चांगली काळजी घेत आहात तुम्ही!” ते म्हणाले.

राज्ञी,“ डॉक्टर हार्टवर परिणाम झाला आहे त्याच्या त्याचे काय?” तिने विचारले.

डॉक्टर,“ हो त्याविषयी मला बोलायचे आहे म्हणूनच त्यांना पाठवून दिले मी! तसं काळजीचे काहीच कारण नाही कारण आपण औषधांनी हार्टची कार्यक्षमता कमी होण्याची प्रोसिजर लेंथी करू. पुढचे पाच ते दहा वर्षे ते अगदी सामान्य आयुष्य जगू शकतील पण पुढे ते जगले तर त्यांना हळूहळू त्रास जाणवायला लागेल. त्यांच्या शारीरिक क्षमता कमी होत जातील. तुम्ही त्यांच्या खाण्यापिण्याच्या, औषधांच्या आणि झोपण्या उठण्याच्या वेळा सांभाळा. त्यांना जास्त ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या. मिसेस सरनाईक मिस्टर सरनाईकांचे आयुष्य आता फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. ते जीममध्ये व्यायाम करत होते ना, तो बंद करा. वाटल्यास सकाळी ते वॉकला गेले तरी चालेल. ते आता ऑफिस ही जॉईन करू शकतात त्यांचे मन त्यात रमेल पण जास्त ट्रेस टाळा. बाकी महिन्याला चेकअपला घेऊन या त्यांना! मी काही औषधे कमी करत आहे आणि काही त्यांना घ्यावीच लागतील. बाकी हवापालट त्यांना चांगलेच मानवले आहे. ते आता पूर्ण स्टेबल आहेत आणि ते स्टेबल राहतील यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत.” ते गार्गी आणि राज्ञीला समजावत म्हणाले आणि तोपर्यंत संग्राम आला.

गार्गी,“ हो डॉक्टर मी त्याची काळजी घेईन.” ती म्हणाली.
★★

डॉक्टरांच्या बोलण्यामुळे गार्गी थोडी रिलॅक्स झाली आता तिला आज सचित्तानंद महाराज काय सांगणार आहेत त्याची काळजी लागली होती. त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे संग्राम आणि गार्गी दोघेच त्यांना भेटायला मठात गेले.

ते मठात गेले आणि महाराजांचा एक शिष्य त्यांना सचित्तानंद महाराजांच्या ध्यानाच्या खोलीत घेऊन गेला. सचित्तानंद महाराज म्हणजे मनिषाताईंच्या गुरूचे पट्ट शिष्य! ज्यांनी पंचवीसवर्षांपूर्वी संग्राम आणि गार्गीबद्दल भविष्यवाणी केली होती. त्यांनी त्यांची जागा समाधी घेताना सचित्तानंद महाराजनां दिली होती.

गार्गी त्याची ध्यानाची रूम निहाळत होती. अगदी स्वच्छ आणि पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंती,समोर अर्धनारिनटेश्वरांची सुंदर तस्वीर आणि बसायला साधी आसने. आत गेलं की खूप शांत आणि प्रसंन्न वाटत होते. सचित्तानंद महाराज म्हणजे चाळीस वर्षांचे चेहऱ्यावर सात्विक तेज असलेले, भगवी कफनी आणि गळ्यात रुद्राक्ष माळ असलेले तेजस्वी व्यक्तिमत्त्व!

सचित्तानंद महाराज,“ या मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो.” ते म्हणाले आणि गार्गी-संग्रामने त्यांच्यासमोर हात जोडले. त्यांनी दोघांना ही त्यांच्यासमोरच्या आसनांवर बसायची खूण केली आणि ते दोघे ही बसले.

गार्गी,“ मी बरेच दिवस तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण तुमच्या भेटीचा योग आज आला.” ती नम्रपणे म्हणाली.

सचित्तानंद महाराज,“प्रारब्ध कोण तोडी पळ पळ तनूचे आयुष्य हे व्यर्थ जाते! आपली भेट नियतीने आत्ता लिहून ठेवली होती ताई! मला माहित आहे तुम्हाला मला का भेटायचे होते आणि आत्ता तुमच्या मनात काय प्रश्न आहेत. तुम्हाला जी व्यक्ती गणपती मंदिरात भेटली होती ती व्यक्ती परमेश्वराने तुम्हांला सावध करण्यासाठी तुमच्याकडे पाठवलेला दूत होती.पण तुमच्यावर प्रारब्ध भारी पडले आणि जे लिहले होते पण घडायला नको होते तेच घडले आहे.” ते शांतपणे म्हणाले.

गार्गी,“ महाराज काय ते स्पष्ट सांगा ना! काय घडायला नको होते? आणि ते घडले आहे. तुम्ही त्या हस्तांदोलनाबद्दल बोलत आहात का जे संग्रामने राजवीरबरोबर त्याच्या नकळत गेले म्हणजे संग्रामला राजवीरपासून धोका आहे? पण तो इतक्या वर्षांनी पुन्हा का आला आहे? काय हवं आहे त्याला आमच्याकडून?”तिने विचारले.

संग्राम क्षितिराजला एकत्र आणण्यासाठी काय करणार होता? आणि खरंच राजवीर इतक्या वर्षानंतर गार्गी-संग्रामच्या आयुष्यात का आला होता? सचित्तानंद महाराज पुढे काय सांगणार होते?
©स्वामिनी चौगुले

ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.





🎭 Series Post

View all