माझिया प्रियाला प्रीत कळेना २भाग ८९

अभिराज क्षितिजाबरोबर डान्स करेल की तिथून निघून जाईल?


संग्रामच्या सांगण्यावरून दोन दिवसांनी पार्टी आयोजित करण्यात आली. ती ही घरातल्याच लॉनमध्ये! त्याची सगळी व्यवस्था सुशांत आणि आदिराजने केली. सगळ्यांना आमंत्रणे धाडण्यात आली. क्षितिजाला आमंत्रण मिळणे साहजिक होते कारण ती स्टाफ मेंबर होती पण पार्टीचे आमंत्रण तिच्या आई-वडिलांना देखील आले होते याचे तिला आश्चर्य वाटले म्हणून तिने ऑफिसमध्ये गेल्यावर आदिराजला त्याबाबतीत विचारायचे ठरवले.

तिने लंच ब्रेकमध्ये भेटू म्हणून आदिराजला मेसेज टाकला.आदिराजने ही हो म्हणून तिला रिप्लाय दिला.
लंच ब्रेकमध्ये दोघे ही कँटीनमध्ये भेटले.

आदिराज,“ काय मॅडम हात काय म्हणतोय तुमचा?” त्याने विचारले.

क्षितिजा,“ जखम बरी होतेय आता त्यामुळे दुखत वगैरे नाही.” ती म्हणाली.

आदिराज,“ सुट्टी घ्यायची ना क्षिती आराम करायचा होतास जरा.” तो काळजीने बोलत होता.

क्षितिजा,“ कशाला उगीच मी ठीक आहे आणि घरात बोअर होण्यापेक्षा ऑफिसला आलेले बरं. ऐक ना मला काही तरी विचारायचे होते तुला.” ती म्हणाली.

आदिराज,“ विचार ना.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ अरे दोन दिवसांनी तुमच्यात पार्टीचे आमंत्रण मला आले हे मी समजू शकते कारण मी स्टाफ मेंबर आहे पण माझ्या आई-बाबांना ही पार्टीचे आमंत्रण आले आहे ते का? हे मला समजत नाही.” तिने गोंधळून विचारले.

आदिराज,“ क्षिती तू पण ना अगं तू आमच्यासाठी फक्त स्टाफ मेंबर आहेस का? डॅडनी सांगितले होते काका-काकूंना आमंत्रण पाठवायला अशा निमित्ताने गाठीभेटी झाल्या तर त्यांच्या मनातील संकोच कमी होईल शेवटी ते व्याही होणार आहेत ना त्याचे म्हणून.” तो तिला चिडवण्याच्या सुरात म्हणाला.

क्षितिजा,“मला वाटतं नाही हे स्वप्न पूर्ण होईल कधी. कारण अभिसर पुन्हा त्यांच्या कोशात निघून गेले आहेत. ते आता बोलत असले तरी तुटत आणि कामा पुरते बोलतात.” ती बारीक तोंड करून म्हणाली.

आदिराज,“ इतक्यात हार मानू नकोस क्षिती. भाई नक्कीच तुझ्यावरचे प्रेम स्वीकारेल.”तो म्हणाला.

क्षितिजा,“ आय होप सो. बरं तुझ्यासाठी आज आईने खास मुगाचा शिरा पाठवला आहे आवडतो ना तुला!” ती डबा पुढे करत म्हणाली.

आदिराज,“ अरे वा मस्त. कशासाठी नाही तर या शिऱ्यासाठी आणि काकूंचा हाताच्या झणझणीत मटनासाठी तरी भाईला तुझ्याशी लग्न करायला भाग पडायला हवं.” तो शिरा खात म्हणाला.

क्षितिजा,“ हो का? आदी तू माझ्या आयुष्यात अभीसरांच्या आधीपासून आहेस. यु आर माय नॉट ओन्ली फ्रेंड बट यु आर माय ब्रो आणि अभिसर आणि माझं नातं नाही जरी जुळलं तरी तुझं माझं आणि संग्रामसर-गार्गी मॅडमच देखील नातं तसंच राहणार आहे कळलं तुला.” ती त्याला टपली मारुन म्हणाली.
★★★

आज पार्टीचा दिवस उजाडला.पार्टी संध्याकाळी होती.त्यामुळे आज ऑफिसला हाफ डे देण्यात आला होता. संग्राम आणि अभिराज सकाळी ऑफिसला जाऊन आले. सुशांत आणि आदिराज पार्टीची तयारी पाहत होते. पार्टीबरोबर संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होती. संग्राम-गार्गी तयार होऊन खाली आले तर बाकी सगळे तयार होऊन त्यांचीच वाट पाहत होते. गार्गी, समिधा आणि मनिषाताईनी अभिराजने बेंगलोरहुन आणलेल्या साड्या नसल्या होत्या तर संग्राम, सुशांत, अभिराज, आदिराज आणि संजयराव फॉर्मल सूटमध्ये होते. राज्ञी वनपीसमध्ये सुंदर दिसत होती.

सगळे लॉनमध्ये गेले प्रशस्त लॉन लायटिंग आणि फुलांनी सजवण्यात आला होता. एका बाजूला बुफे सिस्टीम होती तिथे स्टार्टर, जेवण आणि ड्रिंक्सची रेलचेल होती. सुशांत आणि समिधा पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गेट जवळ उभे होते तर संग्राम आणि गार्गी सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत होते तर अभिराज आणि आदिराज सगळी व्यवस्था पाहत होते.

इतक्यात क्षितिजा तिच्या आई वडिलांबरोबर आली. तिने अभिराजने तिला दिलेली साडी नेसली होती. गोल्डन बॉर्डर असलेल्या मिल्क व्हाईट कलरची साडी तिच्या सावळ्या रंगला उठून दिसत होती. मोकळे सोडलेले केस, कानात मॅचिंग झुमके, गळ्यात नाजूक नेकलेस, कपाळावर छोटी टिकली आणि हातात मॅचिंग बांगड्या एकूणच ती कातिल दिसत होती. ती आत आली आणि अभिराज तिला भान हरपून पाहतच राहिला. कोणाच्या तरी बोलावण्याने तो भानावर आला. क्षितिजा संग्राम आणि गार्गीजवळ गेली तर ते दोघे तिला पाहून एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते.

क्षितिजा,“ गार्गी मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसतायत. तुमच्यावर साडीचा मरून कलर खूप खुलून दिसतोय. अभिराज सरांची चॉईज खूप छान आहे.” ती म्हणाली.

गार्गी,“ थँक्स आणि आपण ऑफिसमध्ये नाही तर मला काकू म्हण आणि अभीची चॉईज मस्तच असते.( ती अर्थपूर्ण हसून संग्रामकडे पाहत म्हणाली.क्षितिजाच्या ती तिच्याबद्दल बोलत आहे हे लक्षात आले आणि तिने लाजून मान खाली घातली.) क्षिती साडी खूप छान आहे गं! कुठून घेतलीस?” तिने विचारले.

क्षितिजा,“ काकू ही साडी अभिराजसरांनी गिफ्ट दिली बेंगोलरमध्ये तुम्हाला साड्या घेताना. मला ही खूप आवडली म्हणून आज नेसली.” ती म्हणाली आणि तिला आदिराजने हाक मारली. ती गेली.

गार्गी,“ संग्राम खरंच अभी तुझीच सावली आहे बाबा. तू मला बेंगलोरवरून जशी साडी आणली होती अगदी त्याच प्रकारची साडी अभिने क्षितिजाला गिफ्ट दिली आहे.” ती कौतुकाने म्हणाली.

संग्राम,“ हो ना मला तर आश्चर्य वाटलं क्षितिजाला अशा साडीत पाहून. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे गार्गी! मी ही तुझ्यावर नाराज होतो तरी तुझ्यासाठी साडी आणली होती आणि अभी क्षितिजावर नाराज आहे तरी त्याने तिला साडी घेतली. दोघांची जोडी मेड फॉर इच अदर आहे.” तो क्षितिजाला पाहून बोलत होता.

गार्गी,“ आपल्यासारखी! आणि हो जास्त शायनिक नाही मारायची मापात राहायचं. बिअर वगैरे घ्यायची नाही कोणी किती ही आग्रह केला तरी कळलं का मिस्टर एस.एस.! बाकी अजून पण हँडसम आहे माझा नवरा.” ती संग्रामला डोळा मारत म्हणाली.

संग्राम,“ जास्त बॉसिंग करू नकोस आ गार्गी मी ऐकून घेतोय म्हणून आणि कशाचा हँडसम जिम बंद केली आणि आता वजन वाढायला लागलं आहे माझं. बाकी आदीची मम्मा पण छान दिसतेय बरं का.” तो मिश्कीलपणे म्हणाला.

गार्गी,“ बॉसिंग करू नकोस म्हणजे मी बॉसच आहे तुझी आणि इतकं ही वजन वाढलेलं नाही तुझं उलट कमीच झालं असेल. आता हे काय नवीन आदीची मम्मा वगैरे.” तिने विचारले.

संग्राम,“ असंच आज खूप हँडसम दिसतंय आपलं कार्ट सूटमध्ये म्हणून!” तो म्हणाला आणि त्याला कोणी तरी हाक मारली.

क्षितिजा सगळ्यांशी बोलत होती. सगळे तिला सुंदर दिसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट देत होते पण तिची नजर मात्र राहून राहून अभिराजवर स्थिरावत होती. तिला वाटत होते अभिराजने तिला कॉम्प्लिमेंट द्यावी पण अभिराज मात्र पाहुण्यांची विचारपूस करण्यात मग्न होता. पार्टी रंगात आली आणि संग्रामने आदिराजच्या कानात काही तरी सांगितले आणि आदिराज माईक घेऊन मधोमध जाऊन उभा राहिला.

आदिराज,“अरे पार्टी हो और। डान्स ना हो! ये बात कुछ हजब नाही होती. तर आपण कपल डान्स करणार आहोत पण त्यात एक ट्विस्ट असणार आहे. नाचत नाचत आपले पार्टनर चेंज करायचे आणि डान्स करायचा कशी वाटली आयडिया?” त्याने विचारले.

आणि सगळे ओरडले मस्त! कपल्स डान्ससाठी फ्लोअरवर येत होते आणि आदिराजने क्षितिजाला त्याच्याबरोबर डान्ससाठी बोलावले. अभिराज तिथेच उभा राहून सगळे पाहत होता तर गार्गी अभिराजजवळ गेली आणि त्याच्या पुढे डान्ससाठी हात केला.

अभिराज,“ हे काय आंटी?अगं अंकूबरोबर डान्स कर ना.” तो म्हणाला.

गार्गी,“ अभी अरे तुझ्या अंकलला काही महिने तरी डॉक्टरने हे सगळं करू नका म्हणून सांगितलं आहे. तो आज इतका वेळ जागरण करणार आहे तेच खूप आहे. राहूदे तुला नाही करायचा माझ्याबरोबर डान्स तर” ती तोंड फुगवून म्हणाली आणि जाऊ लागली तर अभिराजने तिचा हात धरला.

अभिराज,“ इतक्या सुंदर मुलीबरोबर डान्सला नाही म्हणायला वेड लागलं आहे का मला! आंटी यु आर लुकिंग गॉर्जीयस! खूप सुंदर दिसतेय तुला साडी.” तो म्हणाला.

गार्गी,“ झाला मस्का मारून? आणि थँक्स साडी माझ्या मुलाने आणली आहे मग सुंदर तर असणारच ना.” ती हसून त्याचा गाल ओढत म्हणाली आणि तो मनापासून हसला आणि दोघे डान्स फ्लोअरवर गेले.

सुशांत कधी डान्स वगैरेच्या भानगडीत पडत नव्हता त्यामुळे संग्राम त्याच्याजवळ जाऊन थांबला.

सुशांत,“तुझी डिमांड संपली संग्र्या. तू म्हातारा झालास आता.” तो त्याच्या हातात ज्यूसचा ग्लास देत. त्याला चिडवत म्हणाला.

राज्ञी,“ उगीच काही तरी बोलू नकोस डॅड! शेर कभी बुढे नही होते. अंकू तू याच्याकडे लक्ष नको देऊ सगळा लेडीज स्टाफ तुझ्याबरोबर डान्स करायला तडफडत आहे पण तू आजारी आहे म्हणून कोणी आले नाही विचाराला.” ती डोळे मिचकावून म्हणाली.

सुशांत,“ आली लगेच अंकूची लाडकी.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

संग्राम,“सुशा सुधार रे आता. मुलं मोठी झाली आपली किती दिवस लहान मुलांसारखं वागणार.” तो त्याला हसून म्हणाला.

सुशांत,“ गप ये तू! राज्ञी तू उद्याच हॉस्टेल गाठ आता.”तो लटक्या रागाने म्हणाला.

संग्राम,“ जा आता तो बघ तो चव्हाण तुला बोलवत आहे. हॉस्टेल गाठ म्हणे राज्ञी चल आपण काही तरी खाऊ ग.” तो त्याला चिडवत राज्ञीला घेऊन तिथून गेला.

इकडे डान्स फ्लोअरवर सगळे डान्स करत होते आणि फिरत फिरत डान्स पार्टनर बदलत होते आणि अचानक अभिराज आणि क्षितिजा समोरासमोर आले.

अभिराज क्षितिजाबरोबर डान्स करेल की तिथून निघून जाईल?
©स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all