माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ९६

दारावर कोण असेल?


दुसऱ्या दिवशी अमोली आणि तिचे नातेवाईक रिसॉर्टवर आले. एक दिवस आराम करून त्यानंतर मुहूर्तमेढपासून लग्नाच्या कार्यक्रमाला सुरवात होणार होती. आज ही सगळे जरा निवांत होते. संध्याकाळच्या वेळी अभिराज रिसॉर्टच्या पुढच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये त्याच्याच विचारात गढून गेला होता. योगायोगाने क्षितिजा ही तिथे एका बेंचवर येऊन बसली होती.

थंडीचे दिवस असल्याने दिवस लवकरच मावळतीकडे झुकू लागला होता. सूर्याचा केशरी गोळा पश्चिमेकडे आस्थाला जात होता आणि स्वतःच्याच तंद्रीत असलेल्या क्षितिजाकडे त्याचे लक्ष गेले. तिने गुडघ्यापर्यंतचा पिवळसर फ्रॉक घातला होता. केस वाऱ्याबरोबर उडत होते पण तिचे लक्ष मात्र त्या अस्ताला जाणाऱ्या भास्कराकडे होते. अभिराज तिला दोन मिनिटं पाहत राहिली आणि तो अचानक चिडला. तो तिच्याजवळ तरातरा चालत गेला. तिला काही कळायच्या आतच त्याने तिला एका झाडाच्या आडोशाला नेले आणि तिचे दोन्ही हात स्वतःच्या हाताने करकचून धरून तिला झाडाला टेकवून उभे केले. तो तिच्या अगदी श्वासाच्या अंतरावर होता. तिला काय घडतंय कळण्या आधीच त्याने बोलायला सुरुवात केली.

अभिराज,“ माझा पाठलाग करत आहेस ना तू? तू का आली आहेस इथे?मुद्दाम करत आहेस का हे सगळं? तुला काय मिळवायचं आहे गं हे सगळं करून?” तो चिडून विचारत होता.त्याच्या बोलण्याने क्षितिजा भानावरली आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत त्याला म्हणाली.

क्षितिजा,“ सोडा सर मला. कुणी पाहिलं तर काय म्हणेल? उगीच गैरसमज नको आणि मी तुम्ही पार्कमध्ये नव्हता तेंव्हाच येऊन उभी होते. तुमचा पाठलाग करण्याची मला हौस नाही.” ती ही रागाने म्हणाली.

अभिराज,“ मी पार्कमध्ये असण्याबद्दल बोलत नाही तर तू आमच्याबरोबर मुंबईतुन इथे येण्या बाबतीत बोलत आहे.” तो त्याच स्थितीत रागाने बोलत होता आणि क्षितिजा स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती.

क्षितिजा,“ मी इथे माझ्या मर्जीने नाही आले तर संग्रामसरांनी फोर्स फुली मला इथे आणले आहे. मी तुमच्या कंपनीबरोबर तीन वर्षांचे काँट्रॅक्ट साइन केले आहे जे मी मोडू शकत नाही. नाही तर मला हौस नाही तुमच्या लग्नाला यायची. असं ही तुम्हांला तर माझ्याशी लग्न करायचे नाही. तुमचं माझ्यावर प्रेम नाही मग तुम्हाला माझ्या असण्याचा काहीच फरक पडायला नको. तुम्ही तर करताय ना अमोलीबरोबर लग्न मग?” तिने स्वतःला त्याच्यापासून सोडून घेतले आणि डोळे पुसत ती निघून गेली. तिच्या बोलण्याने अभिराज मात्र विचारात पडला.

‛अंकू असा का वागतोय? एकीकडे त्याने अमोलीला माझ्यासाठी निवडले आहे आणि दुसरीकडे त्याने क्षितिजाला इथे यायला भाग पाडले? काय करायचे आहे अंकूला नेमके. त्याला मी काही विचारले तर चिडचिड करेल आणि क्षितिजाबरोबर म्हणाली तिच्या असण्याने मला फरक पडायला नको.’
★★★

आज मुहूर्तमेढचा कार्यक्रम होता. दोन्ही कडच्या सुहासिनीनी देवक आणि मुहूर्तमेढ रोवली आणि लग्नाच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आदिराज मात्र या सगळ्यात फटकून वागत होता. हे जे काही चालले होते ते त्याला अजिबात पटत नव्हते तरी तो शांतपणे सगळं पाहत होता.

संध्याकाळी छोटेखानी गेट टू गेदर ठेवण्यात आले जेणेकरून दोन्ही कडच्या मंडळींची तोंड ओळख तरी होईल. अमोली तिच्या मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात होती. तिने अभिराज आणि आदिराजला येताना पाहिले आणि ती अभिराजचा हात धरून त्याला तिच्या मित्र-मैत्रिणी जवळ घेऊन गेली. अभिराज थोडा मनातून चरकला होता कारण मागच्या वेळीचा अनुभव त्याच्या पाठीशी होता तरी तो अमोलीला नाही म्हणू शकत नव्हता.

अमोलीचे मित्र-मैत्रिणी त्याला नखशिखांत न्याहाळत होते.त्याने कॅज्युअल कपडे घातले होते.ब्यु जीन्स आणि स्काय ब्यु शर्ट! त्याला न्याहळून झाल्यावर एक मित्र म्हणाला.

मित्र,“ अमोली तुझा होणारा नवरा हँडसम तर आहे बाबा पण त्याला बुद्धी ही आहे की नुसताच देखणा दिवा?” तो हसून बोलत होता.आदिराज ही तिथेच होता त्याला अमोलीच्या मित्राचे बोलणे आवडले नाही आणि तो म्हणाला.

आदिराज,“ बुद्धी ना!ती तुमच्यापेक्षा जास्तच आहे त्याच्याकडे काय आहे तो ट्रिपल एसचा निम्मा बिझनेस सांभाळतो ओ पण त्याची बुद्धी काढणारे तुम्ही काय करता की नुसतीच बापाच्या पैशावर ऐश?” तो कुत्सितपणे बोलत होता आणि अभिराजने त्याला गप्प म्हणून इशारा केला.

अमोली,“ कम ऑन आदी! ही इस जस्ट किडींग!” ती कसनुस हसत म्हणाली.

आदिराज,“ आय एम अल सो किडींग बाय द वे माझं नाव आदिराज आहे आणि माझ्याजवळचेच लोक मला आदी म्हणू शकतात तर तू ही मला आदिराजच म्हण.” तो म्हणाला आणि अमोलीने चिडक्या नजरेने अभिराजला पाहिले.

अभिराज,“ आदी चल आपण बाकी लोकांना भेटू” म्हणून तो त्याला घेऊन तिथून गेला.

आदिराज,“ तुझी बुद्धी काढणारा तो आहे कोण रे? आणि ती अमोली तुझी होणारी सो कॉल्ड बायको तिच्या मित्राने तुझा अपमान केला आणि तिला हा जोक वाटतो?” तो रागाने तणतणत होता.

अभिराज,“ तू शांत हो बरं आदी! अरे तो खरंच चेष्टा करत असेल. तू पाणी घे.” तो त्याला समजवत म्हणाला.

अमोली मात्र आदिराजने तिच्या केलेल्या अपमानामुळे रागाने धुमसत होती. ती तिच्या वडिलांच्या दिशेने निघाली होती आणि क्षितिजा काही तरी घेऊन तिच्या विरुद्ध दिशेने येत होती. अमोली क्षितिजाला येऊन धडकली आणि वरून क्षितिजालाच बोलू लागली.

अमोली,“ डोळे फुटले का गं तुझे? दिसत नाही का तुला?” ती तिच्यावर खेकसली.

क्षितिजा,“ मॅडम तुम्हीच मला धडकलात.” ती नम्रपणे म्हणाली.

अमोली,“ मॅनेजर कुठे आहे रिसॉर्टचा? किती उध्दट स्टाफ आहे यांचा!” ती चिडून ओरडली आणि गार्गी आवाज ऐकून तिथे आली.

गार्गी,“ काय झाले आहे अमोली?” तिने विचारले.

अमोली,“ आंटी ही वेटर मुलगी एक तर मला येऊन धडकली आणि वरून मलाच उलट बोलत आहे.” ती म्हणाली. आत्तापर्यंत चढलेला तिचा आवाज गार्गीला पाहून कमी झाला होता.

गार्गी,“ ती वेटर नाही. ती संग्रामची असिस्टंट आहे आपली मदत करायला तिला बोलावले आहे. क्षिती तू जा.” ती म्हणाली आणि क्षितिजा डोळे पुसत निघून गेली. आदिराज सगळं लांब उभं राहून पाहत होता.

अमोली,“ सॉरी आंटी मला वाटले की..” ती नाटकीपणे म्हणाली.

गार्गी,“ इट्स ओके! तू जा.” ती म्हणाली आणि आदिराज गार्गीजवळ आला.

आदिराज,“ मम्मा मला काय ही अमोली भाईसाठी ठीक वाटत नाही. भाई सारख्या शांत माणसाला ही समजून घेईल का?”तो म्हणाला.

गार्गी,“ आदी अरे तिचा गैरसमज झाला होता. एका प्रसंगावरून आपण कोणाला ही जज करू शकत नाही बेटा” ती म्हणाली.

आदिराज मात्र पाय आपटत निघून गेला. गार्गीला त्याचा त्रागा कळत होता. तो त्याच्या भाईच्या आयुष्यात त्याच्या बेस्ट फ्रेंडची जगा कुणी तरी दुसरं घेत आहे हे पाहू शकत नव्हता पण अभिराजच्या अडमुठेपणा पुढे सगळ्यांचाच नाईलाज झाला होता.

गार्गीने रिस्ट व्हॉचमध्ये वेळ पाहिली आणि ती धावतच संग्रामजवळ गेली.आज प्रदोष होता आणि सात वाजत आले तरी अजून तिने पूजेची तयारी केली नव्हती. पूजेच सामान तिने आधीच रूममध्ये आणून ठेवलं होतं ते आठवून ती जरा रिलॅक्स झाली तरी तिने कुणाशी तरी बोलत असलेल्या संग्रामला गाठल आणि त्याला घेऊन रूममध्ये गेली. ती लगेच शुचिर्भूत झाली आणि संग्रामला तिने वॉशरूममध्ये पिटाळले. संग्राम येई पर्यंत तिने पूजा मांडली आणि तासा भरात पूजा उरकली. ती आणि संग्राम अजून नेवैद्य दाखवत होते की दारावर कोणी तरी नॉक केले.त्या आवाजाने दोघे ही दचकले.

दारावर कोण असेल? आणि इतके दिवस गुप्तपणे केलेली पूजा आणि व्रत फळाला येण्याआधीच भंगेल का?
©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all