माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ६७

संग्राम आणि गार्गीच्या आयुष्यात येण्याचा राजवीरचा उद्देश काय असेल?


भाग 67
दुपारचे जेवण करून संग्राम पुस्तक वाचत बसला होता तर गार्गी तिचे मेल चेक करत होती. तेवढ्यात दारावर कोणीतरी नॉक केले आणि गार्गीने दार उघडले. तर समोर रिसॉर्टचा मालक हातात फुलांचा बुके घेऊन उभा होता.

गार्गी,“ अरे मिस्टर मूर्ती आप आइए ना प्लीज अंदर!” ती अदबीने म्हणाली.

मिस्टर मूर्ती,“ थैंक्स मैम! मिस्टर एस. एस आपली तबियत कैसी है अब?”त्याने संग्रामच्या हातात बुके देत विचारले.

संग्राम,“ आप मुझे जानते हैं? वैसे मेरी तबियत अब ठीक है।” त्याने आश्चर्याने विचारले.

मिस्टर मूर्ती,“ अरे आप दोनों को कौन नही जानता? आप तो सॉफ्टवेयर इंटस्ट्री के बेताज बादशाह है। आपके बारे में बिज़नेस मैगज़ीन में आये दिन छपता रहता है।” तो म्हणाला.

संग्राम,“ थैंक्स! पर मैं इतनी भी बड़ी हस्ती नही हूँ।”तो संकोचून म्हणाला

मिस्टर मूर्ती,“ यही तो खासियत होती है आप जैसे बड़े लोगों की! मैं आप दोनों को आज रात के प्रोग्राम के लिए इंव्हाईट करने आया हूं। वैसे आप तो जानते है कि ऊटी हिलस्टेशन हनीमून के लिए फेमस है! यहाँ रोज नए शादीशुदा जोड़े आते है। हमारे रिसॉर्ट में भी करीब बिस-पच्चीस शादीशुदा जोड़े आये हुए है। उन्ही के लिए कुछ गेम्स और एक लकी ड्रॉ भी आयोजित किया है हमने। इसी प्रोग्राम के लिए आपको मैं खुद नियोता देने आया हूँ।” तो म्हणाला

संग्राम,“ थैंक्स लेकिन हम दोनों उन यंगस्टर्स में क्या करेंगे!” त्याने हसत विचारले.

मिस्टर मूर्ती,“ आप दोनों आज हमारे चीफ गेस्ट है। कुछ नही बस उन नए शादीशुदा जोड़ो को सुखी और खुशहाल शादी के कुछ टिप्स दे दीजिए। थोडासा गाइड कर दीजिए। आप दोनों एक आदर्श जोड़ा है।” तो म्हणाला.

गार्गी,“ पर रात देर तक हम रुक नही पाएंगे क्योंकि इनको ज्यादा देर जगना अलाउड नही।” ती म्हणाली आणि संग्रामने तिला डोळ्यांनी खुणावले.

संग्राम,“ गार्गी हम मॅनेज कर लेंगे। हम आ जायेंगे मिस्टर मूर्ती!” तो म्हणाला.

मिस्टर मूर्ती,“ आठ बजे प्रोग्राम शुरू हो जाएगा।” त्यांनी सांगितले व ते निघाले तर गार्गीने त्यांना थांबवले आणि ती म्हणाली.

गार्गी,“ एक मिनिट मिस्टर मूर्ती! ओ रिसॉर्ट में जो आपके गुरु रुके है वो कौन है और आप उन्हें कैसे जानते है?” तिने विचारले.

मिस्टर मूर्ती,“कमाल है आप उन्हें जानती नही वो तो महाराष्ट्र से ही है।” ते आश्चर्याने म्हणाले.

गार्गी,“ खूप चांगलंच ओळखते मी त्याला(ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.) नही जानती ना इसी लिए पूछा।”ती नाटकीपणे म्हणाली.

मिस्टर मूर्ती,“ मेरा बिज़नेस डूबने ही वाला था। तभी मुझे मेरे एक दोस्तने राजेश्वर महाराज के बारे में बताया। वो तब हिमाचल प्रदेश के एक छोटेसे गाँव में थे। मेरा दोस्त मुझे लेकर उनके पास गया। उन्होंने मुझे बस छोटे मोठे विधि बताए और आज मेरा बिज़नेस दिखिए कहाँ पहुच गया। वैसे वो लोगों से और सांसारिक जगहों से दूर रहना पसंद करते है। लेकिन कुछ दिन पहले उनके शिष्यने फोन किया और महाराज यहाँ कुछ दिन रहना चाहते है कहा। मेरे लिए तो ये सौभाग्य की बात है जी। ठीक है मैं चलता हूँ। अगर आपको उनसे आशीर्वाद चाहिए तो मैं..” ते बोलत होते.

गार्गी,“ जी नही हमें उनसे कुछ नही चहिए।” तिने त्यांचे बोलणे मध्येच तोडले आणि ती म्हणाली.मिस्टर मूर्ती निघून गेले.

संग्राम,“ काय गं गार्गी तुला काय गरज होती त्या राजवीरची चौकशी करायची? तुझ्या डोक्यात ना काय चालेलं असतं तुलाच माहीत!” तो म्हणाला.

गार्गी,“ का बरं? मिस्टर एस.एस. जलस फिल करत आहेत का?” तिने त्याच्याकडे पाहत नाटकीपणे विचारले.

संग्राम,“ तुला खरंच असं वाटतं? अगं तो आता राजेश्वर महाराज झाला आहे. संसाराच्या बंधनातून खूप दूर गेला आहे. ऐकलीस ना मूर्ती काय म्हणत होता ते?” तो तिला समजावत म्हणाला.

गार्गी,“ जोक अपार्ट! पण हा राजवीर या रिसॉर्टमध्ये काय करत आहे संग्राम? ते ही आपण इथे आल्यावर? आणि त्याच ना मला काही नको सांगू त्या राजवीरची लायकी मी चांगलीच ओळखून आहे.” ती रागाने म्हणाली.

संग्राम,“ तुझ्या मनात शंकाच खूप बाबा! सोड ना त्या राजवीरचा विषय.” तो म्हणाला.

गार्गी,“ पण तुला त्या मूर्तीचे इंव्हीटेशन कोण स्वीकारायला सांगितले होते? माहीत आहे ना तुला; तू रात्री फार वेळ जागायचे नाही ते!” ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

संग्राम,“ अगं तो इतकं बुके वगैरे घेऊन इंव्हाईट करायला आला होता आणि आपण त्याला नाही म्हणायचे बरे दिसते का? आणि एक दिवस जागलं तर काय होणार आहे इतकं!” तो तिला लाडिगोडी लावत म्हणाला.

गार्गी,“ झाला मस्का लावून! आता आराम करा जरा.” ती म्हणाली.

संग्राम,“नुसतं आराम कर! आराम कर!” तो तोंड वाकडं करून तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

गार्गी,“ काय म्हणालास? तुला काय वाटतं मला ऐकू येणार नाही का? आणि रात्री जास्त शयनींग मारायची नाही कळले का?” ती म्हणाली.

संग्राम,“ हो माझी आई कळले मला!” तो वैतागून म्हणाला.
★★★

गार्गीने कॉटनची मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. त्यावर स्टँड कॉलरचा फुल स्लिव्ह ब्लाउज शोभत होता. तिने उजव्या बाजूला शाल घेतली होती. कानात डायमंडची नाजूक कर्ण फुले आणि गळ्यात नाजूक मंगळसूत्र, हातात संग्रामने अमेरिकेवरून आणलेल्या बांगड्या, मोकळे सोडलेले केस, लाईट मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली. ती आरशात पाहून भांगात कुंकू भरत होती. तितक्यात संग्राम चेंज करून वॉशरूममधून आला आणि तिला तयार झालेलं पाहून मागून मिठी मारत म्हणाला.

संग्राम,“गार्गी यु आर लुकिंग गोर्जीयस!”

गार्गी,“ थँक्स! बरं तयार हो बरं लवकर सात वाजून गेले आहेत.” ती त्याच्याकडे वळून त्याच्या शर्टची कॉलर सरळ करत म्हणाली.

संग्रामने व्हाइट शर्ट आणि लाईट पिंक कलरचा ब्लेझर आणि त्याच कलरची ट्राऊझर घातली होती. तो नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता. दोघे ही बरोबर आठ वाजता हॉलमध्ये गेले तर सगळी नवीन जोडपी आधीच जमली होती. मिस्टर मूर्तीने स्वतः दोघांचे स्वागत केले आणि प्रोग्रॅम सुरू झाला.

नवीन जोडप्यांसाठी विविध गेम्स आणि बक्षिसे ठेवण्यात आली होती. एकाच कपड्यावर उभं राहून डान्स करणे आणि कपडा फोल्ड करून पुन्हा डान्स करणे, बायकोसाठी मोत्याचा हार बनवणे, टाय बांधणे, तसेच बरेच गेम्स होते ज्यात एकमेकांचे कोओर्डीनेशन खूप गरजेचे होते. संग्राम सगळं एन्जॉय करत होता पण गार्गीचे मात्र सगळे लक्ष संग्रामकडे होते. गार्गी त्याला बऱ्याच दिवसांनी दिलखुलास हसताना पाहत होती.

‛ बरं झालं संग्रामला मी जबरदस्तीने उटीला घेऊन आले. त्याच त्याच वातावरणातून तो बाहेर पडला आणि थोडा रिलॅक्स झाला. आज किती दिवसांनी त्याला असं हसताना पाहत आहे मी! संग्राम तू असाच हसत रहा आयुष्यभर, लव यु!’ ती मनात म्हणाली आणि तिने संग्रामचा हात धरला. संग्रामने डोळ्यांनीच काय म्हणून विचारले तर तिने काही नाही म्हणून मान हलवली.

पण कोणी तरी असे होते जे तिथे उपस्थित नसून ही सगळे पाहत होते. खास करून संग्राम आणि गार्गीवर नजर ठेवून होते. ती व्यक्ती राजवीर तर नसेल? पण राजवीर पंचवीस वर्षे कुठे गायब होता आणि असा अचानक संग्राम-गार्गीच्या आयुष्यात येण्याचा त्याचा काय उद्देश असेल?
©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all