माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ४४

संग्राम अभिराजच्या मनातील गोष्ट काढून घेऊ शकेल का?


भाग 44

सकाळचे सात वाजले आणि डॉक्टरांनी अभिराजला चेक करून तो सेफ असल्याचे सांगितले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अभिराज सेफ असला तरी तो अजून शुद्धीवर आला नव्हता. आदिराजने महाबळेश्वर मधील एका लॉजमध्ये सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. संग्राम मात्र अजून ही तिथेच बसून होता. अभिराज साधारण सकाळी दहाच्या दरम्यान शुद्धीवर आला. अभिराज बेशुद्ध होता तरी सतत अंकू अंकू पुटपुटत होता म्हणून राज्ञीने संग्रामला आधी अभिराजला भेटायला पाठवून दिले. तो त्याच्या बेड जवळ खुर्चीवर जाऊन बसला आणि त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत बोलू लागला

संग्राम,“ तुला बरं वाटतंय का मी नाही विचारणार अभी! आता लवकर बरं व्हायचं आणि घरी चलायचं. खूप झालं तुझं हुंदडून!” तो लटक्या रागाने बोलत होता.

अभिराज,“ अंकू आय एम सॉरी! मी हरलो मी नाही मिळवू शकलो क्षितिजाची माफी उलट तिने…” त्याला बोलताना ठसका लागला.

संग्राम,“अभी आपण या विषयावर नंतर बोलू आणि तू हरला वगैरे नाहीस. तू प्रेमाची परीक्षा दिलीस आणि त्यात उत्तीर्ण ही झालास बच्चा!” तो म्हणाला.

अभिराज,“ पण तू आणि आदीने मला माफ केलं का?” त्याने विचारले.

संग्राम,“ हो बाबा केलं माफ मी आणि आदीला आता तूच विचार!” तो म्हणाला तोपर्यंत आदिराज तिथे आला.

आदिराज,“ भाई तुला माफ करेन मी पण तुझी स्पोर्ट बाईक मला हवी.” तो खोडकरपणे म्हणाला.

अभिराज,“ काय म्हणालास तू भाई आणखीन एकदा म्हण ना आदी आणि तू माफ करणार असशील तर स्पोर्ट बाईक काय माझं सगळं तुझं!” तो कातर आवाजात थांबून थांबून बोलत होता.

आदिराज,“ आता काय भाई भाईच गाणं म्हणू का?बरं तू आराम कर.” तो त्याचा हात हातात घेऊन बोलत होता.

संग्राम,“ आम्ही बाहेर आहोत.” तो म्हणाला आणि सुशांत, गार्गी, समिधा आणि राज्ञी त्याला भेटले.

क्षितिजा मात्र अभिराजला बाहेरूनच पाहत होती. आत जाण्याची हिम्मत तिची होत नव्हती.तरी आवंढा गिळून ती आत गेली. अभिराजने तिला पाहिले

क्षितिजा,“ अभी सर कसे आहात तुम्ही?” तिने विचारले.

अभिराज,“ मी ठीक आहे.” तो म्हणाला आणि संग्राम अभिराजसाठी सूप घेऊन आला. क्षितिजाला पाहून तो सूप टेबल वर ठेवून म्हणाला.

संग्राम,“ अभी मी बाहेर आहे.तुम्ही बोला.”

अभिराज,“ तू थांब अंकू आमचं बोलून झालं आहे. क्षितिजा तू गेलीस तरी चालेल.”तो रुक्षपणे म्हणाला आणि क्षितिजाचा नाईलाज झाला ती गेली.

आजचा दिवस गेला आणि अभिराज आता घरी जाण्यासाठी हट्ट करू लागला. राज्ञीने तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि दुसऱ्याच दिवशी तिने अँब्युलन्स मधून अभिराजला घेऊन जाण्याची व्यवस्था केली. क्षितिजा मात्र स्वतःला आतल्या आत खात होती. क्षितिजा आज अभिराज मुंबईला जाणार म्हणून त्याला पहायला आली होती. ती त्याला भेटायला गेली तर तिला पाहून अभिराजने डोळे झाकून घेतले आणि क्षितिजा गेल्या पाऊली परत फिरली. तिला आदिराज बरोबर देखील बोलायचे होतेच. आदिराज नुकताच हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याने क्षितिजाला पाहिले आणि तो तिथून जाऊ लागला.

क्षितिजा,“ आदी प्लिज थांब ना! मला तुझ्याशी बोलायचे आहे.”

आदिराज,“ तुला खरंच माझ्या सारख्या श्रीमंत माणसाशी बोलायचे आहे?” तो तिला तिरकस पाहत म्हणाला.

क्षितिजा,“प्लिज आदी अजून किती लाजवशील मला. आय एम सॉरी!” ती खाली मान घालून म्हणाली.

आदिराज,“ हे तू भाईला म्हण कारण त्याला तू खूप त्रास दिला आहेस.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ ते माझं काहीच ऐकायला तयार नाहीत आदी.”

आदिराज,“ का ऐकून घेईल आता तो तुझं सांग ना? मला मान्य तो चुकला पण तू ही त्याच्याशी बरोबर वागली नाहीस क्षितिजा.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ माझी चूक मला मान्य आहे पण आता मी काय करू म्हणजे अभी सर मला माफ करतील?” तिने विचारले.

आदिराज,“क्षिती तू त्याला खूप दुखावले आहेस. तो लगेच तुला माफ नाही करणार. डॉक्टरांनी ही त्याला ट्रेस देऊ नका म्हणून सांगितले आहे. तो ट्रोमा मधून जातोय. तू थोडे दिवस त्याच्यापासून दूर राहिलीस तर बरं होईल. तुला तुझं लाईफ देखील सॉर्ट करायला वेळ लागेल ना! आत्ताच तर तुझं ठरलेलं लग्न फक्त थांबलं आहे अजून मोडले नाही! तनयला काय सांगायचे? तुझ्या घरात काय आणि कसं सांगायचे या सगळ्याचा विचार करून सगळ्या गोष्टी निस्तार! काकांची तब्बेत बरी नाही ना त्यांच्याकडे लक्ष दे. थोड्या दिवसांनी भाईला भेट. तोपर्यंत तो ही या सगळ्यातून सावरले. हे सगळं मी तुला तुझा मित्र म्हणून सांगतोय आणि हो माझ्या भाई बरोबर तू जे काही वागलीस त्यासाठी अभिराजचा भाऊ म्हणून मला ही तुला माफ करायला वेळ लागेल.” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता निघून गेला.


क्षितिजाला आदिराजचे बोलणे पटले. दुसऱ्या दिवशी अभिराजला घेऊन सगळे मुंबईत पोहोचले. या सगळ्या घटनेमुळे अभिराज शरीर आणि मानसिक दृष्ट्या देखील खचला होता. त्याला वाटत होते की तो हरला आहे प्रेमात आणि घरच्यांच्या नजरेत देखील. दोन दिवस तो गप्प गप्प होता आणि राज्ञीला ही गोष्ट सतत खटकत होती. तिला अभिराजची काळजी वाटत होती म्हणून तिने संध्याकाळी संग्राम, गार्गी, संजयराव, मनीषाताई आणि आदिराजला बोलवून घेतले.

संग्राम,“ असे अचानक तू सगळ्यांना का बोलावले आहेस? अभी ठीक आहे ना?” त्याने काळजीने विचारले.

राज्ञी,“ म्हणलं तर हो आणि म्हणलं तर नाही.”ती गंभीरपणे म्हणाली.

गार्गी,“ म्हणजे?” तिने विचारले.

राज्ञी,“ भाई महाबळेश्वर वरून आल्यापासून खूप गप्प गप्प आहे त्यामुळे त्याची मला खूप काळजी वाटते.” ती म्हणाली.

आदिराज,“ हो पण भाई तसा स्वभावाने शांतच आहे की!” तो म्हणाला.

राज्ञी,“ हो आदी तो तसा शांत आहे स्वभावाने पण ते शांत असणे आणि हे शांत असणे वेगळे आहे.”ती विचार करत बोलत होती.

सुशांत,“ राज्ञी नीट सांग बरं तुला काय म्हणायचे ते!” तो म्हणाला.

राज्ञी,“ दोन दिवस झालं भाई कोणत्या तरी विचारात गाढलेला असतो. सतत त्याचे डोळे भरून येतात तुमच्या ते लक्षात आले नसले तरी मी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. महाबळेश्वरमध्ये जे काही झाले त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला आहेच पण त्याच्या मनावर देखील या गोष्टीचा खोल परिणाम झाला आहे. त्याच मन त्याला खात आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी त्याला खात आहे हे समजायला मात्र मार्ग नाही. जर तो असच स्वतःच्या मनात कुढत राहिला तर तो डिप्रेशनमध्ये जाईल आणि हे त्याच्यासाठी चांगले नाही. त्याची तब्बेत तर नाजूक आहेच पण त्या ही पेक्षा त्याची मनःस्थिती नाजूक बनली आहे. आपल्याला त्याच्या मनात काय चालले आहे ते कळायला हवे. तरच आपण काही करू शकू.” ती म्हणाली.

समिधा,“पण काय करायचं आपण असं! अभी खुप रिझर्व्ह मुलगा आहे. तो सहजासहजी कोणाला ही त्याच्या मनातले सांगत नाही. हा संग्रामला तो सांगू शकतो त्याच्या मनातलं.” ती म्हणाली.

राज्ञी,“ तेच अंकल तू उद्या त्याच्या बरोबर नाष्टा करायच्या निमित्ताने ये आणि त्याच्याशी बोल. तो कदाचित तुला त्याच्या मनातील सांगेल आणि आपल्याला काही तरी करता येईल.” ती म्हणाली.

संजयराव,“ पण राज्ञी त्याची तब्बेत नाजूक आहे त्याला काही त्रास झाला तर?” त्यांनी विचारले.

राज्ञी,“ मी आहे ना आणि जास्त काही होईल असे मला वाटत नाही. जर झाले तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ पण त्याच्या मनात काय सुरू आहे. त्याला कोणती गोष्ट खात आहे हे आपल्याला कळायला हवं.” ती म्हणाली.

संग्राम,“ ठीक आहे मी त्याच्याशी उद्या बोलतो.पण त्याला काही त्रास झाला तर तू तयारीत रहा.” तो म्हणाला.

राज्ञी,“ हो अंकल! तू नको काळजी करुस.”तिने त्याला आश्वस्त केले.

संग्राम अभिराजच्या मनातील गोष्ट काढून घेऊ शकेल का?
© स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all