माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ६८

राजवीर इतक्या सिध्दी कोठून शिकला होता?


भाग 68
मिस्टर मूर्ती,“ अब हमारे नए जोड़ों को मिस्टर एस. एस और गार्गीजी सुखी वैवाहिक जीवन के बारे में मार्गदर्शन करेंगे. दोनो ही एक सफल बिज़नेस चलाते है बल्कि शादी के पच्चीस साल बाद भी उन दोनों में प्यार बरकरार है।” त्यांनी अनौन्स केले आणि गार्गी-संग्रामला स्टेजवर बोलावले.

संग्राम,“ नमस्कार मैं संग्राम सरनाईक और ये मेरी पत्नी गार्गी! वैसे तो सुखी वैवाहिक जीवन का एक ही मूलमंत्र है भाई! जब बीवी झगड़ा करे तो चुप रहो क्योंकि शी इस अ बॉस एंड बॉस इज ऑलवेज राईट!(तो हसत म्हणाला पण गार्गी त्याच्याकडे तिरकस पाहत होती.) ok जोक अपार्ट! सुखी वैवाहिक जीवन की नीव ही एकदूसरे के प्रति विश्वास, आदर और प्यार होती है। वो ही हमारे रिश्ते की डोर थामे रखती है। आप सबको आगे की जिंदगी के लिए शुभकामनाएं और आशीर्वाद!” तो म्हणाला.

तिथे बसलेल्या बायका म्हणजेच मुली एकमेकांमध्ये कुजबुजत होत्या की दोघांची जोडी सुंदर आहे. त्यातल्या त्यात संग्राम हँडसम आहे. गार्गी ते ऐकून गालात हसत होती

गार्गी,“ अब मेरे पति ने तो सब कुछ बता दिया। अब मैं क्या बोलू? लेकिन एक ही बात कहना चाहूंगी हमेशा अपने जीवन साथी का साथ देना चाहे वक्त और हालात कितने भी बुरे हो। उसका हाथ थामे रखना।” ती म्हणाली.

मिस्टर मूर्ती,“ अब वक्त है लकी ड्रॉ का! इस बाउल में यहाँ मौजूद सभी जोड़ो के नाम है। जिस किसी के भी नाम की चिट इस में से निकलेगी उस जोडे को मिलेगा डायमंड रिंग्स का तौफा! उन्हें अपने पार्ट के आगे आपने प्यार का इजहार करके अपने पार्टनर को रिंग पहनानी होगी। ये करली चिट्स शफल और ये उठाली मैंने चिट(ते चिठ्ठी उचलत म्हणाले आणि सगळ्यांचे श्वास एक मिनिट थांबले. प्रत्येकाला वाटत होते की त्यांच्या नावाची चिठ्ठी निघावी.) और उस लकी जोडे का नाम है मिस्टर अँड मिसेस संग्राम सरनाईक!”

संग्राम,“ ये क्या मिस्टर मूर्ती आपने नए जोड़ों के साथ हमारे नाम की भी चिट डाली थी!”त्याने आश्चर्याने विचारले.

मिस्टर मूर्ती,“हाँ मिस्टर एस. एस. क्योंकि जोड़ा नया हो या पुराना जोड़ा तो जोड़ा है ना और आप हमारे रिसॉर्ट के रेप्युटेड कस्टमर है।तो चलए आप अपनी मिसेस के सामने प्यार का इजहार कीजिए और उन्हें हमारी तरफ से ये रिंग पहनाए।” ते म्हणाले.

संग्राम,“ सब के सामने?” तो संकोचून म्हणाला.

मिस्टर मूर्ती,“ हाँ!”ते म्हणाले

संग्राम,“ गार्गी मेरी पत्नी है। वो मेरे बेटे की माँ है। वो एक बहुत अच्छी लाइफ पार्टनर है। गार्गी मैं तुमसे बहुत….!”


तो बोलताना अडखळला लाजून त्याच्या तोंडातून पुढचे शब्द फुटत नव्हते. संग्रामने एकांतात देखील गार्गीसमोर खूप कमी वेळा त्याचे प्रेम व्यक्त केले होते. त्याने कायमच शब्दां ऐवजी त्याच्या कृतीतून ते व्यक्त आणि सिद्ध देखील केले होते. असे उघडपणे सगळ्यांसमोर ते व्यक्त करणे त्याच्या लाजाळू आणि बुजऱ्या स्वभावात बसत नव्हते आणि गार्गी ते चांगलच जाणून होती. ती त्याच्यासमोर उभी राहून गालात असत होती आणि त्याची उडालेली भंबेरी एन्जॉय करत होती. त्याचे लाजेने आरक्त झालेले गाल, त्याच्या ओठांची थरथर, झुकलेली नजर आणि त्याच्या ही नकळत त्याचा केसातून सतत फिरणारा हात हे सगळं नजरेत साठवून घेत होती.


मिस्टर मूर्ती,“ बोलिए ना सर आप उनसे बहुत क्या?” ते म्हणाले आणि सगळ्यांनी एकदम आरोळी ठोकली.

“ बोलिए ना सर sss”

संग्राम,“ मैं तुमसे बहुत…….” त्याने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याची जीभ रेटत नव्हती. शेवटी गार्गीने त्याच्या हातातून माईक घेतला आणि तीच बोलू लागली.

गार्गी,“यही ना की आप मुझसे बहुत प्यार करते है। आय लव यू संग्राम!”

ती म्हणाली.संग्रामने तिच्या बोटात अंगठी घातली. तो शब्दातून जरी प्रेम व्यक्त करू शकत नसला तरी त्याच्या डोळ्यात मात्र ते ओसंडून वाहत होते आणि गार्गीपर्यंत ते पोहोचत होते. गार्गीने त्याला अंगठी घातली.

इकडे राजवीरने त्याच्या रूममध्ये मात्र संग्रामच्या हाताची प्रतिकृती प्रोग्रॅम सुरू झाल्यापासूनच त्या लाकडी पेटीतून बाहेर काढली होती आणि त्या प्रतिकृतीवर हात ठेवून कसलेसे मंत्र पुटपुटले होते. त्याने डोळे झाकले होते आणि तो संग्रामच्या हाताच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून त्याच्या रूममध्ये बसून हॉलमधले सगळे पाहू आणि ऐकू शकत होता. तो मनातच बोलत होता.

‛ गार्गी तू अशा माणसाला निवडलेस तुझ्या उत्कट प्रेमासाठी जो चारचौघात तुझ्यावरच प्रेम ही उघडपणे व्यक्त करू शकत नाही. त्यात तुझी चूक नाही म्हणा तू माझी होतीस माझ्या भाग्यात होतीस पण संग्रामनेमध्ये येऊन तुला माझ्यापासून हिरावून घेतले. एकदा नाही दोनदा! पण मी त्याला असाच तर सोडणार नाही. आधी मी एक सामान्य मनुष्य होतो पण आता मी एक सिद्ध पुरुष आहे ज्याला अनेक सिद्धी वश आहेत.’


सगळ्यांनी जेवण केले आणि आपापल्या रूममध्ये गेले. सगळा प्रोग्रॅम होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते. गार्गी आणि संग्राम ही रूममध्ये गेले.संग्रामला मात्र थोडं अस्वस्थ वाटत होतं पण त्याने गार्गीला ते जाणवू दिले नव्हते.

गार्गी,“ मी आले चेंज करून संग्राम मग औषध देते तुला तू ही कपडे बदल!” ती नाईट गाऊन घेऊन वॉशरूममध्ये जात म्हणाली. संग्रामने मात्र नुसती होकारार्थी मान डोलावली.


संग्रामला श्वास घ्यायला त्रास होत होता. थोडी फार चक्कर देखील येत होती. तो बेडवर कसाबसा बसला. गार्गी चेंज करून आली तर संग्रामला दम लागला होता. ती घाबरून पळतच त्याच्याजवळ गेली.

गार्गी,“ संग्राम काय होतंय तुला?” तिने त्याचे ब्लेझर काढत विचारले.

संग्राम,“ गार्गी मला श्वास घ्यायला ssss त्रास sss आणि चक्करsss” तो कसाबसा उत्तरला.

गार्गी मात्र घाबरली. तरी संग्रामला धीर देत आणि त्याच्या औषधांची बॅग बाहेर काढून त्याला बेडवर झोपवत म्हणाली.

गार्गी,“ संग्राम दीर्घ श्वास घे. काही नाही होणार मी बी.पी चेक करते तुझं!”ती त्याच्या शर्टच्या बाह्य वर करत म्हणाली आणि तिने बी.पी मशीन त्याच्या हाताला लावून बी.पी चेक केले तर त्याचा बी.पी बऱ्यापैकी लो झाला झाला होता. ते पाहून ती घाबरली आणि तिने राज्ञीला फोन केला.

गार्गी,“ राज्ञी अगं संग्रामला श्वास घ्यायला त्रास होत आहे. चक्कर ही येते म्हणत आहे. त्याचा बी.पी चेक केला मी लो झाला आहे बऱ्यापैकी; मी डॉक्टरांना बोलावू का? की हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ त्याला?” ती घाबरून रडत बोलत होती.

राज्ञी,“तू आधी शांत हो बरं आंटी!हायपर नको होऊस आधी मला सांग रिडींग काय आहे त्याच्या बी.पी चे?” ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

गार्गी,“ 90 च्या खाली गेला आहे.” ती म्हणाली.

राज्ञी,“ बरं एक काम कर मी त्याच्या औषधांच्या बॅगमध्ये इंजेक्शन्स ठेवले आहेत. दोन डोस एकाच औषधाचे आहेत त्यातलं एक इंजेक्शन तू अंकुला दे.” ती म्हणाली.

गार्गी,“ अगं मी देऊ इंजेक्शन? मी ss मी कधीच इंजेक्शन दिले नाही राज्ञी. मी त्याला इंजेक्शन देताना चुकले आणि त्याला त्रास झाला तर?” ती पुन्हा रडत म्हणाली.

राज्ञी,“ आंटी तू आधी शांत हो! बॅगेत सिरिन्ज आहे. त्यात तो औषधाचा डोस फोडून भर आणि अंकलच्या दंडाला कापसाने स्पिरीट लाव. मी इंजेक्शन देताना तू पाहिले आहेस की नाही मग तसेच हलक्या हाताने दे काही होणार नाही. उशीर नको करू आंटी प्लिज त्याचा त्रास अजून वाढेल.” ती तिला समजावत होती.

गार्गी,“ बरं मी देते.” ती डोळे पुसून म्हणाली. गार्गीने संग्रामचा शर्ट काढला आणि राज्ञीने सांगितले तसे त्याच्या दंडाला इंजेक्शन दिले. संग्रामला अजून ही नीट श्वास घेता येत नव्हता.

“ संग्राम दीर्घ श्वास घे प्लिज! आता इंजेक्शन दिले आहे ना! तुला बरे वाटेल थोड्या वेळात.” ती त्याचा हात धरून रडत बोलत होती.

इकडे अजून ही राजवीर डोळे झाकून गार्गी आणि संग्रामला पाहत होता.

‘ किती उत्कट प्रेम आहे गार्गी तुझं! श्वास संग्रामला घ्यायला येत नाही पण जीव तुझा गुदमरत आहे. या उत्कट प्रेमावर माझा हक्क होता पण संग्राम तू मध्ये आलास. खरंच आज तुझा हेवा वाटतो मला!’ तो स्वतःशीच बोलत होता.

थोड्या वेळाने संग्रामचा त्रास कमी झाला आणि तो झोपला. गार्गीला राज्ञीचा पुन्हा फोन आला.

राज्ञी,“ झाला ना त्याचा त्रास कमी आंटी?” तिने काळजीने विचारले.

गार्गी,“ हो झोपला तो!” ती गॅलरीत जात म्हणाली.

राज्ञी,“ बरं तू ही झोप आता ठेवते मी!”

ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. गार्गीला मात्र आजची रात्र झोप लागणार नव्हती. तिने संग्रामला व्यवस्थित पांघरूण घालून झोपवले आणि ती त्याच्या शेजारी बेडला टेकून बसली. संग्राम नुसता हलला तरी ती संग्रामला पाहत होती. तिला पहाटे कधी तरी झोप लागली.


राजवीर सतत असं का म्हणत होता की गार्गीवर आणि तिच्या प्रेमावर त्याचा अधिकार होता पण संग्रामने ते त्याच्यापासून हिरावून घेतले? तो इतक्या सिद्धी कुठून शिकला होता?
©स्वामिनी चौगुले


🎭 Series Post

View all