माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व 2 भाग १९

अभिराजच्या मनात काय असेल?
भाग 19
गार्गी क्षितिजाला घेऊन सरळ अभिराजच्या रूममध्ये गेली. तिथे अभिराज बेडला टेकून बसला होता. तर आदिराज काही तरी अभ्यास करत होता. राज्ञी दोघांना ही सफरचंद कापून देत होती. तिने गार्गी आणि क्षितिजा पाहिले.

राज्ञी,“ अरे वा आज क्षितिजा आली आहे.पेशंट्स ना भेटायला.” ती मिश्कीपणे म्हणाली.

आदिराज,“ये पेशंट्स काय पेशंट्स?रादी हे तुझं मेडिकल कॉलेज नाही."तो अंगावर पाल पडल्यासारखा खेकसला.

राज्ञी,“ गप्प ये! तुम्ही दोघे ही पेशंट्स आहात. दोघांनी ही लागून घेतले आहे. सेवा मात्र मला करावी लागतेय.”ती तोंड फुगवून म्हणाली.

गार्गी,“झालं तुमचं सुरू?आता गप्प बसता का जरा? क्षिती तू बस गं इथे ये; दोघे असेच आहेत” ती वैतागून म्हणाली.

क्षितिजा,“ आदी कसा आहेस तू?” तिने त्याला पाहून विचारले.

आदिराज,“ मी ठीक आहे.तू ठीक आहेस ना?” त्याने सुचकपणे विचारले.

क्षितिजा,“ हो मी ठीक आहे.अभी सर तुम्ही कसे आहात?” तिने त्याला पाहून विचारले.

अभिराज,“ मी ठीक आहे.” तो रुक्षपणे म्हणाला.

थोडा वेळ असाच गप्पा मारण्यात गेला.

गार्गी,“ आदी, राज्ञी तुम्ही जरा माझ्याबरोबर चला खाली काम आहे.” ती दोघांना पाहत म्हणाली आणि ते तिघे निघून गेले.


आता रूममध्ये क्षितिजा आणि अभिराज दोघेच होते.क्षितिजाला खरं तर भरून आले होते. ती त्या घटनेनंतर पहिल्यांदा त्याला पाहत होती.तिला अभिराजला घट्ट मिठी मारून रडायचं होतं.अभिराज मात्र शांत होता.

क्षितिजा,“ सर तुम्ही ठीक आहात ना? त्या दिवशी नंतर आपली भेट नाही झाली. माझी हिंम्मतच होत नव्हती. तुमच्या घरी यायची!”ती डोळ्यातले पाणी आडवत म्हणाली.

तिला अपेक्षित होत की अभिराज तिला ती कशी आहे विचारेल. तिची आपुलकीने विचारपूस करेल.तिला जवळ घेईल. ती आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहत होती.

अभिराज,“ मी ठीक आहे.क्षितिजा मला खूप थकल्यासारखं वाटत आहे. मी जरा झोपतो.” तो रुक्षपणे खाली सरकुन झोपत म्हणाला.

क्षितिजाचा मात्र त्याच्या अशा वागण्याने अपेक्षाभंग झाला. तरी ती त्याला म्हणाली.

क्षितिजा,“ ठीक आहे सर!”

क्षितिजा मनातच स्वतःशी बोलत होती.

‘ तू पण ना क्षिती स्वतःचाच विचार करत आहेस.अभीला किती लागलं आहे. त्यातून ब्लड लॉस ही बराच झाला आहे. त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे.आता कुठं जायचं? इकडे की तिकडे यार हा आदी कुठे असेल? एक तर दोन मोठीं-मोठीं घरं काहीच कळत नाही.’ ती स्वतःला समजावून मनात बोलत रूमच्या बाहेर पडली. तर समोर तिच्या रूमच्या दारात राज्ञी मोबाईलमध्ये काही तरी करत. तिची वाटच पाहत होती.

राज्ञी,“ इतकी गोंधळून नको जाऊस क्षितिजा! मला आंटीने तुझ्यासाठीच इथे थांबवले आहे. चल खाली तुझा मित्र आणि आंटी खाली आहेत.” ती म्हणाली.

क्षितिजा,“ thanks! तुम्ही होस्टेलवर असता ना?” तिने विचारले.

राज्ञी,“ ये बाई मला तुम्ही नको म्हणू मी तुझ्यापेक्षा मोठी आहे पण इतकी ही मोठी नाही की तू मला तुम्ही वगैरे म्हणावे.हवं तर मला रादी म्हण आदी सारखं! आणि हो मी होस्टेलवर असते कारण हे लोक मला इथे अभ्यास करू देत नाहीत.”ती हसून जिना उतरत म्हणाली.

क्षितिजा,“ बरं! रादी म्हणजे? आदी पण रादी का म्हणतो तुला?” तिने विचारले.

राज्ञी,“ त्याच असे आहे की आमच्या बच्चूला लहान असताना राज्ञी दीदी म्हणता येत नव्हते म्हणून मग तो रादी म्हणायला लागला. आता ही तो रादीच म्हणतो.तू ही तेच म्हण.” ती म्हणाली.

क्षितिजा,“बरं आणि आदिराजच टोपण नाव भारी आहे बच्चू!” ती हसत म्हणाली आणि राज्ञी देखील तिच्याबरोबर हसू लागली. दोघी गप्पा मारत डायनिंग हॉलमध्ये गेल्या तर समिधा आणि गार्गी टेबलवर जेवण लावत होत्या.

समिधा,“ बस क्षितिजा! जेवण कर आणि मग जा.” ती म्हणाली.

सगळ्यांनी मिळून जेवण केले. क्षितिजा आदिराजच्या रूममध्ये बराच वेळ अभ्यासा बाबत चर्चा करत होती. ती संध्याकाळी निघून गेली.
★★★
रात्री उशिराच संग्राम आला. गार्गी त्याची वाट पाहत होती. दोघांनी जेवण केले.संग्राम बेडरूममध्ये निघून गेला. गार्गी ही किचन आवरून त्याच्या पाठोपाठ रूममध्ये गेली. संग्राम बेडला टेकून बसला होता. थकल्या सारखा दिसत होता. गार्गी त्याच्याजवळ बसत काळजीने विचारले.

गार्गी,“मी आणि अभी ऑफिसमध्ये नसल्यामुळे खूप ओहर लोड होत आहे ना तुला आणि सुशांतला?” तिने काळजीने विचारले.

संग्राम,“तसं काही नाही गं!पण कामाच प्रेशर जास्त आहे थोडं!” तो म्हणाला.

गार्गी,“ कामं थोडी स्लो झाली तरी चालतील. असं ही उद्यापासून मी घरून काम करेन gd!”ती बेडवर बसून त्याचा हात धरत म्हणाली.

संग्राम,“ ये बाई तू काम करायला लागली की कामात गढून जातेस. तुला दुसरं कशाचाच भान नाही राहत. अभी स्वतःची काळजी व्यवस्थित घेऊ शकतो. पण आदि नाही घेऊ शकत. एक तर तो किती धसमुसळा आहे. त्यात त्याच्या हाताचे स्टीचेस निघायला अजून अवकाश आहे. काही म्हणता काही होऊन बसेल; हे पोरगं उपव्द्याप करेल काही तरी त्यापेक्षा तू त्याच्याकडे लक्ष दे. बाकी कामाच मी पाहून घेतो.”तो काळजीने बोलत होता.

गार्गी,“ते ही आहेच म्हणा बावीस वर्षाचा टोणगा झाला पण याचा बलिशपणा काही जात नाही. साहेब धसमुसळेपणा मात्र तुमच्याकडूनच त्याच्यात आला आहे.” ती त्याला चिडवत म्हणाली आणि अर्थपूर्ण हसली.

संग्राम,“ अच्छा!पण गार्गी बरेच दिवस झाले मी धसमुसळेपणा केलाय कुठे?आज करावा म्हणतोय.” तो तिला मिठी मारत हसून म्हणाला.

गार्गी,“ बरं ऐक ना आज क्षितिजा आली होती घरी.” ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.

संग्राम,“ बरी आहे ना ती?” त्याने काळजीने विचारले.

गार्गी,“हो तशी बरी आहे. पण खूप रडली माझ्या कुशीत शिरून. मला चांगलंच माहीत आहे तिला काय वाटत असेल ते! मी तिला धीर दिला समजावले आणि तुला वाटेल तेंव्हा आपल्याकडे ये असं सांगितले.”ती सांगत होती.

संग्राम,“हुंम अशा वेळी तिला मानसिक आधाराची गरज आहे. तू केलंस ते योग्य केलंस.”तो तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला.

गार्गी,“ gd माझ्याकडून एक चूक झाली. चूक का बरोबर मला नाही कळत. आदीच्या गाडीत माझी शाल होती. तू काश्मीरवरून आणलेली ती पश्मीना शाल! ती त्याने त्या रात्री क्षितिजाला पांघरली होती. ती आज क्षितिजा घेऊन आली होती परत पण मी ती तिलाच देऊन टाकली. सॉरी!” ती म्हणाली.

संग्राम,“ बाप रे ती शाल जी तू किती तरी वर्षांपासून सांभाळून ठेवली होतीस ती का?जिला तू कोणाला हात सुद्धा लावू देत नव्हतीस. ती शाल तू क्षितिजाला दिलीस. काय जादू केली गं त्या पोरीने तुझ्यावर?” त्याने आश्चर्याने विचारले.

गार्गी,“ मी दिली पण तुला चांगलच माहीत आहे ती शाल माझ्यासाठी किती precious होती तरी मला नाही माहीत पण मला ती तिला द्यावीशी वाटली. सॉरी ना!” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

संग्राम,“बरं मग त्यात सॉरी म्हणण्यासारखं काय आहे गार्गी? आपण तुला दुसरी तशीच शाल मागवू.” तो तिला समजावत म्हणाला.

गार्गी,“थँक्स!” ती म्हणाली.

संग्राम,“बरं मग आपले अभी सर आज खुश असतील क्षितिजा भेटायला आली होती ना?”त्याने हसून विचारले.

गार्गी,“माहीत नाही रे,कदाचित असेल ही!तो ना सगळ्याच बाबतीत तुझी कार्बन कॉपी आहे.आनंद, राग,लोभ सहजासहजी व्यक्त करत नाही.खूप शांत आणि सयंमी आहे तो!” ती म्हणाली.

संग्राम,“ मला म्हणूनच काळजी वाटते अभीची कारण तो खूप शांत आहे मनातल्या गोष्टी कोणाला सांगत नाही म्हणून आणि आदीची तो कोणतीच गोष्ट मनात ठेवू शकत नाही म्हणून! तुझ्यासारखं लगेच बोलून मोकळा होतो. त्याच्यापेक्षा अभीची जरा जास्त कारण तो आपली जबाबदारी आहे. गार्गी त्याच सगळं मार्गी लागायला हवं. तो आता बिझनेसमध्ये चांगला रुळला आहे. त्याला समजून घेणारी बायको मिळाली अगदी तुझ्यासारखी की आपण आपल्या जबाबदारीतुन मोकळे!” तो बोलत होता.

गार्गी,“gd आत्तापर्यंत अभीची जबाबदारी आपण व्यवस्थित निभावली आहे ना! मग इथून पुढे ही सगळं नीट होईल. मी आज क्षितिजामध्ये माझं आणि अभीमध्ये तुझं प्रतिबिंब पाहिले आहे. आपल्या बच्चूची काळजी तू नको करू त्याच्यासाठी त्याचा सुशा अंकल खमक्या आहे.” ती हसून म्हणाली.

संग्राम,“ते पण आहेच म्हणा!” तो म्हणाला.

गार्गी,“ बरं झोपा आता.” ती म्हणाली.

संग्रामला मात्र थकव्यामुळे लगेच झोप लागली.

संग्राम सतत अभिराज त्याची आणि गार्गीची जबाबदारी आहे असे म्हणत आहे पण असं काय घडलं होत की सुशांत-समिधा असताना संग्राम-गार्गीला अभिराजची जबाबदारी घ्यावी लागली?अभिराजच्या मनात काय असेल?
© स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all