माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ११

This Is A Love Story


संग्राम आणि गार्गी हॉटेलमध्ये पोहोचले. एक वेटर त्यांची कपड्याची छोटीशी बॅग घेऊन त्यांना स्वीटपर्यंत सोडून गेला. संग्रामने की कार्डने दार उघडले. तो आणि त्याच्या पाठोपाठ गार्गी आत गेले. दोघे ही रूम आ वासून पाहत होते. संग्रामने गार्गीकडे पाहिले आणि गार्गी अर्थपूर्ण हसली.

बेड पूर्णपणे निशिगंधाच्या फुलांनी सजवण्यात आला होता. निशिगंधाच्या पांढऱ्या फुलांच्या मधोमध लाल गुलाबांच्या पाकळ्यांचा बदाम उठून दिसत होता. सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता. तसेच सेंटेड कँडल्स लुकलुकत होत्या तर कॉर्नर पिसवर एका आईस बकेटमध्ये शँम्पेन आणि दोन काचेचे ग्लास होते.

संग्राम,“सुशा म्हणजे सुशाच आहे. आठवलं का गार्गी मॅडम?” त्याने हसून विचारले.

गार्गी,“ हो आठवलं ना अशी कशी विसरेन मी? आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री ही बाबांनी सुशांतकडून अशीच तुझी रूम सजवून घेतली होती आणि तू किती घाबरला होतास मला काय वाटेल म्हणून! आज ही सुशांतने तशीच रूम सजवून घेतली आहे.” ती हसून म्हणाली.

संग्राम,“हो मग घाबरणारच ना, एक तर तुझ्या अटी आणि बाबांनी कारभार करून ठेवला!बरं मी फ्रेश होऊन येतो.” तो म्हणाला आणि वॉशरुमकडे वळला.

गार्गी रूमचे निरीक्षण करत बेडवर जाऊन बसली. तो फ्रेश होऊन कुर्ता-पायजमा घालून आला. गार्गी उठून वॉशरुमकडे जात होती तर संग्राम तिला म्हणाला.

संग्राम,“साडी नको चेंज करू ना, छान दिसते तुला!” तो म्हणाला आणि गार्गीने फक्त होकारार्थी मान हलवली आणि ती साडी न बदलता फ्रेश होऊन बेडवर येऊन बसली. संग्राम तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. गार्गी त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत बोलू लागली.

गार्गी,“ पंचवीस वर्षे खूप मोठा पल्ला गाठला ना एकमेकांबरोबर जी.डी आपण!”

संग्राम,“हो ना! मी तर आपण लग्न करताना हा विचारच केला नव्हता गार्गी!”तो तिच्या हाताशी चाळा करत म्हणाला.

गार्गी,“मी ही केला नव्हता विचार! खरं तर कॉलेजमध्ये तुला मी पहिल्यांदा पाहिले तेंव्हा हा कोण चंपु असं वाटून गेलं होतं मला पण मला काय माहीत होतं की हा तो आहे माझा राजकुमार जो माझे संपूर्ण आयुष्य स्वप्नांपेक्षा सुंदर बनवणार आहे.”ती हसून म्हणाली

संग्राम,“did you really think that?हा भाई जो अच्छा दिखता हैं, वही तो बिकता हैं। पण मी तर तुझ्या प्रेमात तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच पडलो होतो. हा तुझं सौंदर्य पाहून नाही बरं का….” तो पुढे बोलणार तर गार्गीमध्येच बोलू लागली.

गार्गी,“टोमणा मारायची काही गरज नाही मिस्टर S. S. आता मी होते म्हणलं ना मूर्ख आणि माहीत आहे मला तू काय पाहून प्रेमात पडला होतास माझ्या! आणि मी ती लकी मुलगी आहे जिला तुझ्याबरोबर पाहून मुली माझ्यावर आज पण जळतात. मला जेंव्हा तुझ्या आतला माणूस कळला ना तेंव्हा मी वेडी झाले तुझ्या प्रेमात!”ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

संग्राम,“ प्रेमात पडलो होतो नाही. मी आज ही तुझ्या प्रेमात आहे. तू सुंदर आहेसच गार्गी पण माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहेस तू.” तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला.

गार्गी,“मी जगातली सुंदर स्त्री आहे का नाही; मला माहित नाही पण लकी मात्र आहे. संग्राम तू आलास माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले you have midas touch! नाही तू ना मिडास राजा आहेस. तू ज्याला हात लावतोस त्याच्या आयुष्याचे सोने होते! Love you!” ती म्हणाली.

संग्राम,“गार्गी तू ना आंधळी झालीस माझ्या प्रेमात म्हणून असं म्हणत आहेस. मी काही मिडास वगैरे नाही. उगीच काही ही बोलू नकोस!” तो उठून बसला आणि त्याने शँम्पेनची बॉटल उघडली. त्यातील शँम्पेन दोन ग्लासमध्ये ओतली. त्यातला एक ग्लास तिच्या हातात दिला. ती ग्लास घेत बोलू लागली.

गार्गी,“आंधळी नाही झाले मी वेडी झाले आहे तुझ्या प्रेमात पण मी खरंच बोलत आहे. तू ना मिडास राजा आहेस. तू सुशांतला हात लावलास त्याच्या आयुष्याचे सोने झाले. माझ्या आयुष्यात आलास माझ्या आयुष्याचे सोने झाले. आणि आता अभी तूच बघ तो तुझ्या मार्गदर्शना खाली किती प्रगती करत आहे.”ती ग्लास ओठाला लावत म्हणाली.

संग्राम,“बास बास किती स्तुती करशील माझी? असं काही नाही गार्गी उलट सुशांत आणि तुझ्या साथीमुळेच हा इतका मोठा बिझनेस उभा करणे मला शक्य झाले आहे. तुमची साथ नसती तर मी काहीच करू शकलो नसतो. तू तर तुझं चांगलं ग्रो होत असलेल करियर सोडून मला गरज आहे असं दिसलं की आपली कंपनी जॉईन केलीस. आज तू आपल्या कंपनीत C.O.O.(चीफ ऑपरेशन ऑसफिर) आहेस पण तू दुसरीकडे जॉब करत असतीस तर नक्कीच मॅनेजिंग डायरेक्टर झाली असतीस आणि आपल्या कंपनीपेक्षा खूप जास्त पॅकेज मिळाले असते तुला!” तो बेडवर बसत ग्लास मधील शँम्पेन संपवत कौतुकाने बोलत होता. गार्गी त्याच्याजवळ बसली आणि त्याच्या हातावर हात ठेवत बोलू लागली.

गार्गी,“ ओय जॉब सोडून आपली कंपनी जॉईन करण्यात माझा फायदा होता. मी किती ही पैसा मिळवला असता तरी जॉब करून नोकरच राहिले असते ना पण आपल्या कंपनीत मी मालक आहे आणि मला ना ट्रिपल एसची C.O.O म्हणून ओळख असण्यापेक्षा ना मिसेस संग्राम सरनाईक ही माझी ओळख आवडते. आणखीन एक फायदा आहे माझा तो म्हणजे तुझ्याबरोबर मला सतत राहता येते. मग सगळ्यात जास्त फायद्यात कोण आहे तू की मी?” तिने डोळे मिचकावत विचारले.

संग्राम,“फायद्यात तर मीच राहणार आहे कायम!” तो हसून शांम्पेनचा दुसरा ग्लास ओठाला लावत म्हणाला.

गार्गी,“ते कसं?” तिने विचारले.

संग्राम,“मग माझ्या पहिल्या प्रेमाबरोबर मी लग्न केलं. आज पंचवीस वर्षे झाले. गार्गी तू या इतक्या वर्षात मला फक्त आणि फक्त सुख दिलंस. इतकच काय मी तर केंव्हाच गेलो असतो पण तू मला मृत्यूच्या अर्ध्या वाटेवरून माघारी घेऊन आलीस. आदी सारखा देखणा मुलगा दिलास. माझ्या आई-बाबांना तू सून नाही तर मुलगी म्हणून संभाळलेस. सुशांत-समिधाला आपल्या कुटुंबात सामावून घेतलंस. खूप काही केलंस तू माझ्यासाठी!आपल्याला एकत्र येऊन देखील दोन वर्षे मूल नव्हते. मी तुला धीर देण्याऐवजी तूच मला धीर दिलास. खूप प्रतिक्षेनंतर आपल्या आयुष्यात आदी आला. त्याच्या जन्माच्या वेळी ही किती त्रास झाला तुला सी सेक्शन करावे लागले. किती स्टीचेस पडले होते तुला! माझ्यासारख्या घुम्या माणसाबरोबर संसार करणे सोपे नव्हते गार्गी! मला तर तुझ्यावरचं माझं प्रेम ही व्यक्त करता येत नाही. विचार कर मी पंचवीस वर्षांच्या इतक्या मोठ्या कालावधीत तुला फक्त 139 वेळा ते व्यक्त केले आहे. ते ही तू वेडी सेलिब्रेट करतेस स्वतःच्या हाताने गुलाब बनवून फोल्डरमध्ये लावतेस. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याला अर्थ आला. thanks for everything & love you alot!”तो भावुक होऊन बोलत होता आणि गार्गी त्याच्याकडे पाहत होती.

गार्गी,“ आता तू मला thanks म्हणणार का? बास इतकं कौतुक पुरे आजसाठी आणि इतकं ही जगावेगळं मी काही केले नाही संग्राम! मी स्वार्थी आहे खूप मी जे केले ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केले. तुझ्यासारखा समजूतदार नवरा मला मिळाला हेच माझे भाग्य आहे. माझ्या मूर्खपणामुळे तुला किती त्रास झाला होता संग्राम मी त्यासाठी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आणि तुला प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीपासून शब्दांची गरज लागायला लागली. तुझे डोळेच बास आहेत ते व्यक्त करण्यासाठी जी.डी! मी तू जेंव्हा मला love you म्हणतोस तेंव्हा सेलिब्रेट करते आणि गुलाब ठेवते कारण मला तुझी प्रत्येक गोष्ट जपून ठेवायची असते. you are very precious for me!” त्याला पाहत म्हणाली.

संग्राम,“ बास आता! आपण हे सगळं बोलायला आलो आहोत का इथे? बघ दोन वाजून गेले.” तो घड्याळात पाहत पुन्हा एक पॅक भरत म्हणाला.

गार्गी,“नाही आणि तू जे करत आहेस ना ते पण करायला नाही आलो आपण, आण तो ग्लास इकडे तुला दोन ग्लासच्यावर शँम्पेन झेपत नाही.” ती त्याच्या हातातून ग्लास बाजूला ठेवत म्हणाली.

संग्राम,“बरं मग जे करायला आलो आहोत ते करूया का?” तो हसून म्हणाला आणि तिला मिठी मारली.

पुन्हा एकदा दोघांच्या सुगंधीत श्वासाने दोघांची ही रात्र सुगंधित होत होती.बऱ्याच वेळाने संग्राम गार्गीच्या मिठीत विसावला होता.

संग्राम,“by the way माझं गिफ्ट कुठे आहे गार्गी?” त्याने विचारले.

गार्गी,“ हो आणले आहे देते.(ती म्हणाली आणि तिने हात लांबवून कॉर्नर पीस वरची तिची पर्स घेतली. त्यातून तिने कसलीशी अंगठी काढली आणि ती म्हणाली.)ही अंगठी सोन्यात मढवलेल्या पाचूची आहे. ही मी खास तुझ्यासाठी बनवून घेतली आहे. यामुळे ना तुझे आरोग्य तर उत्तम राहीलच आणि तुला लो बी.पीचा त्रास पण कमी होईल. ही अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत घालायची.” असं म्हणून तिने त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीत अंगठी घातली ही! संग्राम बेडला टेकून बसत वैतागून बोलू लागला.

संग्राम,“गार्गी काय आहे हे? तू दर वर्षी मला असलच काही तरी देतेस! त्यापेक्षा मला काहीच देत जाऊ नकोस. How unromantic you are!”तो तोंड फुगवून बोलत होता.

गार्गी,“असू दे मी अनरोमॅंटिक! But I love you & care for you! माझ्यासाठी घाल ना ही अंगठी प्लिज!” ती त्याला लाडीगोडी लावत म्हणाली.

संग्राम,“नाही म्हणून मला या पृथ्वीवर राहायचं नाही का? गार्गी तू ना माझा गैरफायदा घेतेस नेहमी!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“ that\"s like my man! आणि माझं गिफ्ट कुठे आहे?” तिने विचारले.

संग्राम,“ तूच म्हणतेस ना की मीच तुझ्यासाठी गिफ्ट आहे. तुला काही नको तर या वर्षी मीच तुझे गिफ्ट!” तो म्हणाला.

गार्गी,“ seriously?gd कुठे आहे माझे गिफ्ट लवकर दे बरं!” ती त्याला रागाने पाहत म्हणाली.

संग्राम,“ हे घे बाई! तुझं गिफ्ट प्रत्येक वेळी नको मला म्हणायचं आणि पुन्हा भांडायच! हे बघ हे लॉकेट यात हार्ट आहे. हे असं उघडतं या हार्टच्या खालच्या भागात आदीचा फोटो आहे आणि मध्ये अभीचा आणि सगळ्यात वर माझा आणि हे वरून असं बंद होतं.” त्याने लॉकेट मधील तीन लिअरचे हार्ट उघडून आणि बंद करून दाखवले.

गार्गी,“ वाव! किती सुंदर आहे हे! प्रत्येक वर्षी तू मला असे काही तरी युनिक गिफ्ट देतोस आणि स्वतःच्या प्रेमात अजून पाडतोस.” ती हसून म्हणाली.

संग्राम,“हो का?” त्याने हसून विचारले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

गार्गी,“ झोप आता पहाटेचे चार वाजून गेले.”

गार्गीला सकाळी जाग आली तर संग्राम तिच्या बाहु पाशात निवांत झोपला होता. तिने त्याला पाहिले आणि त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाली.

गार्गी,“ उठा साहेब सकाळचे आठ वाजून गेले.घरी जायचे की नाही आज?”

संग्रामने डोळे किलकिले करून तिला पाहिले आणि तिला म्हणाला.

संग्राम,“आठ वाजले?आवरून जायला हवं गार्गी घरी सगळे वाट पाहत असतील.मी आवरून येतो तोपर्यंत स्ट्रॉंग कॉफी मागव ना डोकं जड झाल्यासारखं वाटतंय.” तो बेडवरून उठत म्हणाला.

गार्गी,“हो नाष्टा पण मागवते मी!”( ती अस म्हणून उठून त्याच्याजवळ गेली आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलू लागली.)

“पुन्हा आपल्या जगात जायचे जिथे मुलगा, बाप, मित्र,जावई,अंकल या सगळ्या नात्यात मला तुला वाटून घ्यावं लागणार. माझ्या वाट्याला खूप कमी क्षण येतात जेंव्हा तू फक्त माझा असतोस. त्यातून बिझनेसमुळे तर काय विचारूच नका.” ती नाराज होऊन बोलत होती.

संग्राम,“हुंम म्हणजे नाही नाही म्हणत तक्रार आहेच तर मॅडमची! बरं हे वर्ष थांब आदी ही बिझनेस जॉईन करेल मग आपण थोडे मोकळे होऊ मग जाऊ फिरायला चांगलं महिना भर!जिथे मी फक्त तुझा असेन आणि तू माझी!” तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

गार्गी,“ प्रॉमिस?” तिने हात पुढे करत विचारले.

संग्राम,“ हो बाई प्रॉमिस!आता आवरू लवकर नाही तर सुशा चिडवून चिडवून माझा जीव खाईल.” तो हसून म्हणाला.

गार्गी,“ हो ना सवत्या कुठला!” ती मिश्कीलपणे म्हणाली.

दोघे ही घरी गेले तर सगळे त्यांचीच वाट पाहत होते. सगळ्यांच्या पाहुणचारात दोन दिवस कधी गेले हे कोणालाच कळले नाही.

माणसाला वाटत असते की सगळे ठीक आणि सुरळीत चालले आहे. म्हणून माणूस बेफिकीर होऊन जगत असतो. पण नियती तिचे फासे कधी आणि कसे उलटे टाकेल हे मात्र कोणीच सांगू शकत नाही.
©swamini chougule







🎭 Series Post

View all