माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ८

This Is A Love Story


भाग 8
तीन दिवसांनी संग्राम आणि गार्गीच्या लग्नाचा पंचविसांवा वाढदिवस होता आणि त्यासाठी आज ते दोघे झोपल्यावर सुशांतने त्याच्या घरी दोघांच्या ही नकळत मिटिंग बोलवली होती. मनिषाताई, संजयराव आणि आदिराज गुपचूप मधल्या रस्त्याने सुशांतच्या बेडरूममध्ये गेले. तर तिथे आधीच अभिराज, राज्ञी, समिधा हजर होते. सुशांतने बेडरूमचे दार लावून घेतले आणि संजयरावांनी त्याला विचारले.

संजयराव,“ सुशा whats up वर मेसेज करून आम्हाला असं गुपचूप का बोलवले आहेस तू?ते ही रात्री 12 वाजता!”

सुशांत,“ हो हो सांगतो काका! तीन दिवसांनी गार्गी आणि संग्र्याच्या लग्नाचा पंचवीसांवा वाढदिवस आहे तर मी आपण सगळे मिळून त्यांना सरप्राईज देण्याचा विचार करत आहे!” तो गंभीर होत म्हणाला.

आदिराज, “that\"s great पण करायचं काय? दर वर्षी तर या दिवशी पार्टी ठरलेली असते मग वेगळं सरप्राईज काय द्यायचं अंकल?” त्याने विचारले.

सुशांत,“ यावेळी पार्टी नाही तर दोघांचे आणखीन एकदा लग्न करायचे आपण, हेच त्यांच्यासाठी सरप्राईज असेल!” तो म्हणाला.

मनिषाताई,“ अरे वा मस्त कल्पना आहे सुशा!” त्या खुश होत म्हणाल्या.

संजयराव,“ पण दोघांच्या न कळत लग्नाची तयारी कशी करायची?कारण तुम्ही सगळे तर एकत्र ऑफिसमध्ये असता आणि आम्ही तिघांनी काय करायचं म्हणाले तर गार्गी आणि चिनूचे आमच्यावर बारीक लक्ष असते. ”ते म्हणाले.

समिधा,“ काका तयारीची काळजी तुम्ही नका करू. मी आणि राज्ञी करू आणि तुमची मदत पाहिजे तेंव्हा मी आश्रमाच्या कामासाठी तुमची मदत हवी म्हणून तुम्हाला घरा बाहेर काढेन!” तिने सांगितले.

आदिराज,“ आणि मी कॉलेज आहे म्हणून तुम्हाला मदत करूच शकतो!” त्याने दुजोरा दिला.

सुशांत,“ ठरलं तर उद्यापासून तयारीला लागू; मी मुंबई जवळचे दोन तीन रिसॉर्ट पाहून ठेवले आहेत. त्यातील एक उद्याच बुक करतो. राज्ञी आणि समिधा तिथली व्यवस्था पाहतील. काका-काकू तुम्ही दोघे आमंत्रणाचे सगळं पहा पण अगदी सिक्रेटली! आदी तू राज्ञी आणि समिधाला मदत कर.अभी आणि मी बाकी सगळं पाहतो आणि सगळी शॉपिंग आपण उद्या करू.” तो म्हणाला.

आदिराज,“ ते सगळं ठीक आहे पण दर वर्षी डाडा पार्टी देतो की एनिव्हर्सरी दिवशी या वेळी देखील तो हे करणार आपण त्याला सरप्राईज देणार आहोत तर मग त्याला पार्टी देण्यापासून कसे थांबवायचे?” त्याने विचारले.

मनीषाताई,“ बरोबर आहे तुझं! मी पाहते ते या वर्षी पार्टी न करता पूजा करू असं सांगायचं दोघांना आणि मग पूजेला मंदिरात जायचं म्हणून आम्ही दोघांना रिसॉर्टवर घेऊन येऊ.” त्या म्हणाल्या.

समिधा,“ हो काकू तुम्हीं म्हणालात तर संग्राम नाही टाळणार तुमचे म्हणणे पण एका दिवसात सगळं कसं करायचं म्हणजे मेहंदी, संगीत,हळदी आणि लग्न?” तिने शंका उपस्थित केली.

सुशांत,“सगळं नियोजन माझ्या डोक्यात आहे ग. तू नको काळजी करू. बघ सकाळ सकाळ रिंग सेरेमनी करायची, त्यानंतर मेहंदी दुपारी जरा आराम करून संगीताचा कार्यक्रम करू मग संध्याकाळी हळत आणि मग लग्न!” त्याने सविस्तर सांगितले.

अभिराज,“ पण सगळं सांभाळून त्या दोघांना काही माहीत होऊ द्यायचे नाही!”

नेहमीप्रमाणे सगळे ऑफिसला गेले पण सुशांत दुपारी डोकं दुखतंय म्हणून निघून गेला. त्याने दोन-तीन रिसॉर्टमधले एक चांगले रिसॉर्ट पाहून बुक केले. तिथे समिधाला बोलावले. समिधाने केटरिंगपासून ते बाकी मंडप सजावट आणि बाकी सगळ्या सूचना दिल्या. संध्याकाळी आधी समिधा आणि नंतर सुशांत घरी आले. तर गार्गी त्यांच्यात आली होती. तिने सुशांतला काळजीने विचारले.

गार्गी,“ सुशांत तुझी तब्बेत ठीक आहे ना?”

सुशांत,“हो आता ठीक आहे ग!”

गार्गी,“ अरे पण तब्बेत ठीक नव्हती तर कुठे गेला होतास तू?”तिने काळजीने विचारले.

सुशांत,“ मी का ...ते ” काय सांगावे हेच त्याला सुचत नव्हते. तोपर्यंत समिधा तिथे चहा घेऊन आली आणि त्याला सावरून घेत म्हणाली.

समिधा,“ अग तो दुपारी आला आणि झोपला थोड्यावेळा पूर्वी क्लिनिकमध्येच गेला होता!”ती कशी बशी बोलत होती.

गार्गी,“ काय सांगितले डॉक्टरने?”

सुशांत,“ काही नाही पित्त झाले आहे थोडे म्हणून डोकं दुखत होते.” तो म्हणाला.

गार्गी,“ बरं आराम कर!”ती म्हणाली आणि सुशांतने होकारार्थी मान डोलावली. ती निघून गेली.

पण गार्गीला मात्र दोघांचे बोलणे जरा विचित्र वाटत होते. तरी तिने दुर्लक्ष केले आणि थोडावेळ समिधाशी गप्पा मारल्या. ती निघून गेली. समिधाने मात्र सुटकेचा निश्वास सोडला.

इकडे मनीषाताई आणि संजयराव संग्राम आणि गार्गीच्या न कळत सगळ्यांना आमंत्रण देत होते.संग्राम नेहमीप्रमाणे आज ही दहा वाजता ऑफिसमधून आला. मनीषाताई-संजयराव,गार्गी अजून जागेच होते. संग्रामने बॅग, कोट टीपॉयवर ठेवला आणि तो सोफ्यावर रेलून बसला.गार्गीने त्याला पाणी आणून दिले.

संग्राम,“बरं झालं तुम्ही जागेच आहात दोघे, मला आमच्या ऍनिव्हर्सरी पार्टीबद्दल बोलायचे होते तुमच्याशी!” तो पाणी घेत म्हणाला.


मनीषाताई,“ जेवण कर आधी आणि या वर्षी पार्टी वगैरे काही नाही करायची. मी पूजा ठेवली आहे.” त्या म्हणाल्या. संग्राम आणि गार्गी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

संग्राम,“ पण का?” त्याने विचारले.

मनीषाताई,“ नजर लागते लोकांची; गेल्या वेळी पार्टी झाली आणि गार्गी आजारी पडली. दोन दिवस तापाने भाजत होती पोरगी! म्हणून आता पार्टी नाही आणि काही नाही! मी पूजेची सगळी तयारी केली आहे. इथल्या एका मंदिरात पूजा करायला जायचं.” त्या म्हणाल्या.

संग्राम,“ काय आई तू पण अग गार्गीला व्हायरल फिवर झाला होता. आपण दर वर्षी पार्टी देतो या वर्षी..!” तो हिरमुसून बोलत होता.

संजयराव,“ मनीषा बरोबर बोलत आहे! या वर्षी काही नाही करायचं आणि चिनू जर तुला द्यायचीच असेल पार्टी तर आम्ही म्हातारा म्हातारी काय बोलणार मग!असं ही तुझं पोरगं सुद्धा मोठं झालं आहे. आम्हांला कोण विचारणार आता!” ते नाराजीने म्हणाले.

संग्राम,“कुठला विषय कुठे नेताय बाबा तुम्ही! मीच काय पण आदी ही म्हातारा झाला तरी तुमचा माझ्यावरचा हक्क कमी होणार आहे का? मी चिनूच राहणार ना तुमचा!” तो त्यांना समजावत म्हणाला.

गार्गी,“ बरोबर बोलतोय संग्राम! बाबा तुमच्या दोघांच्या मनात नाही ना पार्टी करायची तर नाही करायची पार्टी आपण पूजा करू.” त्यांच्या बोलण्याला तिने दुजोरा दिला.

मनीषाताई,“ बरं! चिनू जा जेव जा, गार्गी ही अजून जेवायची थांबली आहे तुझ्यासाठी!” त्या म्हणाल्या आणि दोघे ही त्यांच्या रूममध्ये निघून गेले.

संजयराव,“ दोघांचे ही चेहरे किती उतरले होते पाहिलेस का मनीषा! मला खूप वाईट वाटलं चिनूशी असं बोलताना!” ते कातर आवाजात म्हणाले.

मनीषाताई,“ तुम्ही पण ना जास्तच बोललात त्याला बरं आता असू द्या! आता चेहरे उतरले आहेत दोघांचे पण त्या दिवशी दोघांचे आनंदी चेहरे मला आत्ताच दिसत आहेत.” त्या हसून म्हणाल्या आणि दोघे ही झोपले.


डायनिंग हॉलमध्ये गार्गी आणि संग्राम जेवत होते. संग्राम खरं तर चिडला होता आणि नाराज देखील होता. कारण या वर्षी दोघांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण होणार होती आणि त्याने त्या निमित्त खास काही तरी करायचं ठरवलं होतं पण आई-बाबांच्या अशा बोलण्याने सगळंच रद्द झाले होते.

संग्राम,“ तुला किती वेळा सांगितले गार्गी की जेवायला माझी वाट पाहत जाऊ नकोस. जेवून घेत जा म्हणून!” तो जेवण करत चिडून म्हणाला.

गार्गी,“ संग्राम उगीच चिडचिड नको करुस. मला माहित आहे तुझी चिडचिड का होत आहे ते?आपण पुन्हा कधी तरी सेलिब्रेशन करू.” ती त्याला समजावत म्हणाली.

संग्राम,“ गार्गी पंचवीसांवी ऍनिव्हर्सरी आहे आपली! तो दिवस पुन्हा येणार आहे का? आणि आई-बाबांना अचानक काय झाले आहे? जाऊ दे! बरं सुशांत कसा आहे ग? तू गेली होतीस का त्याची विचारपूस करायला?” त्याने विषय बदलत विचारले.

गार्गी,“हो गेले होते पण तो विचित्रच वागत होता आज थोडा!मी गेले तर तो नुकताच बाहेरून आला होता विचारले तब्बेत कशी आहे? आराम करायचा सोडून कुठे गेला होता तर त्याला काहीच सुचेना काय बोलावे! शेवटी समिधाच म्हणाली तो दिवस भर आरामच करत होता. क्लिनिकमध्ये गेला होता आत्ता आला! दोघांचे ही वागणे विचित्रच होते!” ती साशंकपणे बोलत होती.

संग्राम,“त्यात काय नवीन आपलं घर म्हणजे ना झू आहे. मी जाऊन झोपतो आता आधीच आज सुशा मध्येच पळून गेल्यामुळे त्याच्या मिटींग्स मला घ्याव्या लागल्या आहेत. हेक्टिक होता आजचा दिवस!” तो वैतागून म्हणाला.

गार्गी,“या झू मधला तू पण एक विचित्र प्राणी आहेस विसरू नकोस. जा मी ही आलेच आणि डोके दुखीची गोळी घेतलीस ना तर खबरदार, मी चेपून देते डोकं. चांगलंच दुखत असेल आज ना!” ती काळजीने म्हणाला.

संग्राम,“you know me better!” तो हसून म्हणाला आणि निघून गेला.
★★★★


इकडे संग्राम-गार्गीच्या सरप्राईज लग्नाची तयारी त्यांच्या न कळत जोरात सुरू होती.आज देखील सुशांतने आणि नंतर अभिराजने दुपारून ऑफिसला दांडी मारली होती. सगळे मिळून आज शॉपिंगला गेले होते. गार्गी- संग्रामसाठी वेगवेगळ्या फंग्शनसाठी कपडे,ज्वेलरी तसेच बाकी सगळ्यांसाठी कपडे खरेदी करायला बराच उशीर लागला होता. ऑफिसमध्ये सुशांत आणि अभिराज नसल्यामुळे संग्राम बरोबर गार्गीला देखील आज घरी यायला दहा वाजून गेले. तोपर्यंत घरात सगळे हजर झाले होते.

तीन दिवसात सगळी तयारी झाली होती. आज ऍनिव्हर्सरीचा दिवस उजाडला होता.गार्गी पूजेला जाण्यासाठी साडी नेसत होती तर संग्राम डोळे चोळत उठला. त्याला उठलेला पाहून गार्गी त्याला म्हणाली.

गार्गी,“ बरं झालं उठलास संग्राम! या साडीच्या निऱ्या जुळवून दे ना! आई पण ना कधी कधी अतिच करतात बघ किती हेवी साडी दिली आहे मला नेसायला ती ही जरी काठाची!” ती निऱ्या नीट करण्याचा प्रयत्न करत बोलत होती.

संग्राम उठला आणि तिच्या समोर खाली जाऊन बसला. त्याने तिच्या साडीच्या प्लेट्स तिला नीट करून दिल्या आणि तिला मागून मिठी मारत तिच्या कानात म्हणाला.

संग्राम,“ हो साडी जरा जास्तच हेवी आहे पण या ग्रीन साडीत तू हॉट आणि सेक्सी दिसतेस की! हॅप्पी मॅरेज ऍनिव्हर्सरी बायको!”

गार्गी,“ सेम टू यु!” ती हसून म्हणाली.

संग्राम,“मग मॅडम तुम्हांला या वेळी काय गिफ्ट हवं?” त्याने विचारले.

गार्गी,“ तूच माझ्यासाठी गिफ्ट आहेस. त्या परमेश्वराने आजच्या दिवशी दिलेले.” ती हसून प्रेमाने त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

संग्राम,“ मी काय म्हणतो ते अगदी खरं आहे. आमचं घर म्हणजे झू आहे आणि त्यात एकशे एक नग आहेत त्यातला हा एक!बायका नवऱ्याला गिफ्टसाठी भांडतात आणि माझी बायको दर वर्षी हीचा डायलॉग ठरलेला असतो.” तो वैतागून म्हणाला.

गार्गी,“ अच्छा मी नग का? आणि तू कोण रे? तू मला सगळं दिलंस अगदी न मागता मग काय मागू मी तुला सांग बरं? आणि मी खरंच म्हणतेय तूच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे gd! मी किती ही नको म्हणाले तरी तू मला गिफ्ट तर देणारच आहेस माहीत आहे मला आणि ते ही युनिक असणार आहे तुझ्या सारख!” ती त्याचे विस्कटलेले केस हाताने नीट करत म्हणाली.

संग्राम,“तू मला चांगलच ओळखतेस.तुझ्यापासून काय लपले आहे स्वीट हार्ट!हा पण मला काय गिफ्ट देणार आहेस तू?” तो डोळे मिचकावून म्हणाला.

गार्गी,“ हो मिळणार ना!गिफ्ट ही मिळणार. बरं जा आवर ना gd आपल्याला उशीर होईल.” ती त्याच्या पासून दूर होत म्हणाली.

संग्राम,“अरे ते गिफ्ट मिळेल तेंव्हा मिळेल पण असं कोरडं हॅप्पी ऍनिव्हर्सरी का? आज तोंड तर गोड झालंच पाहिजे.” असं म्हणून तो तिच्या जवळ जवळ जात होता आणि दारावर मनीषाताईची थाप पडली.

मनीषाताई,“आवरलं का गार्गी-चिनू? आपल्याला देवळात जायचं आहे पूजा आहे ना!” त्या ओरडत होत्या

संग्राम चिडला होता. गार्गी मात्र त्याच्याकडे पाहून हसत होती. संग्राम पाय आपटत वॉशरुमकडे निघून गेला आणि गार्गीने दार उघडले.


संग्राम-गार्गीला इतके मोठे सरप्राईज मिळणार होते. ते मिळाल्यावर ते कसे रिऍक्ट होणार होते?
©स्वामिनी चौगुले








🎭 Series Post

View all