माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग २५

अदिराजच्या एन्ट्रीने क्षितिराजच्या लव स्टोरीत कोणता ट्विस्ट येणार आहे?
भाग 25

सहा महिन्यानंतर…


क्षितिजा ऑफिसमध्ये चांगलीच स्थिरस्थावर झाली होती. तिने अभिराजकडून सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या. ती त्याच्याशी तो तिचा बॉस आहे इतकेच काय ते नाते ठेवून वागत होती. बाकी ती हुशार असल्याने ती अभिराजच्या कचाट्यात सापडत नसे. अभिराज ही अमेरीकन प्रोजेक्टवर काम करण्यात बिझी होता. संग्राम,गार्गी, सुशांत आणि बाकी सगळ्यांचे नेहमीचेच रूटीन सुरु होते.

आज नेहमीप्रमाणे सगळे जेवन करून झोपले होते आणि अचानक रात्री बारानंतर कोणाच्या तरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज इतका मोठा होता की दोन्ही घरात घुमला. सगळे दचकून जागे झाले आणि आवाज ज्या दिशेने आला म्हणजेच गार्डनमधून त्या दिशेने धावत सुटले. सगळे काय झालं? कोण इतकं मोठ्याने ओरडलं असेल म्हणून घाबरले होते. पाहतात तर काय आदिराज गार्डनमधील टेबलवर स्टाईलमध्ये उभा होता. सगळ्यांचे भेदरलेले चेहरे पाहून तो ओरडला.

आदिराज,“ सरप्राईजss”

ते पाहून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला संग्राम पुढे गेला आणि त्याने त्याचा कान धरून त्याला टेबलवरून खाली उतरवले.

संग्राम,“ मूर्खा असलं भयंकर सरप्राईज देतात का? घरात म्हातारी माणसं आहेत. हार्ट अटॅक यायचा की कोणाला तरी?”

आदिराज,“ कोण म्हातारं आहे इथे? आजी का?” तो मनीषाताईंच्या जवळ जात म्हणाला.

मनीषाताई,“ ये आद्या म्हातारा असेल तुझा बाप!”त्या लटक्या रागाने म्हणाल्या आणि सगळे संग्रामकडे पाहून हसू लागले.

गार्गी,“ अरे पण माकडा तू इतक्या रात्री कसा आलास?येणार होतास तर फोन करायचा ड्रायव्हर पाठवला असता ना तुला एअरपोर्टवर घ्यायला.” ती म्हणाली.

संग्राम,“ एक मिनिटं तुझ्या कोर्सचे अजून चार महिने बाकी होते की का सोडून आलासमध्येच?” त्याने त्याला पाहूत विचारले.

सुशांत,“ काय रे तुम्ही सगळे? माझा बच्चू सात महिन्यांनी घरी आला आहे आणि तुम्ही पोलिसांसारख्या चौकशा करताय!चल बच्चू आत!” तो त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला.

संग्राम,“ घ्या गेलं प्रेम उतू लगेच. चला आता झोपा सकाळी बोलू.” तो सुशांतकडे पाहत म्हणाला.

आदिराज,“ अरे डॅडा तुझ्या शंकेच निरसन करतो मग जाऊन झोपू. तर मी एक वर्षाचा कोर्स सात महिन्यात पूर्ण केला आहे चार महिने आधीच! मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून कोणाला ही न सांगता आलो आज.” तो म्हणाला.

अभिराज,“ अरे वा अभिनंदन!” तो त्याला मिठी मारत म्हणाला.

संजयराव,“ बाकी सगळं उद्या बोलू. चला झोपायला आता.” ते म्हणाले आणि सगळे आत गेले.

गार्गीने आदिराजच्या रूममधील बेडशीट आणि पिलो कव्हर्स बदलत होती. आदिराज अभिराजशी तिथेच उभं राहून बोलत होता आणि संग्राम तिथेच उभा राहून आदिराजला पाहत होता. गार्गीने घसा खाकरला आणि संग्राम भानावर आला.

गार्गी,“ अभी जा झोप जा बाकी गप्पा उद्या मारा! खूप रात्र झाली आहे. संग्राम चल!” अभिराज निघून गेला आणि संग्राम-गार्गी निघाले तर आदिराजने संग्रामचा हात धरला आणि त्याने त्याला मिठी मारली.

आदिराज,“ आय व्हॉज मिस यु सो मच डॅडा!” तो भरल्या आवाजात म्हणाला आणि संग्रामचे ही डोळे भरून आले.

गार्गी,“अच्छा म्हणजे फक्त डॅडाला मिस केलंस का? आणि मला नाही?”

ती तोंड फुगवून म्हणाली आणि आदिराजने संग्रामबरोबर तिला ही मिठीत घेतले. रूम बाहेर संजयराव, मनीषाताई आणि सुशांत त्या तिघांना पाहत होते. सुशांत लटक्या रागाने संजयरावांना पाहत म्हणाला.

सुशांत,“ काका याला म्हणतात ज्याच त्याला आणि गाढव ओझ्याला!”

संजयराव,“ बरोबर आहे बाबा तुझं काय करणार घोर कलयुग आहे. या बच्चूला आपण दोघांनी या चिनूच्या रागापासून वाचवायचं आणि आल्या आल्या झप्पी कोणाला तर चिनूला!” ते तोंड फुगवून म्हणाले.

आदिराज,“ हेच हेच मी सगळ्यात जास्त मिस केलं आजोबाचे आणि अंकल तुझे हे असले ओहर रेटेड ड्रामे! बरं जा सगळे आता राहिलेले प्रेम उद्या देतो. आप कतार में है! खूप झोप येत आहे मला!” तो नाटकीपणे म्हणाला.

सुशांत,“ अच्छा आम्ही रांगेत का? आता तुला सांगतो.” असं म्हणून तो त्याच्या मागे मारायला धावू लागला.

संग्राम,“ सुशा तू पण लहान होतोस बघ. जा झोपा आता.” तो दोघांना थांबवत म्हणाला.

आणि सगळे निघून गेले. संग्राम मात्र आज भलताच खुश होता. त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद पाहून गार्गी म्हणाली.

गार्गी,“ काय मग आज खूपच खुश आहे बच्चूचा डॅडा!” तिने हसून विचारले.

संग्राम,“ हो मग आज माझा आदि घरी आला. तो ही एक वर्षाचा कोर्स आठ महिन्याच पूर्ण करून. त्याने मला आज मिस यु डॅडा म्हणून जी मिठी मारली ना तेंव्हा काय वाटले ते शब्दात नाही सांगता येणार गार्गी! इट्स सच अ वंडरफुल फिलिंग! काय नव्हतं त्यात प्रेम, माया, माझ्या विषयीची ओढ खूप काही!हा पण खूप मस्ती खोर आहे कार्ट आज सगळ्यांची झोप उडवली आणि आता झोपला असेल ढाराढुर थकून! मेरे बच्चू की आने की खुशी में पार्टी तो बनती है।” तो गहिवरून पण आनंदाने बोलत होता.

गार्गी,“ आरे हो हो! आता झोपा आणि भावना पोहोचल्या बरका! तुम्हाला कधीपासून भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज लागायला लागली. हे किलर डोळेच बास आहेत. जिस पे हम तो कब के मर मिटे है।” ती हसून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि संग्रामने तिला मिठी मारली.
★★★


आज राज्ञी सुद्धा हॉस्टेलवरून आदिराजला भेटायला आली होती. आज संग्रामच्या घरी सगळे ब्रेकफास्टला जमले होते. आदिराजने सगळ्या घरात नुसता हैदोस घातला होता.

संग्राम,“ आदी एका जागेवर बसून ब्रेकफास्ट कर बरं. किती उड्या करशील? तुला थकवा येतो की नाही बच्चा?” तो काळजीने म्हणाला. तो म्हणाला आणि आदिराज ब्रेकफास्ट करायला खुर्चीवर येऊन बसला.

अभिराज,“ आदि आज अराम कर. मी संध्याकाळी आल्यावर कुठे तरी बाहेर जाऊ.”

आदिराज,“ नाही भाई आज मी मित्र-मैत्रिणींना भेटायला जाणार आहे.” तो म्हणाला.

अभिराज,“ बरं!”

संग्राम,” बरं मला काही तरी सांगायचे आहे. आदि घरी आला आहे ते ही वेळेच्या आधी डिग्री घेऊन. म्हणून परवा पार्टी ठेवत आहोत आपण त्यात आपल्या सगळ्यांचे मित्र, स्टाफ आणि बिझनेस असोसिएट्स पण येतील. त्या निमित्ताने आदिची सगळ्यांशी ओळख देखील होईल.” तो म्हणाला.

आदिराज,“ ते सगळं ठीक आहे डॅडा पण मी आत्ताच बिझनेस जॉईन करणार नाही कमीतकमी काही महिने तरी! आय वॉन्ट टू फ्लाय लाईक अ फ्री बर्ड!” तो म्हणाला.

गार्गी,“ वो फ्री बर्ड जमिनीवर या आता! आणि तुला केंव्हा वाटेल तेंव्हा ऑफिस जॉईन कर मग तर झाले. पण मापात राहायचं कळलं का?” ती त्याला दम देत म्हणाली.

सुशांत,“ काय गं पोराला लगेच दम देतेस!” तो म्हणाला.

संग्राम,“ बर सुशांतराव आपल्याला ऑफिस आहे म्हणलं आणि पार्टी व्हेन्यू आणि बाकी सगळं ही ठरवायचे आहे तर चला.” तो म्हणाला.

आणि संग्राम,सुशांत, गार्गी आणि अभिराज ऑफिसला निघून गेले. राज्ञी ही कॉलेजला निघून गेली समिधा आणि संजयराव आश्रमात गेले. मनीषाताई नोकरांना आवश्यक सूचना देऊन आदिराज बरोबर गप्पा मारत बसल्या. थोड्या वेळाने आदिराज ही बाहेर निघून गेला.त्याने क्षितिजाला फोन केला.

आदिराज,“ काय मॅडम कसं चालले आहे ऑफिस?”

क्षितिजा,“ नेहमीचेच!”ती म्हणाली.

आदिराज,“ आज संध्याकाळी मला ऑफिस जवळच्या कॅफेमध्ये भेट.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ काय? तू इंडियात कधी आलास?” तिने आश्चर्यमिश्रित आनंदाने विचारले.

आदिराज,“ काल! बरं संध्याकाळी भेटल्यावर बोलू आपण.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ ठीक आहे.”
★★★


दिवस सगळा असाच निघून गेला आणि क्षितिजा ऑफिस सुटल्यावर कॅफेमध्ये पोहोचली. तिच्या आधीच आदिराज कॅफेमध्ये हजर होता. त्याने एका टेबलवरून तिला हात केला आणि ती त्याच्यासमोरच्या खुर्चीवर जाऊन बसली.

क्षितिजा,“ व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार! तू असा अचानक? तुझी डिग्री पूर्ण व्हायला अजून काही महिने आहेत ना अजून मग मध्येच कसा आलास?” ती म्हणाली.

आदिराज,“ ये बुलेट ट्रेन जरा श्वास घे. सांगतो सगळं! त्या आधी मला सांग तुमची लव्ह स्टोरी कुठे पर्यंत आली आहे? मला तर वाटलं होतं मी येई पर्यंत लग्नापर्यंत पोहोचेल.” त्याने तिला विचारले.

क्षितिजा,“ कसली लव्ह स्टोरी आणि कसलं काय रे? आदि अरे मी जे फिल केलं तो कदाचित माझा गैरसमज होता. अभिराज सर आणि माझ्यात असं काही कधीच नव्हतंच कदाचित!” ती उदास होत म्हणाली.

आदिराज,“ नाही क्षिती मी भाईच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम पाहिले आहे. ते मोम-डॅडला ही जाणवले होते. भाईच्या इतक्या जवळच्या तीन माणसांचा अंदाज कसा चुकू शकेल. आता भाई असा का वागतोय ते ही कळेल लवकरच!आणि त्याच्या मनातलं काढून घेण्याचा चान्स आपल्याला मिळाला आहे. डॅडनी मी वेळे आधी डिग्री घेऊन परत आलो म्हणून परवा पार्टी ठेवली आहे. तर एज अ स्टाफ प्लस माझी बेस्टी म्हणून यु आर इन्व्हाटेड!” तो म्हणाला.

क्षितिजा,“ पार्टीत मी येईन रे! पण अभिराज सरांच म्हणशील तर मी सगळ्या होप्स सोडून दिल्या आहेत.”ती उदास होत म्हणाली आणि तिच्या हातावर आदिराजने हात ठेवला.

आदिराज,“ अरे इतक्यात निराश नको होऊस तू!” तो म्हणाला.

अभिराज तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये क्लायंट मिटिंगसाठी जात होता आणि त्याने आदिराज आणि क्षितिजाला कॅफेमध्ये बोलत बसलेले पाहिले. त्याच्या मनात विचार चमकून गेला.

‛ आदि मला म्हणाला की तो त्याच्या मित्र-मैत्रिणींना भेटायला जाणार आहे आणि तो क्षितिजाला भेटायला आला आहे. माझ्याशी खोटं बोलून!’


खरं तर अभिराज क्षितिजाशी असं फटकून का वागत होता? हे क्षितिजा सह आदिराजला ही न उलगडलेले कोडे होते. पण आता आदिराजची एन्ट्री या क्षितिराजच्या लव्ह स्टोरीमध्ये नवा ट्विस्ट आणू शकेल का?
© स्वामिनी चौगुले













🎭 Series Post

View all