माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग २४

क्षितिराजची नोकझोकवाली लव स्टोरी आता पुढे कोणते वळण घेणार होती?


भाग 24
क्षितिजाने फोन उचलला. तिकडून आदिराज.

आदिराज,“ हॅलो मिस क्षितिजा!”

क्षितिजा,“ झाली सवड बेस्ट फ्रेंडला फोन करायची?” तिने तोंड फुगवून विचारले.

आदिराज,“ सॉरी गं! न्यू ऍडमिशन! हॉस्टेल!स्टडी या सगळ्यात तुला फोन करायचा राहून गेला. आत्ता थोडा फ्री झालो आणि तुला फोन केला.” तो तिला समजावत म्हणाला.

क्षितिजा,“ जस्ट चिल यार! मी तर असंच तुझी खेचण्यासाठी म्हणाले. मी समजू शकते सगळं. आणि काका-काकूची आठवण पण येत असेल ना तुला? तू कधीच त्यांना सोडून राहिला नाहीस?” तिने विचारले.

आदिराज,“ हो गं मी घरापासून दूर पहिल्यांदाच राहिलो आहे. मम्मा-डॅडा, अंकू आणि बाकी सगळ्यांचीच खूप आठवण येते. बट इट्स ओके! मम्मा-डॅडा आले होते भेटायला मला! अंकू तर काय मला रोज चार वेळा फोन करतो. मम्मा पेक्षा डॅडा खूप इमोशनल आहे गं!” तो भरल्या आवाजात बोलत होता.

क्षितिजा,“ हो संग्राम काका आहेतच सेन्सिटिव्ह ते जाणवतं त्यांच्या वागण्या-बोलण्यातून!” ती म्हणाली.

आदिराज,“ मग मॅडम दोन महिने होत आले ऑफिस जॉईन करून. तुमची लव्ह स्टोरी कुठं पर्यंत पोहोचली?” त्याने तिला चिडवत विचारले.

क्षितिजा,“कसली लव्ह स्टोरी आणि कसलं काय? तुझा भाऊ खडूस बॉसच्या भूमिकेतून बाहेरच येत नाही.” ती बोलत होती आणि अभिराज तिच्या मागे कधीचाच येऊन उभा होता त्याची तिला जाणीव ही नव्हती.तो तीच बोलणं ऐकून ओरडला.

अभिराज,“ मिस पाटील!” आणि क्षितिजा घाबरली तिने फोन कट केला आणि उठून उभी राहत ती चाचरत कशी बशी म्हणाली.

क्षितिजा,“ यss स सर..” ती खूपच घाबरली होती.

अभिराज,“तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला येता की फोनवर गप्पा मारायला?” तो चिडून विचारत होता. क्षितीजाची मान खाली होती. तिला काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते. तोपर्यंत संग्राम तिथे बाहेरून आला आणि तो अभिराजला म्हणाला.

संग्राम,“ कम इन माय केबीन!” असं म्हणून तो निघून गेला आणि अभिराज क्षितिजाकडे एक जळजळीत नेत्र कटाक्ष टाकून निघून गेला.

क्षितिजाने सुटकेचा निःश्वास सोडला. तिने आदिराजला मेसेज टाकला कॉल यु लेटर म्हणून तिला अभिराजच्या वागण्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तो अचानक का चिडला असावा हे तिला कळत नव्हते. तरी तिने त्याच्याबद्दलचे विचार झटकले आणि ती कामात गढून गेली.
★★★

इकडे संग्रामने अभिराजबरोबर, गार्गी आणि सुशांतला देखील त्याच्या केबीनमध्ये बोलावून घेतले होते.

संग्राम,“ त्या अमेरिकन कंपनीचा आपल्याला रिप्लाय आला आहे. ते आपल्याबरोबर काम करायला इंटरेस्टड आहेत.” तो खुश होत म्हणाला.

सुशांत,“ अरे वा! ही तर खूप चांगली बातमी आहे संग्र्या! असं झालं तर आपल्या ट्रिपल एसचा डंका विदेशात देखील वाजेल.”

अभिराज,“ झालं तर काय डॅडा होणारच!” तो उत्सुकतेने म्हणाला.

गार्गी,“ हो ते सगळं ठीक आहे पण आता पुढे काय करायचे आहे आपल्याला?” तिने विचारले.

संग्राम,“ आपण आपल्या कंपनी तर्फे त्यांना हव्या असलेल्या सॉफ्टवेअरचे प्रेझेंटेशन तयार करायचे आणि पुढच्या महिन्यात तिथे जाऊन सादर करायचे. आपल्या पैकी एकाजानाला पुढच्या महिन्यात अमेरिकेला जावे लागेल.” तो म्हणाला.

अभिराज,“ ठीक आहे अंकू या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी माझी, मी सगळं करेन आणि अमेरिकेला ही जाऊन येईन तसेच आदीला देखील भेटणं होईल.” तो म्हणाला.

संग्राम,“ दॅट्स गुड! मग या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी तुझी अभी!” तो हसून म्हणाला.

संग्रामसाठी हे अमेरिकन प्रोजेक्ट त्याचे ड्रीम प्रोजेक्ट होते आणि हे गार्गी,अभिराज आणि सुशांत पुरेपूर जाणून होते. संग्रामने अभिराजवर त्या प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी टाकून त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला होता. अभिराज ही त्या विश्वासाला पात्र होता.
★★★

इकडे क्षितिजा मात्र एरर शोधून वैतागली होती. सहा वाजून गेल्या तरी ती कामच करत होती. अभिराज ही ऑफिसमधून उशीरच घरी जायचा. त्याने केबीनच्या काचेतून एकदा क्षितिजाला पाहिले आणि तिला इंटर कॉम केला.

अभिराज,“ मिस पाटील तुम्ही अजून ऑफिसमध्येच का?”

क्षितिजा,“ ते मी एरर शोधत होते.” ती म्हणाली.

अभिराज,“तो उद्या शोधा आता निघा!” तो म्हणाला.

क्षितिजा,“ यस सर! (ती म्हणाली आणि तोंड वाकडे तिकडे करून स्वतःशीच बोलू लागली.)घरी जा म्हणे खडूस, सडू!” ती जीभ बाहेर काढून आणि हात वारे करून चिडून बोलत होती. अभिराजला ती काय बोलते ते ऐकू येत नसले तरी तिची असं वागणं पाहून हसू येत होते.

तिने तिचा डेस्क आवरला आणि ती घरी जायला निघाली. ती ऑफिस बाहेर पडत होती की आदिराजचा पुन्हा फोन आला.

आदिराज,“ आता तर बोलू शकता ना मॅडम तुम्ही माझ्याशी? बाय द वे फोन मधूनच का कट केलास?” त्याने विचारले.

क्षितिजा,“तुझा तो खडूस आणि सडू भाऊ माझ्या मागे येऊन उभा राहिला होता म्हणून फोन कट केला. मला म्हणतो की तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला येता की गप्पा मारायला?” ती टॅक्सीत बसत म्हणाली.

आदिराज,“ मग बरोबर आहे त्याच!” तो हसून म्हणाला.

क्षितिजा,“ हो का? तुझ्या भावाने नुसते नाकीनऊ आणले आहे माझ्या आदि; त्याने आज तर चक्क मला सॉफ्टवेअर मधील एरर शोधायचे काम दिले आहे ते ही चोवीस तासात! तो हल्ली खूप चिडचिड करतो रे! का माहीत नाही. मी समोर दिसले की त्याच डोकं फिरतं!” ती वैतागून बोलत होती.

आदिराज,“ काय एरर शोधायचा तो ही चोवीस तासात? क्षिती आपल्याकडे त्यासाठी स्पेशन टीम आहे की इतके अवघड काम तुला तो देऊच कसं शकतो? आणि चिडचिड का करतो? त्याचा स्वभाव तसा शांत आहे. तुला जर त्रास होत असेल तर मी डॅडा किंवा अंकलशी बोलू का? तू दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करशील का?” त्याने काळजीने विचारले.

क्षितिजा,“ नको रे! तसं केलं तर त्यांचा गैरसमज होईल माझ्याबद्दल! आणि त्रास वगैरे काही नाही. मला तर नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि मी पळून जाण्याऱ्यातली दिसले का तुला? मी चोवीस तासात एरर शोधून दाखवतेच की नाही बघ.” ती कॉलर टाईट करत म्हणाली.

आदिराज,“ बरं बाई शोध!आणि मी नाही बोलत कोणाशी!” तो म्हणाला.

क्षितिजा,“ बरं रूम आली मी ठेवते फोन!” ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला.
★★★
आज ती ऑफिसला नेहमीपेक्षा लवकरच आली आणि तीच काम करत बसली. ती तिच्या कामात इतकी गढून गेली की आजूबाजूचे भान ही तिला राहिले नाही. साधारण दुपारचे बारा वाजले असतील सगळे आपापल्या कामात मग्न होते आणि क्षितिजा खुर्चीवरून उडी मारून मोठ्याने ओरडली.

क्षितिजा,“सापडला ये ss!” ती ओरडली आणि सगळे तिच्याकडे पाहू लागले. तिथूनच जाणाऱ्या सुशांतने ते पाहिले आणि त्याने आश्चर्याने विचारले.

सुशांत,“ कोण सापडला क्षितिजा मॅडम?”

क्षितिजा,“ खडूस, सडू एरर सापडला कालपासून मला हुलकावणी देत होता.” ती आपल्याच नादात म्हणाली आणि तिचे लक्ष सुशांतकडे गेले आणि ती थोडी चाचरली.

सुशांत,“ अरे वा बरं झालं सापडला नाही तर बिचाऱ्या एररच काही खरं नव्हतं.” तो तिला पाहत म्हणाला आणि हसायला लागला.

क्षितिजा,“ ते सॉरी सर मी थोडी एक्साईटेड झाले.” ती खाली मान घालून म्हणाली.

सुशांत,“ होत असं कधी कधी क्षितिजा!” तो हसून म्हणाला आणि निघून गेला.

क्षितिजा कोणते तरी मोठे युद्ध जिंकल्याच्या अविर्भाव अभिराजच्या केबीनमध्ये गेली.

क्षितिजा,“ सर मला एरर सापडला.” ती थोडी आखडून म्हणाली.

अभिराज,“ खरं का? दाखवा.” त्याने आश्चर्याने विचारले.

क्षितिजा,“ मग मी खोटं बोलते का?(असं म्हणून तिला अभिराजने काल दिलेला पेन ड्राईव्ह त्याच्या लॅपटॉपला जोडला आणि त्याच्या खुर्चीच्या अगदी जवळ जाऊन वाकून ती बोलू लागली.) हे बघा या इथे होता तो एरर….” ती त्याच्या अगदी जवळ होती आणि तिच्या लेडीज परफ्युमचा सुवास त्याच्या नाकात गेला. तो भान हरपून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिचे मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हते. तिने बोलत बोलत त्याच्याकडे पाहिले आणि त्याने स्वतःची नजर वळवली आणि उसणे अवसान आणत म्हणाला.

अभिराज,“ गुड! मी डिपार्टमेंटला कळवतो आता!”

क्षितिजा,“ ओके!” ती त्याला एटीट्युड दाखवत म्हणाली आणि त्याच्यासमोर अकड दाखवत झटक्याने निघून गेली.अभिराज मात्र तिला पाहतच राहिला.

क्षितिजाने आता ठरवले होते की अभिराज जर तिच्याशी खडूस सारखं वागत असेल तर ती देखील त्याला ऍटीट्युड दाखवणार.

अभिराज आणि क्षितिजाचे गोड नाते आता तिखट-खारट होऊ लागले होते. दोघांचे नाते कसे फुलणार होते की हे नोकझोकवाले नाते पुढे वेगळेच वळण घेणार होते?
© स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all