माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग 94

This Is A Love Story


सगळे गप्पा मारत बसले होते. गार्गीने जरा बाजूला जाऊन कोणाला तरी फोन लावला आणि काही तरी एका तासात पाठवून द्यायला सांगितले. घड्याळात आत्ता साडे नऊ झाले होते.गार्गीने मनिषाताईंना विचारले.

गार्गी,“ आई मी संग्रामसाठी नाष्ट्याला थालीपीठ करू का?”तसे सगळे हसले.

मनिषाताई,“हसायला काय झालं इतकं!(त्यांनी डोळे मोठे करून सगळ्यांना दटावले) विचारायच काय त्यात ग! चल मी सगळी पिठं काढून देते आणि राधाबाई सगळी तयारी करून देतील तू कर!” त्या म्हणाल्या आणि गार्गीने होकारार्थी मान हलवली आणि ती त्यांच्या मागे किचनमध्ये गेली.

मनिषाताई पीठ काढत होत्या. राधाबाई मागे भांडी घासत होत्या त्यामुळे इथं दोघीच होत्या. मनिषाताईनी पीठ काढत घसा खाकरून तिला विचारले.

मनिषाताई,“ बरेच दिवस झालं गार्गी तुला विचारीन विचारीन म्हणते! तू त्या दिवशी चिनूला gd म्हणत होतीस gd म्हणजे काय ग?" त्यांनी विचारले आणि गार्गीने लाजून मान खाली घातली ती कशी बशी लाजत म्हणाली.

गार्गी,“ ते gd म्हणजे ग्रीक देवता!”

मनीषाताई,“ काय? अग गार्गी काय हे म्हणूनच तो…” त्या आश्चर्याने बोलत होत्या तर मध्येच त्यांचे बोलणे तोडत ती त्यांना म्हणाली.

गार्गी,“ तसं नाही ओ आई तुमचा गैरसमज होतोय! अहो ग्रीक देवतांचे पुतळे तुम्ही पाहिले आहेत का? त्या देवता कशा हँडसम आणि देखण्या असतात संग्राम तसा दिसतो म्हणून…” ती खाली मान घालून लाजून सांगत होती.

मनिषाताई,“ असं आहे होय नाही तर मला बापडीला वाटलं!” त्या हसून म्हणाल्या.

गार्गी,“ हुंम! पण कदाचित माझीच नजर लागली त्याला आई!मी त्याच्या आयुष्यात आल्या पासून त्याच्या बरोबर काही ना काही विपरीतच घडत आहे! या महिना भरात तर त्याची तब्बेत खूप ढासळली आहे! आज ही त्याचा चेहरा खूप मलूल दिसतोय!” ती डोळ्यातले पाणी आडवत कातर आवाजात बोलत होती.

मनीषाताई,“ बच्चा असलं काही मनात ही नको आणू! जे घडायचं होत ते घडून गेलं! आता त्याचा विचार नाही करायचा उलट तुझ्याच मुळे चिनू ठीक आहे! त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुझ्या हाकेला त्याने साद दिली नसती तर काय झालं असत विचार करून जीवाचा थरकाप होतो आणि गुरुजींनी काय सांगितले होते विसरलीस का? तू त्याची ढाल आहेस समजलं तुला! आता आहेस ना त्याच्या बरोबर तर होईल सगळं नीट आणि इथून पुढे असा विचार नाही करायचा!आवर लवकर त्याला नाष्टा द्यावा लागेल ना! त्याला सकाळची गोळी घ्यायची असते! राधाबाई ते नंतर करा आधी गार्गीला थालीपीठ करण्यात मदत करा जरा!(त्या मागे दारात जाऊन राधावाईला म्हणाल्या) मला फंक्शनला जायची तयारी करायची आहे गार्गी तुझ्यासाठी साडी काढली आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहेच तुझ्या अंगावर! त्याला नाष्टा करवून तू ही आवर हॉस्पिटलमधून तिकडेच या डायरेक्ट आणि हो मोहनला घेऊन जा!” त्यांनी सूचना दिल्या.

गार्गी,“ thanks आई!” ती म्हणाली.

मनिषाताई,“ वेडी कुठली आईला thanks म्हणतात का?”त्या हसून म्हणाल्या आणि निघून गेल्या.

गार्गीने राधाबाईच्या मदतीने थालीपिठं केली आणि ती नाष्टा घेऊन रूममध्ये गेली. संग्राम उठून वॉशरुमला जाण्याच्या तयारीत होता. तो त्याच्या पट्टी बांधलेल्या जखमेवर प्लास्टिक पेपरची पट्टी लावण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमत नव्हते. गार्गीने ते पाहिले आणि तिने त्याला पट्टी लावून दिली.

गार्गी,“ मला वाटलं होतं साहेबांना उठवावे लागेल! पण तू तर उठलास की मनाने!” ती म्हणाली.

संग्राम,“ नाही उठून काय करणार आज खूप कामे आहेत! खरं तर मला असा पुरस्कार वगैरे घ्यायला जाणे नाही पटत गार्गी कारण मी फक्त एक चांगला नागरिक असल्याचे माझे कर्तव्य केले! पुरस्कार देण्यासारखे काही केले नाही! पण बाबा आणि आई जायचंच म्हणून बसले आहेत.” तो तोंड वाकड करून बोलत होता.

गार्गी,“ साहेब तुम्हाला वाटतं तुम्ही मोठं काही केलं नाही पण तुम्ही खूप मोठं काम केलं आहे जे तुम्हाला ही माहीत नाही म्हणून तर सरकार तुम्हाला वीरश्री पुरस्कार देत आहे ना! आणि तुला माहीत आहे का तुझ्या बद्दल या महिन्यात खूप काही छापून आले आहे पेपर्स आणि मॅगझीन्समध्ये अगदी फोटो सहित! कसला हँडसम दिसतोस माझा gd माहीत आहे का? मी सगळ्यांचे फोल्डर तयार केले आहे!तुला दाखवेन! आवर आता लवकर नाष्टा थंड होतोय!” ती त्याचा हात धरून बोलत होती.

संग्राम,“ अच्छा! किती हँडसम दिसतो मी आत्ता सांग ना!” तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत म्हणाला आणि गार्गीच्या पापण्या लाजेने झुकल्या.

गार्गी,“ तू जा बरं आवर लवकर माझं ही आवरायचे आहे अजून! नाही त्या वेळी रोमान्स बरा सुचतो तुला!” ती त्याच्या पासून लाजून नजर चोरत त्याला बळेच वॉशरूममध्ये घालवत म्हणाली.

संग्राम गेला तो पर्यंत गार्गीने रूम आवरायला घेतली. तिची साडी,ब्लाऊज असेच एका कोपऱ्यात पडून होते.विझलेल्या मेणबत्त्या,बेडशीतवर चुगळलेल्या पाकळ्या आणि खाली दारातून बेड पर्यंत अंथरलेल्या पाकळ्या सगळ्या रूम भर पसरल्या होत्या. तिने तिचा पदर कमरेला खोवला आणि साडी-ब्लाऊज उचलला! तिच्या साडीत त्याच्या देहाचा एक टिपिकल सुगंध दळवळत होता. त्या सुगंधाने ती पुन्हा शहारली! तरी स्वतःला सावरत तिने साडी-ब्लाऊज,त्याचे टीशर्ट-थ्रि फोर्थ लॉंड्री बॅगमध्ये धुण्यासाठी टाकले,बेडशीट झटकून तिने पुन्हा नीट अंथरले आणि बाकी सगळा पसारा उचलून झाडून घेतले! तो पर्यंत संग्राम बाहेर आला.तिला झाडून केर भरताना पाहून तिला काहीसा चिडून म्हणाला.

संग्राम,“ तुम्हा बायकांना काय हौस असते कामाची काय माहीत?ती आई-काकू आणि तू पण तशीच राधाबाईला आपण लोकांना दाखवायला ठेवली आहे का? तिला सांगायचं ना झाडायला!” तो म्हणाला आणि गार्गी हात धुवून त्याच्या हातातला टॉवेल घेऊन त्याला बेडवर बसवत त्याचे केस पुसत म्हणाली.

गार्गी,“ वेडा आहेस का तू? अरे राधाबाई येत होत्या झाडून काढायला मीच त्यांना थांबवले! एक तर तू कसा झोपला होतास आणि सगळ्या रूम भर आपल्या कापड्या पासून काय काय पसरले होते! अशी कामे नोकरांना सांगायची नसतात!” ती त्याचे केस पुसत त्याला समजावत बोलत होती.


संग्रामला रात्री पासून अगदी सकाळी देखील काय काय झाले ते आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आले. त्याने गार्गीला धरून स्वतःच्या मांडीवर बसवले आणि तिला एका हाताने धरून तिच्या कानात कुजबुजला

संग्राम,“ गार्गी तू खुश आहेस ना?”

गार्गी,“मी खूप खुश आहे gd!या आधी ही तुझ्या बरोबर मी हे सगळे अनुभवले आहे पण कल की बात कुछ और थी!कारण तू काल शुद्धीत होतास!मी या सुगंधित रात्रीचा अत्तरीय सुगंध कायम माझ्या मनाच्या कुपीत साठवून ठेवणार आहे!I love you alot!” ती त्याचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.
संग्राम मात्र त्यावर काहीच बोलला नाही त्याने तिला घट्ट मिठी मारली त्या मिठीत सगळं होत. तृप्तीचा आनंद, प्रेमाचा ओलावा, सौख्याची उधळण आणि पुनर मिलनाची ओढ!गार्गीला मात्र त्याच्या भावना त्याने न बोलता ही उमगल्या होत्या. ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.

गार्गी,“ तू असं काही तरी करतो gd आणि मग माझे शब्द तुझ्या अशा व्यक्त होण्यापुढे खूप थिटे पडतात आणि मी तुझ्या अधिकाधिक प्रेमात पडते!बरं चल लवकर नाष्टा कर थंड झाला असेल!” ती स्वतःला सोडवून घेत आणि त्याला बेडवर बसवत त्याच्या पुढ्यात थालीपिठाची प्लेट ठेवत म्हणाली.

संग्राम,“ अरे वा आज थालीपीठ!”


तो असं म्हणून प्लेट हातात घेणार तर गार्गीने त्याच्या हातातून प्लेट काढून घेतली आणि थालीपीठाचा एक तुकडा तोडून त्याच्या समोर घास धरला!त्याने घास खाल्ला आणि पुन्हा प्लेट घेणार तर गार्गी म्हणाली.

गार्गी,“ मी भरवणार तुला!”

संग्राम,“ एक घास भरवलास ना मग बास की! माझं मला खाता येत आणि मी लहान आहे का?” तो म्हणाला.

गार्गी,“ मला माहित आहे तू खाऊ शकतोस पण संग्राम गेला एक महिना झालं हॉस्पिटलमध्ये असल्या पासून तुला नीट उठता-बसता ही येत नव्हतं! काहीच करता येत नव्हतं तेंव्हा मला तुझ्या बरोबर राहायचं होत. तुझी काळजी घ्यायची होती तुझी सेवा करायची होती पण तुला लांबून पाहण्या शिवाय मी काहीच करू शकत नव्हते .खूप हतबल होते मी! म्हणून आता पुढचा एक महिना मी सगळं करणार तुझं अगदी भरण्यापासून!” ती आवंढा गिळत त्याला घास भरवत म्हणाली.

संग्राम,“ I am sorry dear!” तो तिला जवळ घेत म्हणाला.

गार्गी,“ मी म्हणाले ना sorry नाही म्हणायचं मला!” ती म्हणाली.

संग्राम,“ बरं नाही म्हणत sorry अग पण आता मला भरवायला ते बरं दिसत का?हा तुला माझी सेवाच करायची तर करू शकतेस रोज! रात्री सारखी!” तो सुचकपणे हसून म्हणाला.

गार्गी,“ चल निर्लज्ज कुठला! त्याला सेवा म्हणतात का?”ती लाजून म्हणाली.

संग्राम,“नाही प्रेम म्हणतात!जे माझं तुझ्यावर खूप आहे!” तो डोळे मिचकावून म्हणाला.

गार्गी,“ हो ते अनुभवलं मी! तुझं पाणचट बोलून झालं असेल तर आवर पटापट आता!” ती त्याला दाटावत घास चारून म्हणाली.

संग्राम,“आता मी काय पाणचट बोललो ग! गार्गी तू ना खूप सुंदर आणि hot ही आहेस!म्हणजे…. कळतय ना तुला!”तो लाजून केसात हात फिरवत म्हणाला.

गार्गी,“देवा हाच अँटिक पीस मला भेटायचा होता का?माझ्या आधी तर हाच लाजतो!माझं लाजाळूच झाड!पण ना अँटिक आहे म्हणूनच भारी आहे माझा राजा!” ती हसून त्याचा गाल ओढत म्हणाली.

संग्राम,“ मी अँटिक पीस का थांब तुला सांगतो आता!” अस म्हणून त्याने रिकामी प्लेट बाजूला केली आणि तिला जवळ ओढले! तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार तर संजयरावांनी तिला हाक मारली आणि गार्गी दचकली.

संजयराव,“ गार्गीss अग कोणी तरी कसलं सामान घेऊन आले आहे तुझं!” ते म्हणाले.

संग्राम,“ बाबांचं कायम रॉन्ग टायमिंग असतं!” तो वैतागून म्हणाला.

गार्गी,“हा हा हा!Better luck next time!” असं म्हणून ती निघून गेली.

ती घराच्या दारात गेली तर एक माणूस उभा होता तिने त्याच्याशी काही तरी बोलून ती बॅग घेतली. ती हँगर असलेली सूटची बॅग होती पाहता क्षणी त्यात सूट आहे हे कळत होतं.ती बॅग घेऊन आत आली.

संजयराव,“ सूट चिनूसाठी वाटतं!पण इतक्या शॉर्ट नोटीस वर कसा मिळाला बेटा?” त्यांनी विचारले.

गार्गी,“ दादाला सांगितले होते तासा भरा पूर्वी फोन करून त्याच्या मित्राचे मेन्स वेअरचे फॅशन हाऊस आहे. त्याच्या कडूनच दादाने संग्रामची साईज सांगून तयार असणार सूट पाठवून दिला.तिथलाच माणूस आला होता. आज संग्रामसाठी इतका खास दिवस आहे मग सूट तो बनता है!” ती हसून म्हणाली.

मनीषाताई,“हुंम! मिसेस संग्राम सरनाईक!जा त्याला तयार करा मग स्वतः तयार व्हा! पळ लवकर!” त्या म्हणाल्या आणि गार्गी हसून मान हलवून गेली.

ती रूममध्ये गेली. तिने ती बॅग बेडवर ठेवली आणि संग्रामला गोळी दिली आणि त्याला म्हणाली.

गार्गी,“ संग्राम आवर लवकर हा घे सूट घाल मी तुला मदत करते.”त्याने पॅन्ट-शर्ट घातला. गार्गीने त्याला मदत केली.

तिने त्याला ब्लेझर चढवले. तिने ही मनीषाताईंनी तिच्यासाठी काढून ठेवलेली लेव्हेंडर कलरची डिझायनर साडी नेसली.संग्राम आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. गार्गी जरा टेन्शनमध्ये होती.त्यांचा नंबर आला आणि दोघे ही डॉक्टरांच्या केबीमध्ये गेले. त्यांना पाहून डॉक्टर म्हणाले.

डॉक्टर,“ या मिस्टर अँड मिसेस सरनाईक! संग्राम कसा आहेस तू?”

संग्राम,“ मी ठीक आहे डॉक्टर!” तो म्हणाला.

डॉक्टर,“ चल तुझे चेकअप करू!”

असं म्हणून डॉक्टरांनी संग्रामला चेकअप बेडवर झोपवले आणि त्याच्या बी.पी पासून सगळे चेक केले. त्यांनी त्याच्या जखमेवरची पट्टी काढली आणि जखम देखील पाहिली आणि नर्सला बोलवून नर्स बरोबर त्याला ड्रेसिंग करायला पाठवून दिले. आणि ते खुर्चीवर येऊन बसले. गार्गीने काळजीने त्यांना विचारले.

गार्गी,“ डॉक्टर सगळं ठीक आहे ना! काळजीचे काही कारण नाही ना?”

डॉक्टर,“हो संग्राम ठीक आहे आता! बी.पी ही नॉर्मल आहे बाकी जखम अजून भरली नाही.ती दुखत असणार नक्कीच म्हणून त्याची चिडचिड होऊ शकते थोडी! थोडा विकनेस ही आहे तर आपण काही औषधे आणि टॉनिक्स त्याला सुरू करू आणि हो त्याला अजून एक महिना तरी सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल! काल घडलेल्या घटना क्रमाचा आणि तू जे सांगितले त्याचा त्याच्या तब्बेतीवर कोणता ही परिणाम झाला नाही! That\"s good thing! त्याचा बी.पी देखील नॉर्मलच आहे! मला भीती होती की त्याला या सगळ्याचा त्रास होईल पण तसं काही नाही झाले!”ते म्हणाले.

गार्गी,“ हो डॉक्टर! मला ही तीच भीती होती पण सुदैवाने तसं काही झालं नाही!” ती समाधानाने म्हणाली.

डॉक्टर,“बाकी सगळं ठीक असलं तरी त्याची जखम अजून ही ताजी आहे तर त्याला विश्रांती घ्यावीच लागेल! आज वीरश्री मिळणार आहे त्याला मला ही फंक्शनचे आमंत्रण आहे! I am so proud of him!सोप्प नाही हे असं स्वतःची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवणे!” ते कौतुकाने बोलत होते

तो पर्यंत संग्राम नर्स बरोबर आला.गार्गी उठून त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याचा ड्रेसिंग करताना काढलेला शर्ट आणि ब्लेझर त्याला घालायला मदत केली. संग्राम खुर्चीवर बसत डॉक्टरांना म्हणाला.

संग्राम,“ प्लिज डॉक्टर मी असं ही काही मोठं काम केलं नाही!” तो हसून म्हणाला.

डॉक्टर,“ ते करणाऱ्याला मोठं वाटत नसत संग्राम! बरं मग भेटू पुढच्या महिन्यात आणि गार्गी आता ड्रेसिंग घरी तू केली तरी चालेल! काही त्रास झाला तर या! मला ही तुमच्या फंक्शनला यायचेच आहे तर भेटू फंक्शनमध्ये!” ते म्हणाले.

ते दोघे ही डॉक्टरांचा निरोप घेऊन फंक्शनच्या व्हेन्यूवर पोहोचले. एका प्रशस्त हॉलमध्ये फंक्शन आयोजित केले होते. हॉलच्या बाहेर सिक्युरिटी टाईट होती. बऱ्याच पोलिसांचा ताफा तिथे होता. प्रवेश व्दारातच पोलीस सगळ्यांना चेक करत होते आमंत्रण पत्रिका असल्या शिवाय कोणाला ही आत सोडले जात नव्हते. हॉल छान सजवण्यात आला होता. समोर व्यसपीठ होते. त्या दिवशी रिसॉर्टमध्ये असणारे बरेच लोक तिथे दिसत होते. संग्रामाच्या घरातील आणि गार्गीच्या घरातील ही सगळे जण तिथे त्यांच्या आधी आले होते. सुशांत आणि समिधा ही आले होते.मीडिया देखील समारंभासाठी हजर होती. अजून गृह मंत्री यायचे होते त्यामुळे समारंभ सुरू व्हायला अजून वेळ होता. संग्रामला पाहून मीडियावाले त्याच्या भोवती जमा झाले. संग्रामचे लक्ष मात्र सुशांतकडे होते. दोघांची नजरा नजर झाली आणि संग्रामने त्याला स्माईल दिली तर सुशांत त्याच्याकडे दुर्लक्ष करून कोणाला तरी बोलायला वळला!

संग्रामला कळून चुकलं होत की सुशांतला या वेळी समजावणे आणि त्याला मनवणे खूप जड जाणार आहे. पण तो आत्ता त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हता कारण मीडियाने त्याला घेरले होते.
©स्वामिनी चौगुले









🎭 Series Post

View all