माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग १६

This is a love Story


भाग १६
गार्गी, तो बसला होता त्याच्या समोर खुर्चीवर जाऊन बसली. संग्राम खाली मान घालून मोबाईलमध्ये काही तरी करत होता. गार्गी त्याला निहाळत होती आणि मनात विचार करत होती.

“अजून छान दिसायला लागला आहे की!मस्त बॉडी बिडी बनवली आहे. आता पहिल्या सारखा गबाळ्या सारखा राहत नाही... स्टाईलिस्ट राहायला लागला की हा... काल याला पाहिलेच नाही मी!” ती त्याला पाहत विचार करत होती.

तेव्हढ्यात संग्राम तिला वर पाहत म्हणाला;

संग्राम, “sorry गार्गी ते थोडं कामाच बोलत होतो whs up वर! (तो हसून म्हणाला)
(आणि वेटरला हाक मारली)वेटर ss दोन कॅफीचिनो!” तो म्हणाला.

गार्गी मात्र भानावर आली आणि तिने नजर दुसरीकडे वळवली. दोघे ही बराच वेळ गप्प होते कुठून सुरवात करावी हेच दोघांना ही कळत नव्हते. वेटरने कॅफीचिनोची ऑर्डर आणून दिली. दोघांनी ही कॉफी घेतली आणि शेवटी संग्रामनेच बोलायला सुरुवात केली.

संग्राम,“by the way sorry कालसाठी! मी असं निघून जायला नको होतं!” तो म्हणाला.

गार्गी,“I am also sorry! मी काल जरा ओव्हर react झाले! आणि sorry once again!” ती म्हणाली.

संग्राम,“for what?” त्याने आश्चर्याने विचारले.

गार्गी,“मी दहा वर्षा पूर्वी तुझी बाजू न घेऊन जी चूक केली त्या बद्दल!” ती म्हणाली.

संग्राम, “सोड ना ते... आता दहा वर्षे झाली त्याला आणि तेंव्हा आपण बालिश होतो आता मॅच्युअर झालो आहोत!”

गार्गी,“खरं आहे आपण मॅच्युअर झालो आता!” ती म्हणाली.

संग्राम, “मला वाटलं नव्हतं तू अशी अरेंज मॅरेजला तयार होशील आणि असं पाहण्याच्या वगैरे कार्यक्रमाला तयार होशील! मला वाटले होते तू लव्ह मॅरेज करणार!” तो म्हणाला आणि ती खिन्नपणे हसली आणि बोलू लागली.

गार्गी,“लव काय किंवा अरेंज काय मला मॅरेजच करायचं नव्हतं!”

संग्राम, “म्हणजे? मी समजलो नाही?” त्याने काही न कळल्यामुळे विचारले.

गार्गी, “म्हणजे माझा ना प्रेमावर विश्वास आहे ना लग्नावर! वासनेला प्रेमाचा गोंडस मुलामा चढवायचा आणि त्या मुलाम्या आड स्वतःची वासना भागवून घ्यायची! आणि लग्न म्हणजे तरी काय रे दोन व्यक्तींना एकमेकांची वासना शमवता यावी म्हणून मारलेली गाठ! शेवटी माणूस ही प्राणीच आहे. फरक फक्त एकच प्राणी त्यांची वासना कोणत्या ही बंधना शिवाय भागवतात पण माणूस लग्नाच्या बंधनात स्वतःला बांधून घेतो! इथे ही फक्त नर आणि मादीच असतात की! फक्त ते लग्न या गोंडस नावा खाली एकमेकांबरोबर कामक्रीडा करतात!” ती कडवटपणे बोलत होती

आणि संग्राम तिच्याकडे आवक होऊन पाहत होता. त्याला प्रश्न पडला की ही तीच मुलगी आहे का? जी एका मुलाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिला कोणावरच विश्वास नव्हता. तो इतका शांत बसलेला पाहून गार्गी त्याच्या समोर चुटकी वाजवली आणि त्याची विचारांची शृंखला खंडित झाली.

गार्गी,“संग्राम कुठे हरवलास?” तिने विचारले.

संग्राम, “आss कुठे नाही ग! एक विचारू?” तो म्हणाला.

गार्गी,“हेच की मला लग्न, प्रेम यावर विश्वास नाही तर मी लग्न का करत आहे बरोबर ना!” ती म्हणाली.

संग्राम, “नाही! मला हे विचारायचे आहे की तुझ्या आयुष्यात असे काय घडले की प्रेमावर इतका अतूट विश्वास असणारी तुझ्यासारखी मुलगी असा विचार करू लागली!” तो तिला रोखून पाहत म्हणाला.

गार्गी,“तीच आयुष्यात मी सगळ्यात मोठी चूक केली. मनापासून प्रेम केलं. पण, माझ्यासाठी ते प्रेम असलं तरी त्याला मात्र माझ्या शरीरात इंटरेस्ट होता फक्त! माझ्यात नाही. मला अशी ठेच लागली की मला सावरायला एक वर्ष लागलं आणि माझ्या आयुष्यातील दोन वर्षे वाया गेली! पण एका अर्थी बरंच झालं त्या नंतर मी शहाणी झाले आणि नर आणि मादी या दोनच जाती असतात हे कळले बाकी प्रेम, लग्न सगळं झूट!” ती पुन्हा कडवटपणे बोलत होती.

संग्राम, “ठीक आहे मग पुढचा काय विचार आहे? म्हणजे असं आहे तर तू लग्न का करत आहेस?” त्याने विचारले.

गार्गी,“अरे तुला मला काहीच विचारायचं नाही का म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडले आणि मी त्याच्या बरोबर झोप…..!” ती पुढे बोलणार तर संग्राम तिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाला.

संग्राम, “मला ना काही विचारायचे आहे ना जाणून घ्यायचे आहे. तो तुझा भूतकाळ होता आणि त्याच्याशी ना माझा संबंध आहे ना मला घेणेदेणे! आपण भविष्या बद्दल बोलूयात का?” तो तिला रोखून पाहत ठामपणे म्हणाला.

गार्गी, “ok! तर मी लग्न का करत आहे? मी लग्न माझ्या पप्पांमुळे करत आहे कारण त्यांना ब्लड कँसर झाला आहे आणि तो लास्ट स्टेजवर आहे ते जास्तीत जास्त सहा महिने जगतील आणि त्यांची शेवटची इच्छा आहे माझे लग्न पाहण्याची! मी मुलगी म्हणून एवढं तर करूच शकते!” इतका वेळ कडवटपणे बोलणाऱ्या गार्गी चा आवाज कातर झाला होता. तिच्या आवाजातील बदल ओळखून संग्रामने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.

संग्राम, “oh.. I am so sorry! ठीक आहे तुझी हरकत नसेल तर मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला!” तो गंभीर होत म्हणाला.

गार्गी,“थांब.... थांब... मला ही लग्न करायचे आहे पण माझ्या काही अटी आहेत त्या ऐक आणि मग निर्णय घे घाई नको!” ती त्याला म्हणाली.

संग्राम, “मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत!” तो पुन्हा ठामपणे म्हणाला.

गार्गी,“पहिल्यांदा अटी ऐक माझ्या मग ठरव!” ती म्हणाली.

संग्राम, “तुला मला अटी सांगून समाधान मिळणार असेल तर सांग पण माझा निर्णय बदलणार नाही!” तो पुन्हा ठामपणे म्हणाला.

गार्गी,“अटी ऐक... मी तुझ्याशी लग्न करेन पण बायकोचं कोणतंच कर्तव्य पार नाही पाडणार! म्हणजे ना आपल्यात फिजिकल रिलेशन असेल ना मेंटल! बायको असल्याचं कोणतं म्हणजे कोणतं कर्तव्य नाही... ना म्हणजे तुझ्यासाठी जेवण बनवणे ना तुझी कोणती कामे करणे! हा जगा समोर आणि घरच्यांसमोर फक्त नवरा-बायको असणार आपण! आपण एकत्र असू पण वेगळे असू! आता तुझा निर्णय विचार करून सांग! काही घाई नाही!” ती निश्चयाने बोलत होती.

संग्राम “माझा निर्णय झाला आहे! उद्या आई-बाबा तुमच्या घरी पुढची बोलणी करायला येतील.” तो शांतपणे म्हणाला आणि निघून गेला.

गार्गी मात्र तिथेच त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत बसून राहिली. थोड्या वेळाने ती उठली आणि तिने टॅक्सी बोलावली आणि ती टॅक्सी ने घरी गेली.
★★★

इकडे संग्राम फ्लॅटवर गेला तर सुशांत दात विचकत तिथे हजर होता. निनाताई संध्याकाळी कधी स्वयंपाक करायला येतात हे त्याला माहीत होतं आणि म्हणूनच तो बरोबर त्या वेळेत हजर झाला होता. म्हणजे फ्लॅटला त्यावेळी कुलप नसणार हे तो जाणून होता. निनाताई स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. संग्राम मात्र समोर सुशांतला पाहून थोडा इरिटेड झाला. तो नाही नाही ते प्रश्न विचारून त्याला आता भंडावून सोडणार हे त्याला माहित होतं. तो त्याला पाहत म्हणाला.

संग्राम,“तुला काही काम धंदा नाही का रे? ती समिधा तुला सोडतेच कशी? थांब तिला सांगतो तुला जरा बांधून ठेव म्हणून जेंव्हा पाहावं तेव्हा तोंड विचकून येतो माझ्या घरी!” तो हॉलमध्ये सोफ्यावर बसत म्हणाला.

सुशांत, “झालं बोलून! तुला काय वाटतं रे संग्ऱ्या तू असं मला बोललास की मी हाय माझा अपमान झाला म्हणून निघून जाईल! मी ना निर्लज्ज टाईपचा प्राणी आहे!आणि समिधाची धमकी मला नाही द्यायची तिला मी लग्न करतानाच सांगितलं होतं तुला एक सवत्या आहे आणि तो माझ्या आयुष्यात तुझ्या आधी पासून आहे तू त्याच्या आणि माझ्या मध्ये कधीच येणार नसशील तर माझ्याशी लग्न कर नाही तर नको!” तो नाटकीपणे म्हणाला.

संग्राम, “म्हणजे तू माझा पिच्छा सोडणारच नाहीस तर!” तो डोक्याला हात लावून म्हणाला.

सुशांत, “कधीच नाही!” तो डोळे मिचकावत म्हणाला आणि दोघे ही हसले.

संग्राम, “बरं चल जेवण करू आधी!” तो म्हणाला.

सुशांत, “नाही रे समिधा ओरडेल मला.. मी लगेच जाणार आहे! बरं काय झालं सांग तुझं आणि गार्गीमध्ये बोलणं?” त्याने विचारले.

संग्राम, “काही विशेष नाही पण लग्न करण्यासाठी तिच्या अटी आहेत काही!” तो म्हणाला.

सुशांत, “अटी? कसल्या अटी?” त्याने आश्चर्याने विचारले.

संग्राम, “ती बायको असण्याचे कोणते ही कर्तव्य निभावणार नाही! तिच्या आयुष्यात असं काही घडले आहे की तिचा प्रेम, लग्न या सगळ्या वरचा विश्वास उडाला आहे! ती हे लग्न तिच्या वडिलांच्या इच्छे खातर करत आहे त्यांना ब्लड कॅन्सर आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे गार्गीचे लग्न पाहणे!” तो शांतपणे म्हणाला.

सुशांत, “काय? म्हणजेच तिच्यात आणि त्या राजवीरमध्ये काही तरी गंभीर घडले होते! तू विचारलेस का तिला?” त्याने विचारले.

संग्राम, “नाही विचारले... म्हणजे ती सांगायला तयार होती पण, मला ऐकायचे नव्हते कारण तो तिचा पास्ट आहे सुश्या आणि मला तिच्या बरोबर फ्युचर जगायचे आहे!” तो म्हणाला.

सुशांत, “ते सगळं ठीक पण या असल्या अटी? तू काय निर्णय घेतलास?” त्याने गंभीर होत विचारले.

संग्राम, “मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे!” तो सहज म्हणाला.

सुशांत, “संग्राम तू पुन्हा एकदा विचार कर... तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला माहित आहे गार्गी तुझं पहिलं प्रेम आहे. पण, तिच्या अटी जर अशा असतील तर तिच्याशी लग्न करून काय फायदा!” तो त्याला समजावत म्हणाला.

संग्राम, “अरे फायदा नुकसान पाहायला हा काय व्यापार आहे का? मी तिच्याशी लग्न करतोय कारण माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून आणि तिच्या विचारां सहित ती जशी आहे तशी मी तिला स्वीकारले आहे. हा तिचे विचार चुकीचे आहेत पण, त्याला जबाबदार ती नाही तिचे कटू अनुभव आहेत. मी माझ्या प्रेमाने तिचे विचार तिला बदलायला भाग पाडेन! मी तिला पटवून देईन की प्रेम आणि लग्न हे वासनेसाठी किंवा शरीरसुखासाठी केलं जात नाही तर शरीरा पलीकडे ही निर्भेळ निर्व्याज प्रेम असते! नर आणि मादी संबंध म्हणजे अंतिम सत्य नाही तर मनाशी-मनाने केलेले लग्न आणि मनोमिलन म्हणजे प्रेम असते!” तो गंभीर पण तितक्याच ठामपणे बोलत होता. त्याचं हे बोलणं ऐकून सुशांत त्याला आवक होऊन पाहत होता.

सुशांत, “धन्य आहेस बाबा तू आणि तुझं प्रेम ही! गार्गी खूप नशीबवान आहे रे!” तो म्हणाला आणि त्याने त्याला मिठी मारली.

संग्राम, “ओय असं काही नाही मी पण लकी आहे की मला असला येडा मित्र मिळाला आहे!” तो हसून म्हणाला.

सुशांत, “मी येडा का? बरं मी निघतो आता!नाही तर ती समी मला घरात घेणार नाही बाबा!” तो नाटकीपणे म्हणाला.

संग्राम, “आत्ता तर म्हणत होता मी भीत नाही तिला!” तो त्याची खेचत म्हणाला

सुशांत, “तुझं लग्न होउदे मग कळेल तुला! मी निघतो रे!” तो म्हणाला आणि निघून गेला.

संग्रामने जेवण करून संजयरावांना फोन केला.

संग्राम, “बाबा मी लग्न करायला तयार आहे गार्गीशी. आज मी तिच्याशी बोलून घेतले आहे!मला वाटतं तिला ही काही हरकत नसावी तुम्ही गार्गीच्या घरच्यांशी पुढची बोलणी करून घ्या!” तो म्हणाला.

संजयराव, “अरे वा! मी उद्याच फोन करतो त्यांना बेटा!” ते खुश होत म्हणाले.

संग्राम आणि गार्गी हे दोन धृव एकमेकांशी लग्न करणार होते. पण, या दोघांचा प्रवास कसा होणार होता? हा मात्र प्रश्नच होता.

गार्गीच्या आयुष्यात असं काय घडले होते की तिच्या मनात प्रेम आणि लग्न या बद्दल इतके कटू विचार निर्माण झाले होते?

कथेचे सगळे अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.
सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा.
©स्वामिनी चौगुले
क्रमशः

🎭 Series Post

View all