माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ९०(बोनस पार्ट)

This Is A Love Story


गार्गीने टॅक्सी घेतली आणि ती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. तिने रात्रीच तिच्या पर्समध्ये तिचे पासपोर्ट, त्याला प्रपोज करण्यासाठी घेतलेले ब्रेसलेट आणि त्या दिवशीचा तिचा आणि राजवीरचा व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह ठेवले होते. तिला बाहेरच एअर पोर्टच्या सिक्युरिटीने आडवले.तिने तिचा पासपोर्ट दाखवून तिला आत नातेवाईकाला अर्जंट भेटायचे आहे असे सांगून विनंती केली आणि तिला सिक्युरिटीने आत सोडले.ती सरळ तिथल्या वेटिंग एरियामध्ये पोहोचली. तिथे एका कोपऱ्यात खुर्चीवर बसलेला संग्राम तिला दिसला. ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि बोलू लागली.

गार्गी,“ संग्राम माझ्या बरोबर चल आत्ताच्या आत्ता!” ती अधिकारवाणीने बोलत होती. तिला पाहून संग्राम चिडला.

संग्राम,“ मला तुझ्या बरोबर कुठे ही यायचे नाही! माझी थोड्यावेळात फ्लाईट आहे!”तो रागाने म्हणाला.

गार्गी,“ गपचूप माझ्या बरोबर चलायचं नाही तर….” ती त्याला दम देत म्हणाली.

संग्राम,“नाही तर काय करणार आहेस तू?” त्याने रागानेच विचारले.

गार्गी,“ ठीक आहे तू असा येणार नसशील तर मला तमाशा करावा लागेल! मी पोलिसांना बोलवून घेते आणि सांगते की तू विमान प्रवास करायला मेडिकली अनफिट आहेस! इथे डॉक्टर देखील असतातच ते तपासतील तुला आणि मेडिकली ते सिद्ध होईल!तू असं ही नॅशनल हिरो बनला आहेस! रोज तुझ्याबद्दल काही ना काही छापून येतच असत आणि मिडियावाले इथं ही असतीलच उद्याची हेडलाईन आणि आजची ब्रेकिंग न्यूज असेल दि नॅशनल हिरो संग्राम सरनाईकने मेडिकली फिट नसताना देखील का केला विमानाने प्रवास करण्याचा प्रयत्न?” ती त्याला धमकावत बोलत होती.

संग्राम,“ काय हवं ग तुला माझ्याकडून? तुला जे हवं होतं ते दिलं तर तू ते ही माघारी दिलंस; का छळत आहेस मला?” त्याने रागाने तिला विचारले.

गार्गी,“चल सांगते ना मला काय हवं ते आणि उगीच चिडचिड नको करुस!कळलं तुला!” ती म्हणाली


आणि त्याची बॅग एका हातात आणि दुसऱ्या हातात त्याचा हात घेऊन ती विमान तळातून निघाली संग्राम अनिच्छेने तिच्या मागे जात होता. ती त्याला घेऊन तिने थांबवून ठेवलेल्या टॅक्सित बसली. तिने पत्ता सांगितला. संग्राम तिच्याकडे खाऊ की गिळू या अविर्भवात पाहत होता.गार्गी त्याला त्यांच्याच फ्लॅटवर घेऊन आली. तिच्या जवळ फ्लॅटची चावी होतीच तिने लॉक खोलले आणि संग्रामला घेऊन आत गेली. तिने कोणाला तरी फोन केला आणि ती संग्रामला फ्लॅटवर घेऊन आली आहे काळजी करू नका असे सांगितले. इकडे संग्राम मात्र रागाने धुमसत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता.

संग्राम,“ काय आहे हे सगळं? तू का मला छळत आहेस?काय हवं ग माझ्याकडून तुला?” तो तावातावाने बोलत होता.

गार्गी,“ बस इथे तुला पाणी देऊ का?” तिने त्याला सोफ्यावर बसवत काळजीने विचारले.

संग्राम,“ नको मला काही! तू मला इथे का घेऊन आली असेल ते सांग आधी?” त्याने रागाने विचारले.

गार्गी,“ सांगते. मला तुला काही तरी दाखवायचे आहे ते प्लिज पहा! मला जे तुला सांगायचे आहे ते ऐक मग तुला तू म्हणशील तिथे मी सोडून येईन!” ती म्हणाली आणि तिने पेन ड्राइव्ह टी. व्हीला कनेक्ट करून टी.व्ही. सुरू केला.

टी.व्ही. वर त्या अवॉर्ड फंक्शन दिवशी गार्गी राजवीर बरोबर स्टेजवर दिसत होती आणि बोलत होती ते दृश्य दिसत होते. गार्गी स्टेजवर गेली आणि संग्राम तिथून निघून गेला होता. गार्गी राजवीरचा पाणउतारा करत होती आणि त्याने काय कट कारस्थान केले हे सांगत होती अगदी प्रूफ सहित! ते सगळं संग्राम आश्चर्याने पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव गार्गी टिपत होती. व्हिडीओ संपला आणि गार्गी बोलू लागली.

गार्गी,“ तुला जस वाटतंय ना संग्राम तसं काही नाही! माझं राजवीर प्रेम वगैरे काही नाही कळलं तुला!मी जे केलं ना ते राजवीरला धडा शिकवण्यासाठी केलं. तो जो तुला त्रास देत होता तो रोखण्यासाठी केलं. सगळ्यांच्या समोर त्याच पितळ उघडे पाडण्यासाठी केलं!मी तुला सांगितलं नाही हे सगळं कारण तू मला काही करू दिलं नसतेस! मी तुला अंधारात ठेवल हेच माझं चुकलं! आणि म्हणूनच तो राजवीर तुला त्रास देऊ शकला I am really very sorry!माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला! पण राजवीरने तुला जेंव्हा माझ्याबद्दल असं काही सांगितले तेंव्हा तू का नाही मला दोन थोबाडीत मारून जाब विचारलास? तुला अधिकार होता तो! का निमूटपणे सहन केलंस त्याच टॉर्चर? बोल ना!” ती रडत त्याच्या जवळ बसून त्याला विचारत होती पण संग्राम मात्र जागीच थिजला होता तो काहीच बोलत नव्हता. तो काहीच रियाक्ट होत नाही ते पाहून तिने त्याचा हात धरला आणि त्याला पुन्हा काळजीने बोलू लागली.

गार्गी,“ काही तरी बोल ना संग्राम! तू ठीक आहेस ना? तुला काही होतय का? बोल ना रे! आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात का? काही तरी बोल ना संग्राम मला भीती वाटते आहे!मी डॉक्टरांना फोन करते!” ती रडत काळजीने म्हणाली आणि पर्स मधील मोबाईल काढण्यासाठी उठणार तर संग्रामने तिचा हात धरला आणि तो बोलू लागला.

संग्राम,“ हे सगळं? आणि मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं! कानांनी ऐकलं आणि राजवीरने मला जे दखवलं! सांगितले ते सगळं काय होत?” तो तिच्याकडे न पाहताच विचारत होता.गार्गीने त्याच्या चेहरा ओंजळीत घेतला आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत रडत म्हणाली.

गार्गी,“ ते सगळं खोटं होतं संग्राम! कायमच आपण जे पाहतो! ऐकतो तेच खरं असते असे नाही ना! खरं हे आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!I love you!” ती बोलत होती.

संग्राम,“ अच्छा? मग तू हे मला इतके दिवस का सांगितले नाहीस ग?” त्याने तिचे दोन्ही हात बाजूला करत रागाने विचारले.

गार्गी,“ सांगण्याचा खूप प्रयत्न केला मी पण सतत काही ना काही होत राहील संग्राम! तुला आठवतं तू सुशांतच्या भावाचा अपघात झाला म्हणून त्याच्या जागी नागपूरला गेलास!त्याच रविवारी मी तुला प्रपोज करणार होते.हॉटेलमध्ये बुकिंग केली होती आणि ऑफिस मधून मी उशीरा आले म्हणून तुझ्यात आणि माझ्यात भांडण झाले ना त्या दिवशी मी तुला प्रपोज करायला ब्रेसलेट घेऊन आले होते! त्या नंतर बाबांना हार्ट अटॅक आला आणि तो विषय मागे पडला! पण तू ज्या दिवशी बेंगलोरला गेलास ना मला न सांगता! त्या दिवशीच मी तुला प्रपोज करणार होते. तू आठ दिवसा नंतर आलास आणि मी आजारी पडले!आणि सुशांतचा फोन आला अवॉर्ड फंक्शन संदर्भात मग मी ठरवलं की माथेरानला गेल्यावर तुला प्रपोज करायचं आणि राजवीरला ही धडा शिकवायचा म्हणूनच मी माथेरानला जाण्याचा हट्ट धरला पण तिथे ही माझे दुर्दैव आडवे आले आणि तू मला राजवीर बरोबर स्टेजवर पाहून निघून गेलास त्या नंतर अतंकवाद्यांनी हल्ला केला आणि तुला गोळी लागली!” ती म्हणाली आणि पर्स मधून ब्रेसलेट काढून त्याच्या हातात घातले आणि त्याच्या समोर गुडघ्यावर बसून ती म्हणाली.

“ I love you Mr. Sangram saranaik! I love you a lot!”

संग्राम तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. त्याच्या डोळ्यात अजून देखील गार्गी बद्दल अविश्वास दिसत होता.

संग्राम,“ पण राजवीर तुझे पहिले प्रेम आहे. तो मला म्हणाला की मी तुझ्यासाठी स्टेफनी होतो तुला माझी भावनिक गरज होती म्हणून तू मला वापरले….. तुझे पहिले प्रेम तर राजवीर…” तो पुढे बोलणार तर गार्गीने त्याचे बोलणे मध्येच तोडले आणि ती रागाने बोलू लागली.

गार्गी,“खबरदार पुन्हा त्या नीच माणसाचे नाव तुझ्या तोंडातून काढशील तर!संग्राम अरे तू वेडा आहेस का? तू एखादी वस्तू आहेस का की मी तुझा स्टेफनी म्हणून वापर करायला किंवा मी तुला गरजे नुसार वापरायला! तू जिवंत माणूस आहेस! जो खूप चांगला आहे! जो निरपेक्ष प्रेम करतो! जो दुसऱ्याला समजून घेतो या सगळ्या गुणांमुळे मी तुझ्या प्रेमात पडले रे! काय करू मी असं की मी तुझा गमावलेला विश्वास परत मिळवू शकेन तूच सांग मला!” त्याचे बोलणे ऐकून तिचा धीर आता खचला होता आणि ती जमिनीवर बसून रडत होती.

संग्राम,“पण आपल्यामध्ये नवरा-बायको सारखे त्या अर्थाने कोणतेच संबंध नाहीत इतकी खाजगी गोष्ट त्याला तू का सांगीतलीस मग?” त्याने विचारले.

गार्गी,“ मी त्याला असं काही सांगितले नाही! हा आमच्या ऑफिसमध्ये तन्वी नावाची एक ट्रेनी मुलगी होती त्याने तिला नोकरीचे आमिष दाखवून माझ्या मागावर सोडले होते. कदाचित माझे आणि श्रद्धाताईचे बोलणे ऐकून तिने राजवीरला हे सांगितले असेल! एक दिवस अशीच खबर देताना मी आणि श्रद्धाताईने तिला पकडले. तिचा मोबाईल माझ्याकडे आहे. त्यात तिचे आणि त्या नीच राजवीरचे बोलणे रेकॉर्ड आहे. मोबाईल माझ्या रूममध्ये आहे मी तुला हवा असल्यास तो देते ऐक सगळं आणि कोण म्हणतं रे की तुझ्यात आणि माझ्यात नवरा-बायकोचे तसे संबंध नाहीत ते कधीच निर्माण झाले आहे!” ती म्हणाली.

संग्राम,“ काय तुझ्यात आणि माझ्यात तसे संबंध? काय बोलते आहेस तुझं तुला तरी कळतंय का गार्गी?” तो रागाने म्हणाला.

गार्गी,“ हो कळतय मला मी काय बोलते आहे ते! माझं दुर्दैव की तुला काही आठवत नाही! हरकत नाही मी सांगते!तुला आठवतंय का तू निमिशच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होतास आणि तुझ्या बिअरमध्ये कोणी तरी व्हिस्की मिसळली. तू त्या रात्री पूर्ण नशेत होतास तुला घरी सुद्धा सुशांतने सोडले त्या रात्री! तू आलास आणि नशेच्या अंमला खाली सगळं बरळून मोकळा झालास! तुझं माझ्यावर कॉलेज पासून प्रेम आहे इथं पासून ते लग्न का केलंस इथं पर्यंत! माझं ही तुझ्यावर प्रेम आहेच की तू मला मिठी मारलीस आणि मी विरघळले तुझ्या मिठीत त्याच रात्री स्वाधीन झाले तुझ्या आणि प्रेमाची पुढची पायरी समर्पण केंव्हाच चढले मी!”

संग्राम,“ दूसऱ्या दिवशी मी नागपूरला जायच्या आधी तुला हेच सांगायचं होत मला! तरी मला फिल होत होतं काही तरी झालं आहे ते पण आठवत नव्हतं! मग मी आल्यावर का नाही सांगितलंस मला?” त्याने विचारले.

गार्गी,“ कधी सांगणार होते मी सांग ना आणि ही गोष्ट मला तुला घाईत सांगायची नव्हती कारण तुझा सेन्सिटिव्ह स्वभाव तू या सगळ्याचा अर्थ वेगळा काढून गिल्ट मनात घेऊन बसशील याची भीती वाटत होती मला!

संग्राम,“पण राजवीर म्हणाला की तो तुझं पहिल प्रेम…” तो पुढे बोलणार तर गार्गी आता भडकली तिने संग्रामची कॉलर धरली आणि खाली येत त्याच्या छातीवर डोकं ठेवून रागानेच बोलू लागली.

गार्गी,“ नाव घेऊ नकोस त्या नालायक माणसाचे! तो माझे प्रेम वगैरे कधी नव्हता आणि नाही तो माझ्या अडणीड्या वयात माझ्याकडून झालेली चूक आहे कळलं तुला! माझं पहिल आणि शेवटच प्रेम फक्त आणि फक्त तू आहेस! त्याच्यात आणि माझ्यात प्रेम कधी नव्हतेच माझं त्या वयातले आकर्षण आणि त्याची वासना होती ती. मी तुला एक सत्य सांगते जे श्रद्धाताई सोडली तर अगदी माझ्या मम्मा-पप्पाला देखील मी कधीच सांगितले नाही! जंगलात झालेल्या त्या प्रकारामुळे तू कॉलेज सोडून गेलास मी तुझी माफी मागायला आले होते हे राजवीरला कळले आणि त्याने मला रात्री त्याच्या रूमवर बोलवले! मी ही मूर्ख बॉईज होस्टेलवर रात्री गेले. गेले तर तो एकटाच त्याच्या रूममध्ये होता त्याने तिथे माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी कशी बशी स्वतःला वाचवून तिथून आले पण त्या नंतर डिप्रेशनमध्ये गेले या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आणि सावरण्यासाठी मला दोन वर्षे लागली!” ती रडत त्याच्या छातीवर डोके ठेवून बोलत होती. संग्रामने स्वतःला तिच्या पासून सोडवून घेतले आणि उठून उभा राहत तो म्हणाला.

संग्राम,“ मग तू ही गोष्ट कोणाला सांगितली का नाहीस? त्याच्या विरुद्ध तक्रार का केली नाहीस?” त्याने विचारले.

गार्गी,“ काय म्हणून तक्रार करणार होते मी? तो माझ्याकडे आला नव्हता संग्राम; मी त्याच्याकडे गेले होते त्याच्या रूममध्ये! मला मम्मा-पप्पानी इतक्या विश्वासाने शिकायला पाठवले होते.हे सगळं करून त्यांचा विश्वास मला गमावयचा नव्हता आणि स्वतःच्या इज्जतीचा पंचनामा देखील करून घ्यायचा नव्हता! म्हणून मी शांत राहिले पण या सगळ्याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला. माझा प्रेम,लग्न यावरचा विश्वास उडाला! मग तू माझ्या आयुष्यात आलास तू माझ्याशी माझ्या अटी स्वीकारून लग्न केलंस! तुझ्याकडून खऱ्या प्रेमाचा अर्थ मला कळला!तूच मला पुन्हा प्रेम करायला शिकवलेस! पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला शिवलेस!मी तुझ्या प्रेमात पडले! पण तो नीच माणूस पुन्हा आला तुला बिझनेसमध्ये हरवता नाही आले म्हणून माझा वापर करून त्याला तुला प्रेमात हरवायचे होते! तो मला फोन करू लागला मग मी पण त्याला धडा शिकवण्याचा चंग बांधला पण इथे ही त्याला नीट वागता नाही आले त्याने मला डबल क्रॉस करून तुला त्रास दिला!माझं चुकलं संग्राम मी तुला असं अंधारात ठेवायला नको होते! I am sorry! But I love you! I can\"t live without you!” ती बोलत होती.

संग्राम,“ एक मिनिटं म्हणजे राजवीरने तुझ्यावर आधी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता तरी ही तू रिस्क घेऊन त्याच्याशी भेटत राहिलीस त्याला धडा शिकवण्यासाठी बरोबर!” आता त्याच्या आवाजाला धार आली होती त्याने रागानेच तिला विचारले.

गार्गी,“ म्हणजे मी त्याला पब्लिक प्लेसमध्येच भेटत होते!” ती त्याच्या पासून नजर चोरत घाबरून म्हणाली.

संग्राम,“ तुला लाज वाटली नाही का? अग त्याने तुझ्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या वस्तूमध्ये काही मिसळले असते! तुला कुठे नेवून काही केले असते तर?” त्याने रागाने तिचा दंड धरून तिला हलवत विचारले.

गार्गी,“ असं काही घडलं असत तर तुला गार्गी पुन्हा कधीच दिसली नसती!” ती निर्विकारपणे म्हणाली.

हे तिचे बोलणे ऐकून संग्रामला मात्र त्याचा राग अनावर झाला आणि त्याने तिच्या कानाखाली दिली. गार्गी अचानक झालेल्या या कृतीमुळे मटकन खाली बसली थोडावेळ तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकले.ती भानावर आली तर संग्राम तिथे नव्हता!

संग्रामचा गैरसमज दूर झाला असला तरी तो गार्गीला माफ करू शकेल का?संग्राम कुठे गेला असेल?
©स्वामिनी चौगुले




















🎭 Series Post

View all