माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ४०

This Is A Love Story


भाग ४०

पावसाळी दिवस होते आणि वातावरणात बराच गारवा होता. गार्गी बसली तर होती रशमी जवळ जावून पण तिचं लक्ष लागत नव्हतं तिथे कारण आत इतका गारवा जाणवत होता. तर बाहेर किती असेल आणि संग्रामची तब्बेत म्हणावी तशी अजून बरी नव्हती म्हणून गार्गी संग्रामच्या चिंतेने अस्वस्थ होती. पण आता तिला काहीच करता येत नव्हते. रशमी आणि तिथे असलेल्या बाकी मुली एकमेकांना बोलत चेष्टा मस्करी करत होत्या. त्यातच रशमीने गार्गीला हाक मारली आणि गार्गी भानावर आली.

रशमी,“गार्गी वहिनी तुम्ही ही काढून घ्या मेहंदी!”

गार्गी,“नाही ग मी नाही काढणार मेहंदी कारण संग्रामला मेहंदीच्या वासाने त्रास होवू शकतो! आधीच तर आज कुठे त्याचा ठसका कमी झाला आहे. त्यामुळे नकोच!” ती म्हणाली. रशमीची आई तिथे आली आणि गार्गीचे बोलणे ऐकून म्हणाली;

“गार्गी थोडी काढ की मेहंदी! का तुझा दुपारचा राग अजून गेला नाही?” त्या खट्टू होत म्हणाल्या.

गार्गी,“तसं काही नाही काकू पण नको ना प्लिज मला पण खूप आवडते मेहंदी काढायला! पण संग्रामला श्वास घेताना मेहंदीच्या वासाने त्रास झाला तर!” ती काळजीने म्हणाली.

आणि तिथून मीनाताई आणि मनीषाताई जिथे बसल्या होत्या तिथे जावून बसली. रशमीचे मात्र गार्गीच्या बोलण्याने समाधान होत नव्हते. तिला राहून राहून वाटत होते की गार्गीच्या मनात तिच्या आत्या बद्दल राग आहे आणि त्यामुळेच ती असं वागत असावी. तिला वाटत होते की गार्गी फक्त इथे दाखवण्यासाठी थांबली आहे कारण, असं मधेच कार्यक्रम सोडून जाणे बरे दिसले नसते म्हणून तिने संग्रामला समजावून थांबवले आहे. कदाचित गार्गी खूप दुखावली गेली आहे त्यामुळे रशमीला अपराधी आणि वाईट दोन्ही वाटत होते. ती या सगळ्या विचाराने रडकुंडीला आली आणि तिने रौनकला तिथून थोडं लांब जावून फोन केला. रौनकने मोबाईल पाहिला त्यावर रशमीचे नाव फ्लॅश होत होते ते पाहून हसत तो जरा बाजूला गेला आणि फोन रिसिव्ह करून बोलू लागला.

“काय ग करमत नाही का माझ्या शिवाय?” तो हसून म्हणाला.

रशमी,“झालं तुझं बोलून आता ऐक!” ती काहीशी चिडून म्हणाली.

रौनक,“बरं बोल!”

रशमी,“गार्गी वहिनी मेहंदी काढून घ्यायला नाही म्हणत आहेत! मला वाटत की त्यांचा दुपारचा राग अजून केला नाही. तू संग्राम भाईला समजवायला सांग ना त्यांना!” ती रडत म्हणाली.

तो पर्यंत तिथे फोन पाहून बाजूला गेलेला रौशनची फिरकी घ्यायला संग्राम, अमर आणि बाकी त्याचे लहान मोठे भाऊ जमले होते.

रौनक,“तू रडणं बंद कर आधी काय म्हणाल्या गार्गी वहिनी ते तरी सांग?” त्याने तिला विचारले आणि गार्गीचे नाव ऐकून संग्रामचे कान टवकारले.

रशमी,“त्या म्हणतात की भाईची तब्बेत ठीक नाही त्यांनी मेहंदी लावली तर त्यांना त्रास होईल!” ती मुसमुसत म्हणाली.

रौशन,“अगं मग बरोबर आहे त्यांचं तू नको रडूस मी भाई काय म्हणतो ते पाहतो आणि तुला फोन करतो!” तो तिला समजावत म्हणाला.संग्रामने त्याला विचारले.

संग्राम,“काय झालं रौनक रशमी का रडत आहे रे? आणि गार्गीच काय म्हणत होती ती?”

रौनक,“भाई गार्गी वहिनी मेहंदी काढायला नको म्हणत आहेत तुला मेहंदीच्या वासाने त्रास होईल म्हणून!...” तो पुढे बोलणार तर संग्रामने त्याला मध्येच थांबवत विचारले.

संग्राम,“मग यात रशमी का रडत आहे?”

रौनक,“तिला वाटतंय की गार्गी वहिनीच्या मनात दुपारी आत्या त्यांना बोलल्या त्याचा राग आहे म्हणून त्या अशा वागत आहेत.”तो वैतागून म्हणाला.

संग्राम,“this women\"s are so complicated! अरे गार्गी असा कुणा बद्दल मनात राग धरणारी नाही आणि तिच्या मनात तसं काही नाही! तिला खरंच माझी काळजी आहे रे! बरं मला रशमीला फोन लावून दे रौनक! मी बोलतो तिच्याशी! (तो म्हणाला आणि रौनकने त्याला रशमीला फोन लावून दिला.) हॅलो रशमी मी संग्राम बोलतोय! अगं गार्गीच्या मनात राग वगैरे नाही ग! ती मेहंदी काढेल हातावर मग तर खुश ना!” त्याने विचारले.

रशमी,“खरं ना भाई!” तिने विचारले.

संग्राम,“हो! तू रडू नकोस! मेकअप खराब होईल तुझा” तो हसून म्हणाला. हे ऐकून रशमी ही हसली.
★★★

मेहंदीचा कार्यक्रम अजून सुरू होता. पण जेवणाची वेळ झाली होती म्हणून पुरुषांची जेवणाची व्यवस्था डायनिंग हॉलमध्ये केली गेली होती. संग्रामने अमर बरोबर मिळून एक मेंहदीचा कोन घेऊन यायचा प्लॅन केला. अमरने गुपचूप जावून मेहंदी कोन ठेवलेल्या एका थाळीतून एक कोन कोणाच्या ही न कळत उडवला पण तो कोन त्याला संग्रामला देता येईना. कारण संग्राम ही बाहेर थंडी आहे म्हणून डायनिंग हॉलमध्ये येवून बसला होता आणि त्याच्या बरोबर सजंयराव, काका आणि बरीच मोठी मंडळी गप्पा मारत होती. संग्राम आणि अमरची खुणवाखुणवी झाली आणि जेवणाच्या थाळी खालून तो त्याला मेहंदी कोन देत होता आणि तेव्हढ्यात तिथे गार्गी आली. संग्रामने तिला पाहून मेहंदी कोन कुर्त्याच्या खिशात टाकला पण नेमकं गार्गीला अमर संग्रामला जेवणाची थाळी देत आहे असे दिसले आणि ती चिडून त्याला हात धरून एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि ती बोलू लागली.

गार्गी,“डोकं फिरले आहे का संग्राम तुझे? डॉक्टरांनी तुला असले तेलकट मसालेदार जेवण जेवू नको म्हणून सांगितले आहे! आजच तुझा ठसका कमी झाला आहे ना आणि तू इथं?” ती रागाने तणतणत होती.

संग्रामने तिचे बोलणे ऐकले आणि तो तोंड फुगवून तिला काहीच न बोलता रूममध्ये निघून गेला. गार्गी मात्र त्याला पाहतच राहिली ती अजूनच चिडली. तो पर्यंत तिथे अमर आला.

अमर,“काय वहिनी? भाईला उगीचच बोलला तुम्ही ही जेवणाची थाळी माझी आहे! भाई फक्त तिथे उभा होता माझ्याशी बोलत आणि मी जेवत होतो हे पहा!” त्याने थाळी आणि त्याचा खरकटा हात तिला दाखवला.

गार्गी,“अरे देवा! मी उगीचच बोलले त्याला म्हणून हा तोंड फुगवून गेला का?” ती डोक्याला हात लावत म्हणाली आणि अमरने ओठ बाहेर काढून निरागसपणे होकारार्थी मान हलवली.

गार्गी लगेच वर गेली. रूमचे दार नुसते पुढे लोटले होते. ती रूममध्ये गेली तर संग्राम कोणाशी तरी फोनवर बोलत खिडकीत उभा होता. तिने लगेच जेवणाची ऑर्डर इंटर कॉम वरून मागवली. संग्रामने फोनवर आपण नंतर बोलू असे सांगितले. तो पर्यंत ऑर्डर आली देखील! संग्रामने फोन ठेवला आणि गार्गीकडे न पाहताच तो गॅलरीकडे वळला तर गार्गी त्याला थांबवत म्हणाली.

गार्गी,“जेवण कर संग्राम!”

संग्राम,“अगं मी तर जेवून आलो की पोट भर मला हवं ते खालून आत्ताच!” तो तोंड फुगवून म्हणाला.

गार्गी,“sorry ना! मला वाटलं की तू! बरं जेव ना आता” ती तोंड बारीक करत म्हणाली.

संग्राम,“हे बघ तू जा जेवून ये मला भूक नाही!”

गार्गीने त्याला बेडवर बसवले आणि त्याच्या पुढ्यात ताट ठेवले आणि हळूच तिच्या मागे लपवलेली एक वाटी त्याच्या समोर धरत ती म्हणाली.

गार्गी,“ हे बघ तुला आवडतात म्हणून गुलाब जामुनपण मागवले आहेत पण एकच मिळणार तुला!” ती लहान मुला सारख त्याच्याशी बोलत होती.

संग्राम,“अरे वा आता तू मला लाच देणार का ती ही एका गुलाब जामुनची!” तो नाटकीपणे म्हणाला.

गार्गी,“मग काय हवं तुला?” तिने विचारले.

संग्राम,“स्वर्ग सुख मिळणार असेल तर मी विचार करेन!” तो खट्याळ हसून म्हणाला.

गार्गी,“you….. तुला असं नाही वाटत की तू जास्तच शेफरला आहेस!” तिने त्याला डोळे मोठे करून कमरेवर हात ठेवून विचारले.

संग्राम,“नाही वाटत! तू जा बरं!” तो नाटकीपणे म्हणाला.

गार्गी,“नौटंकी कुठला! बरं तू म्हणशील तसं प्रॉमिस! आता तरी जेव!” ती म्हणाली.

संग्राम,“बघ आ नंतर पलटशील!” तो म्हणाला.

गार्गी,“प्रॉमिस म्हणाले ना मी! जेव आता!” ती त्याला भाजी चपातीचा घास भरवत म्हणाली.

संग्राम,“मी जेवतो तू जा खाली आई, मम्मा थांबल्या असतील जेवायच्या तुझ्यासाठी मी त्यांना तसं सांगितले होते. जा त्यांच्या बरोबर जेवून ये लवकर!” तो म्हणाला.

गार्गी निघून गेली आणि संग्रामने जेवतच पुन्हा फोन लावला.

संग्राम,“बोल सुशा! अरे गार्गी आली होती म्हणून ठेवला फोन! काय सांगतोस काय कसं शक्य आहे रे हे! ते तर पुण्यात असतात ना मग मुंबईमध्ये कसा काय बिझनेस करायला आले? आपण इतके दिवस झाले मुंबईच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात त्यांचे नाव तरी ऐकले आहे का?” तो गांभीर्याने बोलत होता.

सुशांत, “अरे ते त्यांची एक ब्रांच मुंबईत काढत आहेत आणि कहर म्हणजे इतकी जुनी कंपनी असून ही हे काँट्रॅक्ट त्यांना नाही तर आपल्या कंपनीला मिळाले आहे. तो आता गप्प नाही बसणार संग्र्या! ही वादळा पूर्वीची शांतता आहे!” तो थोडा घाबरून बोलत होता.

संग्राम,“असू दे की आपल्याला काय त्याचे! आपण आपले काम करायचे कोणाला घाबरण्याचा संबंधच काय? आपल्याला ही बिझनेस करायचा आहे आणि त्यांना ही!” तो ठामपणे बोलत होता.

सुशांत, “हो तू म्हणतो ते बरोबर आहे!” तो म्हणाला आणि गार्गी संग्रामचे फोन वरचे बोलणे ऐकत आत आली.

संग्राम,“बरं मी ठेवतो फोन असं म्हणून त्याने फोन ठेवला.

गार्गी, “कोणाशी बोलत होता संग्राम आणि कोणाला घाबरायचं नाही? काय चालले आहे नेमकं तुझं?” तिने प्रश्नार्थक नजरेने विचारले.

संग्राम,“काही नाही सुशा आणि मी ऑफिसच बोलत होतो! तुना आधी तुझं प्रॉमिस पूर्ण कर!” त्याने तिला उत्तर द्यायचं टाळले

आणि उठून तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेत म्हणाला. गार्गी मात्र त्याच्या अचानक जवळ येण्याने शहारली. तिच्या हार्ट बिट्स वाढल्या होत्या. त्या संग्रामला तो तिच्या अगदी जवळ गेल्यामुळे ऐकू येत होत्या. तो तिला रोखून पाहत होता आणि गार्गीच्या मात्र लाजेने पापण्या झुकल्या होत्या. संग्रामचा श्वास तिला तिच्या श्वासा जवळ जाणवला तिने आता डोळे बंद करून घेतले आणि अचानक तिच्या कपाळावर तिला मृदू स्पर्श जाणवला म्हणून तिने डोळे उघडले तर संग्रामने तिच्या कपाळावर ओठ टेकवले होते आणि तो तिला हसत पाहत होता. गार्गीने त्याला ढकलले आणि तिने लाजून तोंड फिरवले. संग्राम पाठमोऱ्या उभ्या असलेल्या तिला हसून म्हणाला.

संग्राम,“जा चेंज करून ये लवकर! मला तुला काही तरी दाखवायचे आहे!”

गार्गी काहीच न बोलता चेंज करून आली आणि बेडवर त्याच्या समोर बसत म्हणाली.

गार्गी, “दाखव काय आहे!” तसा संग्रामने त्याच्या कुर्त्याच्या खिशातून मेहंदी कोन काढला आणि तिला दाखवत म्हणाला.

संग्राम, “हे बघ! हात पुढे कर तुला मेहंदी काढतो! सगळ्यांनी काढली मेहंदी आणि तूच नाही. बिचाऱ्या रशमीला वाईट वाटत आहे ना!” तो नाटकीपणे तिचा हात हातात घेत एका हाताने कोन धरत म्हणाला.

गार्गी, “नको रे! मी सांगितले आहे रशमीला! तुझा ठसका आत्ता कुठे कमी झाला आहे!याच्या वासाने अजून लागला म्हणजे!” ती काळजीने म्हणाली.

संग्राम, “मला मेहंदीची ऍलर्जी नाही! कळले तुला! मी काढत आहे ना गप्प काढून घ्यायची मेहंदी!” तो लहान मुलासारखा तिला म्हणाला.

गार्गी, “मिस्टर सरनाईक तुम्हाला मेहंदी काढता येते का?” ती हसून त्याला चिडवत म्हणाली.

संग्राम, “हो येते की!”

असं म्हणून त्याने तिच्या तळव्याच्या मधोमध कोनाने एक गोल मोठा ठिपका दिला आणि त्याच्या कडेने गोल छोटे छोटे टिंब दिले. दुसऱ्या हातावर आणि उलट्या हातावर देखील तेच काढले आणि बोटांची एक एक पेर रंगवली.

संग्राम, “बरं तुझा गाऊन वर कर तो बेड वरून खाली बसत म्हणाला.

गार्गी, “काय? काय चालू आहे तुझं? उठ बरं तू!” ती डोळे मोठे करत त्याला म्हणाली.

संग्राम,“याला म्हणतात चोराच्या मनात चांदणे!अगं पायाला पण मेहंदी लावतो तुझ्या! तर तुझ्या मनात तिसरेच!” तो अर्थपूर्ण हसून म्हणाला.

गार्गी, “जास्ती शेफारु नकोस तू महागात पडेल तुला! तू दोन दिवस झाले मला खूप सतावतो आहेस!” ती गाऊन वर करून पाय त्याच्या समोर देत लटक्या रागाने म्हणाली.

संग्राम,“सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते! आणि धमकी कोणाला देतेस ग? पाहिलं तुला मघाशीच भित्री भागू बाई!” तो मेहंदीची बोटे तिच्या पावलांच्या कडेने ओढत नाटकीपणे म्हणाला आणि उठून बेडवर बसला.

गार्गी, “नौटंकी कुठला! सगळे म्हणतात आमचा चिनू खूप शांत आहे खूप मितभाषी आहे वगैरे वगैरे! मला विचारा म्हणावं... थांब तुझी ही नौटंकी सुरू असताना तुला न कळत व्हिडीओ काढते आणि सगळ्यांना whs up करते!” ती त्याला चिडवत म्हणाली.

ती असं म्हणताच तो तिला गुदगुल्या करणार तर ती उठून गॅलरीत पळत गेली. संग्राम तिच्या मागे पळत गेला आणि तिला धरणार तर तिने डोळे झाकून तिचे मेहंदी काढलेले दोन्ही हात त्याच्या समोर केले. त्याने तिचे दोन्ही हात मनगटाला धरून स्वतः समोर आडवे केले आणि त्या ओल्या मेहंदीचा सुगंध त्याच्या श्वासा भरून घेतला पण त्यामुळे त्याला जोराचा ठसका लागला.

गार्गी,“तुला म्हणाले होते ना मी नको मेहंदी म्हणून... बघ लागला ना ठसका!” ती काळजीने पण चिडून त्याला रूममध्ये घेऊन जात म्हणाली.

संग्रामने पाणी पिले. पण बराच वेळ त्याला खोकला येत राहिला. गार्गी मात्र रागाने त्याला पाहत होती.

संग्राम,“मी ठीक आहे! मला ओल्या मेंहदीचा सुगंध खूप आवडतो.”

गार्गी,“हो का? आणि ठसका लागला त्याचं काय? मेडिसीन्स घ्या आणि झोपा आता! मी तुझ्याकडे पाठ करून झोपते नाही तर अजून त्रास व्हायचा तुला!” ती काळजीने म्हणाली. संग्रामने होकारार्थी मान हलवली आणि दोघे ही झोपले.

सुशांत कसल्या वादळा पूर्वीच्या शांतते बद्दल बोलत होता? कोणते असे वादळ आता संग्राम आणि गार्गीच्या आयुष्यात घोंघावत होते?
©swamini chougule

🎭 Series Post

View all