माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग 96 अंतिम

This Is A Love Story


सगळे जेवले आणि सुशांत-समिधा घरी निघाले.तर संजयराव अंगणात येऊन सुशांतला म्हणाले.त्यांच्या मागे गार्गी आणि मनिषाताई होत्या.

संजयराव,“ सुशा तू जा तुझ्या दुचाकीवर समिधा आता तुझ्या दुचाकीवर बसणार नाही! समिधा तुला मोहन सोडेल घरी नाही तर तू राहा इथेच!”

समिधा,“ काका कशाला उगीच त्या मोहनरावांना त्रास इतक्या रात्री मला सोडायचे आणि परत यायचे! आणि मी येईल उद्या लवकर!” ती म्हणाली.

मनिषाताई,“ समे जास्त शहाणपणा नाही करायचा! आता काळजी घ्यायची स्वतःची कळलं का तुला!” त्या मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आणि समिधानी गार्गीकडे पाहिले तर गार्गीने तिला खुणावले आणि तिने मान हलवली.

संजयराव,“ झाली का तुमची खुणवा-खुणवी करून आणि काय रे सुशा इतकी आनंदाची बातमी आमच्या पासून लपवलीस?” ते त्याचा कान धरत म्हणाले.

सुशांत,“ काय करणार काका सिच्युएशनच तशी होती. बरं आता कळले ना या चोंबड्या गार्गीमुळे तर मग आशीर्वाद द्या!” तो त्यांना वाकुन नमस्कार करत म्हणाला.

संजयराव,“ आशीर्वाद तर कायमच आहेत तुमच्या पाठीशी आणि आता तुझ्या संग्र्याच बोलणं खायला तयार हो! मी तर उद्या रीतसर घोषणा करणार बाबा पार्टीत; मी आजोबा होणार याची!” ते त्याला चिडव म्हणाले.

सुशांत,“ ते तर खावच लागणार! याला म्हणतात नेकी कर कुए मे डाल!बरं उशीर होतोय आम्ही निघतो मी जातो टू व्हीलरवर समी तू ये गाडीतून!” तो म्हणाला.


मनीषाताई,“ हो निघा उशीर होईल अजून आणि उद्या टॅक्सीने ये नाही तर गाडी पाठवू का सकाळी?” त्यांनी विचारले.

समिधा,“ नको काकू आम्ही येऊ टॉक्सिने!” असं म्हणून ते गेले आणि संग्राम बाहेर आला.

संग्राम,“ इतकं काय बोलत होता तुम्ही? सुशा गेला का?”

गार्गी,“ हो गेले दोघे!”

असं म्हणून सगळे आत गेले. गौरव आणि मीनाताई तर आधीच निघून गेले होते.बाकी सगळे झोपायला निघून गेले. गार्गी आणि संग्राम ही त्यांच्या रूममध्ये आले. गार्गी नायटी घालून आली आणि संग्रामाच्या जवळ बेडवर बसली. तिने त्याला औषधं दिली. संग्रामला काही तरी आठवले आणि त्याने विचारले.

संग्राम,“ गार्गी अग तू काल ऑफिसमधून तशीच निघून आली होती का? आणि आजच काय केलं की नोकरीवर पाणी सोडले तू?”

गार्गी,“ हो मी काल बॉसला न सांगताच तुझ्याकडे आले होते श्रध्दा ताईला सांगितले होते तिने तुझी तब्बेत बिघली म्हणून मी निघून गेले असं सांगितलं तर बॉसने तिच्याकडे निरोप दिला की कालचा हाफ डे आणि अजून किती दिवस रजा हवी त्याचा मेल पाठव म्हणून मी पाठवला सकाळीच मेल! तशी माझी बॉस चांगली आहे आणि आता तुझ्यामुळे सूट मिळाली मला!” ती हसून म्हणाली.

संग्राम,“ बरं झालं!”

गार्गी,“ हो! पण तू त्या अमेरिकन कंपनीला काळवलेस का तू येणार नाही म्हणून? आणि तू नोकरीचा राजीनामा दिलासा ते चांगलेच केले आता तू नोकरी करायची नाही बिझनेस कर!” ती त्याला समजावत म्हणाली.

संग्राम,“ हो मी कळवले त्यांना आणि दिलगिरी ही व्यक्ती केली. पण या सगळ्यात माझी नोकरी मात्र केली की आणि बिझनेस तर करायचा आहे पण पाहू परत मला कामावर घेतले तर कारण मला अजून तरी नोकरी सोडायची नाही गार्गी!” तो म्हणाला.

गार्गी,“ परत झालं का तुझं पालुपद सुरू? तू आता नोकरी करणार नाही! कळलं तुला आणि मी नोकरी करते ना तर होईल अडजेस्ट सगळं! तुझी मनमानी खूप जास्त झाली आहे!आणि झोप आता उद्या लवकर उठायचे आहे!” ती थोडी रागातच म्हणाली.

संग्राम,“ अरे माझ्यावर हुकूम चालवत आहेस की!आणि झोप काय झोप!” असं म्हणून त्याने तिला जवळ ओढले.

गार्गी,“संग्राम खरंच झोप आता! उद्या मला ही खूप कामं आहेत आणि आज दिवसभर तुझी ही खूप दगदग झाली आहे!” ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली.

संग्राम,“ गार्गी एक विचारू का?” त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारले.

गार्गी,“ नाही विचारायचे!झोप तू!” ती लटक्या रागाने म्हणाली.

संग्राम,“ आता तर विचारणारच!(तो तिला चिडवत म्हणाला) थोडावेळ शांततेत गेला आणि संग्राम म्हणाला
गार्गी तू त्या बिचाऱ्या राजवीरला दुपारी हकलवून का दिलेस?

गार्गी,“ म्हणजे तुझं लक्ष होत तर! तो काही बिचारा नाही कळलं तुला आणि मला तुझ्यावर त्याची सावली सुद्धा पडू द्यायची नाही!” ती म्हणाली.

संग्राम,“ गार्गी एखाद्याचा इतका टोकाचा तिरस्कार करण्याची खरंच गरज आहे का?” त्याने तिला विचारले.

गार्गी,“काही लोकं असतातच तिरस्कार करण्या सारखी! तू एखाद्या व्यक्तीला लगेच माफ करू शकतोस पण माझं तसं नाही मी नाही करू शकत कोणाला लगेच माफ!” ती म्हणाली.

संग्राम,“अच्छा! समज भविष्यात माझ्याकडून एखादी चूक झाली तर तू मला देखील माफ करणार नाहीस का?” त्याने सहज विचारले.

गार्गी,“संग्राम तुझी आणि त्याची तुलना होऊ शकते का? आणि मुळात तुझ्याकडून चूक होणारच नाही! आणि झालीच चूक तर तेंव्हाच तेंव्हा पाहू!” असं म्हणून ती त्याला अजूनच बिलगली आणि झोपून गेली.
★★★

दुसऱ्या दिवशी सगळ्यांची सकाळ पहाटेच झाली. सकाळी संग्राम आणि गार्गी पूजेला बसले. सांगली वरून रौनक-रशमी, बाकी काका-काकू, आत्या आणि संग्रामची बाकी भावंडे आली होती.पूजा आटोपली आणि दुपारची जेवणे झाली. संजरावांनी संग्रामला दरडावून थोडावेळ आराम करायला पाठवले होते. संजयराव, सुशांत आणि अमर पार्टीची तयारी व्यवस्थित आली आहे का आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे का पाहायला गेले. संध्याकाळी सगळे पार्टी व्हेन्यूवर पोहोचले.

एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये पार्टीची तयारी करण्यात आली होती बऱ्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. संजयरावांनी दक्षता म्हणून पोलिसांची सिक्युरिटी मागून घेतली होती.संग्रामला तर आधीच सुशांत आणि रौनकने तयार करून घरून नेले होते. गार्गीने तर त्याला पाहिले ही नव्हते. ती देखील तयार होऊन मनीषाताई आणि समिधा बरोबर रेस्टॉरंटमध्ये पोहोचली.
सुंदर सजवलेले गार्डन थोडी थोडी मोकळी जागा सोडून, टेबल खुर्च्या मांडून केलेली बसण्याची सोय!रंगीबेरंगी लायटिंग आणि मध्ये मध्ये उभे असणारे प्रकाश फेकणारे पांढरे शुभ्र बल्बाचे गोळे! सगळीकडे हिरवळ आणि वर चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश! समोर केक ठेवण्यासाठी मोठा टेबल! गार्गी गाऊनचा घेर सावरत सगळं पाहत पुढे जात होती पण तिची नजर संग्रामला शोधत होती.थोडं पुढे गेल्यावर तिला संग्राम दिसला आणि दोघांची नजरानजर झाली.

संग्रामने आकाशी कलरचा सूट घातला होता.डोळ्यात एक चमक आणि ओठांवर तीच किलर स्माईल तो अगदी राजबिंडा दिसत होता. तर गार्गीने त्याला मॅचिंग आकाशी कलरचा पायघोळ गाऊन घातला होता.केसांचा फ्रेंच रोल,कानात लोंबते कानातले, गळ्यात नाजूक मंगळसूत्र,अगदी नकळत केलेला मेकअप आणि ओठांवर अवखळ हसू! ती ही खूपच सुंदर दिसत होती. दोघे एकमेकांना पाहण्यात दंग होते आणि सुशांतने घसा खकरला!

सुशांत,“ दोघांचं एकमेकांना पाहून झालं असेल तर केक कापूयात का?” तो चिडवत म्हणाला.


दोघांची ही नजर लाजून खाली झुकली. संग्राम आणि गार्गीने केक कापला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला आणि संजयरावांनी बोलायला सुरुवात केली.

संजयराव,“ही पार्टी कशासाठी आहे हे तर तुम्हा सगळ्यांना माहितच आहे. तर आणखीन एक आनंदाची बातमी आज मी देणार आहे ती म्हणजे मी आणि मनीषा आजी-आजोबा होणार आहोत! माझा मानसपुत्र सुशांत आणि समिधा आई-बाबा होणार आहेत!” ते म्हणाले पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संग्रामने सुशांतकडे पाहिले सुशांतने हसून डोळे मिचकवले आणि त्याच्या जवळ गेला. संग्रामने त्याला मिठी मारली आणि म्हणाला.

संग्राम,“ अभिनंदन! आणि इतकी आनंदाची बातमी माझ्या पासून लपवलीस ना?” तो तोंड फुगवून म्हणाला.

सुशांत,“ प्लिज यार संग्र्या आता तोंड नको फुगवू! तुला योग्य वेळ आल्यावर सांगणारच होतो आम्ही!”

समिधा,“ हो संग्राम तू नाराज नको होऊस ना!”

संग्राम,“ अरे थांबा थांबा! कोण म्हणाल मी नाराज आहे म्हणून! या नालायक सुशा सारखा आहे का मी?आणि सुशा तू माझ्या पासून काय रादर सगळ्या पासून हे का लपवले ते आले माझ्या लक्षात! तुझ्यारखा मित्र भेटला मला मी भाग्यवान आहे!” तो भावून होत म्हणाला.

सुशांत,“ ये तुझा मेलो ड्रामा बंद कर आणि माझ्या मुलासाठी आत्ता पासून चांगले नाव शोध कारण नाव तर तूच ठेवणार आहेस!” तो म्हणाला.

संग्राम,“ नुसतं नावच नाही तर मीच त्याच सगळं करणार आहे त्याला तुझ्यासारख नाय बनवायचं मला! तो त्याच्या अंकल सारखा बनेल!” तो रुबाबात म्हणाला.

गार्गी,“ हो हो पण तो आहे का ती? माहीत नाही संग्राम!” ती हसून म्हणाली.

तो पर्यंत तिथे संजयराव, मनिषाताई, गौरव, मीनाताई आणि बाकी सगळे आले.

संजयराव,“ बरं अजून एक सांगायचं आहे मला! चिनू आपण सगळे पार्ल्याला शिफ्ट होत आहोत. मी तिथे फोर. बीच.के फ्लॅट बुक केला आहे आणि सुशांत हे माझ्या आणि मनिषाकडून आमच्या येणाऱ्या नातवंडांसाठी!” असं म्हणून त्यांनी सुशांतच्या हातात कागदाचा एक लखोटा दिला. सुशांत पेपर्स वाचत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. त्याचे वाचून झाले. त्याने समिधाच्या हातात पेपर्स दिले आणि तो बोलू लागला.

सुशांत,“ काका माफ करा पण मी हे तुमच्याकडून घेऊ शकत नाही! इतकं मोठं घर?मी संग्रामसाठी जे केलं त्याची परत फेड करताय का अशा रूपाने मी जे केलं ते आपलं समजून केलं! संग्राम माझा मित्रच नाही तर भावा पेक्षा देखील जास्त आहे!” तो नाराजीने बोलत होता.

संजयराव,“तसं नाही बेटा!तुला आम्ही मुलगा मानतो तू आमच्यासाठी संग्राम पेक्षा कमी नाहीस आणि माझी इच्छा आहे की माझ्या नातवंडाने भाड्याच्या घरात राहू नये तर त्याच्या हक्काच्या घरात मोठे व्हावे! तू जर आम्हाला मनापासून आपलं मानत असशील तर ही भेट तू नक्की स्वीकारशील! मी दोन समोरासमोरचे फ्लॅट बुक केले आहेत एक संग्रामसाठी आणि एक तुझ्यासाठी!” ते त्याला समजावत म्हणाले.

समिधा,“ पण काका याची खरंच गरज आहे का?” तिने विचारले.

मनिषाताई,“ हो याची गरज आहे म्हणूनच आम्ही हे केले आहे ना! तुम्हा दोघांना आमचा मान आणि मन ठेवायचं नसेल तर ठीक आहे! चिनूचे बाबा राहू द्या यांनी आपल्याला कधीच आपले मानले नाही आपण तर परके आहोत यांच्यासाठी!” त्या नाराज होत म्हणाल्या.

सुशांत,“ काकू इमोशनल ब्लॅकमेल करू नका आ आता! संग्र्या!गार्गी तुम्ही तरी सांगा काका-काकुला!”तो वैतागून म्हणाला.

संग्राम,“ ये गप्प ये माकडा! मघाशी बसून तुझी टकळी सुरूच आहे आणि हे गिफ्ट तुमच्या दोघांसाठी नाही कळलं तुम्हाला! हे आमच्या सगळ्यांच्या येणाऱ्या बच्चासाठी आहे तर नाही म्हणारे तुम्ही कोण? घे ते आणि लवकर शिफ्ट हो!” तो त्याला दाटवत म्हणाला आणि आता मात्र सुशांतचा नाईलाज झाला.

सगळ्यांनी पार्टी एन्जॉय केली.संग्रामचे काका-काकू, आत्या, अमर,रौनक,रशमी आणि बाकी भावंडे पार्टीतूनच लवकरच सांगलीला जाण्यासाठी निघाले.

काका,“ चिनू काळजी घे बेटा आणि गार्गी तू ही!” ते म्हणाले.

संग्राम,“ काका अजून थोडे दिवस थांबा की!”

काका,“ बच्चा एक महिना थांबलो होतो की नाही तुझ्यासाठी मग आता जातो तिकडे ही कामं खोळंबली आहेत ना!” ते त्याला समजावत म्हणाले.

काकू,“ काळजी घे बच्चा!आणि लगेच दगदग नको करू चिनू!” त्या मायेने त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या.

संग्राम,“ हो काकू पण पुन्हा लवकर ये!” तो त्याचा हात हातात घेत म्हणाला.

काकू,“ आता आम्ही कधी यायचं ते तू आणि गार्गीने ठरवायचे! जर सुशांत-समिधा सारखी गुड न्यूज देणार आसशील तर आम्ही काय लगेच उद्या येऊ काय गार्गी!” त्या हसत म्हणाल्या आणि दोघांच्या ही माना लाजेने खाली गेल्या.

अमर,“ भाई तूच ये आता सांगलीला वहिनीला घेऊन!”

संग्राम,“ हो आणि डिग्री पूर्ण होईल आता तर जॉबच बघा! नाही तरी आपली कंपनी आहेच ये इकडे!म्हणजे तुझ्यासाठी मुलगी पाहायला बरं!” तो हसून म्हणाला.

गार्गी,“हो आता लवकर अमर भाऊजीना मुलगी पहावी लागेल!” ती चिडत म्हणाली.

सगळे हसले. सगळे आनंदाने निघून गेले. गौरव आणि मीनाताई ही गेले.पाहुणे तर आधीच पांगले होते.सुशांत आणि समिधाला माधव सोडायला गेला.संजयराव, मनिषाताई, संग्राम आणि गार्गी ही घरी पोहोचले.मनिषाताई आणि संजयराव झोपायला निघून गेले कारण त्यांना घरी यायला रात्रीचे दहा वाजून गेले होते.गार्गी आणि संग्राम ही रूममध्ये गेले.गार्गी तिची नायटी घेऊन चेंज करायला वॉशरूममध्ये निघाली तर संग्रामने तिला हाताला धरून त्याच्या जवळ ओढून घेतली आणि तो तिला अगदी जवळून नखशिखांत निहाळू लागल्या त्याच्या त्या नजरेने गार्गीने लाजून मान खाली घातली आणि ती म्हणली

गार्गी,“सोड ना संग्राम!काय पाहतोस इतका वेळ तर बरोबरच होते ना!”

संग्राम,“हो होतीस ना बरोबर पण ते पाहणं आणि हे पाहणं वेगळं आहे! पाहू तरी दे मन भरून माझी बायको किती सुंदर दिसते ती!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि गार्गी त्याच्या मिठीत शिरली.

गार्गी,“ बरं सोड आता! झालं ना पाहून!मी कपडे चेंज करून येते!” ती त्याच्या मिठीतुन सुटून वॉशरूमकडे जात म्हणाली.संग्राम ही चेंज करून बेडला टेकून तिची वाट पाहत बसला होता.

गार्गी आली आणि ती संग्राम जवळ बसली.

संग्राम,“ गार्गी तुला लग्नाच्या वाढदिवसाचे काय गिफ्ट हवे आहे?” त्याने विचारले.

गार्गी,“ तू माझ्या बरोबर आहेस हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठे गिफ्ट आहे!मला काही नको!” ती त्याचा हात धरून म्हणाली.

संग्राम,“अग सांग ना काय हवं तुला?म्हणजे ते आणू आपण!” तो पुन्हा आग्रह करत म्हणाला.

गार्गी,“बरं!पण मला जे गिफ्ट हवे ना ते दुकानात नाही मिळणार!” ती हसून म्हणाली.

संग्राम,“बाप रे असं कोणतं गिफ्ट हवे तुला?” त्याने तिला जवळ घेत विचारले.

गार्गी,“ मला ना छोटा संग्राम हवा!” ती लाजून म्हणाली आणि तिने त्याच्या मिठीत तोंड लपवले.

संग्राम,“काय?काकूची चेष्टा जास्तच मनावर घेतलीस की तू!” तो हसून तिचा चेहरा त्याच्या हाताने तिच्या हनुवटीला धरून वर करत म्हणाला.

गार्गी,“gd चेष्टा नाही!खरंच मला हवा आहे छोटा संग्राम!” ती लाडिकपणे त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली.

संग्राम,“अच्छा आणि मला छोटी गार्गी हवी असेल तर?” त्याने विचारले.

गार्गी,“ नाही छोटा संग्रामच हवा!” ती त्याला थोडी रागातच म्हणाली.

संग्राम,“बरं बाई!पण गार्गी छोटा संग्राम असाच येणार आहे का?त्यासाठी…!” तो हसून म्हणाला आणि तिच्या नायटीचे बंद त्याने अलगद सोडले.

गार्गी,“ love you gd!” ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली.


आज पुन्हा रात्र रंगत होती.संग्राम आणि गार्गीच्या प्रेमाला पुन्हा उधाण आले होते.दोघे ही त्या प्रेमात नखशिखांत न्हावून निघत होते.इतक्या संघर्षा नंतर पुन्हा सुखाची पहात त्यांच्या आयुष्यात उगवणार होती!

समाप्त

वाचक मित्र-मैत्रिणींनो नमस्कार?

नेहमी प्रमाणे माझ्या या कथेला दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल मी तुमची कायम ऋणी राहीन असाच लोभ असावा!

आणि थोड्या कालावधी नंतर माझिया प्रियाला प्रीत कळेना सिझन दोन तुमच्या भेटीला येईल आणि हो लवकरच भेटू नवीन कथे बरोबर नवीन पात्रांची एक नवीन कहाणी घेऊन जी कहाणी आहे राध्या आणि अरिनची!?

तुमची,
स्वामिनी चौगुले?








🎭 Series Post

View all