माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ९१

This Is A Love Story


भाग 91
गार्गी भानावर आली. तिला संग्राम कुठेच दिसत नव्हता.पण फ्लॅटचे मेन डोअर तर बंदच होते. त्यामुळे गार्गी त्याला शोधत बेडरूममध्ये गेली तर संग्राम तिला गॅलरीत पाठमोरा उभा असलेला दिसला. तिने त्याला पळत जाऊन माघून मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर गाल ठेवून बोलू लागली.

गार्गी,“ संग्राम मला माहित आहे मी चुकले आहे! I am sorry for that!तू मला त्यासाठी कोणती ही शिक्षा दे पण प्लिज मला स्वतः पासून दूर लोटू नकोस मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय!” ती रडत बोलत होती.

संग्राम तिला काहीच बोलला नाही तो स्वतःला तिच्या मिठीतुन सोडवून घेऊन पुन्हा हॉलमध्ये आला. त्याला इतकं शांत पाहून गार्गीला त्याच्या बद्दल कोणताच अंदाज बांधता येत नव्हता. तिला त्याच असं गप्प राहणं आणि त्याच्या पासून दूर राहणे देखील असह्य झाले होते. एक तर ती त्याला आज तब्बल एक महिन्यानी भेटत होती त्याला इतक्या जवळून पाहत होती. त्यामुळे तिचा आता स्वतःवरचा संयम सुटला होता. ती त्याच्या जवळ गेली आणि तिने टाचा उंच करून त्याच्या ओठांचा ताबा घेतला. त्याने ही तिच्या मानेत हात घालून तिला आणखीन जवळ ओढले आणि संग्राम थोडावेळ तिच्या बरोबर वाहवत केला पण लगेच तो भानावर येत तिच्या पासून लांब झाला. तिच्याकडे पाठ करून उभा राहिला आणि म्हणाला.

संग्राम,“ घरी सगळे काळजीत असतील! ते वाट पाहत असतील आपली!घरी जाऊया!” तो म्हणाला


तो बाहेर पडला.गार्गी ही त्याच्या मागे यांत्रिकपणे चालत होती. संग्रामने टॅक्सी थांबवली आणि गार्गी त्याच्या बरोबर टॅक्सीत बसली.संग्राम शांतच होता तो काहीच बोलत नव्हता. गार्गी मात्र त्याला एकटक पाहत होती आणि पुढे काय होणार याचा विचार करून आतल्या आत कुढत होती. दोघे ही घरी आले. मनीषाताई,संजयराव, काका-काकू, अमर, गौरव आणि मीनाताई सगळे त्यांचीच वाट पाहत होते. गार्गीने फोनवर मनीषाताईंना एअर पोर्टवरून संग्रामला घेऊन फ्लॅटवर आली आहे हे कळवले होते. संग्रामला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता.

आता संध्याकाळचे सहा वाजत आले होते. संग्राम आणि गार्गी घरात आले. संग्राम कोणाकडेच न पाहता म्हणाला.

संग्राम,“मला खूप थकल्या सारखे वाटत आहे मी रूममध्ये आराम करतो!” तो इतकंच बोलून निघून गेला. त्याला कोणीच काही बोलले नाही.

या सगळ्या घटनांमुळे आज दुपारी कोणीच जेवले नव्हते.अगदी संग्राम देखील न जेवताच बाहेर पडला होता आणि संध्याकाळच्या जेवणाला अजून वेळ होता. म्हणून मनीषाताईंनी राधाला शिरा करायला सांगितला आणि सगळे हॉलमध्ये बसले.मनिषाताईंचे लक्ष गार्गीच्या गालाकडे गेले तर तिचा गाल लाल झालेला आणि त्यावर पाच बोटे उमटलेली त्यांना दिसली.

मनिषाताई,“ गार्गी हे काय संग्रामने तुझ्यावर हात उचलला?आपल्या घरात कधीच कोणी बायकोवर हात उचलला नाही! थांब त्याला जाब विचारते मी!”त्या रागाने म्हणाल्या आणि उठून त्या त्याला हाक मारणार तर गार्गी त्यांना थांबवत म्हणाली.

गार्गी,“ प्लिज आई त्याला काही विचारू नका! त्याने जे केले आहे ते माझ्या प्रेमापोटी केले आहे! मीच जे बोलले ते त्याला सहन झाले नाही म्हणून..!!” ती पुढे बोलणार तर संजयराव रागाने म्हणाले.

संजयराव,“ म्हणून त्याने तुझ्यावर हात उचलला! गार्गी त्याला जाब तर विचारावाच लागणार आहे आणि त्याची कानउघडणी ही करावी लागेल!” ते रागाने म्हणाले.

मीनाताई,“ ताई!दादा तुम्ही शांत व्हा बरं! तुमची ही सून काही कमी नाही बरं का!हि काही तरी नक्कीच बोलली असणार! त्याला जाब विचारा बोला पण आज नको चेहऱ्यावरून तो खूप थकल्या सारखा वाटत होता! आणि त्याला गार्गीने सगळं सांगितल्यावर आता त्याच्यावर काही परिणाम दिसत नसला तरी डॉक्टर त्याला तपासत नाहीत तो पर्यंत काही सांगता येणार नाही तर जरा सांभाळून!” त्या काळजीने बोलत होत्या.

काका,“ मीनाताई बरोबर बोलत आहेत आपण जरा सबुरीने घेऊ सगळं! आणि तो घरी आला आहे ना मग जरा शांत राहा!” ते म्हणाले.

संजयराव,“ दादा ठीक आहे! गार्गी त्याला तू व्हिडीओ दाखवलास का? आणि सगळं सांगून त्याचा गैरसमज दूर झाला का?” त्यांनी विचारले.

गार्गी,“हो त्याला व्हिडीओ दाखवला मी! पण तो ते सगळं पाहून बराच वेळ जागीच थिजला होता! थोड्या वेळाने भानावर आला! मी त्याचा गैरसमज दूर करून त्याची माफी मागितली आहे पण तो माझ्याशी काहीच बोलला नाही!त्याने जर मला माफ नाही केलं तर तो जी शिक्षा मला देईल ती निमूटपणे भोगेन!” ती डोळे पुसत म्हणाली.तो पर्यंत राधाने शिऱ्याच्या प्लेट्स आणून दिल्या.

मनिषाताई,“ गार्गी तू नको काळजी करू तो जास्त दिवस तुझ्यावर नाराज नाही राहणार! चल शिरा खा तू! आज पुन्हा खूप मोठे संकट टळले आहे!” त्या म्हणाल्या.

गार्गी,“मी देऊन येऊ का संग्रामला शिरा?” तिने विचारले.तो पर्यंत अमर तिला म्हणाला.

अमर,“नको वहिनी मी जातो घेऊन शिरा! भाईला या सगळ्यामुळे मानसिक ताण आला असेल! थोडावेळ आराम करू द्या त्याला!” तो म्हणाला आणि शिऱ्याची प्लेट घेऊन संग्रामाच्या रूममध्ये गेला.

इकडे मनिषाताईंनी संग्रामच्या आवडीचा स्वयंपाक करायला घेतला! त्याला आवडते म्हणून गार्गीला बटाट्याची खीर करायला सांगितली. ती शरीराने किचनमध्ये होती पण तीच मन मात्र संग्रामाच्या भोवती पिंगा घालत होत. तिला त्याचे असे गप्प राहणे छळत होते.स्वयंपाक झाला आणि काकूने संग्राम-अमरला जेवायला हाक मारली. संग्राम जेवायला आला पण तो जेवताना देखील काहीच बोलला नाही.गार्गी मात्र आता अजूनच बेचैन झाली तिने कसे बसे जेवण घशाखाली ढकलले! संग्राम काहीच न बोलता पुन्हा रूममध्ये निघून गेला. ते सगळं पाहून मीनाताई तिला म्हणाल्या.

मीनाताई,“ घरी चल बेटा! संग्रामाच्या मनात काय आहे अजून आपल्याला माहीत नाही! मनिषाताई संग्राम काय म्हणतो ते तुम्ही फोन करून कळवा आम्हाला मग पुढे काय करायचे ते पाहू!” त्या म्हणाल्या.

गार्गी,“ नाही मम्मा! आज काय तो सोक्षमोक्ष लागूच दे!मी अशी नाही जाणार आता मी त्याला विचारून आले!”


असं म्हणून ती रूमकडे गेली. ती दारावर नॉक करणार तर दार नुसते पुढे लोटलेले होते. ती दार ढकलून आत गेली आत नुसता टेबल लँपचा अंधुक प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात संग्राम उभा होता. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारून रडत बोलू लागली.

गार्गी,“ काही तरी बोल ना gd!असं गप्प राहून माझा अंत नको पाहूस!तुझ्या मनात काय आहे ते एकदा सांगून मोकळा हो! तुला मला माफ करायचे नसेल तर तसे स्पष्ट सांग मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे!” ती बोलत होती.

संग्राम,“ अच्छा! म्हणजे तू मला घटस्फोट देणार का? अग सगळीकडे पहा तरी एकदा!नुसतं रडत सुटली आहेस!” संग्राम हसून म्हणाला आणि गार्गी सगळीकडे पाहू लागली.

तिला पायाखाली काही तरी मऊ जाणवले म्हणून तिने खाली पाहिले तर दारा पासून बेड पर्यंत गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या. ठीक ठिकाणी सेंटेड कँडल्स लावल्या होत्या.त्यांचा अंधुक प्रकाश आणि सुगंध सगळीकडे दरवळत होता.बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या. ती हे सगळं आश्चर्याने पाहत होती आणि तिच्या न कळत रुमचे दार लावून संग्राम तिच्याकडे खट्याळपणे हसत तिच्या समोर उभा होता. गार्गीने ते सगळं पाहिलं आणि तिने त्याला आवेगाने मिठी मारली.

संग्राम,“ जरा हळू! दुखलं ना मला!” तो तोंड वाकड करत म्हणाला.

गार्गी,“ sorry खरंच माझं चुकलं!”

संग्राम,“ तुझं sorry पुराण ऐकून मला कंटाळा आला आता! मला जे ऐकायचे आहे ते बोलशील का?” तो तिच्या भोवतीचे हाताचे कडे अजून घट्ट करत म्हणाला.

गार्गी,“ I love you gd!”तिने असं म्हणून त्याच्या कपाळावर ओठ ठेवले. त्यानंतर त्याच्या ओठांचा ताबा घेतला बराच वेळ दोघे एकमेकांमध्ये गुंतत राहिले.गार्गीने त्याच्या छातीवर डोके ठेवले.

संग्रामने तिला समोर उभं केलं आणि तिथेच असलेली एक बॅग तिच्या हातात देत म्हणाला.

संग्राम,“ गार्गी ही साडी नेसून येशील ना!” त्याने विचारले.

गार्गी,“ gd तू हक्क गाजवायला कधी शिकणार? साडी नेसून ये अस म्हण ना!” ती तोंड फुगवून म्हणाली.

संग्राम,“बरं जा ना आता!” तो म्हणाला.

गार्गी वॉशरूममध्ये गेली. तिने बॅग उघडली तर त्यात ऑफ व्हाईट कलरची सुंदर साडी त्याला मॅचिंग मोत्याची ज्वेलरी, मॅचिंग बांगड्या टिकली आणि चप्पल देखील होती. गार्गी ते सगळं आश्चर्याने पाहत होती.तिने साडी नेसली. बांगड्या घातल्या टिकली लावली!केस विंचरून केस मोकळे सोडले आणि ती बाहेर आली.

तो पर्यंत संग्रामने म्युझिक सिस्टीमवर बारीक आवाजात गाणे लावले होते. तो गार्गीला नखशिखांत निहाळत होता. ऑफ व्हाईट कलरची साडी त्याला सिल्व्हर कलरची किनार, सिल्व्हर कलरचा सिल्वलेस ब्लाऊज, वन साईड सोडलेला पदर!ब्लंट कट असलेले मोकळे केस आणि हातात किणकिण वाजणाऱ्या बांगड्या! तिचा नितळ गोरा रंग त्यात उठून दिसत होता. जणू स्वर्ग लोकांतून अप्सरा उतरली होती! त्याची सिग्ध नजर तिच्या शरीरावरुन फिरत होती आणि ती ते पाहून लाजून शहारली!तिच्या पापण्या झुकलेल्या होत्या. संग्राम तिच्या जवळ गेला आणि तिच्या कानात हळूच म्हणाला.

संग्राम,“ you are looking gorgeous! Let\"s dance!” त्याने एक हात तिच्या उघड्या कमरेत घातला आणि दुसरा हातची बोटे तिच्या हाताच्या बोटात गुंफली.तिने दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवला.गाणं लागलं होतं.


तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये
ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा ज़िन्दगी भर
सारे संसार का प्यार मैं ने तुझी में पाया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये

चँदा तुझे देखने को निकला करता है
आइना भी ओ ... दीदार को तरसा करता है
इतनी हसीं कोई नहीं
हुस्न दोनो जहाँ का एक तुझमे सिमट के आया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये

थोडा वेळ डान्स करण्यात गेला. गार्गी संग्रामच्या मिठीत होती.दोघे ही एकमेकांचा सहवास आणि स्पर्श अनुभवत होते. पण बऱ्याच वेळाने ती भानावर आली आणि काळजीने त्याला म्हणाली.

गार्गी,“ डॉक्टरने आराम करायला सांगितले आहे आणि साहेबांना डान्स करायचा आहे! बास झालं gd बेडवर बस!” ती त्याला बेडवर बसवत म्हणाली.अचानक त्याच्या काही तरी लक्षात आलं आणि तो उठू लागला.

गार्गी,“ काय हवं तुला मला सांग मी देते!” ती म्हणाली

संग्राम,“ तुला नाही सापडणार थांब मीच आणतो!” तो म्हणाला

संग्राम गार्गीला आणखी काय देणार होता आणि दोघांचे नाते पुढे कसे खुलणार होते?
©स्वामिनी चौगुले










🎭 Series Post

View all