माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ८१

This Is A Love Story


सगळे I C U च्या बाहेर बसून होते. संग्राम डॉक्टरच्या ट्रीटमेंटला जरी आता रिस्पॉस देत असला तरी देखील डॉक्टरांनी त्याला अजून सेफ घोषित केले नव्हते. अजून ही त्याच्या जीवाचा धोका पूर्णपणे टळलेला नव्हता.डॉक्टरांनी पुढचे बारा तास त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून सांगितले होते.त्यामुळे अजून ही सगळ्यांचा चेहऱ्यावर चिंता दिसत होती. सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी त्या बद्दल सांगितले होते आणि सगळ्यांचे डोळे आता घड्याळाकडे लागले होते.एक एक तास डोंगरा एवढा वाटत होता.गार्गी मात्र हॉस्पिटलमधील मंदिरातच बसून होती.ती अकरा वाजले म्हणून पुन्हा I. C. U. बाहेर आली होती.
कसे बसे रात्रीचे अकरा वाजले आणि डॉक्टरांनी संग्रामला तपासले.तो हळूहळू आता शुद्धीवर ही येत होता.डॉक्टरांनी त्याला तपासले आणि बाहेर येऊन संगळ्यांना सांगितले.

डॉक्टर,“ he is safe now!तो शुद्धीवर ही आला आहे.तुम्ही त्याला एक एक करून भेटू शकता!हा पण त्याला जास्त बोलू नका आणि बोलू ही देऊ नका!” त्यांनी सूचना दिल्या आणि ते गेले.

सगळ्यांनी डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुटकेचा निःश्वास सोडला.त्याने तब्बल छत्तीस तासांनी डोळे उघडले होते. मनिषाताईंनी हात जोडून देवाचे आभार मानले आणि त्या व संजयराव संग्रामला भेटायला गेले.संग्रामने डोळे उघडून तो कुठे आहे याचा अंदाज घेत होता.त्याला तस सगळीकडे पाहताना पाहून मनीषाताई म्हणाल्या.

मनीषाताई,“बेटा आपण हॉस्पिटलमध्ये आहोत!” त्या मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आवंढा गिळून म्हणाल्या.

संजयराव,“ कसं वाटतंय बच्चा तुला?” त्यांनी कातर आवाजात विचारलं.

संग्राम,“ ठीक” तो खोल गेलेल्या आवाजात इतकच म्हणाला.

संजयराव,“ बरं तू आराम कर बच्चा आम्ही आहोत बाहेर!” ते म्हणाले आणि दोघे बाहेर आले.दोघांच्या ही चेहऱ्यावर तो ठीक असल्याचे समाधान दिसत होते.

त्या नंतर रौनक,अमर आणि काका-काकू त्याला भेटून आले आणि सुशांत आत केला.गार्गीची मात्र आता घालमेल होत होती.संग्रामच्या सामोर कसे जावे हे तिला कळत नव्हते.कारण त्याचा राजवीरमुळे झालेला गैरसमज आणि त्यातून त्याने गोळी लागल्यावर बोललेले ते शब्द तिच्या कानात घुमत होते.तरी सुशांत बाहेर आला की तिने आत जाण्यासाठी हिम्मत कशी बशी एकत्रीत केली.सुशांत आत जाऊन संग्राम जवळ स्टूलवर बसला होता.

सुशांत,“नालायका झालं आम्हाला सगळ्यांना रडवून!कसं वाटतंय संग्र्या तुला!” सुशांतने हात धरून त्याला विचारले.हे बोलताना त्याचे डोळे मात्र काठोकाठ भरून आले होते.

संग्राम,“ठीक ….आहे.आपण...इथे…” तो तुटक तुटक बोलत होता. त्याला बोलताना होत असलेला त्रास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.म्हणून सुशांतने त्याला मध्येच थांबवले आणि तो म्हणाला.

सुशांत,“ आलो बाबा कसे तरी आपण तू नको जास्त विचार करू तू फक्त आराम कर आणि लवकर बरा हो संग्र्या!तुला असं बघवत नाही रे!” तो डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाला.

संग्राम,“ इतकं…..मला ..काही..झालं...नाही!” तो पुन्हा तुटक तुटक म्हणाला.

सुशांत,“ नाही झालं तुला काही तू शांत राहा बोलताना त्रास होतोय तुला! तू आराम कर फक्त आम्ही बाहेर आहोत!” तो असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला आणि निघाला

तो पर्यंत गार्गी दार उघडून आत आली.ती खाली मान घालून दोन तीन पावले पुढे आली असेल आणि सुशांत बाहेर निघाला होता की गार्गीला पाहून संग्राम बिथरला!

संग्राम,“ हिला ...इथून... जायला.. सांग..सुशा….हिला पाहिजे ते मिळेल...डिव्हॉर्स….पैसे….प्लॉट जे पाहिजे….”


तो रागाने अडखळत अडखळत ओरडत होता त्याचा आवाज खोल गेला.त्याला दम लागला होता ओरडल्यामुळे आणि हालचाल केल्यामुळे त्याच्या जखमेतून रक्त कळत होते.ते पाहून सुशांत घाबरून त्याच्या जवळ गेला. त्याचा अवतार पाहून गार्गी तर जागीच थिजली होती.ती मूर्ती सारखी तिथेच थांबली होती.

सुशांत,“ संग्र्या तू शांत हो!(तो त्याला धरून समजावत म्हणाला) गार्गी ss तू जा आणि डॉक्टरांना बोलावून आण!”तो ओरडला आणि गार्गी भानावर आली आणि धावतच डॉक्टरच्या केबिनकडे गेली.

तिने डॉक्टरांना बोलवून आणले.सगळे नुकतेच रिलॅक्स झाले होते आणि अमरने संगळ्यांसाठी चहा आणून दिला होता. पण गार्गीला असे धावत जाताना पाहून सगळे काळजीत पडले. गार्गीने डॉक्टर आणि नर्सला आत पाठवले आणि ती बाहेरच थांबली. सुशांतला ही डॉक्टरांनी बाहेर पाठवले.गार्गी खूपच घाबरलेली दिसत होती. सुशांत ही चिंतीत दिसत होता. त्यामुळे दोघांना ही कोणीच काही विचारले नाही. डॉक्टर बाहेर आले आणि बोलू लागले.

डॉक्टर,“ संग्रामशी शेवटी कोण भेटले होते. त्याला पॅनिक अटॅक आला आहे! आम्ही त्याला झोपेचे इंजेक्शन दिले आहे त्यामुळे तो आता शांत झोपला आहे! पण असं काय झालं की त्याला पॅनिक अटॅक आला? कोण भेटल त्याला?”

गार्गी,“ माझ्याचमुळे त्याला पॅनिक अटॅक आला आहे! सगळी माझीच चूक आहे तो कसा आहे आता डॉक्टर?” तिने रडत विचारले.

डॉक्टर,“ तो आता ठीक आहे पण मिसेस सरनाईक तुम्ही त्याला परत भेटू नका! मला माहित नाही तुमच्यात काय झालेय पण त्याची मेंटल आणि फिजिकल कंडिशन हा ट्रेस सहन करण्याची नाही! जर त्याला पुन्हा पॅनिक अटॅक आला तर तो कोमात जाऊ शकतो! कमीत कमी महिना भर तरी तुम्ही त्याला भेटू नका प्लिज!” ते म्हणाले.

गार्गी,“नाही भेटणार मी त्याला डॉक्टर!” ती रडतच म्हणाली.

डॉक्टर,“तुम्ही सगळ्यांनी ही लक्षात ठेवा त्याच्या समोर मिसेस सारनाईकांचा विषय अजिबात काढू नका आणि तो काही यांच्या विषयी बोलला तर तुम्ही विषय टाळा! त्याच्या या कंडिशनमध्ये त्याला सांभाळणे खूप गरजेचे आहे!” ते म्हणाले आणि सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली.


गार्गीने संजयराव-मनीषाताई आणि बाकी सगळ्यांना घरी पाठवून दिले. हॉस्पिटलमध्ये ती,सुशांत आणि अमर थांबले होते. आज ती घटना घडून तीन दिवस झाले होते. संग्राम अजून या सगळ्यातून सावरला नव्हता. संजयराव-मनिषाताई आणि सुशांत दिवस भर त्याच्या जवळ असत तर अमर आणि काका रात्री थांबत! गार्गी मात्र थोडावेळ आराम करण्यासाठी घरी जायची पण ती सतत हॉस्पिटलमध्ये बसून असायची ती त्याच्या जवळ त्याला भेटायला जात नसली तरी त्याला काचेतून पाहत असायची! डॉक्टरांशी काय ट्रीटमेंट आहेत आता त्याची तब्बेत कशी आहे या बद्दल चर्चा करायची! आज 13 फेब्रुवारी म्हणजेच तिच्या आणि त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता.गार्गी सकाळीच मंदिरात जाऊन आली होती आणि ती सुशांतची वाट पाहत होती. तिला सुशांत येताना दिसला आणि त्याच्याकडे पळतच गेली.

गार्गी,“बरं झालं तू आलास मी तुझीच वाट पाहत होते सुशांत!मी आज मंदिरात गेले होते आज 13 फेब्रुवारी आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस! मला हा दिवस खूप मोठी पार्टी देऊन साजरा करायचा होता.आजच्याच दिवशी संग्राम माझ्या आयुष्यात आला! माझ्यासाठी हा दिवस खास आहे! मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की आजच्या दिवशी मला त्याला या स्थितीत पहावं लागेल त्यात तो मला समोर ही उभं करत नाही! त्याला बाहेरूनच पाहून मनाचे समाधान करून घेते मी!(ती डोळे पुसत म्हणाली) असो मी त्याच्यासाठी प्रार्थना करून आले! तू तूच मंदिरात गेला होतास म्हणून सांग आणि हा अंगारा त्याला लाव आणि हे फुल त्याच्या उशाशी ठेव! बाहेरच काही तो खावू शकत नाही म्हणून प्रसाद नको द्यायला त्याला!” असं म्हणत तिने त्याच्या हातात फुल आणि अंगाऱ्याची पुडी दिली.

सुशांत तिला काहीच बोलला नाही त्याने फुल आणि अंगारा तिच्या हातातून घेतला आणि मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तो संग्राम जवळ गेला. गार्गी बाहेर उभं राहून दाराच्या गोल काचेतून पाहत होती. सुशांतने संग्रामला अंगारा लावला आणि फुल त्याच्या उशाशी ठेवले.गार्गीने ते पाहिलं आणि ती समोर खुर्चीवर बसली

संग्राम,“ हे सगळं काय?” तो म्हणाला.

सुशांत,“ आज मंदिरात गेलो होतो तुझ्यासाठी प्रार्थना करून आलो म्हणून!”

संग्राम,“ आज तारीख किती आहे रे?” त्याने विचारले.तो पर्यंत नर्स सूप घेऊन आली. सुशांतने सूपचा बाऊल हातात घेतला आणि स्टूलवर बसत त्याला सूप पाजयच्या तयारीत तो म्हणाला.

सुशांत,“ तुला काय करायचे रे! सूप पी मग स्पंच बाथ देतो! फ्रेश वाटेल तुला!” तो त्याला म्हणाला.

संग्राम,“ आज 13 फेब्रुवारी आहे सुशा! या सगळ्या गडबडीत माझा मोबाईल कुठं पडला काय माहीत!तू आपल्या वकिलांना फोन करून इथे बोलावून घे ना मला….” तो हळूहळू बोलत होता तो पुढे बोलणार तर सुशांतने मध्येच त्याचे बोलणे तोडले आणि तो बोलू लागला.

सुशांत,“नसता शहाणपणा नाही करायचा संग्र्या जरा स्वतःकडे बघ तुझी अवस्था बघ जरा अजून नीट बोलता येत नाही आणि तुला नाही ते पडले आहे!आराम कर!जास्त विचार करायचा नाही!तुला जे करायचे ना ते बरं झाल्यावर करायचं कळलं का?” तो त्याला दटावत म्हणाला आणि त्याने बेड अप पोजिशनवर केला.

त्याच बोलणं ऐकून संग्राम थोडावेळ शांत बसला.त्याने सूप पिले आणि सुशांतने स्पंचने त्याचे अंग पुसून दिले.संग्रामच्या मनात मात्र अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते.तो विचार करत होता.

“गार्गी तीन दिवस झालं दिसली नाही.ती का थांबेल इथे?ती गेली असेल की आता पर्यंत तिच्या राजवीरकडे!खरंच गेली असे मला या अवस्थेत सोडून?नाही म्हणजे मला गोळी लागली त्या दिवशी ती खूप रडत होती?तिला माझ्या बद्दल काहीच वाटत नसेल का?का वाटेल तिला काही त्या दिवशी तीच आणि राजवीरच बोलणं ऐकलं की!पण मला तिचा राग का यावा?तिने तर तिच्या अटी आधीच सांगितल्या होत्या मला!पण ती जे वागली ते चूक होते अरे ते मी कोण ठरवणार!सगळ्यात जास्त राग मला तिचा आला तिने जे राजवीरच्या सांगण्यावरून मला पैसे मागायचे ठरवले कारण माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भावनांची किंमत इतकी कमी केली तिने असो सुशा तर माझं ऐकणारच नाही आता आणि बाकी कोणी ही ऐकणार नाही! मी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर पाठवून देईन तिला जे हवं ते!पण ती आता कुठे असेल? कशी असेल?सुशाला विचाराव का?नको अजून ओरडेल माझ्यावर!”

तो हा सगळा विचार करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तो कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे हे स्पष्ट दिसत होते.ते सुशांतने पाहिले आणि तो म्हणाला.

सुशांत,“ संग्र्या कसला विचार करतोयस रे?तुला मी सांगितले ना जास्त विचार करू नकोस म्हणून!” तो काळजीने म्हणाला.

संग्राम,“ एक विचारू का?तू ओरडणार नसतील तर!”तो म्हणाला.

सुशांत,“ विचार!नाही ओरडणार मी!”

संग्राम,“ गार्गी कुठे आहे?ती गेली असेल ना!त्या दिवशी तिने हॉलमध्ये…..” तो पुढे बोलणार तर सुशांतने त्याला पुन्हा थांबवले.हे विचारताना संग्रामच्या आवाजात झालेला बदल त्याच्या लक्षात आला होता.

त्याचा झालेला गैरसमज आत्ता लगेच तो व्हिडीओ दाखवून दूर करावा असे सुशांतला वाटले पण डॉक्टरांनी जे सांगितले होते त्यामुळे तो शांत होता.आता संग्रामकच्या बाबतीत त्यालाच काय पण कोणालाच कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती.व्हिडीओ पाहून तो कसा रियाक्ट होईल हे सध्याची त्याची मानसिक स्थिती पाहता कोणालाच सांगता येत नव्हते.त्यामुळे सुशांतने काही तरी विचार केला आणि त्याने काहीच न बोलता समोरच्या काचेचे पट्ट्यांचे तावदान उघडले. काचेच्या त्या बाजूला गार्गी खुर्चीवर डोक्याला हात लावून बसलेली संग्रामला दिसली. काच ही अपारदर्शक असल्याने संग्रामला बाहेरचे दिवस होते पण गार्गीला आतले काही दिसत नव्हते.

सुशांत,“ ती तुला हॉस्पिटलमध्ये आणल्या पासून इथेच आहे!” तो जरा घाबरतच म्हणाला.

संग्राम,“ बरोबर आहे ना तिचा जीव मी वाचवला मग काही तरी करून उपकाराची परत फेड करायला नको का?आणि ते तिला उत्तम जमते(तो खिन्नपणे हसला)तिला सांग इथे थांबायची गरज नाही आणि मी काही उपकार नाही केले तिच्यावर तो आतंकवादी माझ्याचमुळे गोळी झाडत होता!” इतकं बोले पर्यंत त्याला थकल्या सारखे झाले.

सुशांत,“ तू विचारले म्हणून मी सांगितले!बाकी तू आणि ती; तू बरा झाल्यावर पाहून घ्या आणि बास झाले आता हे पाणी पी! आणि आराम कर आताच मेडिसीन्स दिल्या आहेत तुला!” तो त्याला ग्लासने पाणी पाजत म्हणाला.


माणसाचे मन खूप विचित्र असते कायम नको त्या गोष्टींकडे धाव घेत असते.संग्रामच्या मनात गार्गी विषयी गैरसमजातून निर्माण झालेला राग होता.पण तरी ही त्याचे पण तिच्याकडे ओढ घेत होते.त्याला तिचे तोंड देखील पाहायचं नव्हते पण ती कुठे आहे हे मात्र जाणून घ्यायचे होते.

संग्रामचा गार्गी विषयी झालेला गैरसमज कधी दूर होईल?संग्राम गार्गी त्याच्याशी जे काही वागली त्यासाठी तिला माफ करू शकेल का?
©स्वामिनी चौगुले










🎭 Series Post

View all