माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ७९

This Is A Love Story


वर्तमान काळ
भाग 79
संग्रामला डायरेक्ट OT मध्ये नेण्यात आले तिथे भारतातल्या बेस्ट ट्रॉमा सर्जन्स डॉक्टरची एक टीम आधीच हजर होती. सगळी व्यवस्था मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली होती. एव्हाना रात्रीचे एक वाजले होते आणि सगळ्या न्यूज चॅनल्सवर संग्रामाच्या पराक्रमाच्या बातम्या झळकत होत्या. तो रातोरात नॅशनल हिरो झाला होता. सगळीकडे लोक त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि तो सुखरूप या सगळ्यातून बाहेर पडावा म्हणून प्रार्थना करत होते. लाईफ लाईन हॉस्पिटलच्या बाहेर मीडियाने नुसती गर्दी केली होती आणि ते सगळे हॉस्पिटल मधून संग्रामाच्या तब्बेतीची काय बातमी येते याची वाट पाहत होते. तो पर्यंत तिथे संजयराव-मनिषाताई,गौरव,मीनाताई पोहोचले आणि मीडियाने त्यांना गराडा घातला पण त्याची मन:स्थिती ओळखून पोलिसांनी त्यांना सुरक्षा कड्यातून संग्रामची सर्जरी होत असलेल्या फ्लोअरवर पोहोचवले.

गार्गी विमनस्क अवस्थेत खुर्चीवर बसली होती तर सुशांत O. T कडे पाहत उभा होता.मनिषाताई गार्गी जवळ आल्या आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. गार्गीने त्या स्पर्शाने वर मान करून पाहिले आणि मनिषाताईंना मिठी मारून रडू लागली.

गार्गी,“ आई संग्राम! ….मला खूप भीती वाटते!” ती रडत बोलत होती.

मनीषाताई,“शांत हो काही नाही होणार त्याला!”त्या तिला समजावत होत्या.


आता चार तास होऊन गेले तरी O. Tचे दार उघडले नव्हते. जसा वेळ जात होता तसा सगळ्यांच्याच मनातील संग्राम बद्दलची चिंता वाढत होती.साधारण पहाटेचे पाच वाजले असतील. गार्गी विषण्य होऊन फक्त O. Tचे दार कधी उघडते याकडे डोळे लावून बसली होती.तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. तर एकदम कोणी तरी येऊन तिचे पाय धरले त्या स्पर्शाने तिने खाली पाहिले तर राजवीरने तिचे पाय धरले होते आणि सगळेच त्यांच्याकडे आ वासून पाहत होते. गार्गीने स्वतःचे पाय त्याच्या पासून सोडवून घेतले आणि अंगावर पाल पडल्या सारखी ती बाजूला झाली. त्याला पाहून सुशांत रागाने म्हणाला.

सुशांत,“राजवीर तू जा इथून प्लिज हे हॉस्पिटल आहे आणि इथे तमाशे नको आहेत!”


राजवीर,“मी इथे तमाशा करायला नाही आलो सुशांत माफी मागायला आलो आहे. गार्गी आज म्हणाली तसं खरंच माझी संग्रामाच्या पाया जवळ देखील उभं राहण्याची लायकी नाही! मी नालायक माणूस आहे. मी संग्रामला खूप त्रास दिला. त्याला सतत हिनवले त्याला मानसिक टॉर्चर केले! मला माहित होतं की त्याला बिझनेसमध्ये मी नाही हरवू शकणार म्हणून मग मी गार्गीचा वापर करून त्याला हरवायचे ठरवले. त्याला मानसिक दृष्ट्या हणून पडायचे म्हणून मी गार्गीला भेटण्याचा तिला बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. ती ही मला भेटत होती मला बोलत होती आणि मी आमच्या भेटीचे फोटो, बोलणे संग्रामला पाठवत होते एवढंच नाही तर त्याला भेटून तो कसा प्रेमात आणि नाते निभावण्यात हरला आहे आणि गार्गी त्याला सोडून माझ्याकडे येणार म्हणून त्याला टॉर्चर करत होतो एवढंच नाही तर काल ही गार्गी आणि मी रिसॉर्टच्या कॅफेट एरियामध्ये भेटलो तेंव्हा मी त्याला तिथे बोलवून घेतले होते. त्याने गार्गी आणि माझ्यातले बोलणे ऐकले आम्हाला पाहिले तेंव्हा ही मी त्याला लुझर म्हणून हिनवले! खरा लुझर तर मीच आहे गार्गीने जी माझी लायकी काढली सगळ्यां समोर ते योग्यच केले मी त्याच लायकीचा आहे! एवढे होऊन देखील त्याने आज मला त्याने सोडवलेल्या लोकां बरोबर सुखरूप रिसॉर्ट मधून बाहेर सोडले खरं त्याने मनात आणले असते तर माझ्या बरोबर काही ही……” तो पुढे बोलणार तर गार्गीने त्याची कॉलर धरली आणि त्याला दोन थोबाडीत लावून दिल्या आणि जोरजोरात हलवून बोलू लागली.

गार्गी,“ काय बिघवले होते रे त्याने तुझे… कॉलेज पासून तू त्याचा दुःस्वास करतोस! आता ही तो त्याच काम चांगलं करतो म्हणून त्याला काँट्रॅक्ट मिळत गेले तो तुझ्या वाकड्यात कधी शिरला का? सांग ना? आम्ही आमच आयुष्य जगत होतो ना सुखाने तर तू तूच मला फोन केलास! संग्रामला त्रास देत राहिलास मग मी ठरवले की तुझी लायकी तुला दाखवणार….तुला धडा शिवणार म्हणून मी तर तू……….माझच चुकलं मी संग्रामला अंधारात ठेवायला नको होतो म्हणूनच! सुशांत... तो मला आज म्हणाला की तो मला आणि याला एकत्र नाही पाहू शकणार म्हणून तो त्याचे डोळे कायमचे झाकत…… माझच चुकलं!” ती राजवीरच्या कानाखाली अजून दोन तीन लागवून दिल्या राजवीर हात जोडून उभा होता सुशांतने गार्गीचे हात धरले गार्गी रडत सुशांतच्या कुशीत शिरली. तिला सावरत सुशांत राजवीरवर ओरडला.

सुशांत,“ राजवीर जा तू इथून एक मिनिटं जरी तिथे थांबलास ना तर मी तुझं...निघ!”तो रागाने ओरडला.

सगळे राजवीरचे आणि गार्गीचे बोलणे ऐकून स्तिमित होते. मनीषाताई आणि संजयराव यांनी व्हिडीओ पाहिल्यामुळे त्यांना गार्गीने संग्रामसाठीच हे सगळे केले होते. हे माहीत होते पण राजवीरने जे केले ते त्यांना माहीत नव्हते. गार्गीने संग्रामला अंधारात ठेवले होते आणि त्याचाच फायदा घेऊन राजवीरने संग्रामला टॉर्चर केले होते. गौरव आणि मीनाताई मात्र गार्गीवर चांगलेच चिडले होते मीनाताई पुढे आल्या आणि त्यांनी गार्गीच्या दंडाला धरून तिला कानाखाली ओढली आणि त्या बोलू लागल्या.

मीनाताई,“ लाज कशी वाटली नाही तुला हे सगळं करताना ग? त्याला अंधारात ठेवून तू हे धंदे करत होतील? आज तू आमची मान शरमेने खाली केलीस बरं झालं तुझं हे रूप पाहायला तुझे पप्पा या जगात नाहीत त्यांना ही…...गार्गी आज जर संग्रामला काही झालं ना….”त्यांनी पुन्हा तिला मारायला हात उगारला आणि संजयराव त्यांना थांबवले आणि ते गार्गीला जवळ घेऊन बोलू लागले.


संजयराव,“ ताई अहो काय करताय तुम्ही! तिची अवस्था तर बघा आणि मान्य गार्गीने संग्रामला अंधारात ठेवून हे सगळं केलं ही तिची चूक आहे पण आम्ही व्हिडीओ पाहिला आहे तिने जे केले ते संग्रामाच्या प्रेमा पोटी केलं आणि राजवीरला धडा शिकवण्यासाठी केलं! आणि ताई संग्राम आज ज्या अवस्थेत आहे त्याला गार्गी जबाबदार नाही. माझ्या पोराचा मला अभिमानच आहे त्याने 3500 लोकांचा जीव वाचवला आहे. जर ही घटना घडली नसती तर गार्गीने त्याला हा व्हिडीओ दाखवला असता तो चिडला असता फार फार तर महिना दोन महिने गार्गीशी बोलला नसता पण नंतर सगळं सुरळीत झालं असत पण आपलं दुर्दैव की त्याला खरं काळण्या आधीच हे सगळं झालं!” ते म्हणाले आणि रडत असलेल्या गार्गीचे त्यांनी डोळे पुसले

गार्गी,“ बाबा I am sorry खरंच माझं चुकलं मी….मी संग्रामला अंधारात ठेवायला नको होतं. पण मी नाही राहू शकणार त्याच्या शिवाय त्याला काही झालं तर…..!” ती रडत त्यांना मिठी मारून बोलत होती.

संजयराव,“ बेटा तू आधी शांत हो बघू .. त्याला काही होणार नाही. मनीषा हिला सांभाळ!” ते म्हणाले


आणि मनीषाताईंनी गार्गीचा हात धरून तिला खुर्चीवर बसवले. त्या तिला पाणी देत होत्या पण गार्गीने ते घेतले नाही. हे सगळं गौरव आणि मीनाताई समाधानाने डोळ्यात पाणी आणून पाहत होते. तब्बल पाच तासाने O. T चे दार उघडले आणि सुशांत तिकडे धावतच केला बाकी सगळे ही गेले. डॉक्टर बाहेर आले आणि सुशांतने डॉक्टरांना काळजीने विचारले.

सुशांत,“ कसा आहे तो आता? तो ठीक आहे ना?”

डॉक्टर,“sorry to say पण तो ठीक नाही गोळी डाव्या छातीला हार्टच्या काहीच इंच खाली लागली आहे. ती आम्ही काढली आहे पण ब्लड लॉस खूप झाला आणि त्याचा बी.पी खूप जास्त लो आहे त्यामुळे त्याची कंडिशन अजून खराब झाली आहे. असं वाटतंय की त्याच्यावर खूप मोठा मानसिक आघात झाला असावा त्यामुळे तो उपचारांना नीट प्रतिसाद देईल का याची शंका वाटते. Sorry to say but He is critical!सध्या तर आम्ही काहीच सांगू शकत नाही let\"s hope for the best!आम्ही त्यांना I.C.U मध्ये शीफ्ट करत आहोत तुम्ही त्यांना एक एक करून पाहू शकता.” असं म्हणून ते गेले.

आता सकाळचे सात वाजले होते. सगळे एक एक करून संग्रामला पाहून आले आणि सगळ्यात शेवटी गार्गी दार उघडून आत गेली. ती संग्रामाच्या जवळ गेली. त्याला पाहू लागली. तो शांत झोपला होता.रक्तस्त्राव झाल्यामुळे पिवळसर पांढरट पडलेला निस्तेज चेहरा,छातीला बांधलेली भली मोठी पट्टी त्याला अजून ही रक्ताचे डाग दिसत होते. हाताला ड्रीप लावून चढवलेले रक्त,नाकाला ऑक्सिजनची नळी आणि त्याच्या शरीराला जोडलेल्या बीप बीप आवाज करणाऱ्या मेडिकल मशिन्स ते सगळं पाहून गार्गीला गलबलून आलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने त्याच्या केसातून हात फिरवला त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याचा हात धरून ती स्टूलवर बसून बोलू लागली.

गार्गी,“ I am sorry gd! माझं चुकलं! मी असं वागायला नको होतं तुला अंधारात ठेवलं आणि म्हणूनच तुला तो नालायक राजवीर त्रास देऊ शकला!तू एकदा डोळे उघड ना! तू जी शिक्षा मला देशील ती मी भोगायला तयार आहे!तू कायमच असं करतोस gd! तुला काय बोलायचं ते सगळं बोलून मोकळा होतोस पण माझं काहीच ऐकून घेत नाहीस! आता तू उठलास की मी बोलणार आणि तू ऐकायचं! मला माहिती आहे मी चुकले आहे म्हणून तू माझ्यावर चिडला ना! मग तू जी शिक्षा देशील ती मला मान्य!!आता लवकर डोळे उघड मी बाहेर आहे! Love you gd!” ती म्हणाली आणि त्याच्या हाताचे चुंबन घेऊन बाहेर गेली.

तो पर्यंत संग्रामचे काका-काकू, अमर, रौनक, रशमी सांगली वरून हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. भावाला पाहून इतका वेळ धीराने घेणाऱ्या संजयरावांचा मात्र आता बांध फुटला! ते संग्रामाच्या काकांच्या गळ्यात पडून रडू लागले.

संजयराव,“ दादा चिनू! त्याची अवस्था बघवत नाही मला!त्याला काही होणार तर नाही ना!”

काका,“ संज्या शांत हो!आपल्या पोराने किती लोकांचे जीव वाचवले ते सगळे आशिर्वाद त्याला मिळालेच असतील ना! बाहेर सगळे लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत काही होणार नाही बघ त्याला!तू नको काळजी करू!” ते त्यांना धीर देत बोलत होते.

अमर आणि रौनक, काचेतून संग्रामला पाहून सुशांत जवळ जाऊन संग्रामाच्या तब्बेतीची चौकशी करत होते तर काकू,रशमी मनीषाताई आणि गार्गीला धीर देत होत्या. दोन इन्स्पेक्टर आणि दहा कॉन्स्टेबलचा फैजफाटा सिक्युरिटीसाठी V I P विभागात तैनात होता तर हॉस्पिटल बाहेर शंभर-दीडशे पोलीस मीडिया आणि लोकांना सांभाळत होते. इन्स्पेक्टरकडून सतत गृह मंत्र्यांकडून संग्रामाच्या तब्बेतीची चौकशी केली जात होती. आज सगळ्या न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवर संग्रामचा फोटो आणि त्याने केलेल्या पराक्रम झळकत होता. लोकांना आणि मिडीयाला त्याच्या तब्बेतीची माहिती मिळावी म्हणून डॉक्टरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्या तब्बेती बद्दल माहिती दिली होती. लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. I C U च्या बाहेर त्याचे कुटुंबीय ही त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते.गार्गी सतत त्याला काचेतून पाहत होती.

या सगळ्या पासून अनभिज्ञ असणारा संग्राम मृत्यूशी झुंजत होता.तेव्हढ्यात संग्रामला तपासायला गेलेली नर्स बाहेर येवून धावतच डॉक्टरच्या केबीनकडे केली. दोन डॉक्टर्स आणि दोन नर्स धावतच I. C. U मध्ये गेले. ते काही तरी चर्चा करून संग्रामची ट्रीटमेंट करत होते आणि बाहेर सगळे भेदरलेल्या नजरेने हतबलपणे बसले होते. सुशांत आणि गार्गी मात्र काचेतून आत काय चालले आहे ते पाहत होते.

संग्रामचे काय होणार होते? तो गार्गीला म्हणाल्या प्रमाणे कायमचे डोळे बंद करणार होता का?

©स्वामिनी चौगुले








🎭 Series Post

View all