माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ७६

This Is A Love Story


भाग 76
हॉल अगदी प्रोफेशनली सजवण्यात आला होता.कार्यक्रम सुरू व्हायला फक्त पंधरा मिनिटे होती त्यामुळे लोक अजून येतच होते.सगळ्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील लहान कंपन्याच्या मालकांपासून मल्टिनॅशनल कंपन्यांचे मालक सुद्धा दिसत होते.सगळे अगदी प्रोफेशनल लूक मध्ये होते.बऱ्याच स्त्रिया ही यात सामील होत्या.काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे तिथे दिसत होते.हॉल जवळ जवळ 1500ते 2500 लोकांनी फुलून गेला होता.सगळीकडे टेबल खुर्च्या अगदी व्यवस्थित मांडले होते.टेबलांवर प्रत्येकाच्या नावाची नेमप्लेट होती. वेटर्स अदबीने कोल्ड्रिंक्स आणि सॅक्सचे ट्रेज घेऊन फिरत होते. स्टेजवर एक मोठी स्क्रीन आणि प्रोजेक्टर होता. स्टेज पासून थोड्या अंतरावर एका टेबलवर संग्रामच्या आणि सुशांतच्या नावाची नेमप्लेट होती.ते तिघे म्हणजे गार्गी, संग्राम आणि सुशांत त्या टेबलवर जाऊन बसले.

आता कार्यक्रम सुरू झाला पण गार्गीचे मन मात्र थऱ्यावर नव्हते.तिला सतत कसली तरी हुरहूर लागून राहिली होती.तिचे सगळे लक्ष संग्रामकडे होते तिचे मन त्याला नजरे आड करायला धजावत नव्हते.


संग्राम मात्र वेगळ्याच विचारात हरवला होता.“आज गार्गी त्याच्याशी काय आणि कसे बोलणार?सोक्षमोक्ष लावणार म्हणजे नेमके काय करणार?आपण ज्या गार्गीला ओळखत होतो ती हीच गार्गी आहे का?जी इतकी बदलली आहे की आपणच हिला ओळखण्यात चूक केली आहे?ही राजवीरच्या प्रत्येक हो ला हो कशी करू शकते?हिला पैसेच हवे होते तर लग्नानंतर हि आपल्यालाच काय तर आई-बाबांना ही 25-30लाख काय पण त्याही पेक्षा दुप्पट लुटू शकली असती पण तिने असे काहीच केले नाही उलट तिने आज पर्यंत बायको म्हणून देखील मला कधी खर्चायला देखील पैसे मागितले नाहीत मग आताच ही अशी का वागत आहे?तिने नवरा काय पण मित्र सुद्धा कधी समजले नाही त्यामुळे कदाचित तिने पैशाची अपेक्षा केली नसेल किंवा अशा प्रकारे कधी तरी तिला ते मागायचे असतील? तिला आमचे नाते पुढे न्यायचे होते पण तेंव्हा राजवीर नव्हता आला तिच्या आयुष्यात! संग्राम तिच्या लेखी तू कोणीच नाहीस राजवीर म्हणाला तसे तिला कोणाच्या तरी भावनिक आधाराची गरज होती आणि तू तिच्यासाठी स्टेपनी होतास त्या पेक्षा जास्त काहीच नाही!पण आता आई-बाबा बाकी सगळे आणि मम्मा आणि गौरव दादा या सगळ्यांना आपण कशी आणि काय उत्तरे देणार आहोत?”एक ना अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात माजले होते.त्याला समोर काय घडत आहे कोण काय बोलत आहे कशाचेच भान नव्हते आणि सुशांतच्या हलवण्याने तो भानावर आला.

सुशांत,“ संग्र्या अरे लक्ष कुठे आहे तुझे most promising newcomer चे अवॉर्ड तुला घोषित झाले की! जा स्टेजवर!” तो म्हणाला आणि संग्राम उठून यंत्रवत स्टेजवर गेला.टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने अवॉर्ड घेतलं आणि फक्त थँक्स म्हणून खाली येऊन पुन्हा जाग्यावर बसला.

गार्गीने हसून त्याचे अभिनंदन केले आणि तो कुसनुस हसला.त्यानंतर ही best partnership, best partner, best start-up business अशे अजून दोन तीन अवार्ड संग्राम आणि सुशांतला मिळाले. त्यामुळे राजवीरचा मात्र जळफळाट होत होता. संग्राम best start-up business चे अवॉर्ड घायला स्टेजवर गेला आणि तो खाली येऊन त्याच्या टेबलकडे जाताना राजवीरने त्याला मध्येच अडवले आणि तो त्याचे अभिनंदन करण्याच्या बहाण्याने त्याला हळूच म्हणाला.

राजवीर,“ तू आज किती ही ट्रॉफ्या मिळव रे पण ती ट्रॉफी तर माझी आहे आणि तू लुझर आहेस!” तो गार्गीकडे पाहून कुत्सिपणे हसून म्हणाला आणि संग्रामचा आधीच उतरलेला चेहरा अजून उतरला.

त्याला आणखीनच मानसिक दडपण जाणवू लागले आणि थोडे गरगरल्या सारखे देखील झाले पण त्याने स्वतःला सावरले आणि तो पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला.सुशांत आणि गार्गीने ही राजवीर संग्रामला बोलत असताना पाहिले होते आणि सुशांतने त्याला विचारले.

सुशांत,“ काय म्हणत होता रे तो राजवीर?”

संग्राम,“ काही नाही अभिनंदन करत होता!” तो म्हणाला.पण त्याच्या चेहऱ्यावरून तर तसं वाटत नव्हतं सुशांत आणि गार्गीच्या ही ते लक्षात आले होते पण पुढचा अवॉर्ड अनौन्स झाले आणि सुशांतचा फोन वाजला म्हणून तो तिथून जरा लांब गेला. गार्गीला ही तिथे तिच्या ओळखीचे कोणी दिसले म्हणून ती गेली.असं ही फंक्शन आता संपत आले होते. शेवटचे तीन-चार अवॉर्ड राहिले होते.संग्राम त्याच्याच तंद्रीत बसला होता आणि पुढचे अवॉर्ड most consistent performance of the Year चे अवॉर्ड राजवीरला जाहीर झाले तो स्टेजवर गेला आणि अचानकपणे दुसऱ्या बाजूने गार्गी स्टेजवर चढली. संग्राम तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता पण दुपारचे तिचे शब्द त्याच्या कानात घुमले.

“ आज काय तो सोक्षमोक्ष लावेन मी!”
संग्राम विचार करू लागला.

“ म्हणजे आज ही या सगळ्या लोकांच्या समोर जाहीर करणार ती मला सोडून राजवीर बरोबर जाणार आहे ते! गार्गी ही खुप पर्सनल गोष्ट होती आपल्या दोघांतली तू ती अशी चव्हाट्यावर मांडायला नको होतीस! इतक्या लोकांच्या समोर त्या ही माझ्याच क्षेत्रातल्या असं तू जाहीर करणार हे! मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही! राजवीर म्हणाला ते खरंच आहे मला खरंच आज जीव द्यावासा वाटत आहे! गार्गी तू असं करायला नको होतंस! मी तुला हवं ते द्यायला तयार होतो खूप शांतपणे आणि कोणाला जास्त माहिती न होता हा खाजगी प्रश्न खाजगीत मिटवला असता पण आता तुझ्या अशा वागण्याने माझ्या बरोबर माझ्या कुटुंबाची आणि तुझ्या देखील कुटुंबाची नाचक्की होणार!”


त्याच्या डोळ्यात पाणी होतेच पण त्याला गार्गीचा राग देखील येत होता.त्याने गार्गी काय बोलणार हे गृहीत धरले होते त्यात त्याची तर काय चूक होती म्हणा! त्याला ती काय बोलणार हे ऐकायचे नव्हते रादर त्याला ते ऐकणे जड गेले असते म्हणून त्याने कोणाच्या ही नकळत तेथून वाढता पाय घेतला. सुशांत फोन संपवून आला तर त्याला ही राजवीर बरोबर गार्गी स्टेजवर पाहून धक्काच बसला. त्याने संग्रामला शोधले तर तो गायब होता. गार्गी स्टेजवरून संग्रमलाच शोधत होती पण तो तिला दिसत नव्हता. तिने सुशांतला इशाऱ्याने संग्राम कुठे आहे विचारले तर सुशांतने खांदे उडवून तिला माहीत नाही असे सांगितले. तिने सुशांतला इशारा केला आणि मोबाईलमध्ये शूटिंग काढ म्हणून सांगितले. ती आता संग्रामला शोधायला स्टेजवरून उतरून शकत नव्हती कारण तिला राजवीरला धडा शिकण्याची ही संधी सोडायची नव्हती.

सुशांतला प्रश्न पडला होता की इथे ऑल रेडी मीडिया असताना आणि शूटिंग सुरू असताना गार्गी त्याला मोबाईलमध्ये शूटिंग का कर म्हणत आहे आणि शूटिंग काढण्या सारखे ती काय करणार होती आणि संग्राम असा अचानक कुठे गेला? पण त्याने जास्त विचार न करता त्याच्या मोबाईलमध्ये शूटिंग करायला सुरुवात केली.

स्टेजवर राजवीरला अवॉर्ड देण्यात आले. राजवीर गार्गीला स्टेजवर पाहून चांगलाच चेकळला होता. त्याला वाटत होते की गार्गी सगळ्यां समोर संग्रामला सोडून माझ्याकडे येत आहे हे जाहीर करणार आता. तेवढ्यात गार्गीने हातात माईक घेतला आणि बोलू लागली.

गार्गी,“good evening! मी मिसेस गार्गी संग्राम सरनाईक ट्रिपल एसचे वोनर संग्राम सारनाईकांची सुविद्य पत्नी तर आज मी इथे आले आहे कारण मला तुम्हा सगळ्यांना काही तरी सांगायचे आहे आणि दाखवायचे देखील आहे तर मी, संग्राम,सुशांत आणि राजवीर एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो. आम्ही तिघे एकाच क्लासमध्ये तर राजवीर आम्हाला सिनिअर होता.राजवीर माझा एक्स बरका माझ्या अल्लड वयात माझी झालेली चूक म्हणा हवं तर(हे ऐकून राजवीर चपापला आणि स्टेजवरून जाऊ लागला तर गार्गीने त्याचा हात धरून त्याला रागातच थांबवून घेतले आणि पुढे बोलू लागली) कुठं जतोयस राजवीर अरे तुझे कर्तुत्वच सांगणार आहे मी!तर त्या नंतर दहा वर्षे गेली. माझं आणि संग्रामच लग्न झालं. संग्रामचा ट्रिपल एस स्टार्टअप बिझनेस तर तुम्हाला माहीतच आहे आज तब्बल चार अवॉर्ड मिळाले त्याला! तर राजवीर मोरे हा माझ्या संग्रामचा रायव्हल आहे. संग्राम आणि सुशांतला त्यांच्या चांगल्या कामामुळे सतत नवीन नवीन काँट्रॅक्ट मिळत आहेत आणि राजवीरच्या हातून ते जात आहेत. राजवीरला कळले की त्याचा निभाव यांच्या पुढे लागणार नाही. म्हणून या पाताळयंत्री नीच माणसाने संग्रामला हरवण्यासाठी त्याची सगळी वैयक्तिक माहिती काढली जी इथिकली राँन्ग आहे. जेव्हा याला कळले की मी संग्रामची बायको आहे तेंव्हा त्याला आनंद झाला कारण त्याने मला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचे ठरवले. तो एका बाजूने संग्रामला बिझनेसमध्ये सतत आडवं येऊन त्रास देत होता तर दुसऱ्या बाजूला मला फोन करत होता. मी पहिल्यांदा इग्नोर केले पण हा संग्रामला जास्तच त्रास देत आहे हे मला कळले आणि मग मी ही एक योजना बनवली खरं तर मी ही बरोबर नाहीच! कारण बिझनेसचा पहिला आणि अलिखित नियम आहे की बिझनेसमध्ये व्यक्तिगत पातळीवर यायचे नसते. कोणाच्या ही पर्सनल लाईफमध्ये बिझनेसच्या निमित्ताने ढवळा ढवळ करू नये पण राजवीर मोरे या व्यक्तीला ते काही कळत नाही!तो स्वतःच्या स्वार्थासाठी किती ही नीच पातळीवर जाऊ शकतो. त्यामुळे मला ही तेच करावे लागले. तर या नीच माणसाने मला गळ घालून ट्रिपल एसच्या सिक्रेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही त्याची रेकॉर्डिंग
(तिने फोन सुरू करून माईकला लावला सगळे लोक आणि सुशांत ही कान देऊन रेकॉर्डिंग ऐकत होते) काय मिस्टर मोरे आवाज तुमचाच आहे ना की फॉरेन्सिक टेस्ट करूयात आपण(ती कुत्सिपणे हसत बोलली आणि राजवीर मान खाली घालून उभा होता!)एव्हढच नाही तर आज या नालायक माणसाने संग्रामला डिव्हॉर्स दे आणि त्याच्याकडे भरपूर पैसा आहे तर पैसे घेऊन माझ्याकडे ये अशी मला गळ घातली. पण मी मूर्ख आहे का संग्राम सारख्या कर्तृत्ववान, प्रेमळ आणि समजूतदार माणसाला सोडून तुझ्याकडे यायला? स्वतःच तोंड एकदा आरशात पाहून ये राजवीर मोरे तू माझ्या संग्रामाच्या पाया जवळ देखील उभा राहण्याच्या लायकीचा नाही! कोण रे? काय समजतोस तू स्वतःला? वीस टक्के ती ही बापानी घेतलेल्या पार्टनरशिप वर जगणारे मांडगुळ तू! तुला मोरे अँड सन्समध्ये किती पॅकेज आहे रे? त्याच्या डबल पॅकेस संग्राम घेतो वरून कोणाची ही मदत न घेता त्याने स्वतःच्या जीवावर कंपनी सुरू केली त्याचा या वर्षाचा टर्न ओहर करोडोच्या घरात आहे! हे त्याचे व्यावसायिक कर्तृत्व आहे.

तो व्यक्तिगत आयुष्यात एक आदर्श मुलगा, एक आदर्श नवरा, एक आदर्श मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चांगला माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे! त्याची बायको असल्याचा गर्व आहे! त्याच्याबद्दल आदर आहे आणि हो सगळ्यात महत्वाचे I love him so much! तर इथून पुढे त्याच्या वाट्याला गेलास ना तर याद राख राजवीर मोरे! आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आशा पाताळयंत्री,कोणते ही इथिक्स न पाळणाऱ्या व्यक्ती बरोबर बिझनेस करावा का? हे ठरवावे!”

ती एवढं सगळं बोलली आणि स्टेजवरून उतरून सुशांतकडे केली. सुशांत तिच्याकडे अभिमानाने पाहत होता.

गार्गी,“ रेकॉर्डिंग केले का रे? आणि संग्राम कुठे गेला?”

सुशांत,“ गार्गी काय जिरवलीस ग राजवीरची! रेकॉर्डिंग केली ग मी तुला whs up करतो! ते येडं कुठं केलं काय माहीत ते हवं होत इथे!” तो भावुक होऊन म्हणाला.

गार्गी,“ ये माझ्या संग्रामला येडं नाही म्हणायचं!तो असेल इथेच कदाचित शेजारच्या बागेत बसला असेल मी जाते त्याच्याशी मला आज खूप काही बोलायचं आहे!” ती म्हणाली आणि मोबाईल घेऊन पळत सुटली.

ज्या संग्रामसाठी गार्गीने हे सगळं केलं होतं. तो संग्राम मात्र गायब होता आणि त्याच्या मन:स्थितीची थोडी ही कल्पना ना गार्गीला होती ना सुशांतला!

संग्राम गैर समजातून कोणते वेडे वाकडे पाऊल तर उचलणार नाही ना?
©स्वामिनी चौगुले

आजच्या भागात गार्गीने राजवीरला चांगलाच धडा शिकवला आहे याचं भागाची आतुरतेने वाट पाहत होता ना तुम्ही!?




🎭 Series Post

View all