माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ७३बोनस पार्ट

This Is A Love Story


संजयराव संग्रामवर चांगलेच चिडलेले दिसत होते. त्यांचं देखील बरोबरच होत. संग्राम अचानकपणे असा पूर्व कल्पना न देता पाच दिवसांसाठी बेंगलोरला निघून गेला होता. गार्गीला तर त्याने सांगितले देखील नव्हते आणि गार्गी गेल्या पाच दिवसांपासून काहीशी कोमेजलेली आणि विचार मग्न दिसत होती. तिला झालेल्या मानसिक त्रासाचा परिणाम आज दिसत होता. म्हणूनच ते संग्रामवर चांगलेच चिडले होते.

संजयराव,“तुझ्या अविचारी वागण्याचा आता कहर झाला आहे. सुमीतराव आणि मीनाताईनी किती विश्वासाने ही पोर आपल्या घरी पाठवली! त्यांना वाटत होते की ती या घरात सुखी राहील त्यांनी तिच्यासाठी निवडलेला जोडीदार तिला सुखात ठेवेल पण इथे! संग्राम मला खूप वाईट वाटतंय हे बोलताना की तू चांगला नवरा नाही होऊ शकलास!माणसाच्या आयुष्यात करिअर महत्वाचे असतेच no doubt पण आपली नाती आणि घर त्या ही पेक्षा महत्वाचे असतात!माणसाने यशा मागे नक्की धावावे पण आपल्या बरोबर चालणारी माणसे मागे राहू नयेत याची काळजी घ्यावी. असं नाही केलं तर मात्र माणूस बेफाम धावत सुटतो आणि त्याची माणसे मागे मागे पडत जातात पण संग्राम जेंव्हा तो माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो तेंव्हा तो आनंद वाटून घ्यायला त्याच्या बरोबर कोणीच नसते.तो त्या शिखरावर एकटा असतो. तिथे त्याच सुख-दुःख वाटून घ्यायला कोणी नसतं! तो सगळं मिळवून देखील एकटा राहतो! अजून ही वेळ गेली नाही सावर स्वतःला!” ते कठोरपणे बोलत होते.

संग्राम,“ sorry बाबा माझं चुकलं! इथून पुढे अशी चूक नाही होणार माझ्याकडून!” तो खाली मान घालून म्हणाला.

संजयराव,“sorry मला नाही गार्गीला म्हणायचं! काय चूक आहे रे तिची? तुझी काळजी करते ही की तिचा जीव तुझ्यावर आहे ही पाच दिवस झाले ती पोरगी कोमेजून गेली आहे!गुरुजींनी भविष्यवाणी केल्या पासून तिचा जीव थऱ्यावर नाही आणि तू असा बेजबाबदार वागत आहेस!ऐकलेस ना डॉक्टर काय म्हणाले तिची ही अवस्था मानसिक ताणतणावामुळे झाली आहे. वेळीच तिची कदर करायला शिक संग्राम! आणि इथून पुढे तुझ्याकडून अशी चूक होवू नये हीच अपेक्षा!” असं म्हणून ते निघून गेले.
संग्रामला कळून चुकलं होतं की संजयराव त्याच्यावर खूप चिडले आहेत.कारण ते संग्रामला घरी कायम चिनू किंवा बेटा म्हणत पण जेंव्हा ते त्याच्यावर खूप चिडले की मात्र त्याला संग्राम म्हणत.संग्रामला ही गार्गीची अवस्था पाहून अपराधी वाटत होतं.

“ तो राजवीर आपल्याला बोलला म्हणून आपण मागचा पुढचा विचार न करता रागात तडकाफडकी बेंगलोरला निघून गेलो.त्याचा त्रास मात्र गार्गीला झाला त्यात आपण तिच्याशी फोनवर देखील भांडलो!” तो विचार करत रूममध्ये गेला.
मनीषाताई गार्गीच्या उशाशी बसून तिच्या कपाळावर गार पाण्याची पट्टी ठेवत होत्या. एवढं सगळं होई पर्यंत आठ वाजले होते. थोड्याच वेळात जेवणाची वेळ होणार होती. संग्राम त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना हळू आवाजात म्हणाला.

संग्राम,“ आई तू जा मी आहे गार्गी जवळ बाकी सगळं राधा मावशी करतील स्वयंपाकच! पण बाबांच्या डाएटमुळे त्याचे जेवण तुलाच बनवावे लागते ना! तू जा आवर जा आठ वाजून गेले आहेत!” तो म्हणाला.

मनिषाताई,“ हो मी जाते पण चिनू तू या गेल्या काही दिवसात जे काही वागला आहेस ते आम्हाला कोणालाच नाही आवडले! बेटा गार्गी तुझी बायको आहे ती तुझी पहिली जबाबदारी आणि मग बाकी! तुला नंतर बघते तुझ्या बाबांनी केलीच असेल म्हणा कान उघाडणी!”त्या त्याचा कान ओढत म्हणाल्या.

संग्राम,“ हो मीच माती खाल्ली आहे तर आता सगळेच बोला मला!” तो तोंड वाकड करत म्हणाला.

मनीषाताई,“ खाल्ली ना माती मग निस्तरा आता! मी आवरते मग तुला बोलवते! गार्गी उठून काही खाते का पाहू नाही तर दूध देते तिला पाज आणि औषध दे!” त्या म्हणाल्या आणि निघून गेला.

संग्राम गार्गी जवळ बसला. गार्गी जवळ जवळ ग्लानीतच होती. तो तिचा हात हातात घेऊन विचार करत होता.

“ काय हे गार्गी कसला इतका मानसिक ताण आला आहे तुला? कदाचित आता तुझा राजवीर बरोबर जण्याचा निर्णय सगळ्यांना रादर मला कसा सांगायचा याचा जर ताण आला असेल तर तो घेऊ नकोस! मी तुझ्या आनंदासाठी तुला सोडायला ही तयार आहे आणि काळजी करू नकोस तू; मी मम्मा आणि आई-बाबांना ही समजावेन!तू फक्त लवकर बरी हो!”
तो तिच्या जवळ बसून राहिला. मनिषाताई आणि संजयराव रूममध्ये आले. मनिषाताईच्या हातात भात वरणाच ताट होत.त्या म्हणाल्या.

मानिषाताई,“ मी ती खाते का पाहते जरा! गार्गी ये गार्गी बेटा थोडं खा आणि औषध घेऊन मग झोप!”त्या तिला म्हणाल्या आणि गार्गीने डोळे किलकिले करून त्यांना पाहिले आणि मानेनेच नको म्हणून सांगितले. मनिषाताई आणि संजयरावांनी तसेच संग्रामने ही तिला बऱ्याच वेळा उठण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे काही उघडत नव्हते ती मानेनेच नको म्हणून सांगत होती.

संजयराव,“ राहू द्या तिला सारख सारख त्रास द्यायला नको! माझं जेवण झालं आहे तुम्ही दोघे जेवून घ्या मी आहे तिच्या जवळ आणि संग्राम येताना दूध घेऊन ये तिला पाज तेव्हढं आणि औषध मी मागवून घेतली आहेत माधवकडून ती दे!”ते म्हणाले.

संग्राम,“ तुम्ही जा मी आहे इथे!मला भूक नाही आई तू दूध पाठवून दे आणि जेव!” तो म्हणाला.

संजयराव,“ दुपारी कधी आणि कुठे जेवलास तुझे तुलाच माहीत! तुझ्या उपाशी राहण्याने गार्गी लवकर बरी नाही होणार! जा जेवण कर!” ते कडाडले आणि संग्राम जेवायला गुपचूप निघून गेला.

तो जेवण करून ग्लास भर दूध घेऊन आला आणि गार्गीला जबरदस्तीने उठवून बेडला टेकून बसवले. गार्गी डोळे कसेबसे उघडून बसली होती. त्याने तिला दूध पाजले आणि औषधं दिली. तिला नीट झोपवून पांघरून घातले. ती अर्धवट झोपेत ही पुटपुटत होती.

“ संग्राम मला…. तुला…..सांगायचं! की आपण कधीच एक...”ती पुढे बोलणार तर
संग्रामने तिला डोक्यावर थोपटले आणि ती पुन्हा गाढ झोपून गेली.संग्राम रात्री तिचा ताप अधून मधून पाहत होता. मध्यरात्री नंतर तिचा ताप पूर्ण उतरला आणि संग्रामला हायसे वाटले. त्याला ही नंतर कधी तरी झोप लागली.मोबाईलच्या व्हायब्रेशनने त्याला जाग आली. तर गार्गी रात्री कधी तरी त्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्या कुशीत झोपली होती. त्याने दुसरा हात लांबवून कॉर्नर टेबलवरचा मोबाईल कसा बसा घेतला! तर स्क्रीनवर नाव फ्लॅश होत होतं सुशांत! त्याने फोन उचलला आणि हळू आवाजात बोलू लागला.

संग्राम,“ बोल रे सुशा!”

सुशांत,“ अरे त्या बिन डोक नित्या(त्यांच्या कंपनीत काम करणारा कर्मचारी) आपल्याला ट्रिपल एसला असोसिएशनच्या अवोर्ड सेरेमेनीचे दोन दिवसांपूर्वी आलेले इंनव्हीटेशन मला दाखवले ही नाही आणि सांगितले ही नाही आज असोसिएशन मधून फोन आल्यावर मला कळले आज त्याला लय झापला आहे!” तो तावातावाने मोठ्यानेच बोलत होता.

संग्राम,“ सुशा जरा हळू बोल की! आणि ते फंक्शन कधी आहे आणि कुठे आहे?” तो पुन्हा हळू आवाजात म्हणाला!”

सुशांत,“ आज रात्री! माथेरानला! इतकं हळू का बोलत आहेस गार्गीने फायरिंग केली वाटतं!” तो मोठ्याने हसत म्हणाला.

संग्राम,“ ती कशाची फायरिंग करतेय रात्री पासून तिला ताप आहे!त्यामुळे देखील आणि इतक्या शॉर्ट नोटिसवर मी कसा येणार रे फेक्शनला? कालच बेंगलोर वरून आलोय मी!तू जा आपल्याला अवॉर्ड मिळाले तर किंवा मला मिळाले तरी माझ्या तर्फे तूच घेऊन ये अवॉर्ड! ” तो बोलत होता आणि त्याच्या आवाजाने गार्गी कधीच जागी होऊन त्याचे बोलणे ऐकत होती तिने अचानक त्याच्या फोनचे स्पीकरचे बटन दाबले आणि सुशांतला झोपेतच विचारले.

गार्गी,“ कसेल अवॉर्ड? कसले फंक्शन रे सुशांत?”

सुशांत,“काय ग तू त्या संग्र्याला चांगलं भांडायचे सोडून स्वतःच आजारी पडलीस होय! ते असोसिएशनचे अवॉर्ड फंक्शन आहे आज रात्री माथेरानला आणि इंनव्हीटेशन कार्ड आज माझ्या हातात पडले. ते ही मला फोन आला असोसिएशन मधून आणि मी विचारल्या नंतर त्या नित्याची या महिन्याची सॅलरी कापतो की नाही बघच!बरं ते जाऊ दे मला वाटत आपल्या कंपनीची एका वर्षातली प्रगती पाहता आपल्याला बेस्ट स्टार्टअपचा आणि न्यूव कमर वगैरेचे अवॉर्ड नक्कीच मिळणार पण संग्र्या नाही म्हणतोय आमंत्रण फॅमिलीसाठी आहे आणि समिधा तिच्या आईकडे गेली आहे! आता काय मी एकटाच जाऊ का?”तो नाराजीने बोलत होता.

गार्गी,“ नाही तू एकटा का जाणार? मी आणि संग्राम पण येणार आहोत आणि तुला किती वेळा सांगायचं त्याला संग्र्या म्हणायचं नाही म्हणून!”

संग्राम,“तीच काही ऐकू नको सुशा तू जा आम्ही येणार नाही!” तो तिकडून काही उत्तर यायच्या आधीच म्हणाला.

सुशांत,“ ये गार्गी मी त्याला संग्र्याच म्हणणार आणि यायचं नाय यायचं तुमचं तुम्ही बघा मला तर जावेच लागेल!” तो चिडवत असं म्हणाला आणि फोन कट केला.

संग्राम,“ आपण कोठे ही जात नाही आहोत गार्गी गप्प घरात बसायचं! मी श्रध्दा ताईला तुझी लिव्ह टाकायला सांगतो!मी तुझ्यासाठी नाष्टा घेऊन येतो!” तो तिच्या कपाळाला हात लावून ताप आहे का पाहत म्हणाला.

गार्गी,“ मला जायचंच आहे आणि आपण जात आहोत!ती हट्टाने म्हणाली आणि त्यांचा आवाज ऐकून मनीषाताई-संजयराव त्यांच्या रूममध्ये आले.

मनिषाताई,“ काय चालले आहे तुमचे? काय चिनू तुला कळत नाही का ती आजारी आहे ते लागलास भांडायला!” त्या त्याला दाटवत म्हणाल्या.

संग्राम,“ मला कळतय पण हिला कळत नाही ना! हिला माथेरानला जायचं आहे अवॉर्ड फंक्शनसाठी ते ही आजच! किती हट्ट करावा!” तो वैतागून म्हणाला.

संजयराव,“ गार्गी तू कुठे ही जायचे नाही! आराम कर!”

गार्गी,“ बाबा मी ठीक आहे ना बघा ताप पण नाही मला प्लिज प्लिज याला सांगा ना!मला जायचं आहे त्या फंक्शनला!” ती लहान मुली सारखी हट्ट करत होती.

संजयराव,“ पण बेटा तुझी तब्बेत ठीक नाही!” ते काळजीने बोलत होते.

मनीषाताई,“ चिनू आणि त्याचे बाबा बरोबर बोलत आहेत बेटा अग आत्ता तुझा ताप उतरला असला तरी बाहेर वाऱ्यात गेल्यावर पुन्हा आला तर आणि माथेरान जवळ आहे का?” त्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलत होत्या.

गार्गी,“माथेरान कुठे लांब आहे आई अडीच तासांचा तर रस्ता आहे आणि मी घेईन ना माझी काळजी प्लिज! मला जायचं आहे ना आणि संग्रामला नक्कीच स्टार्टअपचे सगळे अवॉर्ड मिळणार!” ती म्हणाली.

संग्राम,“ कुठे नाही जाणार आहोत आपण आई नाष्टा तयार आहे ना हिला दे आणून मी औषध देतो हिला!” तो म्हणाला आणि गार्गी हिरमुसली.

संजयराव,“ गार्गी! तुला खरंच जायचं आहे का? (त्यांनी विचारले आणि गार्गीने निरागसपणे होकारार्थी मान डोलावली.)संग्राम घेऊन जा तिला आणि हो माधवला घेऊन जा बरोबर तो ड्रायव्हिंग करेल! पण गार्गी स्वतःची काळजी घ्यायची आणि औषध वेळेवर घ्यायची आज दुपारून निघा फंक्शन अटेंड करून दुसऱ्या दिवशी निवांत या!” ते म्हणाले आणि गार्गी लहान मुली सारखी उड्या मारू लागली.

संग्राम,“ पण बाबा...!”तो पुढे काही म्हणणार तर संजयराव त्याला थांबवत म्हणाले.

संजयराव,“ अरे तिची इतकी इच्छा आहे ना मग जा ना आणि लग्न झाल्या पासून तिने पहिल्यांदा आपल्याला काही तरी मागितले आहे ना!आणि काळजी घे तिची!” ते म्हणाले आणि संग्रामचा नाईलाज झाला.

गार्गीच्या डोळ्यात मात्र वेगळीच चमक दिसत होती. राजवीरला धडा शिकवण्यासाठी ती वाट पाहत असलेली संधी तिला मिळाली होती.तिथे तर सॉफ्टवेअर क्षेत्रातील सगळे लोक जमणार होते आणि गार्गीला याच संधीचे सोने करायचे होते.तसेच फंक्शन झाल्यावर ती संग्रामला ही प्रपोज करणार होती.

गार्गी राजवीरला धडा शिकवू शकेल का?

आज खास वाचकांसाठी सरप्राईज बोनस पार्ट! डबल धमाका!म्हणजेच एकाच दिवशी कथेचे दोन पार्ट वाचा आणि आनंदी व्हा!तुमच्यासाठी खास!

©स्वामिनी चौगुले









🎭 Series Post

View all