माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ५२

This Is A Love Story


भाग ५२

गार्गीने ती डबी धडधडत्या छातीने हातात घेतली आणि संग्रामला विचारले.

गार्गी,“यात काय आहे आता?” तिने हसून विचारले.

संग्राम, “अगं उघडून तर बघ!” तो डोळे मिचकावून म्हणाला.

गार्गीने डबी उघडली आणि ती पाहतच राहिली! त्यात एक सुंदर असे सोन्याचे ब्रेसलेट होते. त्याच्या मधोमध एक सुंदर फुल आणि त्यावर केलेली खड्यांची कलाकुसर, गोल साखळीला अधेमध्ये असलेले छोटे छोटे खडे आणि शेवटी जिथे साखळीचे दोन्ही भाग एकत्र होतात जिथे ब्रेसलेट हातात घालण्यासाठी हुक होते तिथे छोटीशी साखळी आणि त्याला एकमेकांना किस करणारे छोटेसे सोन्याचे बाहुला-बाहुली. गार्गी ते ब्रेसलेट भान हरपून पाहत होती आणि ते पाहून संग्राम हसून तिला म्हणाला.

संग्राम, “ब्रेसलेट नुसते पाहण्यासाठी नाही दिले तर घालायला आणले आहे. मी म्हणालो होतो ना तुला की पहिल्या स्वर्ग सुखासाठी पहिली भेट देणार म्हणून!” त्याने असं बोलत बोलत तिच्या हातात ब्रेसलेट घातले ही!

गार्गी,“मी तर विसरून ही गेले होते. पण इतक्या दिवसांनंतर!” तिने ते आनंदाने पाहत विचारले.

संग्राम, “खूप पापड लाटावे लागले आहेत या ब्रेसलेटसाठी मला! मी स्वतः ही डिझाइन तयार केली होती म्हणजे चित्र काढले होते याचे पण इथला कोणता ही सोनार असे ब्रेसलेट तयार करून द्यायला तयार होईना! शेवटी दोन महिन्या पूर्वी सुशांतचा एक सोनार मित्र तयार झाला हे ब्रेसलेट तयार करून द्यायला पण एक महिना लागेल म्हणाला आणि दिले त्याने एकदाचे तयार करून... हेच आणायला गेलो होतो मी दुपारी! तुला आवडले की नाही ते सांग आधी?” त्याने उत्सुकतेने विचारले.

गार्गी,“नाही! खूप म्हणजे खूप आवडले. It\"s so beautiful! It\"s very special for me!” ती ब्रेसलेट घातलेल्या हात वर करून त्याला लटकलेला बाहुल्या दुसऱ्या हातात घेऊन त्यांना पाहून आनंदाने म्हणाली.

संग्राम, “मग झालं तर! गार्गी thanks!”

गार्गी,“ते कशा साठी अजून!” तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ब्रेसलेट पाहतच विचारले.

संग्राम, “आज साठी! आज बऱ्याच दिवसांनी मी आई-बाबांना इतकं खुश पाहिलं. खूप दिवसांनी त्यांच्या बरोबर मला इतका चांगला वेळ घालवता आला ते तुझ्यामुळेच!” तो थोडा भावुक होत म्हणाला.

गार्गी,“वेडा आहेस का तू मला thanks म्हणायला! अरे माणूस आहे तो पर्यंत त्याची कदर करावी. आपण आपले शिक्षण आपले करियर यात सगळं विसरून जातो. पण त्या पेक्षा ही महत्त्वाची आपल्या आजूबाजूची आपल्या प्रेमाची माणसे असतात. आपण नेमकं त्यांनाच विसरतो. आपले आई-बाबा, भाऊ- बहीण! आता हेच बघ ना मला पप्पां बरोबर खूप बोलायचे होते, त्यांच्या बरोबर खूप फिरायचे होते पण माझ्या शिक्षण आणि करिअरमध्ये मी गुरफटून गेले आणि सगळेच राहून गेले. आता मी म्हणाले तरी त्यांच्या बरोबर असे क्षण नाही जगू शकणार! (बोलताना तिचा आवाज कातर झाला होता. संग्रामने ते ओळखले आणि तिच्या हातावर हात ठेवला) म्हणून आई-बाबांना वेळ देत जा आणि त्यांनाच कशाला मला ही! कारण माणसाचा काय भरोसा माणूस आज आहे उद्या नाही. माझच सांगते! समज उद्या माझा ऑफिस मधून येताना अपघात झाला आणि मी on the spot गेले तर? किंवा उद्या परवा मी आजारी पडले आणि मला कँसर सारखा जीवघेणा आजार झाला तर?”

ती बोलत होती आणि संग्राम रागाने ताड करून उभा राहिला. गार्गीने ते पाहिले आणि ती ही उभी राहिली ती काही बोलणार तर तिला काही कळायच्या आताच संग्रामने तिचा डावा हात धरून तिच्या मागे नेला आणि तो तिला रागाने बोलू लागला.

संग्राम, “परत जर असं काही बोललीस ना तर याद राख!”

गार्गी,“सोड संग्राम माझा हात! you are hurting me!”

संग्राम, “you are also hurting me आणि एक लक्षात ठेव तू नसण्या आधी मी या जगात नसेल! कारण मी तुझी ढाल आहे!” असं म्हणून त्याने तिला रागाने धक्का दिला आणि तो गाडीत जावून बसला.

गार्गी त्याच्याकडे आवक होऊन पाहत होती. ती बराच वेळ हात चोळत राहिली. संग्रामने हॉर्न वाजवला आणि तिच्याकडे गाडीत येऊन बस म्हणून एक जळजळीत कटाक्ष टाकला. गार्गी येऊन गाडीत बसली आणि संग्रामने गाडी घराच्या दिशेने सुसाट सोडली. तो बराच रागात दिसत होता. त्याचे डोळे आणि नाक, कानशिल रागाने लाल झाली होती. गार्गी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तिने त्याला या आधी कधीच इतकं रागात पाहिले नव्हते. त्याचा तो अवतार पाहून तिची त्याच्याशी बोलायची हिम्मत झाली नाही. ती शांत बसून होती. घर आले आणि संग्रामने गाडी पार्क केली आणि तिच्याशी न बोलताच तो भरभर वर निघून गेला. गार्गी ही त्याच्या मागे धावतच गेली. संग्रामने कपडे चेंज केले आणि तिला एक शब्द ही न बोलता त्याने बेडवर बसत लॅपटॉप ओपन केला. गार्गी ही चेंज करून आली आणि त्याच्या जवळ बसत म्हणाली.

गार्गी,“sorry ना संग्राम! मी नाही बोलणार पुन्हा असं काही!” ती चेहरा बारीक करून बोलत होती.

तरी संग्राम काहीच बोलत नव्हता. तो रागाने धुमसत आहे हे तिला दिसत होते! आता ती रडकुंडीला आली आणि हुंदके देत त्याला म्हणाली.

गार्गी,“सॉरी ना! आता मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? मी म्हणाले ना परत असं बोलणार नाही म्हणून!”

ते पाहून संग्रामने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिचे डोळे हाताने पुसत म्हणाला.

संग्राम, “ok तू रडणं थांबाव आधी! पण पुन्हा मी असं काही ऐकून घेणार नाही & I am also sorry!” तो तिचा डावा हात हातात घेऊन पाहत म्हणाला.

गार्गी,“नाही बोलणार मी पुन्हा असं काही! & its ok!” ती त्याला बिलगत म्हणाली.

संग्राम, “good! हात दुखतो आहे का? मी बाम लावून देऊ का तुला?” त्याने काळजीने तिच्या हातवरून हळुवारपणे हात फिरवत विचारले.

गार्गी, “नाही दुखत माझा हात आणि मी काय इतकी लेचीपेची नाही समजलं का? तुला येत असेल जुडो कराटे पण मी ही कमी नाही कळलं का! (ती तोऱ्यात म्हणाली आणि संग्राम हसला.) That\"s like a my man!” ती त्याचे नाक चिमटीत धरून ओढत हसून म्हणाली.

संग्राम, “अकरा वाजले आहेत मॅडम झोपुया आता! उद्या तुम्हाला ही ऑफिस आहे आणि मला ही!” तो हसून म्हणाला आणि तो झोपला. गार्गी ही तिच्या जागेवर झोपली.


संग्रामला मात्र लगेच झोप लागली पण गार्गी अजून ही जागीच होती ती संग्रामाच्या थोड्या वेळा पूर्वीचा वागण्याचा विचार करत होती. संग्रामचे हे रूप तिच्यासाठी नवीन होते. तिला नेहमीच शांत आणि संयमी वाटणारा संग्राम आज त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध वागला होता. तिने संग्रामकडे पाहिले तर तो गाढ झोपला होता. गार्गीला आज तो तिच्या बाबतीत ओहर प्रोटेक्टिव्ह वाटला आणि त्याने बोललेल्या शब्द तिला आठवले. ती विचार करू लागली.

“संग्राम आपल्या बाबतीत इतका ओहर प्रोटेक्टिव्ह केंव्हा झाला? तो म्हणाला की मी नसण्या आधी तो या जगात नसेल कारण तो माझी ढाल आहे! याचा अर्थ मला नाही कळत आहे. पण याच्या अशा वागण्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. ती डबी पाहून मला वाटलं होतं की तो मला प्रपोज करेल पण कशाचं काय? तरी त्याने मला आज जे गिफ्ट दिले ते खरंच खूप सुंदर आहे. याच्या कडून प्रपोजची अपेक्षा करणे व्यर्थ आहे! गार्गी मॅडम तुम्हालाच याला प्रपोज करावं लागेल. पण उद्या त्याचा मूड पाहून त्याला आजच्या बद्दल विचारायला हवे”

ती हसून हातातले ब्रेसलेट पाहून विचार करत होती आणि तिला त्याला असं झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याचा मोह झाला आणि तो तिला आवरता आला नाही. ती त्याच्या जवळ गेली आणि प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला त्यामुळे त्याची झोप चळवळी आणि त्याने गार्गीला डोळे किलकिले करून पाहिले आणि जवळ ओढले! गार्गी देखील त्याला बिलगली. तिला त्याच्या सुरक्षित बहू पाशात कधी झोप लागली तिला ही कळले नाही.
★★★

गार्गी आज ही रोजच्या प्रमाणे उठली आणि तिचं आवरून ती किचनमध्ये गेली. निनाताई कामाला आल्या होत्या. तिने निनाताईंना स्वयंपाक काय करायचा ते सांगितले आणि घड्याळ पाहिले तर नऊ वाजले होते. तिने हॉलमध्ये येऊन बेडरूमकडे पाहिले तर संग्राम उठल्याची अजून कोणतीच हालचाल दिसत नव्हती. ती विचारात पडली

“अजून कसा उठला नाही हा! त्याची तब्बेत तर ठीक असेल ना!” या विचारा सरशी ती काळजीने बेडरूममध्ये गेली तर संग्राम नुकताच उठला होता.

गार्गी,“संग्राम तब्बेत ठीक आहे ना तुझी?” तिने त्याच्या कपाळाला हात लावून विचारले.

संग्राम, “हो मी ठीक आहे! अगं मला आज उशिराच जाग आली. तू तर उठवायच ना मला! बरं मी आलोच तयार होऊन” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता वॉशरूममध्ये निघून ही केला.


निनाताईनी स्वयंपाक आवरला. बाकी कामे त्यांनी आधीच आवरली होती. त्या निघून देखील गेल्या. संग्राम त्याचं आवरून घाईतच आला आणि गार्गीने त्याला नाष्टा वाढला. ती देखील नाष्टा करू लागली. तिने मनात शब्दांची जुळवाजुळव केली आणि तिने संग्रामला विचारले.

गार्गी,“संग्राम! काल तू जे काही वागलास ते तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध होते. तू कायम शांत आणि संयमी असतोस मग काल इतका का चिडलास?” तिने घाबरत विचारले.

संग्राम, “sorry गार्गी माझे काल चुकलंच पण तू जे बोललीस ते मला नाही सहन झाले. मी तुला काही ही झालेले नाही पाहू शकणार!” तो म्हणाला.

गार्गी,“मी तू मला sorry म्हणावे म्हणून हा विषय नाही काढला संग्राम! तू काल काय म्हणालास की मी नसण्या आधी तू या जगात नसशील कारण तू माझी ढाल आहेस याचा अर्थ नाही कळला मला!” ती त्याला पाहून म्हणाली.

संग्राम तिने हे विचारल्यामुळे थोडा चाचरला! कारण त्याला सुमीतराव आणि त्याच्यातील शेवटचे बोलणे, त्याने त्यांना दिलेले वचन आणि त्याचे तिच्यावर खूप आधी पासून असलेले प्रेम या बद्दल तिला सांगायचे नव्हते. म्हणून तो जरा सावरून बसला आणि विचार करून बोलू लागला.

संग्राम, “गार्गी तू आता माझी जबाबदारी आहेस आणि तुला काही झाले तर मला ते नाही सहन होणार म्हणून मी असं म्हणालो! बरं चल नाही तर उशीर होईल आपल्याला!” तो म्हणाला.

खरं तर गार्गीचे त्याच्या या स्पष्टीकरणाने समाधान झाले नव्हते पण तिला हा विषय आता पुढे ताणायचा देखील नव्हता म्हणून तिने गप्प राहणेच पसंत केले. तिने या विषयी श्रद्धा ताईला काय वाटते? ते विचारावे असे मनोमन ठरवले आणि ती संग्राम बरोबर ऑफिसला निघाली. संग्रामने नेहमी प्रमाणे तिला आधी ऑफिसला सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला. संग्रामच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू तिने काल पाहिला होता.

संग्रामला मात्र तिला हे सांगायचे नव्हते की एक तर त्याच तिच्यावर खूप आधी पासून प्रेम आहे दुसरी गोष्ट तो सुमितरावांना दिलेल्या वचनामुळे तो वचनबद्ध आहे. कारण त्याला स्वतःला असे वाटत होते की गार्गीने त्याला समोरून तिच्या मनात असलेले त्याच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करावे. जे त्याला पदोपदी जाणवत आणि भावत देखील होते.


पुढे संग्राम आणि गार्गीच्या नाते काय वळण घेणार होते?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all