माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ४३

This Is A Love Story


भाग ४३

आज लग्नाचा दिवस होता. त्यामुळे सगळीकडे धामधूम सुरू होती. गोरज मुहूर्तावर लग्न होते. म्हणजेच संध्याकाळी सहा वाजता! त्यामुळे आजची रात्र सगळे लोणावळ्यातच राहणार होते आणि दुसऱ्या दिवशी सगळे निघणार होते. गार्गीला जाग आली ती खाली चाललेल्या धामधुमीमुळे. तिने डोळे उघडले तर ती आज ही संग्रामाच्या मिठीत होती. संग्राम अजून ही झोपला होता. तिने घड्याळ पाहिले तर सात वाजले होते. तिने एकदा संग्रामकडे पाहिले आणि गालात हसली. तिने त्याचा हात अलगद बाजूला केला आणि उठून बसली. संग्राम अजून ही गाढ झोपेत होता. तीने त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला आणि मनात विचार करू लागली.

“संग्राम मला आयुष्य भर असंच तुझ्या मिठीत जागं व्हायचं आहे आणि रोज डोळे उघडल्यावर तुझाच चेहरा पाहायचा आहे. तू मला ना तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडलेस! तुझ्या समजूतदार, गोड आणि निर्मळ स्वभावामुळे मला तुझी भुरळ पडली! मी भाग्यवान आहे तुझ्यासारखा माणूस मला आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळाला. पप्पांची निवड अगदी योग्य होती. मी लवकरच माझे प्रेम व्यक्त करेन! मला माहित आहे तुला प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दाची गरज पडत नाही पण मला मात्र शब्दाची गरज पडते! तुझ्या सारखी अबोल भाषा मला कुठे बोलता येते.”

ती त्याच्या केसातून हात फिरवत मनात विचार करत होती आणि कालचे प्रसंग आठवून ती लाजत होती. संग्राम केव्हांच जागा झाला होता आणि तो तिला असं विचार करून स्वतःशीच लाजताना पाहत होता. त्याने तिचा त्याच्या केसात फिरणार हात धरला आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपत तिला म्हणाला.

संग्राम, “काय झालंय मॅडम आज स्वतःशीच हसताय काय? लाजताय काय?मी तर काहीच केलं नाही! मी तर बिचारा झोपलो होतो” तो हसून नाटकीपणे म्हणाला.

गार्गी,“हो ना तू खूप बिचारा रे! काही नाही कालच आठवून मला हसू येत होतं! नौटंकी कुठला! उठ आता आणि मला ही आवरू दे आणि तू ही आवर!” ती म्हणाली.

संग्राम, “अगं थांब की थोडावेळ! आता एकदा खाली गेलो आपण तर डायरेक्ट झोपयलाच येणार वर!”

गार्गी, “ते काही नाही! उठ आणि आवर लवकर!” ती म्हणाली आणि तिने संग्रामला उठवून वॉशरूममध्ये बळेबळेच पाठवले.

तो केस पुसत वॉशरूममधून आला. त्याने कॉटनचा काळे चेक्स आणि रेडिश करलचा फुल शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याला पाहून गार्गी हसली आणि तिने त्याच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टची आत गेलेली कॉलर नीट केली आणि त्याच्या हातातून टॉवेल घेत त्याला म्हणाली.

गार्गी,“बेडवर बस मी केस पुसून देते!”

ती असं म्हणून त्याला बेडवर बसवून त्याच्या समोर उभी राहून त्याचे केस पुसू लागली आणि संग्रामने मात्र तिच्या कमरेला विळखा घातला. गार्गी काहीशा लटक्या रागाने त्याच्या पासून दूर होत त्याला म्हणाली.

गार्गी,“एक चान्स नाही सोडायचा ना! आवर आता!”

संग्राम, “चान्स मिळाला तर मारून घेतो ना... नाही तरी परत घरी गेल्यावर कुठे मिळणार चान्स! उगीच मी आजारी आहे म्हणून सेवा सुरू आहे माझी नाही तर काय?” तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“हुंम्म ss म्हणजे तुला काय वाटत की मला तुझी काळजी नाही!” ती डोळे बारीक करून रागाने म्हणाली.

संग्राम, “तसं नाही..!” तो चाचरत म्हणाला.

गार्गी,“मग कसं सांग ना?” ती पुन्हा रागाचा आव आणत त्याच्या जवळ जात म्हणाली.

संग्राम, “sorry! मला तसं म्हणायचे नव्हते!” तो तोंड बारीक करून म्हणाला आणि गार्गी हसायला लागली.

गार्गी,“काकू आणि सुशांत खरंच म्हणत होते तुझ्या बद्दल.... तू ना भांडण लागले की लगेच हत्यार टाकून मोकळा होतोस!”

संग्राम,“मला तुझ्याशी बोलायचे नाही मी माझं आवरून खाली जातो तू ये तुझं झाल्यावर!” तो चिडक्या आवाजात म्हणाला.

गार्गी,“लगेच राग आला! बरं मग आता रुसवा कसा काढायचा मिस्टर सरदेसाईचा?” तिने त्याचे गाल ओढत लाडिकपणे विचारले.

संग्राम, “काही नको.... सरक मला तयार व्हायचे आहे!” तो उठत म्हणाला.

गार्गी,“बरं आता मी म्हणते sorry!” ती कान धरत क्युट चेहरा करत म्हणाली.

संग्राम, “मला नुसतं sorry नको!” तो हसून गाल पुढे करत म्हणाला आणि गार्गीने त्याच्या गालांवर ओठ ठेवले.

गार्गी,“असा कसा रे तू? समोरचा माणूस भांडायला उठला की तलवार म्यान करतोस!असं करून कसे चालेल संग्राम! अरे जग तुझ्या सारख निरागस नाही!” ती काळजीने म्हणाली.

संग्राम, “अगं घरातल्या आपल्या प्रेमाच्या माणसांशी भांडणे मला पटत नाही. चूक कोणाची हे माझ्यासाठी महत्वाचे नसते आणि भांडून मला माझ्याच माणसांना दुखवायचे नसते म्हणून मी माघार घेतो! हा पण बाहेर कोणाशी लढावे लागले तरी मी तयार असतो!बरं जा आता तयार हो आणि नाष्टा मागवून जा बाई साहेब!” तो तिला समजावत म्हणाला.

गार्गी, “you are sweet like a jaggery!” ती म्हणाली आणि नाष्ट्याची ऑर्डर देऊन गेली.

संग्रामचा आणि तिचा ही नाष्टा तिने रूम मध्येच मागवून घेतला होता. संग्राम नाष्टा करत होता आणि गार्गी साडी नेसून आली तिने सुंदर अशी जॉर्जेटची स्कॅय ब्ल्यू कलरची साडी नेसली होती त्यावर छोटी छोटी गडद निळ्या रंगाची फुले होती. साडी जास्त भारदस्त नव्हती पण स्टॅण्डर्ड होती. तिने कानात नाजूक टॉप्स, कपाळावर छोटीशी टिकली, भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्रा शिवाय काहीच घातले नव्हते. लाईट मेकअप आणि मोकळे सोडलेले केस! ती इतकी साधी तयार होऊन देखील आकर्षक दिसत होती. ती तयार होत होती आणि संग्राम तिचे अरशातले प्रतिबिंब निहाळत होता. तिचे लक्ष संग्रामकडे गेले आणि त्याने तिला नजरेनेच दाद दिली. ती खुदकन हसली आणि नाष्टा करून दोघे ही खाली गेले.

जसे दोघे खाली आले तशी एक मुलगी सॅम असं मोठ्याने ओरडत आली आणि तिने पळतच येऊन संग्रामला मिठी मारली. गार्गी आश्चर्याने आणि काहीशा रागानेच तिला पाहत होती. थोडी सावळी पण तरतरीत नाकाची मोठ्या डोळ्यांची आणि शिडशिडीत बांध्याची आकर्षक ती पंजाबी सूटमध्ये होती. संग्रामने ही तिला एका हाताने जवळ घेतले होते. त्याने आश्चर्य मिश्रित आनंदाने तिला विचारले.

संग्राम, “वंदू तू इथे?”

वंदू,“हो सॅम! अरे रशमी माझी लांबची बहीण आहे त्यामुळे मी लग्नाला आले होते तर इथे काका-काकू दिसले आणि कळले की ती तर तुमच्याच घरात लग्न करून येत आहे. guess what? Now we are relatives!” ती हसून त्याच्या समोर उभी राहत म्हणाली.

आणि संग्रामचे लक्ष गार्गीकडे गेले. तिच्या डोळ्यात कोण आहे ही असे भाव होते. संग्रामने दोघींची ओळख करून देत म्हणाला.

संग्राम,“ही गार्गी माझी बायको आणि गार्गी ही वंदिता माझी मैत्रीण!”

गार्गीने तिला नाटकीपणे हसत नुसतं हाय केलं तिला अस संग्रामला वंदिताने मिठी मारलेले तिला आवडले नाही हे स्पष्ट तिच्या डोळ्यात दिसत होते. वंदिता मात्र आता मुद्दामहुन संग्रामशी फ्लड करू लागली.

वंदिता,“काय सॅम दिवसेन दिवस हँडसम आणि हॉट दिसायला लागला आहेस! तुझी बायको वितळून जायची बर्फ़ा सारखी सांभाळ रे बाबा! आणि आज तर कातील दिसत आहेस यार!” ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

आणि गार्गी एकदा संग्रामकडे रागाने पाहिले आणि ती नाटकी हसून तिथून निघून गेली. वंदिता मात्र मोठ्याने हसायला लागली. संग्राम तिच्यावर वैतागत म्हणाला.

संग्राम,“झालं तुझ्या मनासारखं? गेली ना ती?आधीच राग मॅडमच्या नाकावर बसलेला असतो जा आता तिला काय समजवायचे ते तूच समजवायचे तो पर्यंत मी ना जीत आणि वीरला भेटतो!”

गार्गी नाराज होऊन कोपऱ्यात एका खुर्चीवर जाऊन बसली होती. तिची अपेक्षा होती की संग्राम तिची मनधरणी करायला येईल पण झालं उलटंच वंदिता तिच्या शेजारी येऊन बसली आणि तिला म्हणाली.

वंदिता,“hi! मी मिसेस वंदिता कौर कुलजीतसिंग गिल!”

गार्गी,“काय? तुमचं नाव पंजाबी?” ती आश्चर्याने म्हणाली आणि वंदिता दिलखुलास हसली.

वंदिता,“हो! ते तिकडे बघ तो माझा नवरा जीत म्हणजे कुलजीत आणि मुलगा विराज. सॅम उप्स तुझा संग्राम ज्याला खेळवत आहे ना माझा मुलगा आहे. आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आमचे लग्न सगळ्यांच्या संमतीने व्हायला संग्राम कारणीभूत आहे. इथे जात वेगळी चालत नाही मग आमची तर कम्युनिटीच वेगळी होती. जीत आम्हाला सिनिअर होता आणि मी, संग्राम एकाच वर्गात! मी आणि जीत एकमेकांच्या प्रेमात पडलो पण माझ्या आई बाबांना हे मान्य नव्हते. संग्रामने त्यांची समजून काढली आणि झालं लग्न! आज चार वर्षे झाली दोघे सुखाने संसार करतोय दोन्ही फॅमेलीज पण खुश आहेत it all because of him! एवढंच नाही तर वीरच्या जन्माच्या वेळी खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या. जीत कोलमडला पण संग्राम तेव्हा ही हजर होता हॉस्पिटलमध्ये! वीरला पहिल्यांदा त्यानेच घेतले. वीरचा फेव्हरेट मामा आहे हा तो! तो बघ संग्रामकडे कसा झेप घेतोय! तुमच्या लग्नाला मला यायचं होत पण, नेमकं तेव्हाच माझ्या नंदेच लग्न कॅनडामध्ये ठरलं होतं. मी जायला तयार नव्हते पण संग्रामने मला जा म्हणून सांगितले! मी थायलंडचे हनिमुन पॅकेज पाठवले होते तुमच्या दोघांसाठी तर तो म्हणाला की काकांनी पण मालदीवचे तिकीट बुक केले होते पण आम्ही कुठेच नाही जात आहोत कारण तुझ्या वडिलांची तब्बेत ठीक नव्हती! तुला अजून तरी जाणीव झाली की नाही माहीत नाही पण तू एका खूप समंजस आणि pure hart व्यक्तीशी लग्न केलं आहे गार्गी! You are a lucky girl who has husband like a sungram! He is a such wonderful guy! तुझ्या डोळ्यात मी त्याच्या बद्दल प्रेम पाहिलं आहे!पण तो जितका स्ट्रॉंग आहे तितकाच सेन्सिटिव्ह देखील आणि जितका शांत तितकाच जिद्दी देखील so please take care of him!” ती संग्राम विषयी भरभरून बोलत होती आणि गार्गी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.

गार्गी,“thanks! वंदिता मला आज संग्रामचा नवीन पैलू तुमच्यामुळे पहायला मिळाला!” ती संग्रामकडे पाहत तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली.

वंदिता गार्गीची काही जुजबी चौकशी करून निघून गेली. आणि हे सगळं ऐकून तिच्या मनात संग्राम बद्दल असणारे प्रेम आणि आदर अजूनच वाढला होता. गार्गी ने लांब उभी राहून तिच्या मोबाईल मधून संग्राम वीरशी खेळत असलेले फोटो काढले आणि ती त्याच्या जवळ जाऊन वीरला घेऊन खेळू लागली. संग्रामचा मोबाईल वाजला त्याने तो काढून पाहिला आणि इथून हळूच वर रूममध्ये गेला. गॅलरीत जाऊन त्याने फोन लावला.

संग्राम, “बोल रे सुशा मी उद्या येणारच आहे की इतका फोन करत आहेस ते काय झालं?”

सुशांत, “sorry यार! पण बातमीच तशी आहे! म्हणून तुला न राहवून फोन केला!” तो थोडा काळजीने बोलत होता.

संग्राम, “sorry काय मी सहज म्हणालो बोल ना!”

सुशांत,“आपल्याला ते मेहता अँड सन्सचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे ना जे त्याच्या कंपनीला इतकी वर्षे झाले मिळत होते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने आपण हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यास कसे असक्षम आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे!” तो सांगत होता.

संग्राम, “मग ते काय म्हणाले?”

तो बोलत होता आणि गार्गीने त्याला मागून येऊन मिठी मारली आणि संग्रामने फोन ठेवला.

©swamini chougule

🎭 Series Post

View all