माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३७

This Is A Love Story


भाग ३७

मीनाताई आणि मनीषाताई संग्राम-गार्गीच्या रूममध्ये बराच वेळ बसल्या होत्या. मनीषाताईंनी आज संग्रामला भरवले आणि गार्गी खाली जाऊन जेवण करून आली. संजयराव, संग्रामचे काका - काकू संग्रामला भेटून आणि त्याच्याशी बोलून गेले. सुशांतचा देखील फोन येऊन गेला. सगळे दोघांना गुड नाईट म्हणून निघून गेले. गार्गीने या सगळ्यात देखील त्याला आठवणीने मेडिसीन्स दिले होते. त्यामुळे त्याला झोप येत होती म्हणून ती त्याला म्हणाली.

“संग्राम तुला क्रीम लावायची राहिली आहे!”

संग्राम,“कमी झाले आहेत ना पुरळ आता मग कशाला? मी झोपतो आता!” तो वैतागून झोपायच्या तयारीने म्हणाला.

गार्गी,“झाली का तुझी नाटकं पुन्हा सुरू? एक लहान मूल परवडले बाबा पण तू नको!” ती त्याला पुन्हा बसवत तक्रारीच्या सुरात म्हणाली.

संग्राम,“बरं लाव बाई! तू असं ही माझं ऐकणार थोडीच आहेस!” तो तिला कुर्ता काढत म्हणाला.

गार्गीने त्याच्या अंगाला क्रीम लावली आणि संग्राम झोपला. मेडिसीन्स मुळे त्याला लवकरच गाढ झोप लागली होती. गार्गीला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. ती संग्रामकडे वळली तर तो गाढ झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर बरोबर टेबल लॅम्पचा मंद प्रकाश पडलेला होता. फॅनच्या वाऱ्यामुळे त्याचे केस उडत होते आणि शांत चेहऱ्यावर गोड हसू पसरले होते. त्याला तस झोपलेल पाहून गार्गीला मात्र राहवत नव्हतं आणि ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यामुळे संग्रामने थोडी चुळबुळ केली पण औषधांमुळे तो एक प्रकारच्या धुंधित पुन्हा झोपला. गार्गी मात्र त्याला मिठी मारून झोपली आणि संग्रामचा हात देखील आपसूकच तिच्या पाठीवर गेला आणि तो ही तिला मिठी मारून झोपला. रात्री चांगली झोप झाल्यामुळे संग्रामला सकाळी लवकरच जाग आली त्याने डोळे उघडे तर गार्गी त्याच्या मिठीत लहान मुली सारखी झोपली होती. संग्रामला प्रथम तिला असं त्याच्या मिठीत पाहून बरं वाटले! त्याने तिचा चेहरा बराच वेळ निहाळला आणि भानावर येत मनात विचार केला.

“संग्रामराव आज तुमचं काही खरं नाही गार्गीला तिच्या असं जवळ आलेलं आवडत नाही आणि आज चक्क ती तुमच्या मिठीत आहे. ती अजून झोपली आहे म्हणून बरं पण उठली की तांडव करणार ती! आज तुम्हीं मेलात ठार! पण मी तर माझ्या जागेवरच आहे पण ही कधी आणि कशी आली माझ्या मिठीत!” तो हा विचार करत होता आणि गार्गीची चुळबूळ झाली. तिला संग्रामने जागी होताना पाहिली आणि घाबरून डोळे बंद करून झोपायचे नाटक केले.

गार्गीने डोळे उघडले आणि संग्रामकडे पाहिले. घड्याळ पाहिले तर आत्ता सहा वाजले होते. तिला त्याच्या मिठीतुन सुटावे असे वाटत नव्हते आणि अजून सगळे उठायला वेळ होता. गार्गी संग्रामला पाहत होती. ती कालचा विचार करून हसली आणि तो झोपला आहे असा विचार करून हळू आवाजात बोलू लागली.

“हे काळे भोर केस, रुंद कपाळ, भुरे गहिरे डोळे त्यात पाहिलं की असं वाटत की आता मी बुडते की काय? बाणा सारखे सरळ नाक, नाजूक ओठ, उभट चेहरा! हसल्यावर दिसणारा डबल दात साहेबांचे स्माईल अजूनच किलर बनवतो! रुंद खांदे आणि पिळदार शरीर स्वतः आहेत साहेब एखाद्या ग्रीक देवते सारखे आणि यांना म्हणे स्वर्गसुख अनुभवाचे आहे!” ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत बोलत होती आणि अचानक संग्रामने डोळे उघडले. ते पाहून गार्गी गोरिमोरी झाली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला उठताच येईना तिने पाहिले तर संग्रामने तिच्या कंबरेला मिठी मारून धरून ठेवले होते. ते पाहून ती कसबस उसनं अवसान आणून त्याच्या पासून नजर चोरत त्याला म्हणाली.

गार्गी,“काय फाजीलपणा आहे हा संग्राम सोड मला!”

संग्राम,“अच्छा मी फाजीलपणा केला का? मी माझ्या जागेवर झोपलो आहे इथं कोण आले आहे? आणि मी झोपलोय समजून काय काय बोलत होतीस? मला अजून एकदा ऐकायचे आहे!” तो खोडसाळपणे हसत म्हणाला.

गार्गी,“तू झोपला नव्हतास तर मग ऐकलं ना सगळं मग सोड आता!” स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.

संग्राम,“मघाशी झोपलो होतो तेंव्हा ऐकले आता जागेपणी ऐकायचे आहे!” तो तिला अजून जवळ ओढत म्हणाला.

इतका वेळ गोंधळलेली गार्गी आता चांगलीच सावरली आणि आता त्याच्या डोळ्यात पाहून बोलू लागली.

गार्गी,“आकाशवाणी एकदाच होत असते. बरं मग सोड ना आता!” ती पुन्हा सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

संग्राम,“असं का? मला तर माहीत नव्हते मी कोणाच्या तरी नजरेत ग्रीक देवते सारखा दिसतो आणि काल मी जे पुटपुटलो ते ऐकलं होतस तर तू!” तो तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर करत म्हणाला.

गार्गी,“हो ऐकलं होतं मी तू पुटपुटला ते आणि दिसतोस तू ग्रीक देवते सारखा हँडसम पण काय उपयोग स्वर्गसुख नाही अनुभवायला मिळाले ना!” ती काहीशी चिडवत त्याला म्हणाली.

संग्राम,“असुदे आमचं कुठलं एवढं नशीब!” तो खट्टू होत म्हणाला आणि त्याने गार्गीला सोडले.

गार्गी,“असं! नशिबात नाही का आमच्या gd च्या पण नशिबात असू ही शकतं!”

तिने त्याने सोडलेला त्याचा हात पुन्हा स्वतःच्या कमरेवर ठेवून घेतला आणि अलगद त्याच्या ओठावर ओठ ठेवले! संग्रामला पहिल्यांदा काय घडतंय ते कळले नाही. पण दोनच मिनिटात त्याने त्याचा तिच्या कामरेवरचा हात तिच्या मानेत घातला आणि तिला अजून जवळ ओढले. दोघे ही बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतत राहिले. गार्गीने स्वतःला त्याच्या पासून सोडवून घेतलं आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले. संग्राम तिच्या केसातून हात फिरवत होता दोघांचा ही वाढलेला श्वास नॉर्मल करण्यात थोडा वेळ गेला. संग्रामला कधीच वाटले नव्हते की गार्गी असं काही तरी करेल. पण त्याने लग्ना नंतर आज जवळ जवळ चार-पाच महिन्यांनी ते हळुवार क्षण अनुभवले होते. थोडा वेळाने गार्गी उठू लागली पण पुन्हा संग्रामने तिला ओढून घेतले आणि तिला काही कळायच्या आतच त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला. गार्गी ही त्याच्यात विरघळू लागली आणि संग्राम हळूहळू पुढे सरकू लागला. पण गार्गी अचानक भानावर आली आणि तिने संग्रामला स्वतः पासून दूर केले. संग्राम ही आता भानावर आला आणि त्याला तो जे वागला त्याचे गिल्ट वाटू लागले म्हणून तो स्वतःला सावरत बेडला टेकून बसत म्हणाला.

“I am really sorry! मी तुझ्याशी असं वागायला नको होतं!” तो खाली मान घालून नजर झुकून म्हणाला गार्गी पुन्हा त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या ओठावर बोट ठेवत त्याला पुन्हा बिलगून म्हणाली.

गार्गी,“sorry for what? तू काही ही चुकीचा वागला नाहीस संग्राम! मला आपलं नातं पुढे न्यायचे आहे त्याचीच सुरवात समज हवं तर ही! पण मला थोडा वेळ हवा आहे! by the way I am yours if you have….!” ती पुढे बोलणार तर संग्रामने तिला मध्येच थांबवले कारण त्याला तिच्या बोलण्याचा रोख आणि अर्थ देखील समजला होता.

संग्राम,“गार्गी मुळात मी तुझ्या अटी मनापासून मान्य करून तुझ्याशी लग्न केले होते आणि तुझ्या कडून कोणती ही अपेक्षा केली नाही. तुझ्यावर आपले नाते लादणार देखील नाही!तुला आपले नाते पुढे न्यायचे आहे तर मी तुझ्या सोबत आहे आणि तू माझी असायला आणि मी तुला मला हवी तशी वापरायला तू काही एखादी वस्तू नाहीस एक स्वतंत्र व्यक्ती आहेस! जो पर्यंत तू मनाने तयार होत नाहीस तो पर्यंत आणि तू स्वतः पुढाकार घेत नाहीस तो पर्यंत मी थांबायला तयार आहे अगदी माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत!” तो गंभीर होत म्हणाला.

गार्गी,“खबरदार असलं काही अभद्र बोलशील तर आधीच स्वर्गाच्या पायरीला हात लावून आला आहेस माघारी! मला तुझ्या बरोबर जगायचे आहे कळलं तुला?” ती त्याला रागाने त्याच्या पासून दूर होत म्हणाली.

संग्राम,“sorry! पण आपल्या नात्या विषयी अंतिम निर्णय कायम तुझाच असेल! माझ्या सहवासामुळे किंवा मग मी आजारी आहे म्हणून ही तुला आता आपलं नातं पुढे न्यावं असं वाटू शकते. पण ही एक फेज ही असू शकते. आता जे तुला वाटतं तसच पुढे वाटेल असं नाही ना! पण तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या बरोबर असेन गार्गी!” तो पुन्हा गंभीर होत बोलत होता.

गार्गी,“मला काय वाटतं ना तुझ्या विषयी हे तू मला सांगू नकोस! मी फक्त मला थोडा वेळ मागितला आहे तुझ्याकडे कळलं! जाते मी... माझा सगळा मूड घालवला काही तरी मूर्खा सारख बोलून!” ती रागाने म्हणाली आणि उठून जावू लागली तर संग्रामने तिला पुन्हा जवळ ओढली आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला.

संग्राम, “by the way! हे स्वर्ग सुख आजच्या साठीच होत का फक्त? की पुढे ही मिळणार आहे नाही म्हणजे gd ला आवडेल रोज मिळालं तरी!”

गार्गी,“बराच लालची रे तू! स्वर्गाच दार एकदा उघडल्यावर पुन्हा बंद होतं का कधी? वेडा कुठला!” ती हसून त्याच्या कानात म्हणाली आणि लाजून त्याचा हात सोडवून वॉश रूममध्ये पळून गेली.


ती स्वतःच आवरत विचार करत होती.“देवा हेच येडं माझ्यासाठी पाठवायचं होतस का? याला काहीच कळत नाही! मी असं वागले तर ही फेज असू शकते असं वाटतं याला! इतका हुशार हा... पण प्रेमाच्या बाबतीत अडाणी ठोकळा आहे! याला कसं सांगू की माझं प्रेम जडलंय याच्यावर! सांगायचं तर आहेच मला! पण स्पेशल करायचं आहे काही तरी माझ्या gd साठी! माझ्या मनात तुझ्याबद्दल आदर पहिल्यांदाच होता संग्राम पण आज तो दुणावला आहे तू प्रेमाच्या परीक्षेत खरा उतरला आहेस! माझ्या मनात नसताना देखील मी तुला परवानगी दिली होती. तुझ्या जागी दुसरं कोणी असत तर लगेच फायदा घेतला असता पण तू तसं केलं नाहीस! आधीच प्रेमात असलेली मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडले! I love you a lot!” ती याच विचारांच्या तंद्रीत अंघोळ करून डोक्याला टॉवेल गुंडाळून तो पिळत बराच वेळ आरशा समोर बसली होती आणि संग्राम तिचे आरशातले प्रतिबिंब निहाळत होता. तो तिच्या जवळ आलेलं ही तिला कळले नाही.

संग्राम, “काय चालले आहे गार्गी तुझं किती वेळ झालं केसांना पीळ देत आहेस ग ओढ लागत नाही का केसांना! सोड तो टॉवेल!” तो काळजीने म्हणाला आणि त्याने तिच्या हातातून तिने टॉवेलमध्ये गुंडाळलेले केस मागे घेतले आणि टॉवेल काढून तिचे केस मोकळे केले आणि तो वॉश रूमकडे वळला!

गार्गी,“दाराला कडी नाही लावायची!” ती ओरडली.

संग्राम, “हो माझी आई!” तो वैतागून म्हणाला आणि गार्गी हसायला लागली.

प्रेम हा शब्दच मुळात विचित्र आहे माणसाला कायम मना विरुद्ध वागायला भाग पाडत असतो. संग्राम आणि गार्गी त्याच एका शब्दात अडकले होते आणि त्याच एका नाजूक पण पवित्र धाग्यात बांधले गेले होते. गार्गीने संग्रामला तिच्या मनात नसताना देखील मी तुझीच आहे म्हणून त्याला परवानगी दिली होती का तर तिचे संग्रामवर असणारे प्रेम! आणि संग्रामने त्याच्या मनात असताना देखील तुझे मन तयार होत नाही तर मी थांबायला तयार आहे म्हणून ती नाकारली होती. त्या दोघांचे नातं आता एका विचित्र वळणावर येऊन थांबले होते. इथून पुढे कस लागणार होता त्यांच्या एकमेकां विषयीच्या भावनांचा आणि त्या जपण्यासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीचा प्रवास!
©swamini chougule

🎭 Series Post

View all