माझिया प्रियाला प्रीत कळेना (भाग 6)

Love Story
भाग ६

नुकत्याच परीक्षा झाल्या होत्या त्यामुळे सगळे जरा रिलॅक्स होते. तोच कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन युथ फेस्टिव्हलचे वारे वाहू लागले. कॉलेजचा सांस्कृतिक विभाग खडवडून जागा झाला.आणि सगळी कडे ऑडिशनचे पेवाच फुटले जणू! कोणी गाण्याचे ऑडिशन देत होते तर कोणी डान्ससाठी! कोणाला ग्रुपमध्ये का असेना भाग घ्यायचा होता तर कोणाला सोलो परफॉर्मन्स करायचे होते. फायनल इअरचा शुभम नाईक कल्चरल डिपार्टमेंटचा हेड होता. तो अतिशन स्ट्रिक्ट आणि हरहुन्नरी होता. गायन, डान्स आणि म्युझिक या सगळ्यात पारंगत असलेला शुभम तुमच्याकडे खरंच टॅलेंट असल्या शिवाय कोणाची ही डाळ शिजू देत नव्हता. सगळ्यांचे ऑडिशन तो स्वतः घ्यायचा आणि प्रत्येक स्पर्धेत कॉलेजला बरीच पारितोषिके मिळवून देत असल्याने त्याच्या कामात कॉलेज मधील स्टाफ हस्तक्षेप करत नसे.

आता सगळ्या कॉलेज कँपसमध्ये यावेळी गोव्याला होणाऱ्या युथ फेस्टिव्हलचीच चर्चा होती. ती चर्चा आणि शुभमच्या स्वभावाची चर्चा सुशांत आणि संग्राम च्या देखील कानावर आली होती. सुशांत संग्रामला हसून म्हणाला; “संग्र्या माझा तर कोणत्या ही कलेशी लांब लांब पर्यंत संबंध नाही बघ! तुला काही येत का?” त्याने विचारले.

संग्राम,“ हो मला येतो थोडा फार डान्स म्हणजे मी थोडे दिवस साल्सा शिकलो आहे पण त्याला आता बरेच दिवस झाले! पाहू का ऑडिशन देऊन मी?” त्याने सुशांतला विचारले.

सुशांत,“अरे नेकी और पुछबुज! देना ऑडिशन झालं सिलेक्शन तर झालं नाही तर नाही त्यात काय हाय काय आणि नाय काय!” तो हसून म्हणाला.

संग्राम,“हो देतो पण ना त्या शुभमची कीर्ती ऐकून मला वाटत नाही की माझे सिलेक्शन होईल!” तो म्हणाला.

सुशांत,“झालं तर झालं नाय तर गेलं उडत तू बी ना लय टेन्शन घेतो रे!” तो अस म्हणाला आणि त्याच्या अशा बोलण्यावर संग्राम मात्र खळखळून हसला.

संग्राम डान्सच्या ऑडिशनसाठी ऑडिटोरिममध्ये गेला तर तिथे त्याचा अशा चंपु अवतारात पाहून सगळ्यांच्या डोळ्यात एकाच प्रश्न होता.

“हा काय डान्स करणार आहे?”

काही मुलं-मुली तर त्याला पाहून आपापसात चर्चा करून तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसत होते. संग्रामने मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष केले. त्याने जाऊन तिथे रजिट्रेशन करत असलेल्या मुलाकडे स्वतःचे नाव रजिस्ट्रेशन करून घेतले आणि शांतपणे नंबर येई पर्यंत तो एका खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्या आधी बरेच मुलं-मुली होते. आज डान्स ऑडिशनचा पहिलाच दिवस होता. त्याच्या नंबर यायला दोन तास लागले. तिथे डान्सरची निवड करण्यासाठी शुभम आणि आणखीन एक मुलगी होती. ते म्युझिक सुरू झाले की एक दोन डान्स स्टेप पाहत जर त्यांना डान्स बरा वाटला तर पुढचा एक मिनिटं डान्स पाहत आणि लगेच सिलेक्ट किंवा रिजेक्ट सांगून मोकळे होत. संग्रामचा नंबर आला आणि संग्रामला पाहून हा डान्स करणार का? अशा अविर्भावात त्रासिक चेहऱ्याने त्या मुलीने शुभम कडे पाहिले आणि शुभमने डोळ्यानेच तिला पाहू तरी असे खुणावले. म्युझिक सुरू झालं आणि आपल्या बरोबर पार्टनर आहे अशी कल्पना करून संग्रामने डान्स सुरू केला आणि सगळ्यांनी पहिल्या स्टेप पासूनच आ वासले. तो भान हरपून डान्स करत होता आणि तिथले लोक अगदी शुभम आणि ती मुलगी भान हरपून त्याचा डान्स पाहत होते. त्याच्या क्लीन अँड नीट स्टेप्स, त्याचे रिदमिक डान्स करणे चेहऱ्यावरील किलर स्माईल पाहून सगळेच मंत्र मुग्ध झाले होते. त्याचा डान्स पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी एक मेजवानीच होती. म्युझिक थांबले आणि संग्राम ही थांबला त्याने वाकून सालस टाईपणे सगळ्यांना अभिवादन केले. पण सगळे ऑडिटोरिम दोन मिनिटं स्तब्ध होते. शुभम भानावर येत उभा राहिला आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. तो पर्यंत सुशांत देखील तिथे येऊन बसला होता. तो ही संग्रामचा डान्स पाहून चकित होता. शुभमने तर स्टेजवर जाऊन संग्रामला मिठीच मारली! आणि तो बोलू लागला; “काय डान्स केलास मित्रा! तू सालसा शिकला आहेस का?” त्याने विचारले.

संग्राम,“ हो मी शिकलो आहे सालसा! पण, बरेच दिवस झाले प्रॅक्टिस नाही! तरी ट्राय केले” तो म्हणाला.

शुभम,“बिना प्रॅक्टिसचे असा डान्स करतोस तर प्रॅक्टिस करून नाचलास तर स्टेजला आग लावशील! You are selected for couple dance! या वर्षीची ट्रॉफी आपलीच. फक्त आता आपल्याला पार्टनर शोधावा लागेल!तो ही तुझ्याच तोडीचा!” तो खुश होत म्हणाला.

संग्राम,“ thanks” असं म्हणून संग्राम त्याला हँडशेक करून निघून गेला.

त्याच्या पाठोपाठ सुशांत ही बाहेर पडला आणि त्याला म्हणाला.

सुशांत,“अभिनंदन संग्र्या! भारी नाचलास रे!” तो कौतुकाने म्हणाला.

संग्राम,“ thanks!”
★★★★
संग्रामने स्टेजवर केलेली कमाल आता कॉलेज मध्ये चर्चेचा विषय बनली. ही बातमी राजवीरच्या कानावर पोहोचली.

विक्या,” अरे तो संग्राम म्हणे लय जबरदस्त नाचतो! तो युथ फेस्टिव्हलमध्ये डान्स करण्यासाठी सिलेक्ट झाला.

राजवीर,“ तू माझा मित्र आहेस की त्याचा रे! तो शुभम महा….. आहे तो ऐकणार नाही आपलं नाही तर त्या संग्रामला काढून टाकायला लावला असता.” तो रागाने म्हणाला.

गार्गीची ही इच्छा होती युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्याची ती जरी डान्स शिकली नसली तरी ती लहानपणापासून शाळा-कॉलेजमध्ये डान्स मध्ये भाग घेत आली होती. त्यामुळे तिला डान्सची चांगली जाण आणि डान्ससाठीची लवचिकता दोन्ही गोष्टी तिच्याकडे होत्या. ती ही डान्सच्या ऑडिशनसाठी गेली. ती फिल्मी डान्स करण्यात पटाईत होती तिने माधुरी दीक्षितच्या “एक दो तीन चार पाच छे … बारा तेरा” या गाण्यावर सुरेख परफॉर्मन्स दिला. तिने ऑडिशन सोलो डान्ससाठी दिली होती. तिला शुभमने ती सिलेक्ट झाल्याचे सांगितले पण काही तरी विचार करून तो म्हणाला.

शुभम,“ उद्या पासून रिसेस नंतर तू ऑडिटोरिममध्ये ये आपल्याला प्रॅक्टिस लवकर सुरू करावी लागणार आहे.”

गार्गी,“ हो अँड thanks!” ती खुश होत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी ती ऑडिटोरिममध्ये गेली तर शुभम बरोबर संग्राम ही तिथे हजर होता. दोघांना पाहून शुभमने बोलायला सुरुवात केली.

शुभम,“ तुम्ही दोघे युथ फेस्टिवलसाठी आपल्या कॉलेजकडून सालसा सादर करणार आहात as a couple dancer!” हे ऐकून संग्राम शांत होता पण गार्गी मात्र उडलीच.

गार्गी,“ what? शुभम सालसा मी नाही करू शकणार मी काही ट्रेंड डान्सर नाही संग्राम सारखी! मी फिल्मी डान्स करू शकते आणि सोलो डान्ससाठी ऑडिशन दिली होती. I am sorry but I can\"t!”ती म्हणाली.

शुभम,“इथे प्रत्येक जणच ट्रेंड डान्सर नाही आहे आणि संग्राम शिकवेल तुला मी आहे, आपल्या कुरिओ ग्राफर विभा मॅडम आहेत आणि हो मी काही तरी विचार करूनच तुमच्या दोघांची निवड केली असेल ना कपल डान्ससाठी!” तो समजावत म्हणाला.

गार्गी,“ पण सालसा मी कधी केला नाही!” ती नर्व्हस होत म्हणाली.

शुभम,“ मग आता कर! उद्या पासून तुमची प्रॅक्टिस सुरू! उद्या रिसेस नंतर इकडे तिकडे टाइम पास करायचा नाही डायरेक्ट ऑडिटोरिम गाठायचे!” त्याने ऑर्डर दिली आणि तो निघून गेला.

गार्गी मात्र इथेच शॉक होऊन उभी होती. तिला असं पाहुन संग्राम तिला म्हणाला.

संग्राम,“ इतकी काळजी नको करुस मी शिकवेन तुला आणि शुभम सर आणि विभा मॅडम ही आहेतच की!” तो तिला समजावण्याच्या सुरत म्हणाला.

गार्गी,“ पण मी साल्सा कधी केला नाही संग्राम मला जमेल का?” ती नर्व्हस होत म्हणाली.

संग्राम,“ आपण कधी ना कधी कोणती तरी गोष्ट पहिल्यांदा करतोच ना so don\"t be nervous! तुला जमेल!” तो तिला धीर देत म्हणाला.

गार्गी,“ let\"s hope!” ती असं म्हणाली आणि दोघे ही ऑडिटोरिमच्या बाहेर पडले.

इकडे गार्गी आणि संग्राम कपल डान्स करणार आहेत हे राजवीरला समजले आणि तो चिडला. त्याने गार्गीला कॉलेज सुटल्यावर भेटायला बोलवले. गार्गीला कुठे तरी कल्पना होती की राजवीर काय बोलणार आहे म्हणून ती ही राजवीरला काय उत्तर द्यायचे याचा विचार करून आली होती.

गार्गी,“ बोल कशाला बोलवले होतेस मला इथे ते ही बागेत? आपण रोजच कॉलेजमध्ये भेटतोच की!” तिने त्याच्या शेजारी बेंचवर बसत त्याला विचारले.

राजवीर,“ तुला खरंच माहीत नाही का मी तुला का बोलवले आहे ते?” त्याने चिडून विचारले.

गार्गी,“ अच्छा तर माझा अंदाज बरोबर होता तर!” ती ही चिडून म्हणाला.

राजवीर,“ अरे वा! तुला तर सगळंच माहीत आहे की! मग तू त्या संग्राम बरोबर डान्स करणार नाहीस तुझे नाव मागे घे!” तो म्हणाला.

गार्गी,“ एक मिनिटं राजवीर! तू मला अशी ऑर्डर नाही देऊ शकत मी तुझी गर्ल फ्रेंड आहे! तुझी गुलाम नाही आणि संग्राम माझा मित्र आहे तुझ्या आधी पासून त्यामुळे मी नाव मागे घेण्याचा प्रश्नच नाही! आणि इथून पुढे माझ्याशी असल्या भाषेत बोलायचे नाही कळलं तुला!” ती हे सगळं बोलून त्याचं काहीच न ऐकून घेता तिथून निघून गेली. राजवीर मात्र तिच्याकडे फक्त चिडून पाहण्या शिवाय काहीच करू शकला नाही.

तिथेच एका झाडा जवळ थोड्या अंतरावर बसलेला राजवीरचा चमच्या पक्या बाहेर आला आणि त्याला म्हणाला; “राजभाई पाखरू लय फडफडतय की हे!”

राजवीर,“फडफडू दे की रे एकदा का या फुलाचा मध चाखला की जा म्हणावं कुठे ही! तो पर्यंत हिला सांभाळायला हवी!” असे म्हणून तो कुत्सितपणे हसला आणि त्याच्या हसण्यात पक्या सामील झाला.

★★★

त्या नंतर रोज संग्राम आणि गार्गीची डान्स प्रॅक्टिस सुरू झाली. संग्राम आणि कोरिओग्राफर विभा तिला व्यवस्थित स्टेप शिकवत होते. आता फेस्टिव्हलला थोडेच दिवस राहिले होते म्हणून प्रॅक्टिस जोरात सुरू होती. गाणे होते;
“मैं अगर कहु तुमसा हसी
कायनात में नहीं हैं कोई
तारीफ ये भी सच हैं कुछ भी नहीं!”

एक दिवस राजवीर आणि त्याची चांडाळचौकडी ऑडिटोरिममध्ये संग्राम आणि गार्गीची डान्स प्रॅक्टिस पाहायला आले. गार्गी आणि संग्राम हातात हात घेऊन डान्स करत होते त्यातच दोन वेळा संग्रामने तिला उचलले आणि पुन्हा खाली ठेवले या सगळ्यात ते दोघे खूपच जवळ येत होते. ते पाहून राजवीर चिडला आणि त्याने त्याच्या टोळक्याला खुणवले, त्याच्या बरोबर असणारी चार-पाच पोरं वेगवेगळ्या आवाजात ओरडू लागली.

“ ये चंपु ये चंपु स्वतःला शाहरुख समजतो काय?”

त्यामुळे संग्राम, गार्गी आणि विभा डिस्टर्ब होऊ लागले. तो पर्यंत शुभम आला त्याने हे सगळे ऐकले आणि तो राजवीर जवळ उभा राहून म्हणाला.

शुभम,“ संग्राम तू पोलीस कंप्लेट करून किती दिवस झाले रे या माकडाची!”

राजवीर,“ ये माकड कोणाला म्हणतो रे?” तो चिडून ओरडला.

शुभम,“ ये आवाज खाली! मी डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठेन आणि या वेळी तू आत तर जाशीलाच वरून रेस्टीकेट ही होशील म्हणून सांगतो तुझ्या वानरसेने बरोबर फुटायची गोळी घ्यायची! निघा!” तो ओरडला

राजवीर मात्र रागाने चरफडत निघाला. शुभमने त्याला पुन्हा हाताने अडवलं आणि तो म्हणाला.

शुभव,“ परत ऑडिटोरिमच्या आसपास पण भटकायचं नाही आज पासून फक्त भाग घेतलेली मुलं-मुली इथे दिसतील बाकी कोणी नाही!” त्याने सगळ्यांकडे पाहून सूचना केली आणि राजवीर रागाने धुमसत निघून गेला. तो कॅन्टीन मध्ये जाऊन बसला.

पक्या,“ भाई शांत व्हा! हे घ्या पाणी!”तो चापलुसी करत म्हणाला.

राजवीर,“ लय उडतोय तो संग्राम त्या शुभमच्या जीवावर तो आता फेस्टिव्हलमध्ये भागच कसा घेतो ते पाहतो!” तो रागाने ग्लास फेकत म्हणाला.

राजवीर आता काय करणार होता? संग्राम पुन्हा नवीन संकटात तर सापडणार नव्हता ना?

पाहू पुढच्या भागात….
सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download आणि प्रो ब्लॉगचे subscription घ्या आणि वाचत राहा माझिया प्रियाला प्रीत कळेना!
©स्वामिनी चौगुले
क्रमशःभाग ६

क्रमशः

🎭 Series Post

View all