माझिया प्रियाला प्रीत कळेना (भाग 5)

Love Story
भाग ५
सुशांत नुसते रुमचे दार लोटून गेल्यामुळे संग्रामवर हा बाका प्रसंग ओढवला होता पण सुशांतला मात्र त्याची काहीच कल्पना नव्हती. संग्रामने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला पण, त्याला हा रागाने का पाहतोय हेच कळत नव्हते. साक्षी आणि गार्गी दोघी ही आता झालेल्या प्रसंगा मधून सावरल्या होत्या पण संग्राम मात्र लाजून खाली मान घालून उभा होता. शेवटी तिघांना गप्प पाहून सुशांत च म्हणाला; “तुम्ही दोघी इथे? काय काम होते का आमच्याकडे?” त्याने विचारले.

साक्षी,“हो! आम्हाला हा टॉपिक समजला नाही आणि उद्या पेपर आहे म्हणून आम्ही दोघी संग्रामकडे आलो होतो!” ती संग्रामला पुस्तक दाखवत म्हणाली.

संग्राम,“बरं! हा टॉपिक का? अगं सोपा आहे हा! तुम्ही बसा मी सांगतो समजावून!” तो पुस्तक पाहून म्हणाला

आणि दोघी बेडवर बसल्या आणि संग्राम त्यांच्या पुढे खुर्ची घेऊन! त्याने फक्त अर्ध्या तासातच दोघींना टॉपिक अगदी सोप्या पध्द्तीने समजावून सांगितला आणि गार्गी उस्फुर्तपणे म्हणाली.

गार्गी,“किती सोपं होतं रे हे! आणि आम्ही आठ दिवस झाले डोके लावून बसलो होतो!”

साक्षी,“thanks संग्राम!” ती म्हणाली.

संग्राम,“thanks काय त्यात it\"s my pleasure!" तो म्हणाला.

गार्गी,“खरंच खूप thanks!” ती इंप्रेस होऊन म्हणाली.

संग्रामने तिला नुसती स्माईल दिली. गार्गी त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. शुभ्र मोत्या सारखी दंतपंक्ती आणि त्यातून डोकावणारा एक डबल दात, डाव्या गालावर छोटीशी खळी! भुऱ्या डोळ्यात एक प्रकारची चमक! तिला असं त्याला पाहताना पाहून साक्षीने घसा साफ करत आवाज केला आणि गार्गी भानावर आली. दोघी निघून गेल्या.

सुशांत मात्र इकडे संग्रामला चिडवत म्हणाला; “फायनली गार्गी इंप्रेस झाली बाबा!” तो डोळे मिचकावत म्हणाला.

संग्राम,“उगीच काही ही बोलू नकोस! कुठं कडमडला होतास रे दार उघड ठेवून? मला किती ओकवर्ड झालं.” तो रागाने म्हणाला.

सुशांत,“अरे इथंच गेलो होतो! पण तुला ओकवर्ड व्हायला काय झालं रे?” त्याने विचारले.

संग्राम मात्र आता गप्प बसला कारण काय घडले हे त्याने सांगितले असते तर सुशांतने त्याला चिडवून चिडवून भंडावून सोडले असते. पण सुशांत गप्प बसणाऱ्यातला थोडीच होता. सुशांतला काही तरी घडले आहे याचा वास आला आणि त्याने संग्रामला काय झाले असे विचारून विचारून जेरीस आणले. संग्राम शेवटी वैतागला आणि त्याला म्हणाला.

संग्राम,“अरे मूर्खा मी अंघोळीला चाललो आहे असे सांगितले होते ना तुला! पण तू थोबाड वर करून निघून गेलास... बरं! गेलास तर गेलास रूमला बाहेरून कडी लावायची ना! नुसतं दार लोटून गेलास आणि या दोघी पोरी आल्या ना टॉपिक समजावून घ्यायला तुझ्या सारख्या त्या ही डोक्यावर पडलेल्या! सरळ येऊन बसल्या रूममध्ये आणि मी नुसता टॉवेल गुंडाळून बाहेर आलो आणि माझी आणि त्यांची फजिती झाली ना!” तो डोक्यावर हात मारून म्हणाला आणि सुशांत मात्र पोट धरून असू लागला.

संग्राम,“हसू नकोस काय वाटलं असेल माझ्या बद्दल त्यांना! हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे” तो रागाने त्याला म्हणाला.

सुशांत,“सोड ना यार बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं!” ती शहारूख स्टाईलने म्हणाला आणि दोघे ही हसले.

संग्राम,“झालं तुझं आता अभ्यास करूयात का?” तो म्हणाला.

सुशांतने नुसती होकारार्थी मान हलवली आणि दोघे अभ्यासाला बसले. साक्षी आणि गार्गी होस्टेलवर गेल्या आणि घडलेला प्रसंग आठवून पोट धरून हसू लागल्या.

गार्गी,“काय पण नमुना आहे ग हा संग्राम! पण, हुशार आहे हा खूप! किती सोप्प्या पध्द्तीने सांगितला टॉपिक समजावून!” ती कौतुक करत म्हणाली.

साक्षी,“मग उगीच नाही सगळे त्याच नाव काढत पण तू त्याला इतकं एकटक पाहत होती.” तिने कोपराने तिला कोचत विचारले

गार्गी, “यार कसली किलर स्माईल आहे त्याची! मी त्याला इतकं जवळून कधी पहिलाच नव्हतं आणि त्याचे ते भुरे डोळे असं वाटत की आपण त्यात बुडूनच जाऊ! जरा चांगला राहिला अवतार बदलला तर क्या बात” ती स्वतःच्याच नादात बडबडत होती.

साक्षी,“क्या बात हैं इतनी तारीफ!प्रेमात पडलीस की काय त्याच्या?” तिने डोळे मिचकावत विचारले.

गार्गी,“तसं नाही ग! पण खरंच खूप किलर आहे त्याची स्माईल आणि डोळे ही!” ती म्हणाली आणि साक्षीच्या बोलण्याची वाट न पाहता उठून निघून गेली.

काय वाटत तुम्हांला आपली हिरोईन पण हिरोच्या प्रेमात पडली होती का? अरे थांबा थांबा इतकी सरळ स्टोरी असेल तर ती स्वामिनीची स्टोरी असेल का?
★★★

परीक्षा आता संपत आल्या होत्या. प्रोजेक्ट वगैरे सबमिट करून केव्हांच झाले होते. या दिवसात संग्राम आणि गार्गीची चांगली मैत्री झाली होती. पण गार्गीवर अजून कोणाची तरी नजर होती. त्याला गार्गीला प्रपोज करायचे होते कारण गार्गी ही कॉलेज मधील ज्युनिअर मुलींमध्ये सगळ्यात सुंदर मुलगी होती आणि त्याला ती कोणत्या ही किमती वर हवी होती आणि संग्राम आणि गार्गीची मैत्री देखील त्याला खटकत होती. म्हणून तो गेल्या महिन्याभरा पासून गार्गीच्या मागे पुढे फिरत होता पण गार्गीने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. पण आज चक्क राजवीरने तिला कॉलेज सुटल्यावर सगळ्यांसमोर प्रपोज करायचे ठरवले. कॉलेज सुटले आणि सगळे क्लास मधून बाहेर निघून आपापल्या रस्त्याने जाऊ लागले. त्यात संग्राम आणि सुशांत ही होता. गार्गी ही साक्षी बरोबर हॉस्टेलकडे निघाली होती. तर राजवीरने तिला अडवले आणि तो गुडघ्यावर बसला सगळे कॉलेज ते पाहून त्यांच्या भोवती जमा झाले. संग्राम ही ते पाहत उभा होता. राजवीर गुलाबाचं फुल गार्गीच्या समोर धरत तिला म्हणाला; “गार्गी माझं तुझ्यावर प्रेम आहे! मी तुझ्या शिवाय जगू शकणार नाही please expect my love!”

हे पाहून गार्गी चिडली आणि म्हणाली; “sorry I am not interested!”

हे ऐकून संग्रामाच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होते आणि राजवीरचे लक्ष त्याच्यावर होतेच त्याने संग्रामला हसताना पाहिले. आता तो अधिकच इरेला पेटला. गार्गी मात्र तिथून निघून जाऊ लागली. ते पाहून राजवीर म्हणाला; “थांब गार्गी माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय! तू नाही म्हणालीस तर मी खरंच स्वतःच काही तरी बरं वाईट करून घेईन!” तो गंभीरपणे म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून ती थबकली आणि म्हणाली; “हे बघ राजवीर! मला सध्या या सगळ्यात इंटरेस्ट नाही आणि असं कोणी कोणासाठी मरत नसते!” असं म्हणून ती निघून गेली.

राजवीरचा मात्र गार्गी आणि अर्थातच संग्रामने इगो डिवचला होता. आता तो गार्गीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता आणि याची थोडीशी देखील कल्पना गार्गीला नव्हती. आता थर्ड ट्रायमिस्टर सुरू झाली आणि एक दिवस विक्या ती बातमी घेऊन गार्गीला शोधत पळतच आला. गार्गी कॅन्टीनमध्ये साक्षी,संग्राम आणि सुशांत बरोबर बसली होती. तो धापा टाकतच गार्गी समोर येऊन बोलू लागला; “गार्गी अगं राजवीरने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.”

गार्गी,“काय? काय बोलतो आहेस? कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे तो?" ती जागेवरून उठत म्हणाली.

विक्या,“सिटी हॉस्पिटलमध्ये!”

ते ऐकून गार्गी पळत सुटली तिच्या मागे साक्षी आणि विक्या होते. सुशांत आणि संग्राम हे सगळं ऐकून एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते. गार्गी हॉस्पिटलमध्ये पोहचली. तर राजवीर एका रूममध्ये बेडवर झोपलेला तिला दिसला. त्याने गार्गीकडे पाहिले आणि तो कसनुस हसला. गार्गी त्याच्या जवळ बसत रागाने बोलू लागली; “राजवीर काय वेडेपणा आहे हा? तुला काही झालं असत म्हणजे?”

राजवीर,“मग काय करू मी? मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय!” तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

आणि गार्गी ने त्याला मिठी मारली. ती बराच वेळ त्याच्या जवळ बसून राहिली. गार्गी आणि साक्षी निघून गेल्या. विक्या मात्र राजवीरला हसून म्हणाला; “पोरगी फसली वीर भाई!”

राजवीर,“मग राज ज्या वस्तूवर बोट ठेवतो ती वस्तू मिळवतोच!”तो हसून म्हणाला.

खरं तर राजवीराने हे सगळं नाटक गार्गीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी केले आणि गार्गी अलगद त्याच्या जाळ्यात अडकली होती.
★★★

इकडे सुशांत अस्वस्थपणे रूम मधून फेऱ्या मारत होता आणि संग्राम बेडवर शांत निश्चल बसला होता. ते पाहून सुशांत संग्रामला म्हणाला; “राजवीर सारखा अप्पल पोटी आणि नीच माणूस स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल? माझ्या मनाला पटत नाही! आता गार्गी त्याच्या जाळ्यात फसेल आपल्याला तिला समजवावे लागेल!” तो चिडून बोलत होता.

संग्राम,“अरे तू असं कसं म्हणू शकतो सुश्या की राजवीर असं काही करणार नाही! अरे माणूस प्रेमात असला की काहीही करू शकतो! आणि आपण कोण आहोत गार्गीला वाचणारे! ती मॅच्युअर आहे तिचे स्वतःचे विचार आहेत! तिला योग्य वाटेल ते ती करेल! After all her life!” तो म्हणाला. पण, त्याच्या डोळ्यात मात्र दुःख दिसत होते आणि तो ते दुःख लपवण्याचा निष्फळ प्रयत्न तो करत होता.

सुशांत,“माझ्या डोळ्यात बघ आणि सांग की गार्गी त्या राजवीरसाठी अशी पळत गेली त्याच तुला काहीच वाटलं नाही!” त्याने त्याच्या समोर जात विचारले.

आणि संग्रामने त्याला मिठी मारली. त्याच्या मिठीत दुःख, गार्गीला गमावण्याची भावना! होती. सुशांत मात्र त्याला धीर देत त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता.

सुशांत,“मला वाटतं की गार्गीला राजवीर फसवत आहे. आपण तिला समजवायला हवं!” तो म्हणाला.

संग्राम,“मला नाही वाटत असं सुश्या! कारण, राजवीर हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो म्हणाला होता गार्गीला की तो तिच्या शिवाय नाही जगू शकत. मग तो तिला कसा फसवेल सांग?कदाचित त्याच प्रेम खरं आहे! आपण या सगळ्यात नको पडायला प्लिज!” तो म्हणाला.

सुशांत,“ठीक आहे तू म्हणतो तर नाही पडणार मी यात! पण माझं मन सांगतय मला... राजवीर गार्गीला फसवत आहे!” तो म्हणाला आणि निघून गेला.
★★★

ती घटना घडून आता आठ दिवस झाले होते. गार्गी रोज सकाळी कॉलेजला जायच्या आधी आणि कॉलेज सुटल्यावर राजवीरला भेटायला जात होती. तिने राजवीरचे प्रेम स्वीकारले होते आणि या दहा दिवसातच राजवीरच्या गोड बोलण्यामुळे आणि इमोशनल ड्राम्यामुळे गार्गीवर हळूहळू त्याच्या प्रेमाची भुरळ पडायला लागली होती. तिला त्याच्या शिवाय काहीच दिसत नव्हते. ती आता तिचा गृप सोडून राजवीर बरोबर त्याच्या गृपमध्ये सामील झाली होती. सतत राजवीरच्या मागे पुढे करत होती आणि राजवीर तिच्या या मानसिक स्थितीचा फायदा घेत होता. संग्रामचा मात्र असा समज झाला होता की राजवीरचे गार्गीवर खरंच प्रेम आहे. म्हणून तो शांत होता पण त्याच्या डोळ्यात मात्र दुःख दिसत होतं. सुशांत मात्र या सगळ्यानी अवस्थ होता. त्याला पक्का विश्वास होता की राजवीर गार्गीला फसवत आहे पण तो संग्राममुळे गप्प होता.

गार्गी मात्र या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ तिच्याच विश्वात रममाण होती.राजवीरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिच्यामुळे केला म्हणून ती स्वतःला गिल्टी तर समजत होती पण तो तिच्या वर इतकं प्रेम करतो ती त्याने इतकं मोठं पाऊल उचलले. म्हणून ती खूप खुश होती.

माणूस असा प्राणी आहे जो प्रेमाला आसुसलेला असतो. त्याला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्य महत्वाचे स्थान हवे असते. त्याला ते मिळाले की मग तो कोणताच विचार करत नाही. त्याच्या डोळ्यासमोर प्रेमाची पट्टी बांधली जाते आणि तो मृगजळा मागे धावत सुटतो. तसेच काहीसे आता गार्गीच्या बाबतीत घडत होते.

गार्गीला केंव्हा कळेल की राजवीर तिला फसवत आहे? संग्रामच तिच्यावर प्रेम आहे हे तिला कधी कळणार होते की नाही?
पुढील भागाची आतुरता आहे? त्वरित वाचा माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग 5, ईरा च्या सबस्क्रिप्शन फिचर मधून. आणि त्यानंतर पुढील सर्व भाग रोज एकेक करून...हमखास..!!! आजच सबस्क्रिप्शन घ्या...

🎭 Series Post

View all