माझी प्रिय पत्नी...

Rashmi ani mahesh madhe kadadyache bhandan zale, agdi chhotya gosti varun... Rashmi sagal visrun kamala lagli, pan mahesh matra ajunahi ragatach hota....

माझी प्रिय पत्नी.....

रश्मी आणि महेश मध्ये कडाडयाचे भांडण झाले., अगदी  छोट्या गोष्टी वरून...
रश्मी सगळं विसरून घर कामाला लागली, पण महेश मात्र अजूनही रागातच  होता..
रागाच्य भरात बागेत जाऊन बसला.....तोंड फुलवून बाकावर बसलेला... जवळच एक वयस्कर बसलेले होते..त्या वयस्कर गृहस्थाने महेशला विचारले...
काय झाले बेटा? 
इतका त्रासलेला का आहेस?
त्यावर महेशने रश्मीच्या चुका बद्दल सांगितले, रश्मी बद्दल काही काही बोलला....
वयस्कर गृहस्थ मनातल्या मनात हसले आणि महेशला विचारले, 
तुझा धोबी कोण आहे? 
महेश ला आधी काहीच कळले नाही....
तुझ्या घरी कपडे कोण धुते ?
माझी पत्नी....
तुझ्या घरी स्वयंपाक कोण करते? 
माझी पत्नी...
घरातल्या सगळ्यांची काळजी कोण घेते? 
माझी पत्नी....
आलेल्या पाहुण्यांचा पाउनचार कोण करते?
माझी पत्नी....
संकटात आणि दुःखात सोबत कोण असते? 
माझी पत्नी...
स्वता:च घर, स्वताची माणसे सोडुन तुझ्या सोबत नादांयला कोण आलं? 

माझी पत्नी.....
आजारी पडल्यावर तुझी काळजी कोण घेते? 
माझी पत्नी...
तुझ्या  आई बाबांची सेवा कोण करतं? 
माझी पत्नी...
तुझ्या मुलांचे संगोपन कोण करतं?
माझी पत्नी...
एवढं सगळं सांभाळून, ती सर्व तुझ्या साठी करते याचे कधी तिने तुझ्या कडुन पैसे घेतले..
महेश: कधीच नाही..

मग तुला तिची एक चुक दिसली , पण तिच्यातले एवढे गुण दिसले नाही का? ती दिवस रात्र तुझ्या साठी झटते याचे तुला काहीच भान नाही... लग्ना पासुन आजतागत तिनी तुझी सेवा केली...तुझ्या साठी कष्ट केले, त्रास झाला असेल तरी कधी बोलुन दाखवलं नाही...कधी तुझ्या कडे कोणत्या गोष्टींची तक्रार केली नाही .... आणि आज एक चुक झाली तिच्या कडून तर पटकन बोलुन दाखवलंस... तिच्या मनांच विचारही केला नाही कि तिला कसे वाटले असेल... ती ही एक माणूस आहे..तिच्याही कडून चुक होऊ शकते....
 हे सगळं ऐकुन महेश शांत झाला, त्याला त्याची चुक कळली..
तो लगेच घरी जाऊन त्यानी रश्मी ची माफी मागितली...आणि आय लव यु म्हणत रश्मी च्या हातात गुलाबाच फुल दिलं....
रश्मी नी पण सगळं विसरून महेश ला  आय लव यु टु  म्हटल..
दोघेही एकमेकांना मिठीत घेऊन हसायला लागले..
खरचं पत्नी म्हणजे देवानी दिलेली सुंदर भेट आहे.... तिचा आदर करा, तिची काळजी घ्या...
ती तुमच्यासाठी स्वत:च घर , स्वत:ची  माणसे सोडुन येते...तुम्हाला स्वत:च जिवन अर्पण करते..

स्त्रीही एक बहीण,  बायको ,सुन, आई , सासु, ननंद, वहिनी, आत्या, मावशी अनेक  रुपं निभावते....
तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी...मन जपायला हव....
एक स्त्री म्हणुन तिचा आदर करा....
✍ऋतुजा वैरागडकर