Jan 19, 2021
नारीवादी

माझी ओळख हाच माझा दागिना....२

Read Later
माझी ओळख हाच माझा दागिना....२

मागच्या भागात आपण पाहिले कसा जोरात महिला दिन साजरा करतायत सहजीवन सोसायटी मधील बायका.....

पहिला कार्यक्रम झाला सायकल आणि....बाईक चा....

आता दुसरा कार्यक्रम होता....पाककला,रांगोळी आणि चिञकला.....इथे सुद्धा देशमुख मॅडम नि सर्वांना सांभाळून घेतले होते....जेणेकरून लहान मुलीं पासून तें सर्व आजी पर्यंत त्यांनी सर्वांना भाग घ्यायला लावला....2तास वेळ दिली होती...आणि मग् सर्वाना जेवण....सर्व अगदी मन लावुन करत होत्या....सावी ला लहान असल्या पासून चित्र काढायला आवडत असे....आणि स्वयंपाक पण....

पण नियम होता...एक व्यक्ती जास्तीत जास्त २ स्पर्धां मध्ये भाग घेऊ शकते....पण वेळ वाढवून मिळणार नाही....पण वेगळे बक्षिस मात्र होते....त्या साठी....

सावी ने दोन्ही मध्ये भाग घेतला.....आणि अगदी छान स्पर्धा झाल्या.....सुधा काकूंनी सुद्धा पाककला मध्ये भाग घेतला होता....आणि नेमके दोघींचे टेबल एकच आले....माय लेकींनी कशी बशी वेळ सांभाळून नेली....पण त्यांची सून अंकिता तिला काही हे पटत नव्हते....

ती वाट बघत होती, कधी एकदा सावी तिला भेटते....तिने वाट बघितली....आणि सर्व बायका जेवण करण्यासाठी गेल्यावर तिला बोलायला सुरुवात केली? तू का आलीस परत??? एकदा आमची शोभा करून गेलीस ना मग् आता परत काय आहे? तू मुदाम आलीस आम्हाला त्रास द्यायला....तू निघून जा या सोसायटी मधून.....आणि हो आज सुद्धा पुढचा कार्यक्रम करायला थांबु नकोसं....

त्या कार्यक्रमा मध्ये स्वतः ची ओळख करून द्यायचे....आणि त्यातून तें निवडणार आहेत मिस आणि मिसेस ऑफ  सहजीवन सोसायटी....

तू येशील तेव्हा काय ओळख करून देशील ग? आमची इज्जत घालवायची आहे का परत? सगळ्यांना नाही माहीती तूझं नी आमचे नाते.....आणि आम्हाला ते माहीती करून द्यायचे पण नाही....तुझी काय ओळख आहे ग.... सावी काहीच बोलली नाही....तेवढ्यात देशमुख मॅडम आल्या....आणि तिला जेवायला घेऊन गेल्या....

थोड्या वेळात हळदी कुंकू चा कार्यक्रम होता.....आणि मग् निवडणार होते मिस आणि मिसेस ऑफ सहजीवन सोसायटी....

सर्व बायका तयारी करायला गेल्या....तेवढ्यात परीक्षकांनी येऊन सर्व स्पर्धा बघितल्या...आणि रिज़ल्ट देशमुख मॅडम कडे दिल्या....आणि पुढच्या कार्यक्रमासाठी त्या सुद्धा तयारी करायला गेल्या.....

हळदी कुंकू म्हणून सर्व बायका अगदी नखशिखांत नटुन आल्या....पाया पासून डोक्या पर्यंत दागिने घालून....कॊणी नउवारी, कॊणी पैठणी, कॊणी गुजराथी, तर कॊणी बेंगाॅली....थिम करून फोटो काढत होत्या.....सावी आली अगदी सिम्पल नारायण पेठ साडी...नाकात नथ...आणि गळ्यात मंगळसूत्र आणि बारीक ठुशी....तिला बघितलं आणि अंकिता ला राग आला....तूला बोलले होते ना येऊ नको....का आलीस?आलीस ती आलीस परत हि अशी....खोटे दागिने मिळतात तें तरी घालायचं.....

पण सावी मात्र गप्प....ती नुसती हसली....आणि म्हणाली आग वहिनी हळदी कुंकू आहे....त्याला कधी पाठ करू नये ग म्हणून आले....अंकिता कुत्सितपणे हसली....आणि म्हणाली खर आहे गरीब असला तरी नवरा आहे तूझा.....सुधा काकू दागिने घेऊन आल्या आणि म्हणाला हे घाल....आणि आमची लाज राख....सावी म्हणाली आई तू सुद्धा....असे बोलतेस...नको मला....

पुढच्या कार्यक्रमाची सुरवात झाली...देशमुख मॅडम येऊन सावी ला घेऊन गेल्या....पण सावी मात्र  भूतकाळात गेली....

बघूया काय आठवत असेल तिला? आणि कार्यक्रमाचे काय होते?

अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका..... लाइक आणि कंमेंट करत रहा..... सूचनांचे स्वागत.... ????© अनुजा धारिया शेठ....

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...