विषय : संसारात नणंदची भूमिका
"अगं आई, आत्याचा फोन आहे."
छोटा वरद आपल्या आईला मोबाईल देत म्हणाला.
नणंदबाईचा फोन म्हटल्यावर, अनघाने त्रासिक मुद्रेने फोन घेतला व फोनवर बोलू लागली.
" हॅलो ताई, कशा आहात?"
"मी मजेत आहे. तुम्ही व वरद मजेत आहेत ना?
अगं, मी यासाठी फोन केला होता की, आईला बरे वाटत नाही आहे. तिच्याकडून काही काम होत नाही. तुम्ही एक-दोन दिवसात जा तिकडे. मी गेली असती आईकडे पण यांनाही बरे नाही ना!
राजेश बोलला नाही का तुम्हांला याबद्दल काही?"
अगं, मी यासाठी फोन केला होता की, आईला बरे वाटत नाही आहे. तिच्याकडून काही काम होत नाही. तुम्ही एक-दोन दिवसात जा तिकडे. मी गेली असती आईकडे पण यांनाही बरे नाही ना!
राजेश बोलला नाही का तुम्हांला याबद्दल काही?"
नणंदबाई म्हणाल्या.
"बोलले ते मला..आईला थोडे बरे नाही असे. पण येण्याबद्दल काही बोलले नाही."
अनघा नणंदबाईंना म्हणाली.
"त्याला काही समजत नाही पण तुम्हांला तर कळले पाहिजे ना. आई आजारी असल्याचे कळताच तुम्ही जायला हवे होते तिकडे."
नणंदबाई चढ्या आवाजातच बोलल्या.
"ठीक आहे, बघते मी."
असे शांत स्वरात बोलत अनघाने फोन ठेवून दिला.
नणंदबाईशी शांत स्वरात बोलणाऱ्या अनघाला नणंदबाईचा खूप राग आला होता.
'मी इकडे माहेरी आली की, सासूबाईंची नाटके सुरू होतात. तब्येत वगैरे सर्व काही चांगले असते. फक्त मला त्रास द्यायचा म्हणून दुखणी काढतात. आईचे व मुलीचे कटकारस्थान सुरू होते व बाईसाहेब लगेच मला ऑर्डर सोडतात. मला वाटते माझ्या संसारात नणंदबाईंची भूमिका त्यांच्या आईसाठी चांगली आहे; पण माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरते. त्या लग्न करून सासरी गेल्या. त्यांचा स्वतःचा संसार व्यवस्थित सांभाळायचा ना.. माहेरी इतके लक्ष का द्यायचे? आणि सासूबाई पण फोनवर सर्वच बारीकसारीक गोष्टी त्यांना सांगत राहतात. आईची काळजी घ्यायला त्यांचा भाऊ व मी आहे.
आम्ही आमच्या कर्तव्यात कधी चुकत नाही जर चुकलं तर बोला ना. पण उगाच सासूपणा व नणंदपणाचा रूबाब का दाखवतात दोघी?'
अनघा रागाने बोलत होती.
तिचे बोलणे ऐकून आईला कळाले की, काहीतरी झाले आहे.
'अनघा माहेरी आली की, असे काही होतेच.
अनघाच्या सासूबाई, नणंदबाई या स्वतः एक स्री असूनही अनघाशी असे कसे वागतात?'
अनघाच्या सासूबाई, नणंदबाई या स्वतः एक स्री असूनही अनघाशी असे कसे वागतात?'
या विचाराने त्यांना वाईट वाटले.
आपल्या ताईला होणारा त्रास प्रीतीला जाणवत होता. सासू व नणंद अशा का असतात? अशा सासू व नणंद यांच्याबद्दल प्रीतीला राग येत होता.
क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा