माझी मानवी... 20

A story about love, friendship, kindness and relationships

मानवी सीमा मॅम च्या इथे त्यांनी दिलेलं काम complete करून घेऊन गेली..

"मॅम हे तुम्ही दिलेलं.. "

"मी तुला आधी ई-मेल सेंड केलेला एक.. चेक केलास का तो?"

"ओह.. मला त्या मेल च्या related अजून काही resources मिळाले त्यामुळे मी त्यांच्यावर पण काम करून ते सगळं च एकत्र document केलं.. I  hope it would be helpful.. "

"You do have some sense! थँक्यू.. " सीमा मॅम हसून म्हणाल्या.. मानवी खुश होऊन जायला वळणार इतक्यात त्या म्हणाल्या..

"अरे हो.. तू घरी जायच्या आधी हे रिटर्न करशील?" तिच्या हातात बरीचशी पुस्तके देऊन त्या म्हणाल्या..

"हो.. करते ना.. पण.. हे कुठं रिटर्न करायचंय?"

सीमा मॅम नि तिला directions दिल्या.. त्यांच्या कंपनी ची in-house भली मोठी लायब्ररी होती.. मानवीला फार आश्चर्य वाटले.. तिला वाटत होते केवढं काही आहे या बिल्डिंग मध्ये.. इतके दिवस काम करतीये पण तरी अजून सगळं नाही माहिती झालं मला.. ती लॉगऑऊट करूनच ती पुस्तके द्यायला  लायब्ररी मध्ये गेली..  पुस्तक जमा केल्या नंतर ती अशीच फिरून पाहत होती कि केवढी मोठी आहे हि लायब्ररी..

"wow.. किती मोठी आहे हि लायब्ररी " ती स्वतःशीच बोलत पाहत होती.. इन्स्पिरेशन मिळावं म्हणून इथे सगळ्या प्रकारची पुस्तक तिला दिसत होती.. अगदी लहान मुलांची सुद्धा पुस्तक तिथे होती.. तिने तिथले तिचे लहानपणीचे आवडीचे पुस्तक काढले.. "peter pan and wendy" ह्याच production तिचे वडील श्रीमंत असताना त्यांच्या कंपनी मध्ये झालेलं.. तिला तेव्हापासून च लहान मुलांच्या गोष्टीची पुस्तक आवडायची.. ती मायेने त्या पुस्तकावरून हात फिरवत होती इतक्यात तिचा फोन वाजला.. लायब्ररी च्या शांततेत जरा जास्तच मोठा आवाज आला.. तिने घाई घाईने ते पुस्तक ठेवले आणि तिथून जात कॉल अटेंड केला.. तो रवी होता..

"ए मानवी.. मला टांग देऊन गेलीस कि काय? मला ट्रीट देणार आहेस तू आज.. विसरली नाही ना?! "

"हो हो.. आले आले "म्हणत.. मानवी तिथून सटकली..

******

राहुल पार्किंग लॉट मध्ये आता त्याची गाडी सुरु करायला जाणारच इतक्यात त्याचा फोन वाजला.. मानवी च नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली..

"हां बोल ग मानवी.. मी आत्ता निघतोच आहे बघ तुला भेटायला.. "

"सॉरी अरे राहुल.. माझी आधीची १ अपॉइंटमेंट होती मी विसरले तुला सांगायची.. "

"ओह.. मग नंतर भेटूयात का?"

"नाही.. नको.. २ तासांच्या नंतर भेटू शकशील? मी तोवर फ्री होईन.. "

"उशीर नाही होणार? I mean दमली असशील ना.. "

"नाही नाही.. तस अजिबात नको वाटून घेऊस.. मी तुला एका रेस्टॉरंट चा ऍड्रेस देते.. तिथे भेटूयात ?"

"ओह.. असं म्हणतेस का? ठीके.. मी भेटतो मग २ तासात.. "

त्याला लगेच मेसेज मधून ऍड्रेस मिळाला.. त्याने चेक केलं तर तो त्याच्या घरापासून हार्डली १० मिनिटांच्या डिस्टन्स वर होता.. त्याने घरी जाऊन फ्रेश होऊन मग जायचं ठरवलं.. पण अजून पण वेळ खूप होता.. थोडा वेळ त्याने ऑफिस ची लायब्ररी मध्ये घालवायचा विचार केला.. त्याने आल्या पासून ती पहिलीच न्हवती.. तो पुन्हा बिल्डिंग मध्ये गेला.. जाताना त्याला मानवी आणि रवी बाहेर पडताना दिसले.. हे एकत्र कसे काय असा विचार करतच तो लायब्ररी मध्ये पोहोचला.. पुस्तक browse करता करता तो लहान मुलांच्या विभागाकडे गेला.. १ पुस्तक घाई घाईत ठेवलेलं दिसत होत.. त्याने ते काढून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.. "मानवीचं आवडतं पुस्तक.. " त्या पुस्तकावरून हात फिरवत तो स्वतःशीच बोलला..

*********

स्नेहल तिच्या वडिलांच्या आलिशान घराच्या बाहेर पोहोचली.. तिने बाहेर च गाडी लावली आणि आत गेली.. मिसेस शांती कोच वर बसून तिची वाट च पाहत होत्या.. स्नेहल आत आलेली पाहताच समोर गिफ्ट wrap करून ठेवलेल्या बॉक्स कडे बोट दाखवून त्या म्हणाल्या..

"ह्याच्यात टाय आहे.. तुझ्या वडिलांना दे नंतर.. काही आणायचं तुझ्या लक्षात होत असं तर वाटत नाहीये.. You are still your father's daughter after all.."

स्नेहल नि काहीही उत्तर दिले नाही..एव्हाना तुम्हां वाचकांच्या लक्षात आलेच असेल.. मिसेस शांती ह्या स्नेहल च्या सावत्र आई होत्या.. त्यांना स्नेहल कधीच आवडली नाही.. त्यांनी ती लहान असताना पण कधी तिला माया लावली नाही.. एकतर जेव्हा त्या तिच्या आयुष्यात आल्या तेव्हा स्नेहल काही फार लहान न्हवती.. तिला कळत होते.. त्यामुळे त्यांनी कधी तिचा छळ केला नसला तरी तिच्याशी त्या कधी प्रेमाने वागल्या सुद्धा नाहीत.. आणि त्यांचा सावत्रपणा तिला नेहमीच टोचत राहिला.. त्यांच्यामुळेच तिचे आणि तिच्या वडिलांचे संबंध थोडे ताणलेले च असायचे.. स्नेहल ला मानवीच्या घरी सख्या मुली सारखी वागणूक मिळत आली होती मात्र तिच्या स्वतःच्या घरी तिला सगळ्यांशी अंतर ठेवून वागायला भाग पडलं होत..

 तिचे वडील आल्यावर ते सगळे जेवायला डाईनिंग टेबल वर बसले.. तेव्हा तिच्या पर्स मधून १ छोटा बॉक्स काढत स्नेहल म्हणाली..

"Happy birthday papa.. मी तुमच्या साठी बेल्ट आणलाय.. "

आता मिसेस शांती नि तिच्याकडे रोखुन पाहिलं.. स्नेहल च्या वडिलांनी मात्र हसून ते घेतलं आणि म्हणाले..

"गिफ्ट ची काय गरज होती ग?" स्नेहल पण हसून म्हणाली..

"Of course I have to buy a gift, I am your daughter after all.." शेवटचं वाक्य तिने त्यांच्या रोखलेल्या नजरेला उत्तर देत म्हटलं होत आणि ते त्यांच्या पण लक्षात आलं.. मात्र तिच्या वडिलांचे तिकडे लक्ष न्हवते.. ते हसून म्हणाले..

"तुला भेटणं हेच माझं गिफ्ट असेल ग.. तू आजकाल घरी फिरकेनाशीच झालीयेस.. येत जा ना जरा घरी पण.. " स्नेहल ने नुसते स्माईल दिले.. इतक्यात त्यांना फोन आला.. त्यांनी स्क्रीन वरचे नाव वाचून तिला म्हंटले..

"ओह.. १ मिनिट हां.. मला हा कॉल घ्यावा लागेल.. तुम्ही करा सुरु जेवण.. मी येतोच.. "असं म्हणून ते उठून दुसऱ्या खोलीत गेले.. ते गेल्या गेल्याच मिसेस शांती म्हणाल्या.. " तुला माझ्या मेसेज ला रिप्लाय करायला वेळ न्हवता पण गिफ्ट घ्यायला वेळ मिळाला का?"

"Do what I must do is my principle you know? त्यामुळे मला खूपदा rude आहे हे ऐकावं लागलय पण कुणी हि असं नाही म्हटलं कि मला सेन्स नाहीये.. "

"हम्म.. It seems you are very sociable.. specially मुलांच्या सोबत.. "

"काय?" न कळून स्नेहल नि विचारले..

"असं ऐकलं मी कि एका मुलाने आणि तू पूल साईड पार्टी केलीस.. जशी तू दिसतियेस आणि वागतीयेस त्यावरून  तरी असंच वाटतंय कि तुझा प्रेफरन्स flashy आहे.. " तिच्या कपड्यांच्या कडे बोट दाखवून त्या बोलल्या.. स्नेहल नि आज पिंक blouse,लेदर चा black मिनी स्कर्ट आणि तसेच knee लेंग्थ बूट्स घातले होते.. स्नेहल तरी सुद्धा बधत नाही आणि त्रासात दिसत नाही हे बघून त्या कुत्सित पणे हसून पुढे म्हणाल्या..

"Well, where did you inherit from this style?" स्नेहल नि आता शांतपणे उत्तर दिले जरी तिला टोमणा जिव्हारी लागला होता..

"ती माझी बर्थडे पार्टी होती.. माझ्या फ्रेंड्स बरोबर.. "

"ते हॉटेल तुझ्या वडिलांच्या मित्राचे होते.. तिथल्या फिटनेस सेंटर आणि स्पा ला माझ्या ओळखीचे कितीतरी जण जातात.. तुला दंगा घालायचाय जो काही तो तू दुसरीकडे नाही घालू शकत का? At least you should stay within line where I can still manage my expressions.. "

"तुम्हाला दंगा आवडत नाही तर तुम्ही जे केलेत ते लिमिट मध्ये राहून करायला हवे होते.. म्हणजे काही थोडे फार चेहऱ्यावर expressions राहिले असते.. Did you overdo it this time? Botox? " त्यांच्या गालावर पॉईंट आऊट करून स्नेहल म्हटली.. आता रागाने त्यांनी एक मोठा उसासा सोडला आणि म्हणाल्या..

"With your rudeness and cheap attitude, असं दिसतंय कि फक्त तुझा चेहराच नाही तर तुझी personality पण तुझ्या आईवर च गेलीये.. " यावेळी मात्र स्नेहल ला सहन झालं नाही.. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली..

"हे बघा.. तुम्हाला माझ्या आई बद्दल माहितीच काय आहे ते त्यांच्या बद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला तो अधिकारच कुणी दिला? माझ्या आईच्या बद्दल अपशब्द बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये.. " आता स्नेहल चा पारा चढला होता.. इतक्यात तिचे वडील तिथे आले आणि तिला ओरडून म्हणाले..

"काय उद्धट पणा चाललाय तुझा?" आता वडिलांच्या कडे तक्रार करायच्या सुरत ती म्हणाली..

"पप्पा.. हि बाई माझ्या आईच्या बद्दल.. " ती एवढं बोलतच होती कि तिच्या जोरात कानाखाली बसली.. तसे प्रेमाचे नाटक करत त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या..

"अहो.. हे काय करताय तुम्ही?" स्नेहल चे वडील स्ट्रिक्ट आवाजात म्हणाले..

"तू 'हि बाई' असं कस म्हणालीस? आधी माफी माग.. "

"पप्पा.. " स्नेहालचा हात गालावर होता.. ते पुन्हा ओरडले..

"माफी माग म्हणतो ना.. " स्नेहल चे डोळे पाण्याने भरले होते पण तिने ते पाणी डोळ्यातून खाली येऊ दिलं नाही.. ती म्हणाली..

"I committed a serious offense.. If you can generously forgive me, I would be really grateful..Is that enough? " तिच्या वडिलांच्या कडे पाहून शेवटचं वाक्य ती म्हणाली.. एवढं बोलून तिने पर्स उचलली आणि घरा बाहेर पडली.. gate च्या बाहेर आल्यावर तिचा हात पुन्हा गालावर गेला.. तिचा गाल लाल झाला होता.. त्यांच्या बोटांचे ठसे तिला अजूनही गालावर जाणवत होते.. आता तिच्या डोळ्यातून इतक्या वेळ अडवून धरलेलं पाणी ओघळू लागले.. तिने तिचा फोन काढला.. आणि मानवी ला फोन लावला..

********

इकडे रवी मानवीला त्यांच्या ऑफिस च्याच मागे १ खाऊ गल्ली होती तिकडे घेऊन आला होता.. त्याची अजूनही तिच्या कडे तक्रार चालू

होतीच.. " तू मला विकत घेऊन देणार होतीस तर पळून का गेलीस मला सोडून?"

"पळून न्हवते गेले.. लायब्ररी मध्ये गेले होते.. आता खावा ना..  " पावभाजी सोडून ते पाणीपुरी खात होते.. खात असताना त्याने थोडं पाणी त्याच्या t-शर्ट वर सांडलं.. "ओह.. शीट शीट.. " त्या पाणीपुरी वाल्याकडून tissue पेपर घेऊन तो ते पुसायचा प्रयत्न करत होता.. त्याचा हा गोंधळ मानवी पाहत होती.. त्यात रस्त्यावरच्या वाहनांचा आवाज.. मानवीने अशा ठिकाणी फोन मारतात हे माहिती असल्याने बॅग मध्ये आत मोबाईल ठेवला होता.. त्यामुळे स्नेहल तिला कॉल करत होती तरी तिला ऐकायला नाही आले.. तिचा फोन वाजून वाजून बंद झाला.. रवीने आता तिच्या खांद्या वर हात ठेवत विचारले..

"मानवी.. मी पावभाजी पण खाऊ शकतो का?" आज काय ते याला खाऊ घालूयाच म्हणजे पिच्छा सोडेल हा विचार करून ती म्हणाली..

"हो हो.. खावा ना.. चला जाऊया तिकडे खायला.. " असं म्हणून ती पाणीपुरीचे payment करून त्याला पावभाजीच्या गाड्यावर घेऊन गेली..

पावभाजीचा गरम घास फुकून न खाल्या मुळे रवीचे तोंड भाजले आणि तो जीभ बाहेर कडून मानवीला दाखवायला लागला..

"भा.. भाजलं.. आह.. गडम होत खूप.. "

"फुकून खावा ना.. काकडी खा ना आता.. " मानवीने त्याचा गोंधळ पाहून सांगितलं.. "त्याने काकडीची १ चकती जिभेवर ठेवली जीभ तोंडाबाहेर काढून तिला दाखवलं कि आता बर वाटतंय आणि  उसासा सोडला.. मग चावून खात म्हणाला.. "आता बरं वाटलं.. " त्याच तस लहान मुलाच्या सारखं वागणं बघून मानवी त्याच्या तोंडाकडे पाहत होती..

"काय? माझ्या चेहऱ्यावर काही आहे का?" तिला तस बघताना पाहून रवी म्हणाला..

"काही नाही.. पोटभर खा.. " "हम्म.. थँक्यू.. " असं म्हणून त्याने ताव मारायला सुरुवात केली.. मानवीने एक observe केले होते ते तिने रवीला विचारले..

"रवी सर.. " "हम्म?"

"तुम्ही नेहमी केक, बिस्किट्स का खाता? तुम्ही लंच ला पण कप नूडल्स खाल्ल्या.. तुम्ही हे बाहेरचं रोज खाता का?"

 "जो मुलगा एकटा राहतो तो दुसरं करणार तरी काय?"

"तुम्ही एकटे राहता? तुमचं स्वतःच घर कुठाय मग?" ती असे प्रश्न विचारत च होती कि त्याचा धक्का लागून तिच्या अंगावर पाण्याची बाटली पडली.. मानवी एकदम कपडे झटकत उभी राहिली.. रवीने घाई घाईने tissue पेपर दिला तिला पुसायला.. त्यांचा हा गोंधळ चालू होता तेव्हाच शेवटी स्नेहल नि मानवीला केलेला मेसेज आला-

"कुठे आहेस तू?

मला तू आत्ता हवियेस माझ्या सोबत.. "

रवी ला खाऊ घालून मानवी बस स्टॉप वर आली.. बस स्टॉप वर आल्यावर तिने स्नेहल चा मेसेज वाचला आणि लगेचच कॉल लावला.. बऱ्याच वेळ रिंग झाल्यावर एका माणसाने तिचा कॉल उचलला..

"हॅलो?"

"हॅलो? तुम्ही कोण बोलताय?"

"मॅडम मी या रेस्टॉरंट चा बार टेंडर बोलतोय.. या मॅडम नि जरा जास्तच घेतलीये.. मला वाटतंय त्यांना झोप लागलीये.. तुम्ही येता का?"

"हो हो.. मी लगेच येते.. तुम्ही प्लीज तिच्यावर लक्ष ठेवा मी आलेच.. "

मानवीने लगेच टॅक्सी केली आणि स्नेहल कडे निघाली..

*******

राहुल २ तासांनी दिलेल्या ऍड्रेस वर जाऊन पोहोचला.. त्याने reception च्या इथे विचारले.. मानवी कुलकर्णी च्या नावाने १ टेबल बुक होता.. तो त्यांनी दिलेल्या टेबल वर जाऊन तिची वाट पाहत बसला..

इकडे स्नेहल मानवीचा काहीच रिप्लाय नाही आलेला बघून  त्याच रेस्टॉरंट मध्ये होती पण ती बार section ला जाऊन पीत बसली होती.. आज तिची मनःस्थिती खूपच बिघडली होती.. तिला प्रचंड एकटं वाटत होत..

तिला तशी एकटी बसून पीत बसलेलं पाहून १ जण तिच्याशी बोलायला आला.. त्याची घाणेरडी नजर तिच्यावर बराच वेळ झाली होती..

"अरे अरे अरे.. एवढं का बरं प्यायची वेळ आली? मग अशी फार चढते.. "

"चढण्यासाठीच पितात पोट भरण्यासाठी नाही.. " स्नेहालचा त्याही अवस्थेत witty रिप्लाय आला..

"अरे हो खरच कि.. तुम्ही आज न्युज पाहिली? ग्लोबल वॉर्मिंग वर रिपोर्ट आलाय.. Turns out the reason for global warming was you!" त्याची थर्ड क्लास पिक अप line ऐकून आता तिने नजर वर करून त्याच्या कडे पाहिलं.. तिने वर पाहिलंय हे बघून त्याने तिच्या खांद्याला बोट लावलं आणि भाजल्याची acting करत म्हणाला..

"You are so hot!" आता स्नेहल नि वैतागून सांगितलं.. "That was not at all funny.."

"बॉयफ्रेंड आहे? हां.. तुझ्याकडे बघून वाटतंय १-२ तरी असतीलच.. Want to go out together?"

"Can you get lost? माझं डोकं ऑलरेडी फिरलंय.. " तिचा रिस्पॉन्स ऐकून तो उगाचच हसला आणि म्हणाला..

"Don't be like that.. मला एक खूप छान जागा माहितीये.. चल ना तिकडे जाऊयात.. "

"जस्ट get lost!"

"एवढा माज दाखवायची काय गरज आहे? तू इथे अशी कुणीतरी तुला कंपनी द्यावी म्हणूनच बसली आहेस ना?" असं बोलून त्याने स्नेहल चा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला.. आता स्नेहल पण वैतागली.. आता तिचा आवाज वाढला होता..

"ए माणसा.. तुला एवढाच नालयकपणा करायचा असेल तर इथे यायच्या आधी तुझी wedding रिंग तरी काढून खिशात ठेवायची.. तुझ्या बायकोला माहितीये का तू असे धंदे करतोस ते?"

एवढं बोलून स्नेहल तिथून उठून जाऊ लागली.. तसा त्या माणसाने तिचा हात पकडून पुन्हा तिला बार स्टूल वर बसवलं..

तिचा तो आवाज ऐकून राहुल उठून चेक करायला बार section ला आला.. त्याने तो माणूस त्याच्या मानवीशी लगट करायचा प्रयत्न करतोय ते पाहिलं.. आणि धावत च तिच्या जवळ पोहोचला.. तोवर तो माणूस तिला म्हणत होता..

"काय म्हणालीस? पुन्हा बोल.." राहुल नि येऊन तिचा हात सोडवला आणि त्या माणसाला म्हणाला..

"समजतो कोण तू स्वतःला? हात नाही लावायचा तिला.. " राहुलचा चिडलेला चेहरा तो पाहत होता इतक्यात स्नेहल नि तिच्या समोर decoration साठी प्लॅटफॉर्म वर ठेवलेलं pineapple उचललं आणि त्याच्या डोक्यात मारलं.. "नालायक ! नालायक माणसा.. " असं म्हणत एका मागे एक त्याच्या डोक्यात त्याने मारत सुटली.. आता राहुल तिला आवरायला म्हणून त्या दोघांच्या मध्ये पडला.. आणि तिथल्या एका वेटर नि त्या माणसाला बाजूला केलं.. आता स्नेहल रागाने त्या माणसावर ओरडत होती..

"तुझ्या सारख्या माणसांच्यामुळे माझ्या देशाचं नाव खराब आहे.. हरामखोर.. माझ्या character वर बोट उचलतो.. स्वतः.. स्वतः married असताना असं वागतो आणि.. " प्रत्येक शब्दामागे ती त्याला मारायचा प्रयत्न करत होती आणि राहुल तिला अडवत होता.. त्याला आता साधारण अंदाज आला होता काय झाल असणारे ह्याचा.. आता तिच्या कडून असं ऐकून त्या माणसाला पण जोर चढला.. त्याने तिथला १ ग्लास प्लॅटफॉर्म वर फोडला आणि त्या तुटलेल्या ग्लास ने तिला मारायचा प्रयत्न करू लागला.. राहुल मध्ये होता आणि तो दुसरा वेटर पण त्याला पकडून होता त्यामुळे त्याचा हात तिच्या पर्यंत पोहोचला नाही.. पण राहुल च्या कपाळाला बारीक चीर पडून जखम झाली.. थोडं शांत झाल्यावर तो माणूस बाथरूम मध्ये गेला.. आणि स्नेहल ला एका खुर्चीवर बसवून राहुल त्याच्या मागे गेला..

***********

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all