Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 23

Read Later
माझी मानवी... 23
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

 

मीटिंग च्या साठी राहुल ऑफिस मधून बाहेर पडला होता.. तो सिग्नल ला थांबला होता इतक्यात त्याच लक्ष वर आकाशाकडे गेलं.. त्याला आणि मानवीला लहानपणी ढगांचे आकार बघत त्यात काही तरी शेप शोधायला फार आवडायचं.. मुंबईच्या pollution मध्ये सुद्धा त्याला आज आकाश जरा स्वच्छ आणि निळे वाटले.. त्याने खिडकीतून १ फोटो काढला आणि सिग्नल सुटायच्या आत त्याच्या मानवीला सेंड पण केला..

 

********

 

इकडे मानवी ऑफिस मध्ये as usual धावपळ करत होती.. तिला फॅशन टीम मधल्या मुलींनी खालून स्टुडिओ मधून काही items घेऊन यायला पाठवलेलं ती ते घेऊन येत होती तेव्हा तिला कॉरिडॉर च्या पॅसेज मध्ये जिथे ट्रान्सपरंट ग्लास होती तिथून बाहेर च आकाश दिसलं.. तिला त्याही धावपळीत १ फोटो काढायचा मोह आवरला नाही.. तिने हातातलं सामान समोर च्या टेबल वर ठेवलं आणि ती फोटो काढायला जाणार इतक्यात तिच्या कॅमेरा च्या लेन्स समोर रवी ने chewing गम चा फुगा फोडला आणि म्हणाला..

"hi मानवी.. काय चाललंय?"

"आह.. काय हो रवी सर माझा शॉट खराब केला.. "

"कशाचा फोटो काढतीयेस एवढा? सुपरमॅन चाललाय का उडत?" त्याने त्या ग्लास मधून बाहेर बघत विचारलं..

"आकाशाचा ... " फोन च्या स्क्रीन वर बघत तिने उत्तर दिलं..

"आकाशाचा? का?"

"सुंदर दिसतंय आज.. निळभोर.. "

तिच्या चष्म्यातून लुकलुकणाऱ्या डोळ्यांच्या कडे पाहत आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहत त्याला त्या दिवशीची गोष्ट आठवली.. जेव्हा तो बस मध्ये तिच्या मागे बसला होता आणि ती दमून झोपली होती पण तिला जाग आल्यावर तिने त्या म्हाताऱ्या आजींना बसायला जागा दिली होती.. त्यांचा तोल जातोय हे पाहून आधार देऊन बसवलं होत.. तिच्या त्या आकाश बघून खुश झालेल्या चेहऱ्याला पाहत तो म्हणाला..

"हम्म.. खरच सुंदर आहे.. "

मानवीचे त्याच्या कडे लक्ष न्हवते.. तिच्या लक्षात काही आले नाही.. ती तिचा फोटो काढून झाल्यावर सामान घेऊन गेली पुन्हा ऑफिस मध्ये गेली..

 

*******

 

स्नेहल ऑफिस मध्ये तिच्या काम करत होती.. तीच डेस्क वरच काम झाल्यावर ती तिच्या स्टाफ ला काही instruction द्यायला म्हणून खाली लॉबी मध्ये आली.. ते काम झाल्यावर तिला पुन्हा वर ऑफिस मध्ये जावस वाटेना.. जरा मोकळ्या हवेत गेल्यावर फ्रेश वाटेल असं वाटून ती हॉटेल च्या बाहेर असलेल्या लॉन वर च्या एका बाकड्यावर जाऊन बसली.. त्या झाडांच्या सहवासात तिला जरा फ्रेश वाटायला लागलं.. इतक्यात तिचा फोन वाजायला लागला.. तिने चेक केलं तर तिचे वडील तिला कॉल करत होते.. तिला त्या दिवशी चा प्रसंग आठवला.. त्यांनी तिच्या कानाखाली मारलेली पण आठवली.. तिच्या हातात फोन वाजून वाजून बंद झाला.. बंद झाल्यावर तिने साईड ला बाकड्यावर ठेवून दिला.. इतक्यात पुन्हा तिचा फोन वाजला मात्र या वेळी ती मेसेज ची रिंग होती.. तिला वाटले तिने कॉल उचलला नाही म्हणून मेसेज केला कि काय.. तिने चेक केले तर तो राहुल चा मेसेज होता.. उंच बिल्डिंग च्या बॅकग्राऊंड वर निळ्याभोर आकाशाचा एक तुकडा त्याने सेंड केलेल्या फोटो मध्ये दिसत होता.. त्या फोटो बरोबर चा मेसेज तिने आता वाचला..

"The sky is pretty today..

तुझा हात आता बरा आहे ना?"

त्याच्या मेसेज मुळे  तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिने वर आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाली.. "खरच कि.. आज आकाश सुंदर दिसतंय.. "

 

********

 

आज स्नेहल एका मुलासोबत डेट वर गेली होती.. मात्र तिने त्याला आज लवकर सोडायला सांगितले.. हा तो न्हवता ज्याने मानवीला बर्थडे पार्टी मध्ये नावं ठेवली होती.. हा तो मुलगा होता ज्याला किस करताना मानवीने स्नेहल ला पकडले होते.. आज पण तिला तो त्याच्या आलिशान गाडीतून सोडायला आला होता.. डेट वर जाण्यासाठी तिने एक शॉर्ट ड्रेस घातला होता.. त्याने घराच्या इथे गाडी आणल्यावर ती थोडी विचारात हरवलेली होती.. गाडी थांबल्यावर ती म्हणाली..

"चल मी निघते.. " ती उतरू नये म्हणून त्याने तिच्या मांडीवर हात ठेवला.. आणि तिला किस करायला जवळ येणार इतक्यात तिचा विचारात हरवलेला आवाज त्याच्या कानी पडला..  

"अरे तू आज आकाश पाहिले का रे? खूप सुंदर दिसत होते.. " त्याने चमकून तिच्या कडे पाहिले आणि तिच्या पासून लांब होत पुन्हा त्याच्या सीट वर नीट बसला.. आणि म्हणाला..

"ए स्नेहल, काय बोलतीयेस हे? That's so cheesy.. एकदम त्या रोमँटिक मुली असतात तशी फीलिंग आली मला.. That's so unlike you.."

त्याने तसे बोलल्यावर भानावर येत ती हसली.. आणि म्हणाली..

"I know right.. ? That was a little corny.. निघते मी.." असं म्हणून ती गाडीतून बाहेर पडली..

"१ मिनिट.. तू खरच चाल्लीयेस? ए स्नेहल.. थांब ना.. " तो मागून बोलत होता पण तोवर स्नेहल त्यांच्या गेट च्या इथे पोहोचली होती.. शेवटी तो निघून गेला..

ती ते गेट उघडणार त्याच्या आत मानवी गेट उघडून बाहेर आली.. तिला पाहून स्नेहल नि तिला मिठी मारली.. पण मानवीच्या दोन्ही हातात कचऱ्याच्या पिशव्या होत्या..  " बायको.... "

"व्हाट्स अप.... "

"तू मला घ्यायला बाहेर आलीस..?"

"मी कचरा टाकायला आलीये.. "

"काय ग.. " असं म्हणून स्नेहल बाजूला झाली.. तिच्या ड्रेस कडे पाहत मानवी तिला चिडवत म्हणाली..

"तिसरीतला ड्रेस आहे का हा? एवढा लहान का आहे? थंडी वाजायची मुंबईत सुद्धा.. लोकांना बोलायला कारण मिळत.. " तीचा शेवटचा रिमार्क ऐकून ती म्हणाली..

"It's my body, my life.. ज्या गोष्टींनी मला ख़ुशी मिळते तेवढंच मॅटर करत.. लोक काय काहीही केलं तरी बोलतातच.. "

"हो का? स्नेहल आमची बेस्ट आहे कि मग.. बरं.. तू जा वर आराम कर.. मी डस्टबिन च्या बॅग्स संपल्यात त्या आणायला जाते.. "

तिच्या हातातून कचऱ्याची १ बॅग घेत स्नेहल म्हणाली..

"मी पण येणार.. आणि हे मी टाकते.. तुझ्या पेक्षा माझी height जास्त आहे.. "

कचरा टाकायला नेहमी कुरकुर करणारी स्नेहल स्वतःहून म्हणाली मी येते तशी मानवी म्हणाली..

"ड्रिंक्स घेतलेत का आज? एवढी मेहेरबानी कशी?"

"असं का? बघ मग.. हा... " तिच्या चेहऱ्यावर श्वास सोडत स्नेहल म्हणाली.. "ईईई.. कांद्याचा वास येतोय सगळा.. "

असाच दंगा करत त्या दोघी कचरा टाकून आल्या.. नंतर डस्टबिन च्या पिशव्या आणायला गेल्या पण तरीही आज त्यांना घरी जाऊ वाटेना.. डस्टबिन च्या पिशव्या आणताना दोघींनी ice cream चे कोन पण घेतलेले.. ते खाता खाता दोघी त्यांच्या घराशेजारच्या त्या पार्क मध्ये आल्या आणि तिथे बसून गप्पा करायला लागल्या.. मानवीला तिला सांगायला वेळच न्हवता मिळाला कि मेधा त्या दिवशी तिच्या ऑफिस च्या इथे आली होती आणि त्या दिवशी तिला राहुल नि अल्मोस्ट पकडलंच होत.. तिने ते सांगितल्यावर स्नेहल जोरात ओरडलीच..

"काय???"

"मग नाही तर काय अग.. मेधा वर लक्ष ठेवावं लागणारे मला.. I nearly got caught that day.."

"ओह माय गॉड!! तू अजिबात पकडली जाऊ नकोस.. You absolutely can't get caught!!"

"हो ना ग.. पण तू इतकी का घाबरतीयेस? माझ्या पेक्षा तूच जास्त घाबरलेली दिसतियेस.. "

"हां? नाही ग.. म्हणजे जर का तू पकडली गेलीस तर तुझ्या साठी ते embarrassing असेल ना?" सावरून घेत स्नेहल म्हणाली..

"ह्म्म्म.. मी पण तोच विचार केला कि पकडले गेले तर गेले.. चोरी थोडी ना केलीये मी.. पण जेव्हा तस मेधा त्याला भेटली त्या दिवशी होता होता राहिलं ना.. तेव्हा मी विचार केला.. कि किती horribly humiliation situation आहे हि.. आणि माझा जीव अक्षरशः घशात आला होता.. मी तर हि अशी आहे.. पण त्याच्या साठी ते किती जास्त embarrassing असेल ना? जर का त्याला कळालं कि तो ज्या इंटर्न ला सारखा घालून पाडून बोलतो ती मुलगी त्याची मानवी आहे तर.. It's terrible to even think about it.. " तिच्या बोलण्यावर विचार करत स्नेहल म्हणाली..

"मानवी जर का तू सुरुवातीलाच जस्ट जाऊन भेटली असतीस त्याला तर? तुला काय वाटतं काय झालं असतं ?" मानवीने विचार केला आणि म्हणाली..

"Who knows? जर का मी गेले असते आणि नंतर पुन्हा त्याला इंटर्न म्हणून भेटले असते तर आम्हा दोघांच्या साठी मे बी ते uncomfortable झालं असत.. I don't know यार.. It's better I don't know..पण.. अचानक तू का विचारलं असं?" मानवीची नजर चुकवत स्नेहल म्हणाली..

"मी फक्त म्हणजे.. असं झालं असत तर काय झालं असत असा विचार करत होते ग.. पण राहुल च्या बाबतीत मला तुला.. " तीच बोलणं मध्येच तोडत मानवी म्हणाली..

"ओके.. बास आता त्या विषयावर बोलणं.. "

"का?"

"त्या विषयावर विचार पण नको करायला आणि त्यातून काही मिळणार पण नाही ना ग बोलून.. He is looking down on me anyway.. सो.. त्याबद्दल जास्त विचार करणं माझ्यासाठी ठीक नाही.. इथून पुढे त्याच्या बद्दल नको बोलायला.. चल जाऊयात आता.. मला तुला काही माझे doubts विचारायचे आहेत.. मी sticky नोट्स लावून आणल्यात एका मॅगझीन वर.. "

स्नेहल तिला राहुल तिला भेटलाय हे सांगता सांगता राहिली.. तिने विचार केला ठीके इतक्यात काही सांगायची गरज नाही.. स्नेहल तिच्या मागे खांद्यावरून हात टाकत म्हणाली..

"बरं चल ना.. आपण पावभाजी खायला जाऊया आज.. "

"काय झालंय सगळ्या लोकांना? माझ्या बरोबर पावभाजी च का खावीशी वाटते?"

"लोकांना? अजून कोण आहे?" स्नेहल च्या आवाजातली जेलसी पाहून मानवीने हसून उत्तर दिल..

"आहे एक आमच्या ऑफिस मधलं विचित्र पात्र.. "

"हो का? इतका विचित्र आहे?"

"ह्म्म्म.. Totally idiotic.. "

तिच्या बोलण्याला हसत स्नेहल नि तिला टाळी दिली.. आणि त्या पार्क मधून बाहेर पडल्या..

 

 

 

************

क्रमशः

 

************

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..