माझी मानवी... 8

A story about love, friendship, kindness and relationships

आज मानवी च काम सगळ्यांच्या बरोबर संपलं होत.. आज लवकर घरी जाता येणार हा विचार करून तिला आनंद झाला.. तिनी तिच्या कामाचा मेल पाठवला आणि तिच्या टीम लीडर ला सांगायला गेली कि तीच आजच काम झालेलं आहे..

"सर माझ्या आजच्या टास्क झाल्यात complete.. मी मेल पण केलाय.. तुम्ही एकदा चेक करता का?", मानवी ..

"अरे वा.. आज वेळेत काम झालं म्हणायचं तुझं.. छान.. मी करतो चेक.. "

"सर अजून काही काम नाही ना ?" मानवी नि घाबरत विचारलं..

"आता कसलं काम? असलं तरी उद्या करू.. अरे हो.. फक्त जाता जाता हे ऑफिस supplies एडिटिंग टीम ला नेऊन देशील?" टेबल वर ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्स कडे बोट करून ते म्हणाले..

"सर मी जाऊ ते घेऊन ?" मानवीनी हळू आवाजात विचारले.. कारण तो बॉक्स बराच जड वाटत होता.. द्यायचंच असेल तर हे काम एखाद्या मुलाला द्यायला हवं असं तिला वाटलं.. म्हणून तिनी परत विचारलं..

"हो.. तेवढंच आहे काम.. तिथून डायरेक्ट घरी गेलीस तरी चालेल.. आत्ता जातानाच लॉग आऊट करून जा हवं तर.. "

लवकर जायला मिळतंय तर जाता जाता करून जाऊया.. एवढं काय त्यात.. आणि तेवढंच कंपनी मधले दुसरे डिपार्टमेंट्स बघायला मिळतील असा विचार करून तिनी तो बॉक्स घेऊन जायचं ठरवलं.. तिचा कॉम्पुटर लॉग आऊट करून आणि बॅग घेऊन ती तो बॉक्स घेऊन निघाली.. त्यांचं डिपार्टमेंट ३ऱ्या मजल्यावर होत तर हे डिपार्टमेंट ७व्या मजल्यावर..

ती लिफ्ट मधून बाहेर पडली आणि समोरचा पॅसेज बघतच राहिली.. सगळी कडे एकदम व्हाईट मार्बल फ्लोअर, एखाद्या आलिशान हॉटेल मध्ये असते तशी सजावट होती.. एका भिंतीवर मोठ्या अक्षरात जसे मॅगझीन वर लिहिलेले असायचे तसे लिहिलेले - FACE magazine..  काही मॉडेल्स चे फोटोज पण त्या पॅसेज मध्ये लावलेले.. समोर एक काचेचे ऑटोमॅटिक दार होते.. हा सगळा मजलाच एडिटिंग डिपार्टमेंट चा होता हे तिला यायच्या आधी सांगितले होते.. त्यामुळे ते एकमेव काचेच्या दारातूनच जायचे असणार हे तिच्या लक्षात आले.. तिने तिचे कार्ड पंच केले आणि इकडे तिकडे बघत त्या दारातून आत गेली आणि समोर पाहतच राहिली.. तिच्या तोंडातून आपोआप च आले-

 " ओह माय गॉड !!! Awesome !!!"

३ छोट्या पायऱ्या उतरून समोर अख्खा फ्लोअर ओपन कन्सेप्ट नि design केला होता.. खोलीतला प्रत्येक जण प्रत्येकाला पाहून शकत होता.. म्हटलं तर षट्कोनी आकाराचे cubicles होते पण खूप कमी लोक जागेवर बसून काम करत होते.. जो तो धावा धाव करत काम करत होता.. तिथेच एका बाजूला छोटीशी पॅन्टरी पण दिसत होती.. तिथून इन्स्टंट कॉफी चा वास दरवळत होता.. तिथेच एक समोर गेल्यावर काचेचे केबिन  पण दिसत होते.. एका बाजूने एक जिना वर जात होता आणि वर पण एखादे केबिन असावे असे वाटत होते.. पण मानवी चे लक्ष वेधून घेतले ते समोर दिसणाऱ्या एका भिंतीने.. तो १ भला मोठा ८ फुटी डिजिटल बोर्ड होता.. ज्यावर मॅक्सझिन मधले फोटो सेशन केलेले बरेच फोटो slide show होत होते..

मानवी सगळीकडे curiosityने पाहत होती.. त्या पूर्ण खोलीतली लगबग बघून तिला त्यांच्या डिपार्टमेंट मधली सुस्तावलेली लोक आठवली.. उरकायचे म्हणून उरकायचे असा attitude ठेवून केलेलं काम आणि हे समोर ती पाहत असलेलं जीव तोडून केलेलं काम यात किती फरक आहे.. पण तिच्या हे हि लक्षात आले कि इथे लोक busy दिसत असले तरी पेहराव अतिशय स्टायलिश होता..

स्नेहल इकडे अगदी फिट बसेल, मानवी नि स्वतःशीच विचार केला.. ती आता तो बॉक्स घेऊन तिथे मान खाली घालून काम करणाऱ्या एका मुली कडे घेऊन गेली..

"excuse me.. मी हे ऑफिस supplies घेऊन आलीये management डिपार्टमेंट मधून.. हे कुठे ठेवू?" प्रत्येक टेबल वर काही ना काही पसारा होता.. आपण चुकून कुठल्या तरी डेस्क वर ठेवायचो आणि महत्वाचे काही कागद असतील तर खराब व्हायचे म्हणून तिने विचारले..

"तिकडे पहिला डेस्क रिकामा आहे तिकडे नेऊन ठेवा.. "त्या मुलीनि मान वर न करताच उत्तर दिले आणि फक्त हाताने दिशा दाखवली..

मानवीनी तिने दाखवलेल्या दिशेने पहिले तर तो डेस्क रिकामा दिसला.. ती त्या मुलीला थँक्यू म्हणून त्या डेस्क वर बॉक्स ठेवायला गेली.. तिने बॉक्स ठेवला तेवढ्यात एक करारी चेहऱ्याची ३५ च्या पुढची दिसणारी पण प्रचंड attractive दिसणारी एक बाई आली.. तीच वय जरी ३५ च्या पुढचे असले तरी तिला बाई न्हवे मुलगीच म्हणले पाहिजे असे तिला वाटले.. ती काही तरी पेपर्स चेक करत आली.. मानवीच्या जवळ आल्यावर तिने मान वर करून तिच्या कडे पहिले आणि म्हणाली..

"finally आलीस तू.. you are late.. "

"सॉरी मला माहिती न्हवत तुम्हाला urgency आहे ते मी.. " मानवी बोलतच होती कि तिने हातानी बोलणं थांबवं असा इशारा केला आणि पुढे बोलू लागली..

"हे document चे पार्सल आहे खाली जाऊन पहिल्यांदा पार्किंग मध्ये courier वाल्याला देऊन ये.. तो तिथे थांबला असेल त्याच payment online झालेलं आहे सो पैसे देऊ नकोस.. आणि वर येऊन हे प्रूफ रीड करून ठेव.. आणि जर का तू माझ्या बरोबर काम करणार असशील तर तुला तुझ्या केसांचं काही तरी करावं लागेल.. पार्सल - courier - Now ! " एवढंच बोलून मानवीच्या फुगलेल्या केसांच्या कडे १ कटाक्ष टाकत ती तिच्या कामाला निघून गेली..

सगळं इतकं फास्ट झालं कि मानवीला काही बोलायला पण चान्स मिळाला नाही.. 

"पण मी का हे सगळं करायचंय?" मानवी बोलली पण तीच ऐकायला कुणीच न्हवत.. तिथली गडबड बघून तिला योग्य पण वाटलं नाही कि तिला सोपवलेलं काम दुसऱ्याला सांगून सटकावं..

ती ते courier चे पार्सल घेऊन पळत पार्किंग लॉट मध्ये गेली.. तिथे १ माणूस bike वर बसलेला होता.. तिने विचारले " फेस मॅगझीन साठीच ना ?"

त्या माणसाने हेल्मेट घातलेले.. तो म्हणाला " हो "..

तो हो म्हणाल्या म्हणाल्या तिनी त्याच्या हातात ते पार्सल पकडवल आणि म्हणाली " हे पार्सल आणि तुमचं payment झालेलं आहे सो प्लीज त्या address ला लवकर  courier करा.. " एवढं म्हणून ती पळत वरती गेली सुद्धा..

इकडे हेल्मेट काढून तो मुलगा विचार करत होता.. हिला कुठे तरी या आधी पाहिलं आहे.. ( मानवीला जॉब च्या पहिल्या दिवशी धडकलेला मुलगा हाच होता.. )

मानवी धावत पळत वर आली.. तिला दिलेले documents चे तिने प्रूफ रिडींग करत संपवत आणलेच होते कि एका चष्मीश आणि थोडासा जाड असलेल्या माणसानि तिच्या समोर अजून १ file ठेवली.. आणि म्हणाला,

 "तुम्हाला यायला उशीर झाला मॅडम.. हे हि चेक करा आजच.. आमचे schedule थोडे गडबडले आहे आणि २०वि anniversary चे स्पेशल सुद्धा करायचे आहेत.. सो हे पुन्हा करायला मला वेळ नाहीये.. तर हे चेक करा यात काही typo mistakes नको असायला.. आणि प्लीज एडिटिंग कडे पण लक्ष ठेवा नाहीतर आम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ.. ठीके?" एवढं बोलून तो पण परत त्याच्या कामाला गेला..

एव्हाना काम करत करत मानवी हे हि विसरून गेलेली कि ती इथे ती काय करायला आलेली आणि आता काय करत आहे ते.. तिनी ते हि काम घेतलं आणि पहिल झालं कि हे सुरु केलं.. इतक्यात तो खाली भेटलेला मुलगा वर आला होता.. तिला तिथे काम करताना बघून तो आत्ता ज्यांनी तिला file दिलेली त्यांच्या कडे गेला आणि म्हणाला.. "भाईसाब हि कोण आहे हो ?"

"अरे रवी आलास तू? हां ती होय? ती फ्रीलान्सर आहे.. १० दिवस साठी तिला घेतलंय.. तुझं पण काही प्रूफ रिडींग, एडिटिंग नाहीतर revising असेल तर करून घे.. "

"बरं झालं सांगितलंत " रवी म्हणाला..

मानवीच्या डेस्क वर येऊन रवीने १ भलं मोठं जाडजूड document ठेवलं आणि म्हणाला, " यामध्ये अल्मोस्ट zero टायपिंग मिस्टेक्स आहेत आणि रायटिंग पण अमेझिंग आहे सो you will be done in no time!"

"हां ? ओके " मानवीनी एकदा त्या बंडल कडे पाहून सांगितलं..

"आपण या आधी कधी भेटलोय का ?"

"हां ? नाही.. पहिल्यांदाच भेटतोय "

"are you sure ?"

"हो.. "

"night club मध्ये भेटलेलो आहे का मग आपण.. ?"

एकदम सरळ चेहरा करून मानवीने उत्तर दिले, "नाही.. "

इतक्यात ज्यांनी सुरुवातीला दिलेले काम त्या मॅडम आल्या.. " झालं काम complete ?" त्यांनी विचारलं..

"हो हो.. झालं.. " मानवीने लगेच ते document त्यांना दिलं.. त्या ते चेक करत तिथून निघून गेल्या आणि मानवी पुन्हा कामाला लागली..

या सगळ्या गदारोळात तिने स्नेहल ला फक्त मेसेज करून सांगितलं होत कि तिला यायला खूप उशीर होईल तर जेवायला थांबू नकोस.. आणि तसेच झाले होते.. मानवीला घरी पोहोचायला ११ वाजले.. ती इतकी दमली होती कि बस स्टॉप वर सुद्धा तिला पेंग आवरत न्हवती.. स्नेहल नि अक्षरशः जबरदस्ती तिला इन्स्टंट नूडल्स खाऊ घातले आणि १२ ला मानवी झोपली..

*************

दुसऱ्या दिवशी ऑफीस मध्ये एडिटिंग डिपार्टमेंट ला कळाले कि ज्या फ्रीलान्सर ला बोलावलं होत तीच काही पर्सनल कामामुळे यायचं कॅन्सल झालं होत .. आणि त्यांचं काम करून गेलेली त्यांच्याच कंपनी मधली एम्प्लॉयी आहे, जी कि इंटर्न म्हणून च management डिपार्टमेंट मध्ये आहे.. तिचं दर्जेदार काम आणि कामाचा स्पीड बघून त्यांनी तिची बदली मिनिमम ३ महिन्या साठी तरी त्यांच्या डिपार्टमेंट ला करून मागितली होती.. एडिटिंग डिपार्टमेंट नि मागितल्यावर नाही म्हणायचा सवाल च न्हवता..

जेव्हा तिच्या मॅनेजर नि हि न्युज तिला सांगितली तेव्हा मात्र तिची reaction आनंदाची कमी आणि घाबरल्याची जास्त होती.. तिला हि बदली नको होती.. कारण नाही म्हटलं तरी तिला तिथलं fashionable वातावरण थोडं जड च गेलं होत..

"सर पण मीच का?"

"त्यांनी स्पेशल request पाठवलीये आणि आपण त्यांना नाही म्हणूच शकत नाही.. ती टीम सगळ्यात महत्वाचं काम करते हे तर माहितीच असेल तुला..फक्त ३ महिने तिकडे राहा आणि मग ये परत इकडे ?"

"काय? ३ महिने? म्हणजे.. म्हणजे मला कळालं नाही सर.. "

"३ महिन्यांच्या साठी त्यांचा वर्क लोड जास्त असणारे म्हणून ३ महिने मागितलय त्यांनी तुला.. "

"पण सर.. मला नाही जायचं.. याच डिपार्टमेंट मध्ये मला पर्मनंट व्हायचं आहे.. "

"हे बघ आत्ता जा.. ३ महिन्यांचा तर प्रश्न आहे.. ३ महिने झाले कि मी तुला इकडे बोलावतो आणि तुला पर्मनंट पण सगळ्यांच्या आधी करतो.. मग तर झालं?"

मानवी नाईलाजाने तयार झाली.. तिने तीच सामान उचलेले आणि ती एडिटिंग डिपार्टमेंट मध्ये गेली.. आज हि सकाळ ची सुरुवात च असली तरी गडबड दिसत होती..

तिने जरा मोठ्यानी च म्हणले " excuse me.. माझी management डिपार्टमेंट मधून इकडे ट्रान्सफर झाली आहे.. "

"ओह.. वेलकम दीदी.. तिकडे एकदम त्या काचेच्या केबिन च्या समोर चे डेस्क आहे ना ती तुझी जागा आहे.. " तिच्या पेक्षा वयाने निदान ६ वर्षे तरी लहान वाटणाऱ्या मुलानि तिचे स्वागत केले आणि तिला तिची बसायची जागा पण दाखवली.. त्याच ते genuine स्माईल आणि एकदम फ्रेंडली वागणं बघून तिला थोडा धीर आला.. ती तिचे सामान घेऊन त्या डेस्क वर गेली इतक्यात तिला स्नेहल चा फोन आला..

"हॅलो बायको.. "

"हॅलो माऊ.. काय करू ग आता.. "

"तेच तुझी अशी अचानक ट्रान्सफर कशी काय झाली.. तुझा मेसेज वाचून काही कळेना म्हणून कॉल च केला डायरेक्ट.. काल तर तू रात्री एवढी उशिरा आलेली घरी.. नक्की चाललंय काय?"

"काहीच कळायला मार्ग नाही अग.. "

"तुला काल  काहीच नाही का सांगितलं त्यांनी.. ?"

"नाही ना.. "

इतक्यात एका ५० उलटून गेलेल्या पण २० वर्षाच्या मुली सारखा ड्रेस घातलेली एक बाई त्या काचेच्या दारातून आत आली..

 "Bonjour... " तिने फ्रेंच मध्ये सगळ्यांना मोठ्यांनी गुड मॉर्निंग विश केले तसे सगळे उठून उभे राहिले.. इकडे मानवी हळू आवाजात स्नेहल शी बोलत होती..

"स्नेहल ऐक ना..आत्ता एक काकू आल्यात.. आईच्या वयाच्या असतील पण कसल्या नटल्या आहेत बघायला पाहिजेस तू.. "

तीच बोलणं ऐकून स्नेहल ला हसायला आलं..

"ए मानवी.. तोंडावर हसू वगैरे नको हां.. नॅचरल मेकअप नसेल आणि डार्क मेकअप असेल तर तू फसकन तोंडावर हसतेस.. इट्स ए बॅड हॅबिट ऑफ यूअर्स.. "

मानवी तीच ऐकून खुसू खुसू  हसतच होती इतक्यात त्या मॅडम नि विचारले.. " अजून ते आलेले दिसत नाही.. एव्हाना यायला हवे होते.. " त्यांनी काचेच्या केबिन कडे पाहत बोलले.. त्या असे बोलत असतानाच ते काचेचे दार पुन्हा उघडले आणि ब्लेझर घातलेला एक उंचपुरा हँडसम मुलगा त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिला.. त्या दोघांनी हॅन्डशेक केला.. मानवीला हसू कंट्रोल होत न्हवते त्यामुळे तिनी त्यांच्या कडे पाठ केली होती.. इतक्यात त्या मॅडम नि announcement करायच्या आवाजात सांगितले, "everyone प्लीज पे अटेंशन हियर !" तसं मानवीनी “परत कॉल करते ग” असं सांगून फोन कट केला आणि वळून पहिले.. आणि.....

"लेट मी इंट्रोड्युस युअर न्यू कलीग.. he is from New York FACE office आणि ह्यांची जस्ट इकडे ट्रान्सफर झाली आहे.. हे आज पासून आपल्या टीम बरोबर as a डेप्युटी एडिटर इन चीफ म्हणून काम करतील.. "

"hello everyone..मी राहुल अवस्थी.. मी आज पासून तुमच्या बरोबर डेप्युटी एडिटर इन चीफ म्हणून काम करेन.. Nice to meet you all... " राहुल नि हसून त्याची ओळख करून दिली..

मानवीचा आश्चर्याने आ वासला गेला होता.. तिचा हात तिचे expressions कुणाला कळू नयेत म्हणून  तिने तोंडावर झाकला.. ती डोळे विस्फारून त्याच्या कडे पाहत होती..

तुम्ही आयुष्यात कितीही सावधगिरीने राहिलात तरी नियतीने तुमच्या साठी काय surprises ठेवलेली आहेत यावर तुमचा काहीच कंट्रोल नसतो.. रिऍलिटी मध्ये काहीही तुमच्या अपेक्षे प्रमाणे होत नाही.. राहुल काय आणि मानवी काय, दोघांनी हि हे कधीच प्रेडिक्ट केले नसते कि त्यांच्या आयुष्यात इथून पुढे काय उलथापालथ होणारे..

************

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all