Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 22

Read Later
माझी मानवी... 22
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

 

राहुल त्याच्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये as usual टॅब मध्ये डोकं घालून बसला होता..

"सर तुमची कॉफी रेडी आहे.. " टेबल वर knock करत ती waitress म्हणाली.. राहुल नि दचकून तिच्या कडे पाहिलं..

"तुमची कॉफी.. " "ओह.. थँक्यू.. " आज कॉफी देऊन न जाता ती तिथेच थांबली.. आणि तिच्या अपेक्षे प्रमाणे कॉफी कडे हात न जात त्याचा हात समोर ठेवलेल्या फुलदाणी कडे गेला.. तस तिने ती त्याच्या समोरून उचलली.. आणि कॉफी चा कप त्याच्या समोर सरकवला.. त्याने तिच्या कडे पाहिलं असता ती हसून कॉफी कडे बोट करून निघून गेली.. राहुल नेहमी त्याची कॉफी On the go cup मध्येच ऑर्डर करायचा.. त्याने आज ऑफिस मध्ये जाऊन कॉफी प्यावी असा विचार केला आणि टॅब त्याच्या लॅपटॉप बॅग मध्ये ठेवून तो जाऊ लागला.. इतक्यात त्याला फोन आला म्हणून त्याने तिथेच एका टेबल वर कप ठेवला आणि कॉल receive केला..

"हॅलो? हो बोलतोय.. ओह.. तुम्ही केलाय का मेल? मी लगेच चेक करून सांगतो मग.. हो हो.. लगेच.. " असं म्हणून त्याने जिथे कप ठेवलेला त्याच टेबल वर बसला.. तो जिथे बसला त्या खुर्चीवर १ डायरी दिसली.. त्याने इकडे तिकडे पहिली  कि हि कुणाची आहे असं..  इतक्यात समोरून एका छोट्या मुलीचा आवाज आला..

"ती माझिये.. "

त्याने वर पाहिलं आणि त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास च बसेना.. मानवीची लहानपणीची कारबन कॉपी त्याच्या समोर उभी होती.. त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली..

मानवी जस्ट मेधा नि सांगितलेल्या कॉफी शॉप मध्ये आली आणि तिने दारातूनच पाहिलं.. मेधा राहुल च्या समोर उभी होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आलेली.. आता तिचा भीतीने घसा कोरडा पडला.. तिने पटकन एका पिलर च्या मागे दडी मारली.. आणि तिथून लपून ती पाहू लागली..आता तिने दात एकमेकांवर आपटून आवाज करायला सुरुवात केली होती..

राहुल नि मेधाला तिची डायरी परत दिली होती आणि तिच्या साठी १ pastry  आणि कोल्ड कॉफी घेऊन आला होता.. इकडे मानवी मेधा ला फोन करत होती पण बरोबर आताच ती उचलत न्हवती.. राहुल तिच्या समोर येऊन बसल्यावर मेधा ने त्याला विचारले..

"तुम्ही माझ्या ताईला कसे ओळखता? कोण आहात तुम्ही?"

"उम्म्म.. मी.. मी तिचा मित्र आहे.. "

"मित्र? what kind of friend?"

"what kind of friend?! उम्म्म.. कस सांगू आता.. " तो असं म्हणत च होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला..

"१ मिनिट हां.. मी एवढा फोन घेतो.. " असं म्हणत त्याने फोन उचलला.. ती मानवी होती..

"हॅलो? हॅलो राहुल सर.. मी management डिपार्टमेंट मधली इंटर्न बोलतीये.. (त्याचा काहीही रिस्पॉन्स न बघून ती पुढे म्हणाली.. )The one who always causes trouble..मी तुम्हाला फोन करायचं कारण कि.. आं.... हां.. लोला मॅम तुम्हांला शोधत होत्या.. हो.. त्यांनी तुम्हाला ताबडतोब यायला सांगितलंय.. "

"ठीके.. निघतो मी.. " एवढं म्हणून त्याने फोन ठेवला आणि मेधा ला म्हणाला..

"मेधा मला जावं लागेल.. मला अजून थोडा वेळ तुझ्याशी बोलायचं होत पण काहीतरी काम निघालंय मला जावं लागेल.. आपण पुन्हा भेटू.. ठीके?"

एवढं बोलून तो तिथून बाहेर पडला.. तो जसा दारातून बाहेर पडला तशी मानवी पळत मेधा च्या समोर जाऊन बसली..

"ए मेधा.. तुला कुणी ग सांगितलेलं इकडे यायला?"

"काय ग? किती उशीर लावलास ताई.. आत्ता च १ दादा इथून गेला बघ.. तो म्हणत होता कि तो तुझा मित्र आहे म्हणून.. " तिच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करून ती म्हणाली..

"तू त्याच्याशी काय बोललीस? तू म्हणालीस का कि तू मला इथे भेटायला आलीयेस म्हणून? तू सांगितलं नाहीस ना कि सिग्नल क्रॉस केल्यावर च्या बिल्डिंग मध्ये तुझी ताई काम करते म्हणून?" मानवी पॅनिक होऊन तिला एका मागे एक प्रश्न विचारत होती..

"मी सांगितलं असलं तरी काय झालं?" तिचा प्रतिप्रश्न ऐकून मानवीने डोक्याचे केस च पकडले..

"मेली तू मानवी.. आज तू मेलीस.." तिची reaction बघून मेधा म्हणाली..

"मी त्याला काहीही सांगितलेलं नाही.. chill.. "

"नाही सांगितलं?"

"आता एवढी म्हातारी झालीस का कि मी बोललेलं पण ऐकू नाही आलं तुला? सांगितलं ना कि नाही सांगितलं काही म्हणून.. " सुटकेचा निःश्वास  सोडून मानवी म्हणाली..

"सुटले.. देवा वाचवलंस रे बाबा.. " आता मेधा नि तिला काळजीने विचारल्यासारखे विचारले..

"ए ताई.. तू त्या माणसाकडून पैसे तर न्हवते ना घेतले उधारीवर? इतकी घाबरली का आहेस?"

"काय? काहीही काय बोलतेस ग?! समजतेस काय तू मला.. आणि तुला आम्ही शिकवलं नाहीये का  कि अनोळखी व्यक्तींच्या बरोबर बोलायचं नाही म्हणून.. अजून नाही शिकलीस का ते?"

"What are you talking about? clearly कळत होत कि तो तुला ओळखतो म्हणून.. "

"गप्प बस.. हे ५०० घे.. बर्गर खा आणि घरी जा.. इकडे तिकडे भटकत बसू नकोस.. "

तिच्या हातात ५०० रुपये कोंबून मानवी पळत पुन्हा ऑफिस मध्ये गेली.. तिला राहुल ला लोला मॅम ना भेटायच्या आधी गाठायचं होत.. ती पळत गेली तोवर तिला राहुल लोला मॅम च्या समोर उभा राहून बोलताना दिसला..

"मॅम काही काम होत का?"

"काम? कसलं काम?"

"तुम्ही बोलावलंत ना मला?"

इतक्यात मानवी तिथे धापा टाकत आली आणि राहुल च्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाली..

"सर.. सॉरी.. त्यांनी नाही बोलावलं.. माझ्या कडून काहीतरी ऐकण्यात चूक झाली.. सॉरी.. कुणीच नाही बोलावलं तुम्हाला.. सॉरी सर.. "

राहुल नि तिच्या कडे पाहून १ उसासा सोडला आणि लोला मॅम ना म्हणाला..

"सॉरी मॅम.. मला चुकीचा मेसेज डिलीव्हर झालेला.. "

पण लोला मॅम च लक्ष त्याच्या कडे नसून मानवीच्या डोक्या कडे होत..

"इंटर्न? तुला सांगितलेलं ना ग मी त्या केसांचं काहीतरी करायला? थोडं तरी? काहीतरी कर त्यांचं.. "

मानवी नकळत तिच्या केसांच्या वरून हात फिरवून ते बसवायचा प्रयत्न करू लागली.. तिचे ते निष्फळ प्रयत्न बघत राहुल तिथून निघून गेला.. मानवी पण त्यांच्या मीटिंग च्या तयारी ला लागली..

 

मीटिंग मध्ये राहुल सगळ्यांच्या ideas वर त्यांनी ज्या कन्सेप्ट फाइल्स बनवल्या होत्या त्यावर नजर टाकत होता.. एक एक करत सगळ्या फाइल्स त्याने चाळल्या.. आणि वर पहिले.. सगळे त्याच्या बोलण्याचीच वाट पाहत होते..

"तुमच्या पैकी एकाला सुद्धा एक streamlined proposal नाही बनवता आलं? असं वाटतंय मी शाळेत मुलांनी लिहिलेले essay वाचतोय.. भले मोठे च्या मोठे लिहिलेत हे.. पाठपोठ ४ पानं भरली म्हणजेच मार्क्स मिळतील अशा हिशोबाने मुलं लिहतात तस लिहिलंय हे.. मला वाटलेलं इथे फक्त प्रोफेशनल लोक काम करतात.. पण तुम्ही तर सगळे amateurs आहेत.. ज्यांना मॅगझिन्स मधले decision कसे घेतले जातात ह्याची काही कल्पना च नाहीये.. If you can't attract reader's attention with just one sentence or one picture, तर ह्या मॅगझीन ला अर्थच नाही ना.. इथून पुढे, proposals पण आपल्या मीटिंग सारखीच असतील.. मी फक्त असेच streamlined proposals accept करेन जे वाचायला ४ मिनिटांच्या पेक्षा कमी वेळ लागतो.. आणि आपल्या २० व्या एनिवर्सरी च्या special एडिशन साठी आपण आज पर्यंत जे डिस्कस केलं होत ते विसरून जाऊया आणि नवीन सुरुवात करूया.. विथ अ क्लीन स्लेट.. "

"काय? सुरुवातीपासून?" सीमा मॅम नि न राहून विचारलं..

"का पण?" विजय सर म्हणाले.. रिया पण त्यांना दुजोरा देत म्हणाली..

"का सर? त्यातले काही पॉईंट्स ओके होते ना?"

"Under what standards are they okay?" राहुल नि विचारलं..

"वेल सर, मला त्यातल्या काही ideas इंटरेस्टिंग.. " तीच बोलणं कट करत राहुल म्हणाला..

"ओके या वर्ड च फक्त १ च मिनिंग असू शकत.. ओके = जे विकलं जाईल ते.. तुम्हां लोकांना खरंच वाटतं का कि आपण या ideas बरोबर गेलं तर ते चांगलं विकलं जाईल? Better than "New look"? " राहुल नि अशा शब्दात मांडल्यावर ती गप्प बसली.. सगळ्यांचा मूड गेलेला पाहून रवी म्हणाला..

" पण तुम्ही जर का अशा पद्धतीने मांडलेत तर.. आम्ही अशा environment मध्ये आमची ओपिनिअन्स कशी देणार? तुम्हाला नाही वाटत हे जरा ब्रूटल होतंय? Let's be comfortable.. You know.. Be free.." त्याच्या बोलण्यावर सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली.. त्या सगळ्यांच्या मनातलेच तो बोलला होता.. सगळ्यांची reaction बघून राहुल म्हणाला..

"जर का तुम्हाला  comfortable आणि free environment हवे असेल तर कामावर कशाला येता? घरी राहा ना.. And  Be free... " तो तस बोलला म्हटल्यावर रवी हसून म्हणाला..

"तुम्ही असं कसं बोलता? मला वाईट वाटलं ना.. " त्याने त्या पण situation मध्ये त्याने फार सिरीयस वातावरण होऊ नये म्हणून हसण्यावारी नेलं पण आता सगळ्यांच्या लक्षात आलं कि राहुल काय म्हणतोय ते.. राहुल च बोलणं ऐकून मानवी च्या लक्षात आलं कि काढून टाकायची धमकी फक्त तिच्या साठीच नाहीये..

राहुल नि सगळ्या फाइल्स गोळा केल्या आणि शेजारच्या डस्टबिन मध्ये टाकल्या.. आणि म्हणाला..

"आपण पुन्हा मीटिंग घेऊ once you have a new concept.. " निघायच्या दृष्टीने उठत तो म्हणाला.. "आणि सीमा मॅम तुम्ही Mr. Taylor ना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का?"

"मी try करतीये पण त्यांचं schedule इतकं पॅक आहे कि त्यांच्या सोबत collaboration होणं मला सध्या तरी अशक्य वाटतंय.. " त्यांचा रिप्लाय ऐकून राहुल नि sarcastic हसून उसासा सोडला आणि म्हणाला,

"I think I overrated you.. "

"काय?"

"आपण या आधी जस प्लॅन केलाय त्याप्रमाणे आपल्याला above and beyond जाऊन हे collaboration २० व्या एनिवर्सरी साठी श्यक्य करावं लागणार आहे..  तुम्हाला जमत नाहीये तर राहूद्या.. मी त्यात लक्ष घालतो.. You stay out of it.. " एवढं बोलून राहुल मीटिंग रूम मधून बाहेर पडला..

त्याच बोलणं ऐकून सगळ्यांनीच एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं.. सीमा मॅम उठत म्हणाल्या, "आज माझ्याशी कुणी बोलू नका.. "

सगळ्यांनी हळू आवाजात हो म्हटलं आणि त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडले.. मानवी आवरत स्वतःशीच विचार करायला लागली..

"असं काय झालं अमेरिकेत कि हा इतका बदलला?!"

 

 

************

क्रमशः

 

************

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..