माझी मानवी... 26

A story about love, friendship, kindness and relationships

राहुल नि तिला गाठे पर्यंत स्नेहल चालत तिच्या हॉटेल च्या रोड ने चालत निघाली होती.. राहुल ने पटकन त्याची गाडी काढली आणि तिच्या मागे आला.. ती फुटपाथ वरून चालत असताना त्याने तिच्या साइड ला गाडी लावली आणि म्हणाला.. "Get in.. आज माझ्या बरोबर थोडावेळ थांब ना.. "

स्नेहल त्याला टाळायला म्हणून म्हणाली.. "आज नको राहुल.. पुन्हा कधीतरी.. " तरी तीच न ऐकता तो म्हणाला..

"बस ना.. प्लीज ? come on.. प्लीज प्लीज प्लीज... " त्याचा तो हसतमुख चेहरा आणि उत्साही बोलणं ऐकून तिला त्याच मन मोडवल नाही..

ती येऊन त्याच्या गाडीत बसली.. पण अजूनही ती त्याच्याशी काही बोलत न्हवती.. फक्त शांत बसली होती.. तोच तिच्याशी गाडी चालवत बोलायचा प्रयत्न करत होता.. "उम्म्म.. काय करूयात आपण आज? मूवी ला जाऊयात कि लॉंग ड्राईव्ह वर जाऊया कि... " स्नेहल नि आज शॉर्ट स्कर्ट घातला होता ती uncomfortable आहे कि काय असं वाटून बोलता बोलता त्याने त्याच काढून ठेवलेलं जॅकेट तिच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाला.. "हे घे.. be comfortable.. "

"ओह.. थँक यु.. " त्याच्या या अशा वागण्याने इतका वेळ स्वतःच्याच विचारात हरवलेली आणि खिडकीबाहेर बघत बसलेली स्नेहल त्याच्या कडे पाहू लागली.. तिला चान्स मिळाला कि touch करायला पाहणारेच मुलं तिने पाहिले होते.. पण तिच्या comfort चा विचार करणारा ती पहिल्यांदाच पाहत होती..

तीने जॅकेट मांडीवर ठेवल्यानंतर खाली १ रॅकेट आणि बॉल च किट दिसलं त्यावर तिने विचारलं.. "तू टेनिस खेळतोस?"

"नाही अग.. ते स्पीडमिंटन आहे.. मी त्या health सेंटर मध्ये मेम्बरशिप घेतल्यावर मला त्यांनी हे फ्री दिलं.. काय नवीन काढतील ते खरं बघ मार्केटिंग साठी.. मी अजून काय ते try नाही केलं.. असं करूयात का? हेच खेळुयात का? तुला माहितीये एखादं पार्क आत्ता ओपन असलेलं..बराच उशीर झाला ना ?"

"हम्म.. इथेच आहे डाव्या बाजूला एक.. "

स्नेहल नि सांगितलेल्या जवळच्याच पार्क मध्ये ते दोघे गेले.. स्नेहल चा अजूनही मूड न्हवताच.. तिला वाटलेलं थोडंसं त्याच्या समाधानासाठी फिरू आणि नंतर हॉटेल वर सोडायला सांगू.. पण राहुल नि खरच ते स्पीडमिंटन चे रॅकेट आणि बॉल घेतले.. आत पार्क मध्ये एक भरपूर लॉन, वारं आणि प्रकाश असलेली जागा त्याने निवडली आणि तिच्या हातात १ रॅकेट देऊन तिच्या पासून लांब जात तो म्हणाला.. "जो हरेल त्याने जिंकलेल्याला डिनर द्यायचं.. "

"पण राहुल ऐक ना.. माझा आज मूड.. " ती असं बोले पर्यंत त्याने १ बॉल सर्व्ह पण केला होता.. तिने तो त्याच्या दिशेने टोलवला आणि म्हणू लागली "पण राहुल.. "

तोवर त्याने पुन्हा मारला पण आता तिला टोलवता नाही आला.. तस तिला चिडवत तो म्हणाला.. "आज मी खूप मोठा डिनर खाणार असं दिसतंय.. "

तशी स्नेहल पुन्हा चुरशीने खेळायला लागली.. आता तिने एकदाही बॉल तिच्या साईड ला पडू दिला नाही.. आणि १ बॉल त्याला टोलवता आला नाही तसं "येस्स्स !!" असं जोरात ओरडून ती म्हणाली.. "१ मिनिट थांब.. time प्लीज.. " आणि लहान मुलं खेळताना जसे पालथ्या हाताची पापी घेऊन ब्रेक घ्यायचे तस तिने केलं.. तिची हि reaction बघून त्याला पण हसू आवरलं नाही.. तिने तिचे हिल्स चे शूज बाजूला काढून ठेवले आणि म्हणाली.. "आता तू गेलास.. You are dead meat now.."

"बघू कि बघू.. " असं म्हणत ते पुन्हा खेळू लागले.. तरीही स्नेहल च हरत होती हे बघून त्याने पुन्हा चिडवायला सुरुवात केली.. " मिस मानवी कुलकर्णी यांचे अतिशय खराब खेळाचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे.. " तशी ती कुरकुरत म्हणाली.. "Hey.. I have a disadvantage !" तिच्या स्कर्ट कडे तिने हात करत म्हटलं तरी कळालं नाही अशा अविर्भावात तिच्या जवळ येत तो म्हणाला.. "कसलं disadvantage ?" येता येता त्याने त्याचं ब्लेझर काढले आणि तिच्या कमरेच्या भोवती त्याच्या भाया बांधून तिला कुठूनही काही दिसेल अशी भीती राहणार नाही असे बांधले.. राहुल असा जवळ आल्यावर २ मिनिटांच्या साठी स्नेहल पण गोंधळली.. पण हसून राहुल तिला म्हणाला.. "आता काही कारण नाही हां चालणार.. " आता ती पण खेळकरपणे म्हणाली..

"आता तर तू तुझ्या हाताने पायावर दगड मारून घेतलास.. आता तर तू गेलास.. " असं म्हणून त्यांनी पुन्हा खेळ चालू केला.. बऱ्याच वेळ खेळून झाल्यावर दमून ते दोघे एका बाकड्यावर बसले.. राहुल ने जवळच्याच एका विक्रेत्याकडून २ energy ड्रिंक्स आणल्या आणि ते गप्पा मारत ते पिऊ लागले.. राहुल नेच सुरुवात केली..

"you are surprisingly competitive मानवी.. अक्षरशः दात ओठ खाऊन शॉट मारत होतीस हां.. "

"कोण बोलतंय बघा.. तुझं आयुष्य दावणीवर असल्यासारखा तू खेळत होतास ते?!"

"ओह.. Did I get caught?" त्याच्या या बोलण्यावर दोघे पण हसले.. एकदम काही आठवल्यासारखा चेहरा करून राहुल म्हणाला..

"मी तुला सांगितलं नाही ना ग? मी तुझ्या धाकट्या बहिणीला भेटलो.. " स्नेहल नि त्याच्या कडे पाहिलं आणि म्हणाली..

"हो.. कळालं मला मेधानी सांगितलं.. "

"हो ना? पण मानवी ती अगदी तुझीच कारबन कॉपी आहे ग.. लहानपणी तू सेम तशीच दिसायची.. " थोडंसं हसून स्नेहल म्हणाली..

"ह्म्म्म.. resemblance uncanny होता.. हो ना?"

"हो.. आपण तिघे कधी तरी एकत्र जेवायचा प्लॅन बनवूयात ना.. "

"हो.. करूयात कधी तरी.. " स्नेहल आता जेवढ्यास तेवढं उत्तर द्यायचं ठरवून बोलत होती..

थोडा वेळ ते दोघे काही न बोलता फक्त ते  energy ड्रिंक्स पित  होते.. बाकड्यावर बसून पिताना ते एकमेकांच्या कडे नाही तर समोर बघत पीत होते.. आणि तसंच समोर बघताना राहुल नि हळूच विचारले..

"तू मघाशी रडत का होतीस?" स्नेहल ने चमकून त्याच्या कडे पाहिलं.. मानवी सोडलं तर हे कधीच कुणी ओळखू शकलं न्हवत.. अगदी तिचे वडील सुद्धा.. तिने काही उत्तर दिले नाही हे पाहून तोच पुढे बोलला..

"I mean.. your face looked like you cried.. आह.. मी विचारायला नको होत का?" ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर त्याने लाइन तर क्रॉस नाही केली असं वाटून तो शेवटचं वाक्य बोलला..

"नाही.. तस काही नाही.. Something was troubling me..आता मात्र नाही वाटते तस मला.. i am feeling much better now.. "

"तस असेल तर मग छान च.. " स्नेहल ला अजूनही अप्रूप वाटत होत कि ह्याने ओळखलंच कस..

त्या पार्क मध्ये एका लहान मुलाला घेऊन त्याचे आई वडील आले होते.. ते त्या दोघांच्या समोरून पास होताना त्यांच्यातला संवाद हे दोघे ऐकत होते..

त्या लहान मुलाचे वडील विचारत होते.. "झोक्यावर खेळायचं कि घसरगुंडीवर खेळायचं आज पिल्लू?"

"झोका.. " त्याने मोठ्याने उत्तर दिलं तस त्याचे आई वडील दोघे हसले आणि त्याला घेऊन गेले..  त्यांना जाताना पाहताना स्नेहल च्या डोक्यात तिच्या आईचा विचार आला आणि तिच्याही नकळत तिने राहुल ला प्रश्न विचारला..

" तुझ्या आई बद्दल तू सगळ्यात जास्त कधी विचार करतोस ?"

"आई? असं अचानक का विचारलंस आईच्या बद्दल?"

"असंच .. मला अचानक आपण सोलकढी पिली होती त्या दिवशीची आठवण झाली.. तुझ्या आई बद्दल तेव्हा तू बोलला होतास.. आह.. मी विचारायला नको होत का?" तिला पण वाटलं कि तिने लाइन तर क्रॉस नाही केली.. तिची त्याच्या सारखीच सेम reaction पाहून तो हसून बोलला..

"नाही ग.. uhhhh.. I am not sure actually.. जर का मला एक गोष्ट सांगायचीच झाली तर मी म्हणेन- जेव्हा ती माझी नख कापून द्यायची तेंव्हा ?"

"नखं  कापताना ?"

"अग म्हणजे.. तुला माहितीये ना मी लेफ्ट हँडेड आहे.. त्यामुळे मला काहीही कापाकापी म्हटल कि जमायचंच नाही.. धार नेलकटर ची उलटी वाटते ना आम्हा लोकांना.. specially नखं कापताना मी नेहमी स्वतःला इजा करून घ्यायचो.. जिव्हाळी तर कित्येकदा लागायची मला.. त्यामुळे आई नेहमी मला नखं कापून द्यायची.. आता.. You know.. This must have become a habit now.. but still..मी जितके दिवस टाळता येईल नखं कापायचं तितके दिवस टाळतो.. May be..त्यामुळेच मला अजूनही नखं कापताना तिची आठवण आल्या शिवाय राहत नाही.. " त्याने हसून त्याच बोलणं पूर्ण केलं..

"कोणत्याही आयुष्याच्या स्टेज ला बरोबर आई नसणं.. It sounds really difficult.. लहान असताना तर खूप जास्त त्रास झाला असेल ना तुला?"

"हो.. पण.. मला वाटतं कि मी छान पणे ते सगळं सहन करू शकलो.. " तिला कानात सीक्रेट सांगायची acting करत तो पुढे म्हणाला.. " एक मुलगी होतीना कारण माझ्या बरोबर मानवी कुलकर्णी नावाची त्यावेळी.. " तो हसत होता पण स्नेहल च्या चेहऱ्यावर मात्र काळजी होती.. ती विचार करत होती कि मानवीने त्याच्या साठी अजून काय काय केले होते तेव्हा कि हा अजूनही तिच्या तेव्हाच्या वागण्याचं नाव काढतोय.. "

*********

इकडे मानवी रवी बरोबर खात कमी आणि पीत जास्त होती.. तिच्या समोर बिअर च्या ६ बाटल्या होत्या.. ती एक बॉटल प्यायची आणि आजू बाजूला बघत ओरडायची, " कोण आहे रे तिकडे? कोण माझी बिअर संपवतोय?? दादा.. अजून १ बिअर द्या प्लीज.. "

तीच हे रवी गेल्या ४ बाटल्या झाल्या बघत होता.. तो यायच्या आधी तिच्या २ पिऊन झाल्या होत्याच.. त्याने १च बिअर घेतली होती आणि पूर्ण वेळ मानवीला सेम वाक्य रिपीट करताना बघत होता.. शेवटी तिने जेव्हा ७वि बाटली संपवल्यावर पुन्हा सेम dialog रिपीट केला तेव्हा त्याने वेटर ला खुणावलं कि नाहीये ऑर्डर आमची.. आणि तिला आता सांभाळायला बघत होता..त्याने खुणावलेलं त्यातूनही तिने पाहिलं आणि म्हणाली..

 "मला प्यायला लागतंय त्या नालायक राहुल आ.. आ.. आ.. "

"राहुल अवस्थी ?" तीच वाक्य पूर्ण करायचा प्रयत्न करत रवी म्हणाला.. 

"नाई काई.. राहुल आखडू मुळे.. त्या मूर्खाला तर.. " असं म्हणून ती एकदम उभी राहिली.. रवीने तिला हाताला धरून पुन्हा खाली बसवलं..

"मानवी आता बास बर.. चढलीये तुला.. आता जाऊया आपण.. "

"नाही चदली मला.. अजिबात नाही.. " हे सगळं ती इतक्या जड जिभेने बोलत होती कि त्याला पण कळायला वेळ लागला.. आणि थोड्या वेळानी हळू आवाजात म्हणाली..

 " रवी सर तुम्हाला म्हणून सांगते.. कुणाला कळू देऊ नका.. एकदम टॉप सिक्रेट.. " रवीने पण आता कान टवकारले.. मानवी पुढं म्हणाली.. "खरं काय ते आज मी सांगतेच.. Actually ना मला.. जाम चढलीये.. "

"हो ना? मग चल जाऊयात आता.. " पण त्याच्या कडे लक्ष न देता ती पुढे म्हणाली..

"हा समजतो कोण हो स्वतःला नेहमी मला घालून पडून बोलतो ते.. ?! केव्हा पासून तो स्वीट मुलगा स्वतःला सगळ्यांच्या पेक्षा ग्रेट समजायला लागला? You know what?! मी त्याला सगळं सांगूनच टाकते.. "

"काय सांगणार तू त्यांना? असं बोलतीयेस कि तू त्यांना आधी पासून ओळखत होतीस.. "रवी सहज बोलता बोलता बोलला..

"मग खरच आहे ते.. मी ओळखतेच त्याला आधी पासून.. Actually मी आणि तो.. मी आणि तो... "  एवढंच बोलली आणि तीच जोरात डोकं टेबल वर आपटलं.. टेबल वर दुसरं काही न्हवत फक्त बिअर च्या बाटल्याचं होत्या आता म्हणून ठीके.. आता तिला चांगलीच चढली होती हे रवी ने ओळखलं.. त्याने बिल पे केले आणि तिला घेऊन बाहेर आला.. बाहेर येताना तिने काही कुरकुर नाही केली.. पण चालताना एकदम ब्रेक लागल्या सारखी थांबायची आणि म्हणायची..

"रवी सर.. तुम्हाला सांगितलं ना मला मागून ढकलू नका.. मी चालतीये बरोबर.. " तो म्हणायचा... " मी नाही ढकलते.. " कि थोडं चालून गेल्यावर पुन्हा तेच.. "रवी सर.. ढकलू नका..”

मानवीची बॅग रवीने स्वतः कडे घेतली होती.. त्याने खूप वेळा तिला तिचा पत्ता विचारला होता पण मॅडम माझी मी जाते म्हणून पुढे पुढेच जात होत्या.. शेवटी तिच्या बरोबर तरी राहुयात म्हणून रवी तिची बॅग घेऊन तिच्या मागे चालला होता.. आणि मानवीचं पूर्ण वेळ असंच चालू होत.. 

थोड्या वेळानी मात्र रडवेली होऊन ती रवी कडे वळून म्हणाली..

"Ughhh!! तो भित्रा ढोल्या.. त्याला माहिती पण नाही मी कोण आहे ते.. मी सगळं सांगूनच टाकते.. सगळं.. " आणि रस्त्यावर च २ पायावर डोकं गुढघ्यात घालून बसली.. रवी पण दमला होता.. त्याला पण ब्रेक हवाच होता.. तो पण तिच्या शेजारी तसाच बसला.. मानवी मात्र स्वतःशीच बोलत होती..

"माझा फोन कुठं गेला..? माझा फोन?.. " असं म्हणत तीच लक्ष रविने पुढच्या साईड ला अडकवलेल्या तिच्या बॅग कडे गेलं.. तिने बॅग खेचून घेतली आणि तिथेच उपडी केली.. रवी “अग थांब थांब” म्हणे पर्यंत बॅग मधला प्रत्येक आयटम फुटपाथ वर होता.. आता ती फोनला हाक मारू लागली..

"मोबाईल? माझा मोबाईल?? कुठं आहेस तू?" रवीने डोक्याला हातच लावला.. "This is driving me nuts.." तो म्हणाला.. तोवर इकडे मानवीला फोन सापडला..

*********

राहुल स्नेहल ला घेऊन पुन्हा हॉटेल च्या इथे आला होता..

"मी तुला घेऊन गेलो असतो ग घरी.. "

"नाही अरे.. माझी गाडी इथेच आहे ना.. मला इथूनच गेलेलं बरं पडेल.. "

"ओह.. ठीके मग.. घरी जाऊन झोप शांत! "

असं म्हणून तो जायला वळाला तेवढ्यात स्नेहल ने पुन्हा मागून हाक मारली.. स्नेहल ला वाटत होत हे अजून नको वाढवायला आता.. कारण तिला आता आपण याला फसवतोय असं थोडं थोडं वाटू लागलं होत.. आत्ताच ह्याला कारण म्हणून सांगावं कि माझा साखरपुढा झालाय आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला असं दुसऱ्या मुलांना भेटणं आवडत नाही.. त्यामुळे आपण असं पुढे भेटायला नको.. पण आपण हे बोलल्या वर त्याचा चेहरा कसा होईल हे तिने इमॅजिन केलं आणि म्हणाली..

"अरे हे तुझं ब्लेझर माझ्या कडेच राहिलं असतं ना.. " हसून तिला तो म्हणाला..

"तुला मला नेक्स्ट time डिनर ला घेऊन जावं लागेल ना तेव्हा दे.. "

"डिनर?" हे केव्हा ठरलं असा चेहरा करत स्नेहल नि विचारलं.. तस तो म्हणाला..

"आपण गेम खेळलो ते इतक्यात विसरलीस? तू हरलीयेस म्हटलं.. आपलं ठरलं होत ना जो हरेल तो डिनर करवणार जिंकलेल्याला?"

"ओह.. ते.. "

" त्यामुळे जॅकेट असू दे तुझ्याकडेच आणि तसंही रात्री थोडं नाही म्हटलं तरी गार वाटतं आणि तुझी फॅशन ऑन पॉईंट जरी असली तरी आजारी पाडणारी जास्त वाटते.. "

"आह.. " स्नेहल ने थोडं conscious होत स्कर्ट खाली ओढायचा प्रयत्न केला तसं तो हसून म्हणाला.. "आजारी पडू नकोस फक्त.. कळालं ?"

"हां ? हो.. " "गुड.. मी निघतो मग आता.. बाय.. " असं म्हणून तो गाडीत बसला आणि निघून गेला.. त्याच्या जाणाऱ्या गाडी कडे पाहत स्नेहल ने विचार केला..

"ठीके.. मी आज सांगितलं काय आणि नेक्स्ट time सांगितलं काय.. काय फरक पडतो.. मी नंतरच सांगते.. Let's clean it up nicely next time..It doesn't matter right?" ती पण आता हॉटेल मध्ये आत गेली..

************

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all