इकडे मानवीने फोन काढला होता.. रवी तिने जे सगळं सामान ओतलं होत ते पुन्हा तिच्या बॅग मध्ये भरत होता.. त्याला वाटलं नाही कि तिला त्याचा नंबर सापडेल आणि ती त्याला कॉल लावेल.. पण मॅडम नि बरोबर नंबर लावला.. राहुल स्नेहल ला सोडून त्याच्या घरी चालला होता.. इतक्यात त्याचा फोन वाजला.. त्याने ब्लूटूथ कानाला लावला आणि कॉल घेतला.. त्याने जेमतेम हॅलो म्हटलं असेल कि तिकडून मानवी ओरडली..
"ए राहुल.. "
"कोण? कोण बोलतंय?"
"मी.. बोलतीये मी.. इंटर्न इंटर्न.. ओह.. तू माझा नंबर पण सेव नाही केलास?!"
"१ मिनिट.. इंटर्न? ए management इंटर्न.. तू भरपूर घेतलेली दिसतियेस.. " त्याच बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली..
"आखडू राहुल.. मी हे तुला बोलल्या शिवाय आता झोपू शकत नाही.. "
"तुला? आखडू राहुल??" राहुल ला तिच्या अरे तुरे बोलण्याचा आता राग आला..
"मिस्टर राहुल आखडू !! तुम्हाला माहितीये मी कोण आहे? तुम्हाला कळालं तर तुझ्या डोक्यात बॉम्ब च फुटेल.. " आणि बॉम्ब फुटल्याचा तिने आवाज काढला.. आता राहुल चा patience संपला होता.. तो म्हणाला..
" हे बघ इंटर्न.. " इतक्यात मानवी म्हणाली..
"मी.. मी मानवी कुलकर्णी आहे.. "
"हो माहितीये.. मग?" आता हि काही त्याच्या साठी न्युज तर नक्कीच न्हवती.. त्यामुळे तो म्हणाला मग? आता मानवी जोरात ओरडली फोन मध्ये..
"मी मानवी आहे.. मा - न - वि.. " एकेका शब्दावर जोर देत ती ओरडली.. इतकी जोरात ओरडली कि राहुल नि गाडी साईड ला घेतली आणि विचारलं..
"काय म्हणालीस? पुन्हा बोल.. "
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहल नेहमीप्रमाणे ऑफिस ला जायला तयार होत होती.. सवयीने तिचा हात तिच्या शॉर्ट स्कर्ट च्या कप्प्या कडे गेला.. पण तिला रात्री राहुल बोलला होता ते आठवलं.... "आजारी पडू नकोस फक्त.. कळालं ?" ते आठवलं तसं तिने आज trouser घालायचं ठरवलं.. तीच आवरून ती बाहेर आली आणि मानवी तोंड हातात धरून पळत बाथरूम मध्ये जाताना दिसली.. स्नेहल पण तिच्या मागे धावली.. मानवी कमोड च्या समोर बसून उलट्या करत होती आणि स्नेहल आता तिच्या पाठीवरून हात फिरवत तिचे केस मागे धरून हेल्प करत होती..
"काल नक्की किती पिलीयेस? कधी न पिणारी तू.. " डोकं वर करून मानवी म्हणाली..
"माहिती नाही.. आठवत नाही.. " आणि पुन्हा तिने डोकं कमोड मध्ये घातलं.. तिला पाठीवर थोपटत स्नेहल म्हणाली..
"ठीके ठीके.. पण तुला काल घेऊन आलेला कोण होता?"
"हम्म? मला कुणी घेऊन आलं होत.. ?"
"अरे हां.. तो idiotic माणूस बसलेला माझ्या समोर येऊन.. ज्याच्या मुळे सगळं रामायण घडलं.. "
तोंड धुवून आल्यावर मानवीने फ्रिज मधली पाण्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली.. तिला असं वाटत होत कि काहीही पाणीच राहिलं नाहीये शरीरात.. तिला तस पाणी पिताना बघून स्नेहल म्हणाली..
"काल आपल्या अक्ख्या कॉलोनी ला जागे करायच ठरवल्यासारखी रात्री ओरडत होतीस.. तुझा घसा आज बसला नाही याचंच आश्चर्य आहे.. फक्त कोरडंच पडलीये.. " मानवीला काही आठवत न्हवत ती फक्त पाणी पीत होती..
काल रात्री मानवीने खरंच गोंधळ घातला होता.. रवीने तिला कसबसं घरी तर आणलं होत पण तिने वरती घरात जाईपर्यंत लहान मुलांच्या वर त्रास दिला होता.. त्यांच्या घराखाली असलेलं स्टेशनरी च दुकान बंद करून ते मालक चालले होते तर मॅडम त्यांच्या पायरीवर झोपायचा हट्ट करून बसलेल्या.. ते काका तिला चांगले ओळखत होते आणि त्यांना तिने बऱ्याच वेळा मदत केल्याने त्यांना माहिती होते कि मुली चांगल्या आहेत त्यामुळे त्यांनी स्नेहल ला फोन करून खाली बोलवले होते.. रवी तोवर तिथेच पार्क च्या बाहेर बसवलेल्या पाणपोई वर पाणी घेऊन त्याच्या शर्ट वर मानवीने केलेली उलटी धुवायचा प्रयत्न करत होता.. मानवीला घ्यायला स्नेहल आल्यावर पण सरळ घरी जाईल ती मानवी कसली.. तिचे केस ओढ.. रस्त्यावरच फतकल मांडून बस असे सगळे प्रकार करून झाले होते.. स्नेहल नि रवी चा चेहरा बघितला नाही कारण त्याची पाठ होती तिच्याकडे.. पण तिने त्याला त्या गदारोळात मानवीला सुखरूप घरी आणल्या बद्दल थँक्यू म्हटलं आणि घरी घेऊन आली होती.. मानवी मॅडम ना अर्थातच काही आठवत न्हवत.. स्नेहल नि हा सगळा प्रकार आता तिला सांगितला तसं आश्चर्यचकित होत मानवी म्हणाली..
"मी केलं असं? मी? वेड लागलेलं बहुतेक म्हणजे मला.. " स्नेहल नि फक्त होकारार्थी मान हलवली आणि घड्याळाकडे बघत म्हणाली..
"ओह.. मला आज लवकर निघायचंय ऑफिस ला.. घरी आल्यावर सांग मला नक्की काय झालं होत ते.. ओके?"
"हां... आह माझं डोकं.. " आणि एकदम स्नेहल कडे बघत ती म्हणाली.. " आज सूर्य पश्चिमेकडून उगवला का? तू तुझे स्कर्ट दिल्लीतल्या थंडीत न्हवते सोडले आणि आज एकदम trousers ?"
"हम्म.. आज घालावे वाटले मला.. बरं मी निघते आता.. जेलोसील पिशील आठवणीनी.. ऍसिडीटी वाढली असणारे.. "
"हां.. बाय.. " "बाय.. "
ती गेल्यावर मानवी विचार करत होती.. "मला काहीच का आठवत नाहीये.. म्हतारी व्हायला लागले काय मी.. " शेवटी कसं बस आवरून ती ऑफिस च्या इथे पोहोचली.. जवळच्याच एका मेडिकल शॉप मधून तिने जेलोसील ची १ बाटली घेतली.. सिग्नल ला उभी असताना तिने न राहवून बाटली फोडली आणि त्यातून १ मोठा घोट घेतला.. इतक्यात तिचा फोन वाजला.. तिच्या आईचा होता.. तिने उचलला..
"हॅलो आई.. बोल ग.. "
"तुझ्या आवाजाला काय झालं? तू काल घेतलेलीस का?" आईने परफेक्ट ओळखलं बघून मानवीने सारवा सारव करत सांगितलं..
"ए असं काही नाही ग आई.. मी नवीन जॉब मध्ये खूप जास्त बिझी होते त्यामुळे तस वाटलं असेल.. घेतलेली का म्हणे.. पण तू सकाळी सकाळी का केला बरं फोन? सगळं ठीक आहे ना?"
"काही नाही ग.. या वीकएंड ला ये ना स्नेहल ला घेऊन.. जेवायचा प्रोग्रॅम करूया.. माझ्या लेकीला एवढ्या मोठ्या कंपनी मध्ये जॉब लागलाय म्हटल्यावर पार्टी तो बनती है.. माझे कूकिंग स्किल्स दाखवते ना special डिनर करते.. " मानवीची आई मसाले वगैरे तर चांगले बनवायची पण नॉर्मल जेवणच ती चांगलं बनवायची आणि ज्या दिवशी ती काहीतरी कुकिंग स्किल्स दाखवायचे म्हणायची त्या दिवशी सगळ्यांना काहीतरी करपलेलं, आंबट नाहीतर कुठल्यातरी न explain करता येणाऱ्या चवीचं खावं लागायचं.. अशा वेळी मानवीचे बाबा स्वतःच काहीतरी बनवायचे आणि म्हणायचे कि या बरोबर आईची डिश अजून छान लागतीये नाहीतर बाहेरून काहीतरी घेऊन यायचे आणि सगळं हसण्यावारी सगळेच न्यायचे.. त्यामुळे जेव्हा मानवीची आई "माझे कूकिंग स्किल्स दाखवते ना" असं म्हणाली तस मानवी पटकन म्हणाली..
"काही गरज नाहीये कूकिंग स्किल्स दाखवायची.. आपण त्यापेक्षा बाहेरून ऑर्डर करूयात.. तू पण दमू नकोस.. " तिच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करत तिची आई म्हणाली.. "पार्टी चा ड्रेस कोड रेड कलर असेल हां.. स्नेहल ला पण सांगायला विसरू नकोस.. "
"आता ड्रेस कोड ची काय गरज आहे ग आई? बर बर विचारते मी तिला चालेल का ते.. "
"तिला चालतं.. तुझेच नखरे असतात.. "
"बरं बाई.. येते रेड घालून.. हां.. त्यावरून आठवलं आई माझी रेड ट्रॅक पँट आहे ना ग? मी घरी घालायचे ती? नाही ग.. माझी इथली खराब झालीये.. तर मी ती इकडे घेऊन येईन.. नाही ग.. न्हवते पिले मी.. हो.. ठेवते चल.. बाय.. "
मानवीने फोन ठेवला आणि मोबाइल च्या स्क्रीन कडे बघितले.. त्यावर राहुल सरांना काल रात्री कॉल केल्याचे दिसत होते.. मानवीचा घाबरून हात तोंडावर गेला कारण तिला आठवतच न्हवते कि तिने कॉल पण केला होता हे.. "मी राहुल ला drunk कॉल तर नाही केला? ओह माय गॉड.. शीट शीट शीट शीट.. मानवी आठव आठव.. काय बोलीयेस.. " सिग्नल सुटला तरी मानवी तिथेच मोबाईल कडे बघत उभी होती.. आता तिला एकदम कालच्या कॉल मधलं १ - १ वाक्य आठवायला लागलं..
"तुम्हाला माहितीये मी कोण आहे? तुम्हाला कळालं तर तुझ्या डोक्यात बॉम्ब च फुटेल.. मी मानवी कुलकर्णी आहे.. मानवी कुलकर्णी !" तिला एवढं तरी आठवलं आणि आता घाबरून तिचा घसा कोरडा झाला.. इतक्यात मागून तिच्या पाठीवर १ हात आला.. तो रवी होता.. त्याचा आवाज एकदम दमल्या सारखा होता..
"ए पिअक्कड.. सिग्नल सुटलाय आपल्या साठी.. चल.. " आणि तो पुढे चालत गेला.. आता मानवीला आठवलं कि रवी तिच्या समोर येऊन बसलेला बिर्याणी हाऊस मध्ये.. ती त्याच्या मागे धावली.. चालता चालत तीने त्याच्या कडूनच आधी माहिती काढायची ठरवली.. तिने घाबरून त्याला विचारलं..
"रवी सर.. तुम्ही मला काल राहुल सरांना कॉल करताना पाहिलं का?"
"मे बी.. काल मी नको ते इतकं पाहिलंय कि काही स्पेसिफिक आठवत नाहीये.. " तो दमलेल्या आवाजात बोलला..
"मी काय बोलले? तुम्ही सगळं ऐकलं होत का?"
"मी खूप काही ऐकलं पण मला आता ते काहीही आठवत नाहीये.."
"तुम्ही ऐकलं कि नाही ऐकलं? काय ते सांगा ना प्लिज.. ?"
"well.. I am not sure.. मला काही आठवत नाहीये कारण मला भूकच इतकी लागलीये मे बी त्यामुळे.. "
त्यांना वाटेत १ वडापाव चा स्टॉल होता.. त्याच्या कडे बघत रवी म्हणाला.. " मी वडापाव किंवा ते भाजी खाल्ले तर मला आठवेल मे बी.. "
मानवी पळत त्या वडापाव वाल्याकडे गेली.. आणि म्हणाली "पटकन बांधून द्या दादा वडापाव.. " "मला २ पाहिजेत पण.. " "दादा २ बांधा प्लिज.. " त्याने पटकन बांधून दिले.. मानवीने लगेच वडापाव चे पैसे दिले.. त्या वडापाव वाल्या कडून ते बांधून घेतलेल्या वडापाव ची पिशवी मानवीने रवीच्या हातात कोंबली आणि पुन्हा विचारू लागली.. एव्हाना ते चालत त्यांच्या ऑफिस च्या बिल्डिंग मध्ये आले होते..
"सो... सर.. सांगा ना मी काय बोलले.. "
"पहिले तर सुशिक्षित समाजाच्या घटकांनी तस काही वागल्यावर माफी मागायला हवी ना?" मानवीला काही कळाले नाही ते पाहून तो पुढे म्हणाला..
"तू काल माझ्या कपड्यांवर उलटी केलीस.. तुला ते पण आठवत नसणारे.. हो ना?"
"About that.. मी.. I am really really really sorry sir.. पण प्लिज सांगा ना मी राहुल सरांना फोन वर काय बोलले?"
"आह.. मी तर इमॅजिन पण केले न्हवते कि तुझ्यात आणि राहुल सरांच्या मध्ये तसे relation असेल म्हणून.. " तो असं बोलला आणि मानवी आहे त्या ठिकाणीच फ्रीझ झाली.. तिने घाबरून दोन्ही हाताने तिचे केस पकडले.. तिची ती रिऍक्टिव बघून रवी तिच्या जवळ गेला.. आणि तिला हलवून म्हणाला..
"मानवी.. ए मानवी.. काय झालं? ह्या reaction ला काय म्हणायचं? काळजी करू नकोस.. फार काही नाही बोललीस.. "
"हां ? खरंच?"
रवीने सगळा प्रसंग सांगितला..
"मिस्टर राहुल आखडू !! तुम्हाला माहितीये मी कोण आहे? तुम्हाला कळालं तर तुझ्या डोक्यात बॉम्ब च फुटेल.. " आणि बॉम्ब फुटल्याचा तिने आवाज काढला..
"मी.. मी मानवी कुलकर्णी आहे.. मा - न - वि.. मी मानवी आहे माकडा.. "
तिने माकड म्हटल्यावर रवीने दचकून तिच्या बॅग मध्ये सामान भरताना पाहिलं.. आणि "ए मानवी गप्प बस.. " असं म्हणून तिच्या कडून मोबाईल हिसकावून घेऊन बंद केला..
आणि हे सगळं सांगून झाल्यावर म्हणाला.. "तू अजून त्यांना पुढं बरेच काही बोलायच्या मूड मध्ये दिसत होतीस म्हणून मी तुझा फोन काढून घेतला आणि वेळेत बंद केला.. सो.. तू याच्या साठी कितीही वेळा मला ट्रीट देऊ शकतेस.. "
त्याच बोलणं ऐकून मानवीने सुटकेचा श्वास सोडला.. ती इतका वेळ श्वास रोखून त्याच बोलणं ऐकत होती हे तिच्या पण लक्षात न्हवत आलं.. पण आता तिला वाटलं कि मी राहुल ला तर नाही बोलले पण नशेत रवीला तर नाही सांगितलं सगळं? म्हणून तिने पुढे विचारलं..
"आणि त्या नंतर? त्यानंतर मी कशा बद्दल बोलले नाही ना?"
"नाही.. माकडा च्या तिथेच थांबलं सगळं.. " "Oh.. thank goodness.. That's a relief.. "
"पण तू असं काय बोलली असतीस बोलून बोलून ते तू इतकी घाबरलेली? असं काही आहे का ज्याने तू श्वास घ्यायचं विसरली २ मिनिटांच्या पूर्वी?" वाकून तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत तो तिला विचारत होता..
"नाही हो.. तस काही नाही सर.. पण तुम्हाला तर माहितीये ना राहुल सर सारखे मला ओरडत असतात.. मग आता अजून त्यांना कारण मिळालं कि काय असं वाटून घाबरले मी.. त्यांच्या समोर जायच्या आधी माहिती तरी असावं म्हणून तुम्हाला विचारत होते.. " मानवीने explain केलं.. रवी ने पण कळालं असा चेहरा केला.. आणि आता तिला चिडवायला म्हणून म्हणाला..
"आह.. मी गोल्डन चान्स घालवला.. मी तुझं विडिओ शूट करायला पाहिजे होत म्हणजे तुला चिडवता आलं असत मला.. पण तुला कल्पना आहे न? हा सिंगल प्रसंग १० जेवणांच्या बरोबर आहे.. मला टांग देऊन जायचं नाही.. खायला तर घालावं लागणारे तुला मला.. " त्याच्या चेहर्या कडे बघत मानवी विचार करू लागली..
"ठीके ना.. बला टळली.. ह्याला खाऊ घातलं म्हणून काय फरक पडतो.. तरी लगेच हो म्हणायला नको.. आपण पण थोडं खेचुया.. " हा विचार करून ती त्याला म्हणाली..
"पण रवी सर.. I am not sure about that.. कारण मला तर काही आठवत नाहीये कालच.. " एवढं बोलून ती पुढे तिचे कार्ड पंच करायला गेली.. तिच्या मागून रवी वडापाव ची पिशवी हलवत म्हणाला.. "ए मानवी.. हि चीटिंग आहे राव.. तू मला वडापाव वर कटवणार? "
मानवीच्या मागून जाताना आणि वडापाव पेक्षा अजून काही तरी खायला मागायचा हट्ट करणाऱ्या रवीला राहुल मागून पाहत होता.. त्याला कालचा तिचा कॉल आठवला.. ती त्याला माकडा म्हणल्यावर त्याने गाडी साईड ला घेतलेली.. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याला रवीचा आवाज ऐकू आला होता कि गप्प बस.. घरी जायचंय आपल्याला.. आणि मानवी हट्ट करत होती कि फोन दे फोन दे त्या माकडाला सांगतेच मी असं करून.. आणि कॉल कट झाला होता..
रवी आणि मानवी त्यांच्या जागेवर बसतच होते कि राहुल ऑफिस मध्ये आला.. राहुल ला बघून मानवीने डेस्क वर डोकं ठेवलं.. ते बघून रवी हसत होता.. इतक्यात राहुल आलेला पाहून लोला मॅम तिथे आल्या..
"ओहो.. राहुल सर.. ब्राव्हो ब्राव्हो.. तुम्ही Mr. Taylor ना कॉलॅबोरेशन साठी मनवले.. " असे म्हणून त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.. आता त्यांनीच टाळ्या वाजवल्या म्हटल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.. टाळ्या थांबवण्यासाठी त्यांनी हात वर केला आणि म्हणाल्या..
"Let's have a staff party tonight to celebrate that.." त्यांची announcement पूर्ण झाली नसेल इतक्यात राहुल म्हणाला.. "पण मला खूप काम आहे सो मी येऊ शकणार नाही.. " तशा त्या म्हणाल्या.. "नो कॅन डू राहुल सर.. तुम्ही तर आलंच पाहिजे.. मला तेव्हा काही सांगायचं आहे सो तुमचं पार्टीसिपेशन तर मस्ट असेल.. " राहुल पुढे काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात त्या म्हणाल्या.
"लेडीज अँड जेंटलमेन.. कुणीही जर का यायचं टाळलं तर मी त्या व्यक्तीला लक्षात ठेवून त्रास देईन हां.. " असं बोलून त्या मोठ्याने हसल्या आणि पुढे म्हणाल्या.. "specially cutie patootie विशाल.. तू तर आलंच पाहिजे.. " तो हसून म्हणाला "येस मॅम " एवढं बोलून त्या निघून गेल्या..
त्यांचं बोलणं ऐकून रिया विचार करू लागली.. "ओह माय गॉड.. विशाल तू तर जॅकपॉट लागलास.. तुला त्या जेवढं प्रेमाने बोलतात तेवढं कुणालाच बोलत नाहीत.. तू एकदम बरोबर आहेस रिया.. विशालच असणारे त्यांचा भाचा.. अनायसे पार्टी पण आहे आज.. आजपासूनच त्याला टार्गेट करायला सुरुवात करते.. "
************
क्रमशः
*************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा