Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 29

Read Later
माझी मानवी... 29

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

स्नेहल तिच्या ऑफिस मध्ये काम करत बसली होती इतक्यात तिच्या वरच्या पोस्ट वर असलेली मॅनेजर तिथे आली.. तिने स्नेहल ला विचारले..

"स्नेहल तू अजून किती वेळ आहेस?"

"निघालीच आहे मी.. काही काम होत का?"

"हो ग.. हे काही इम्पॉर्टन्ट documents आहेत जे कि personally डिलिव्हरी करायचेत to one of our VIP clients.. "

"ओह.. चालेल मी देते ना.. कुठल्या suite मध्ये आहेत ते?"

"२२०७ मध्ये.. एव्हाना येतात ते बाहेरून.. देशील प्लीज?"

"हो.. आता लगेच जाते मी.. "

स्नेहल ते documents द्यायला गेली.. स्नेहल च्या हॉटेल मध्ये suite चा मजला सगळ्यात वरचा आणि VIP होता.. तिथे जायला सुद्धा special कोड लिफ्ट मध्ये टाकावा लागायचा तर गेस्ट ना वर जाता यायचं.. थोडक्यात जे अगदी श्रीमंत लोक असायचे तेच जायचे.. त्यामुळे अशा लोकांचे पार्सल्स ऑर documents assistant मॅनेजर किंवा त्या वरचाच स्टाफ डिलिव्हर करायचे.. रूम सर्व्हिस देणारी लोक फक्त cleaning साठीच जायची.. स्नेहल साठी हे काही नवीन न्हवत.. ती त्या फ्लोअर वर गेली.. तिच्या समोरूनच १ उंच माणूस चालत होता.. स्नेहल च लक्ष त्याच्या पायांच्या कडे गेले.. साधी पॅरागॉन ची स्लीपर घातली होती.. आणि वर मात्र हॉटेल चा रोब घातला होता.. स्नेहल थोडी पळतच त्याच्या समोर गेली.. पाहिलं तर ट्रिम केलेली दाढी, handsome चेहरा पण पार दमलेला दिसत होता.. त्याचे कपडे रोब च्या आतले पहिले मात्र स्नेहल थोडी घाबरली.. मुंबई च्या फॅशन स्ट्रीट वरून घेतलेला वाटावा असा ग्रे t - shirt आणि बर्मुडा घातलेला.. तिने त्याचा हात पकडून थांबवलं आणि म्हणाली..

"ओ दादा.. तुम्ही या मजल्यावर येऊ नाही शकत.. तुम्हाला वर कुणी सोडलं? या फ्लोअर ला फक्त suites च आहेत.. दुसऱ्या कुठल्या क्लायंट नि बघण्या आधी चला इथून खाली.. "  असं म्हणून ती त्याला आता लिटरली खाली ओढायला लागली.. त्या माणसाला पण कळत न्हवते कि काय चाललंय तो तिच्या मागे जातच होता कि तिचे अजून १ सिनिअर मॅनेजर तिथे आले आणि म्हणाले..

"मिस स्नेहल.. तुम्ही कुठे घेऊन चाललाय त्यांना?" तसे स्नेहल सांगू लागली.. "सर हा माणूस वर कसा आला माहिती नाही पण.. " तिचे बोलणे मध्येच अडवून आणि काय झालं असावं हे लक्षात येऊन ते मॅनेजर त्या माणसाकडे वळून म्हणाले..

"we are extremely sorry for the inconvenience caused to you sir.. आमच्या एम्प्लॉयी कडून चूक झाली.. मिस स्नेहल apologize.. सॉरी मिस्टर रवी.."

स्नेहल ने पण आता हात सोडला त्याचा आणि माफी मागितली.. "i am extremely sorry sir" त्या मॅनेजरने रवीच्या समोरच स्नेहल ला सांगितलं..

"Mr.Ravi is the long term guest in the suite room number 2207..Please take good care of him.."

"yes sir..certainly.." स्नेहल नि वळून रवी ला त्याची documents दिली..

"तुमची documents सर.. अँड वन्स अगेन i am sorry" रवी मात्र तिच्या कडे निरखून बघत होता.. त्याने तोंडदेखलं  रिप्लाय दिला..

"माझं मन फार मोठं आहे मिस स्नेहल त्यामुळे मी तुमचा गैरसमज समजू शकतो.. पण.. तुमचा आवाज.. तुमचा आवाज ओळखीचा वाटतोय.." स्नेहल पण तो बोलल्या पासून तेच आठवायचा प्रयत्न करत होती.. "मला पण तसेच वाटतंय सर पण आठवत नाहीये.. "

"ठीके तर मग.. see you around.." असं बोलून रवी निघून गेला..

काही वेळा लोकांचे मार्ग एकमेकांना क्रॉस करत असतात पण ते डोळ्यांनी दिसत नाहीत.. त्यांचे निव्वळ अस्तित्व भविष्यात गोष्टी गुंतागुंतीच्या करू शकेल याचा कुणी विचार देखील केला नसेल..

 

******

 

राहुल ला जेव्हा सोफ्यावर जाग आली तेव्हा त्याला थोडं आश्चर्य वाटलं.. त्याला आठवत होत फक्त तो हॉटेल मध्ये बिअर पिऊन बाहेर पडला आणि तिथेच कुठे तरी असताना त्याची शुद्ध हरपली.. आपण घरी कसे आलो हे त्याला आठवत न्हवते.. त्याने आजूबाजूला वळून पाहिलं आणि त्याला मानवी दिसली.. ती त्या पझल च्या जवळ गेलेली आणि त्या मोकळ्या पझलच्या तुकड्यावरून हळुवार हात फिरवताना दिसली तसा तो तडक तिच्या जवळ गेला आणि म्हणाला..

"ए इंटर्न.. तू काय करतीयेस इथे..?" हे तो इतक्या जोरात तिच्या मागे येऊन म्हणाला कि दचकून ती त्या फ्रेम बॉक्स वर जाऊन आपटली आणि तो त्या टेबल वरून पडून त्याच्या काचा सगळी कडे झाल्या.. तिने मागे वळून पाहिले राहुल च्या कपाळा वर छोटीशी आठी पडली होती.. नकळत तिचे पाऊल मागे झाले.. ती आता मागे जाऊन त्या काचेवर पाय देणार हे त्याच्या लक्षात आलं तस त्याने पटकन तिला आपल्या कडे ओढलं.. ती त्याच्या अंगावर आदळली गेली.. अर्थात मानवी गडबडली.. ती त्याच्या पासून पटकन लांब झाली.. त्याने खाली पडलेल्या काचांच्या तुकड्यांच्या कडे पाहिलं आणि वैतागून तिला विचारलं..

"मी विचारलं तू काय करतीयेस इथे..? माझ्या घरात?" त्याचा किंचित चिडलेला आणि वैतागलेला आवाज ऐकून मानवी फास्ट बोलायला लागली..

"ते.. तुम्ही डिनर पार्टी..आधी बाहेर पडला.. मी बाहेर आले.. फोन कॉल.. आणि धडाम.. " तिच्या लक्षात पण आलं नाही पण ती फक्त काही शब्द बोलत आहे.. राहुलने तीच बोलणं त्याला जस समजलं तस सांगितलं..

"डिनर पार्टी मध्ये, मी आधी बाहेर आलो.. तू १ कॉल घ्यायला बाहेर आली पण मी तुला तिथे बेशुद्ध झालेला सापडलो.. " तीने जोरात ते ऐकून हो अशी मान हलवली.. त्यावर तो हसून म्हणाला..

"मग तर तुझ्या कडे दुसरा ऑपशन च न्हवता मला माझ्या घरी आणण्या शिवाय.. तू एकटी घेऊन आली मला..?"

"नाही ते सर पण होते.. रवी सर होते बरोबर.. "

"मग ते कुठे आहेत?"

 "ते आधी बाहेर पडले.. "

"मी पण पडणारच होते बाहेर.. " आता त्याने उसासा सोडला आणि विचारलं.. "तू माझ्या घरात कशी शिरली?"

"किल्ली ने उघडलं ना दार.. "

"तू माझ्या परवानगी शिवाय माझे खिसे चेक केले?"

"सर तुम्ही परवानगी घ्यायच्या अवस्थेत न्हवता.. "

"मी उठे पर्यंत वाट पाहता आली असती तुला.. " "हां ?"

"खालच्या एखाद्या watchman ला सांगून जाऊ शकली असतीस माझी काळजी घ्यायला..?" "हां ? ठीके मग निघते मी.. "

तीच लक्ष खाली पडलेल्या काचांच्या कडे गेलं ती म्हणाली.. "ओह.. ह्या काचा.. मी हे साफ करून जाते.. "

ती तिथेच काचा उचलायला खाली बसली.. तिला जबरदस्ती हाताला धरून उठवत तो म्हणाला.. "राहू दे ते.."

"पण मी फोडलं तर मी च साफ करते.. असं म्हणून ती परत खाली वाकू लागली तेव्हा त्याने धरलेला हात पुन्हा ओढला आणि म्हणाला.. "ठीके.. राहूदे म्हणालो ना मी.. कशाला हात लावू नको.. जा फक्त आता.. "

"हो सर.. सोमवारी भेटू.. गुड नाईट.. "

असं म्हणून घाईघाईत ती बाहेर आली.. तिने बाहेर येताना तिच्या मागे दार ओढून घेतलं आणि दार लॉक झाल्यावर पायाकडे पाहिलं.. तिचे बूट आतच राहिले होते.. ती गेल्यावर राहुलने खाली पडलेल्या काचांच्या कडे बघितले.. ते सगळं गोळा करायला तो खाली बसला आणि त्याला रक्ताचे थेंब दिसले.. मानवी जेव्हा काचा उचलायला गेली तेव्हा नक्कीच तिला कापलं होत.. त्याने तिला बॅण्ड एड द्यावं म्हणून दार उघडायला गेला.. जस त्याने दार उघडलं तस मानवीने फास्ट मध्ये आत घुसून तिचे बूट घेतले आणि "सॉरी सर.. " म्हणत बाहेर पण पळून गेली.. "ए इंटर्न.. अग.. " म्हणे पर्यंत ती लिफ्ट मध्ये शिरली पण होती..

जाताना ती विचार करत होती..

 "कसला माणूस आहे पण.. अर्ध्या ग्लास बिअर मध्ये शुद्ध हरपली ह्याची.. लो अल्कोहोल टॉलरन्स असतो लोकांचे हे ऐकून माहिती होत.. आज पाहिलं पण.. "

ती गेल्यावर राहुल ने ते सगळं आवरलं.. आणि ते पझल चे सगळे पिसेस पुन्हा एका काचेच्या बरणीत भरून ठेवले.. बराच वेळ तो त्या बरणीकडे बघत विचार करत बसलेला..

 

************

 

क्रमशः

 

*************

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..