Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 25

Read Later
माझी मानवी... 25
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

स्नेहल ला आपण म्हणावा असा वेळ देत नाही हि खंत तिच्या बाबांना पण होती.. पण कुठे तरी त्यांच्या आणि मिसेस. शांती यांच्यातील relation मेंटेन करण्याच्या प्रयत्नात स्नेहल कडे दुर्लक्ष झाले होतेच.. नाही म्हटलं तरी टीन एज मुली बरोबर तसेही अवघडलेलं नातं असतं वडिलांचं त्यातच त्यांचा डिवोर्स झाला.. त्यामुळे स्नेहल शी वागायचं कसं हे त्यांना अजूनही कळत न्हवत.. मिसेस. शांती देखील या बाबतीत अलिप्तपणा च दाखवायच्या त्यामुळे तर अजूनच त्यांचे relation नाजूक झाले होते..

आत्ता सुद्धा जेवायला म्हणून ते एकमेकांच्या समोर बसले होते.. पण बोलायला कुठून सुरुवात करावी ते दोघांना कळत न्हवते..बाबांनीच बोलायला सुरुवात केली..

"तुझं हॉटेल मधलं काम कसं चालूये?"

"मी तर ठीके पण बाकीची लोक तक्रार करत असतात.. कारण मी assistant manager तुमच्या शब्दाखातर झालीये ना.. हि पोस्ट तुमच्या मुळे मिळाली आहे त्यामुळे तेवढी कुरकुर अजूनही चालू असते लोकांची.. "

"हि मुलगी पण ना.. Be careful what you say.. " तीच अगदीच honest उत्तर ऐकून ते म्हणाले.. त्यांनी हातातला चमचा खाली ठेवला आणि गंभीर होत मान खाली घालून म्हणाले..

"I am sorry about that day.." स्नेहल ने पण त्यांच्या कडे न पाहतच त्यांची माफी accept केली आणि म्हणाली.. "ठीके.. Of course, you are sorry.."

तिचा असा रिप्लाय ऐकून ते पुढे बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला..  मिसेस. शांती यांचाच तो कॉल होता.. त्यांनी कॉल उचलला..

"हां हॅलो.. मी तुला सांगायचे विसरलो कि माझी एक डिनर मीटिंग आहे सो तू आधी जेवून घे.. ओके.. ठीके.. " त्यांनी गोड बोलून कॉल ठेवला.. त्यांचं बोलणं ऐकून स्नेहल नि विचारलं..

"कॉल घरून आलेला असं वाटलं मला.. तुम्ही त्यांना का सांगितलं नाहीत कि तुम्ही माझ्या बरोबर आहात ते?"

"तो प्रसंग झाल्या नंतर घरातलं वातावरण पण थोडं तंग च होते.. अशा परिस्थितीत मी तुला  भेटणं थोडं विचित्र दिसलं असतं म्हणून नाही सांगितलं.. आपण तिघेच आहोत आपल्या फॅमिली मध्ये आणि त्यातल्या दोघांनी असे बाहेर भेटायचे म्हणजे उगाचच गैरसमज वाढवायला कारण होईल.. "

स्नेहल त्यांना समजून घ्यायचा खूप प्रयत्न करत होती.. पण तिच्या हे लक्षात येत न्हवतं कि त्यांनी त्यांच्या मुलीला घरात काय किंवा बाहेर काय भेटलं तरी त्यांना काय प्रॉब्लेम असू शकतो?!

" जर का आपण खरंच फॅमिली असू तर त्या का गैरसमज करून घेतील आपण बाहेर भेटलो तरी?" त्या टॉपिक वर आता आलोच आहोत तर ज्या साठी आलोय ते बोलूयात असा विचार करून ते म्हणाले..

"स्नेहल, मी काय म्हणतो.. तू त्यांना कॉल करून त्यांची माफी का मागत नाहीस?" आता स्नेहल च्या आवाजात कडवटपणा आला.. तिने उत्तर दिले..

"मी पुन्हा शाळेत जायला हवं असं वाटतंय मला.. शाळेत तर शिकवलेलं कि जो चुकीचा आहे त्याने पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे.. Seems like I learned it wrong.." स्नेहल चे वडील आता काहीतरी स्पष्टीकरण द्यायचे म्हणून बोलू लागले आहेत असच स्नेहल ला वाटत होते..

"हे बघ स्नेहल.. त्या गरीब घरातून आल्यात.. खूप वाईट परिस्थिती पहिलीये त्यांनी.. त्यामुळे तू जर का पहिलं पाऊल उचललं आणि मदतीचा हात पुढे केला तर तुझ्या मनाचा तो मोठेपणा होईल ना.. " आता स्नेहल ला ऐकणं पण हे सहन होत न्हवत.. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली..

"मला वाटतंय आता मी निघावं पप्पा.. You can eat with people whom you think are family members.. Be happy with them.. "

डोळ्यातलं पाणी अडवत ती तिथून निघाली.. मागून तिच्या वडिलांनी तिला हाका मारलेल्या पण तिने परतून जायचं नाही असं ठरवलं.. काहीही केलं तरी मी उद्धट च वाटते मग वागून वाटू दे.. असा विचार करून ती तिथून निघाली आणि वर तिच्या केबिन मध्ये आली.. तिच्या ऑफिस मधल्या कपाटात तिने तिचे workout साठी चे थोडे कपडे ठेवले होते त्यातला स्विमिंग costume तिने घेतला आणि त्यांच्या हॉटेल च्या शेजारच्याच बिल्डिंग मध्ये १ खूप मोठ health सेंटर होत, जिथली ती मेंबर पण होती.. तिथे गेली..

 

********

 

इकडे मानवी पण ऑफिस मधून बाहेर पडायच्याच मार्गावर होती.. तिला त्या काकड्या काही विकता आल्या नाहीत.. तिने शक्य तेवढ्या management डिपार्टमेंट ला जाऊन वाटून टाकल्या होत्या.. फुकट मिळालेलं कुणाला आवडत नाही..?! फुकट ते पौष्टिक या नात्याने ते सगळं संपलं होत.. येऊन तिने ऑफिस मधल पण काम केलं होत पण रवी वर तिने फार राग काढला होता.. आणि तिचा राग म्हणजे पूर्ण अबोला.. रवी पण तिला न मनवता आल्याने तिला अजून न चिडवता गप्प बसला होता.. ऑफिस मधून निघताना तिने स्नेहल ला मेसेज केला..

"स्नेहल? कुठे आहेस तू? माझा मूड आज एकदम डाउन आहे.. आज आपण बाहेर कुठे तरी जाऊन पिऊयात का? घरी नको वाटतंय मला.. तू फ्री झालीस कि मेसेज कर.. मला अजून अर्धा तास तरी लागेल सगळं आवरून निघायला.. "

तिला सगळं आवरून निघायला उशीर झालाच.. तरी पाऊण तास झाला होता तिने मेसेज करून.. तिने निघताना फक्त सीमा मॅम ना सांगितलं आणि निघाली.. रवी अजून पण काम करत बसला होता पण तिने त्याच्या कडे लक्ष न देता निघायचं ठरवलं..

ती बाहेर आली तर पाऊस पडत होता.. मानवी स्वतःशीच पण मोठ्याने बोलत होती.. "मी already डिप्रेस असताना हा पाऊस.. ढगांच्या कडे पाहून ती म्हणाली.. थँक्यू सो मच बर का.. " तिने थोडा वेळ पावसाची सर ओसरायची वाट पाहून निघायच ठरवलं.. ती वाट पाहत उभी होती इतक्यात टॅब मध्ये पाहत पाहत राहुल पण तिच्या बाजूला येऊन उभा राहिला.. त्यांच्या सारखेच अजून काही लोक सुद्धा थांबली होती त्यामुळे तिच्या पटकन लक्षात आलं नाही.. पण एका क्षणी दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि नजर दुसरीकडे वळवली.. मानवी दुसरी कडे तोंड करून विचार करत होती.. "हा आलाच का परत माझ्या आयुष्यात? एक सुंदर आठवण बनून राहायला काय झालं होत?! भेट च नसती झाली तर फार बर झालं असतं.. " पाऊस काही थांबायचं नाव घेत न्हवता आणि आजूबाजूची गर्दी थोडी वाढत होती आणि जवळ जवळ उभं राहता राहता आणि इतर लोकांना जागा करून देताना मानवी आणि राहुल एकदम एकमेकांच्या शेजारी येऊन उभे राहिले.. राहुल ने तिच्या कडे आणि तिने त्याच्या कडे पाहिले.. पण आज दोघे पण मूड मध्ये न्हवते थोडंसं पण बोलायच्या.. मानवीने शेवटी निघायचं ठरवलं.. तिने तिच्या बॅग मधून छत्री काढली आणि उघडली.. तिने छत्री उघडल्यावर राहुल च लक्ष त्या छत्री कडे, तिच्या फुगलेल्या केसांच्या कडे गेलं.. ती त्यानेच मानवीला दिलेली निळी छत्री होती.. मानवी पावसात चालत पुढे गेली.. आणि न राहवून राहुल नि मागून हाक मारली..

"ए इंटर्न!! हि छत्री.. " आणि बोलता बोलता थांबला.. मानवीला त्याचा आवाज ऐकल्याचा भास झाला कि काय म्हणून तिने मागे वळून पहिले तर तिला राहुल पुन्हा बिल्डिंग मध्ये जाताना दिसला.. तिला वाटलं तिला भासच झाला असणार.. आणि इकडे राहुल ला वाटलं.. " आपण उगाच फार विचार करतोय.. हि काही एकमेव छत्री असणार नाही जी निळी असेल आणि आत मध्ये पण आपल्याला आवडायचं त्या पेन्टिंग च प्रिंट असेल.. पण मानवी नाव असणाऱ्या २ व्यक्तींच्या कडे सेम छत्री हा योगायोग त्याला विचित्र वाटला.. आजचा दिवस या ऑफिस मधल्या मानवी च्या बरोबर माझ्या मानवीच्यातली सिमिलॅरिटी बघत नको घालवायला.." आपल्या डोक्यातले विचार थोडे सॉर्ट आऊट करण्यासाठी त्याने जिम ला जायचे ठरवले..

आणि मानवीने तिच्या बस स्टॉप च्या वाटेवर च असणाऱ्या त्या खाऊ गल्लीतल्या एका बिर्याणी हाऊस मध्ये चालत चालत जायचं ठरवलं.. स्नेहल यायची काही चिन्ह न्हवती.. असं पुष्कळदा झालेलं होत कि स्नेहल ने उशिरा मेसेज पाहिलाय त्यामुळे ती आली जरी तरी तिला आपण पटकन सापडावे म्हणून ती इथे येऊन बसली.. तिने बिर्याणी बरोबर बिअर पण ऑर्डर केली.. ती मुद्दाम रस्त्याच्या कडेला असलेल्या खिडकीच्या बाजूला बसली होती.. रवी त्याच आवरून नेहमी याच वाटेने त्याच्या रूम वर जात असे.. त्याला आज मानवीने दिलेली सायलेंट ट्रीटमेंट नाही म्हटलं तरी थोडी मनाला लागली होती.. तो तिचा विचार करत चालला च होता कि त्याला एका बिर्याणी हाऊस च्या खिडकीत मानवी दिसली.. तो तिच्या समोर जाऊन बसला ..

"हॅलो मानवी!" एकदम उत्साही आवाजात तो बोलला.. मानवीने २ च बिअर पिल्या होत्या त्यामुळे ती थोडी tipsy होती.. पण तरी ती त्याला म्हणाली..

"मी तुमच्याशी बोलत नाहीये.. "

"ओके.. नको बोलूस.. ओ दादा.. मला फुल्ल प्लेट चिकन टिक्का कबाब द्या.. "

"तुम्ही इथे बसू नका बरं .. आणि मी चिकन nuggets खाते.. मला नको कबाब.. " ती अशी बोललेली पाहून रवी हसून वेटर ला म्हणाला..

"बॉस मला लवकर आणा हां कबाब.. आणि १ बिअर पण.. "

"मी पैसे नाही देणार तुमचे.. " मानवी ने आधीच declare केलं..

आता रवी पण तिच्या बरोबर बसून पीत होता.. पण मानवी त्याला स्वतःची काळजी घेणारी मुलगी आहे हे माहिती होते.. तिने राहुलच्या मध्ये आणि तिच्या मध्ये काय झाले नक्की ते सांगितलेलं नसलं तरी ती इतकी frustrate होऊन पिणारी मुलगी तर वाटत न्हवती त्याला.. नक्कीच काहीतरी अजून आहे जे तिला खात असणारे.. सोबर असताना तर ती त्याला टाळून जायची पण निदान आता तरी सांगेल असं त्याला वाटत होत.. आणि त्यात पण त्याला तिची काळजी जास्त वाटत होती.. मुंबई कितीही सेफ असलं आणि मानवी दिसायला कशी का राहत असेना तरी ती व्यवस्थित घरी पोहोचली म्हणजे त्याला काळजी लागून राहिली नसती म्हणून त्याने तिच्या बरोबर थांबायचं ठरवलं..

 

*********

 

स्नेहल हॉटेल मधून डायरेक्ट health सेंटर कडे आली होती.. तिने मोबाइलला पण सायलेंट वर ठेवला होता.. तिने मोबाईल चेक च केला नाही..  त्या मोठ्या health सेंटर मधल्या इनडोअर पूल मध्ये ती आता पोहत होती.. तिने एका मागोमाग किती तरी राऊंड मारले होते.. या वेळेला श्यक्यतो लोक जिम मध्ये जातात आणि स्विमिंग करायला कुणी येत नाही हे तिला माहिती होत त्यामुळे ती एकटीच त्या पूल मध्ये पोहत होती.. काही केल्या तिच्या डोक्यातून विचार जात न्हवते.. तिच्या वडिलांच्या वागण्याचा तिला राग आला होता पण त्याहून जास्त वाईट वाटत होत.. तिला असं वाटत होत कि -

"ना माझ्या वडिलांच्या साठी मी महत्वाची आहे ना आई साठी.. आई ला मी ठोकरलं वडिलांच्या साठी.. मोठं झाल्यावर पण तिच्या बरोबर कॉन्टॅक्ट नाही ठेवला.. आणि आता वडिलांच्या साठी मी नाही तर ती दुसरी बाई महत्वाची झाली.. म्हणजे माझं कुणीच नाही का? आज ना उद्या मानवी पण लग्न होऊन जाईल.. म्हणजे मी कायम साठी एकटीच राहायचं का?" त्या एकटेपणा च्या भावनेने तिला रडू कंट्रोल झालं नाही आणि तिने मनसोक्त पोहणं थांबवून रडून घेतलं..

नंतर मात्र ती रडायची थांबली कारण ती खूप रडली तर तिचे डोळे सुजायचे आणि मानवी ते बरोबर ओळखायची.. ती कपडे चेंज करून बाहेर आली.. तिने reception वर तिचे चेक आऊट time लिहिले आणि ती वळली तर  समोर राहुल उभा होता..

"ओह.. मानवी.. "

"ओह.. राहुल.. hi.. " तिने तिची नजर थोडीशी दुसरी कडे वळवत त्याला ग्रीट केलं.. पण आत्ता तिला फक्त घरी जाऊन झोपावं असं वाटतं होत.. तिला आज त्याच्या बरोबर डील करायचं न्हवत..

"तू इथे कशी काय?" त्याने हसून विचारले..

"ते.. माझं हॉटेल इथून जवळच आहे ना म्हणून मी इथे येते workout करायला.. "  तिचा एकदम हळू आवाज ऐकून त्याने तिला विचारले..

"ओह.. मी पण इथे येतो कारण ऑफिस पासून हे जवळ आहे तर.. उशीर झाला तरी मी workout करू शकतो.. "

"अरे हां बरोबर.. ठीके मग तू जा आत workout करायला.. मी निघते.. बाय.. "

"ओके बाय.. "

त्याचा बाय ऐकायला पण ती तिथे थांबली नाही आणि बाहेर पडली.. तिला जाताना राहुल पाहत होता.. त्याने काही तरी ठरवले आणि तिच्या मागे आला..

 

************

 

क्रमशः

 

*************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..