माझी मानवी... 12

A story about love, relationships, friendship and kindness

मानवी सीमा मॅम सोबत स्टुडिओ मध्ये गेली.. इथे सुद्धा अख्खा फ्लोअर फक्त एवढ्या एकाच कामासाठी होता असे दिसत होते.. तिथे मॉडेल्स च फोटोशूट चालू होत आणि तिच्या या एडिटिंग डिपार्टमेंट मधले जवळपास सगळेच तिथे धावाधाव करत काम करत होते..

ती बॉक्स घेऊन गेली आणि तिथे एका टेबल वर तिने तो ठेवला.. त्या टेबल वर च पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि बाकी energy ड्रिंक्स ठेवलेली दिसत होती.. मानवी तिथेच उभे राहून फक्त इकडे तिकडे पाहत होती.. तिला सगळी कडे पाहून "आपण काही मध्ये मध्ये करायला नको..  काय चालू आहे काही कळत तर नाहीये उगाच काही चूक नको व्हायला आपल्याकडून " असा विचार करून ती शांत उभी होती..

************

चीफ एडिटर लोला यांच्या केबिन मध्ये राहुल बसला होता.. लोला मॅडम आणि राहुल यांचे डिसक्शन चालू होते.. सकाळी फक्त introduction झाले तेवढेच त्यांचे बोलणे झाले होते.. काही गोष्टी राहुल ला आजच क्लिअर करणे गरजेचे होते त्यामुळे जेव्हा मोस्टली सगळा स्टाफ स्टुडिओ मध्ये हेल्प करायला गेला तेव्हा तो त्यांची भेट घ्यायला गेला होता..

"राहुल तुम्ही आधी आमचा स्टुडिओ पाहायला हवा.. " लोला मॅम..

"actually आपलं बोलणं झालं कि मी तिकडेच जाणार आहे.. फोटो शूट आजच आहे अनायसे तर मी ते हि चेक करेन.. पण तुम्ही मला म्हणालात सकाळी कि तुम्हाला काही महत्वाचे बोलायचे आहे.. तर काय बोलायचे होते तुम्हाला?" त्यानी असा एकदम मुद्द्याला हात घातल्याचे बघून त्यांच्या लक्षात आले याला वेळ वाया घालवायचा नाहीये..

" ओह, ओके ओके.. तुमच्या हे मे बी ऐकण्यात आलं असेल कि मी या पोस्ट वर  माझ्या भावाच्या मुळे आहे.. you know nepotism?!" असं म्हणून त्या मोठ्यानि हसल्या पण राहुल च्या चेहऱ्यावर ची रेष देखील हलली नाही.. तो म्हणाला, " हो माहितीये मला ते.. "

"at least तोंडदेखलं तरी हसावं माणसानी (त्या राहुल ला ऐकू जाईल असं पुटपुटल्या पण त्याचा तरी रिस्पॉन्स काहीच नाही हे पाहून पुढे बोलल्या.. ) मला फक्त हे म्हणायचं होत कि इथल्या टीम ला पुढे न्यायची पूर्ण जबाबदारी तुमची राहील.. म्हणजेच माझं देखील काम तुम्हालाच करायला लागेल.. मी नाम मात्र असेन.. " राहुल १ मिन शांत झाला आणि मग म्हणाला..

"हे तर फार बरं होईल मग.. पण मॅडम पुढच्या ३ महिन्यांच्या साठी माझ्या काही कंडिशन्स असतील.. "

"कंडिशन्स? कोणत्या कंडिशन्स?"

"आत्ता पुरतं फक्त मला एवढंच प्रॉमिस करा कि मी आत्ता तुम्हाला जे सांगणार आहे ते आपल्या दोघांच्या मध्येच राहील आणि आपल्या टीम पर्यंत यातली कोणतीही बाब पोहोचणार नाही.. "

"ठीके.. सांगा.. "

"आजपासून ३ महिन्यांनी फेस इंडिया बंद होईल.. "

"काय? अशी कशी काय बंद करू शकतात ते.. म्हणजे म्हणायचंय काय नक्की तुम्हाला? "

"फ्रांस हेडक्वार्टर्स नि हा डिसिजन ऑलरेडी घेतला आहे.. आजपासून ३ महिन्यांनी फेस इंडिया मध्ये पब्लिश होणार नाही.. आणि फेस ची एडिटिंग टीम बरखास्त होईल.. "

"तुम्हाला हि न्युज सांगयला तर नक्कीच नाही पाठवलं त्या लोकांनी.. असं होऊ द्यायचं नसेल तर ?"

"त्या साठीच तर मी इथे आलोय.. जर का आपण येत्या ३ महिन्यात फर्स्ट पोजिशन  इंडियन मार्केट मध्ये अचिव्ह करू शकलो तर हा decision ते बदलतील.. मी इकडे यायच्या आधी आपल्या सगळ्या टीम मेंबर्स चे रिपोर्ट्स analyze केलेत.. या टीम मध्ये skilled एडिटर्स आहेत आणि ते unique देखील आहेत पण ते त्यांचं फुल potential use करत नाहीयेत असं माझ्या लक्षात आलंय.. मी काहीही करून त्यांना त्यांचं फुल potential use करायला भाग पाडेन.. त्यासाठी त्यांना पुश करावं लागलं तरी चालेल.. But in order to do that,तुम्हाला माझ्या वर सगळं सोपवावे लागेल.. मला या गोष्टीची जाणीव आहे कि २० वर्षांपासून चालू असणारे इंटरनॅशनल लेव्हल चे मॅगझीन जर का इंडिया मध्ये बंद झाले तर या एडिटिंग टीम ला दुसऱ्या कोणत्याही या इंडस्ट्री मधल्या मॅगझीन मध्ये जॉब मिळणार नाही.. "

"आणि तरी तुम्हाला हि जबाबदारी उचलायचीये ? का बरे? असं जरी झालं तरी तुम्ही पुन्हा न्यूयॉर्क ला परत जाऊ शकता.. "

"नाही.. माझ्या साठी सुद्धा सगळे दरवाजे बंद होतील.. "

"काय? पण का?"

"कारण भारतीय असल्याने त्यांचा हा decision घेताना हे मॅगझीन बंद होऊ नये म्हणून भांडलेला मी एकमेव होतो.. त्यामुळे जर का हे मॅगझीन पहिल्या position वर पोहोचले नाही तर including फेस इंडिया एडिटिंग टीम माझे हि करिअर संकटात असेल.. "

"तुम्ही खूप मोठी रिस्क घेतलीये असं नाही वाटत.. "

"त्यामुळेच हि गोष्ट स्टाफ मध्ये कुणालाही कळता कामा नये.. आणि तुमचे काम हि मला च करू दिलेत तर अजून चांगले होईल.. "

"हो ठीके.. तुम्ही म्हणाल तसेच करूयात.. "

**********

 राहुल पण शूटिंग आणि फोटोज पाहायला आला होता.. तो आणि सीमा मॅम तिथल्या स्क्रीन वर बघून चेक करत होते.. त्यांचं चालू असलेलं डिस्कशन मानवी लांबून पाहत होती.. त्याची नजर आजूबाजूला सर्व observe करत होती.. आणि मानवी चोरून त्याला पाहत होती..

इतक्यात एका मॉडेल नि मानवीला खुणावून पाणी मागितले.. ती त्या पाण्याच्या टेबल समोर च उभी होती.. मानवीने पटकन पाण्याची १ बॉटल उचलली आणि तिला नेऊन दिली.. इतक्यात राहुल चा रागाने ओरडल्याचा आवाज स्टुडिओ मध्ये घुमला.. तिथे पिन ड्रॉप शांतता पसरली..

"hey YOU.. आधी तिथून इकडे ये.. "

मानवीने मागे वळून पहिले.. राहुल तिच्या कडे च पाहत होता.. तो पुन्हा ओरडला..

"फोटोशूट च्या सेट वर बाहेरचे शूज घालायचे नसतात एवढं सुद्धा कळत नाही का?"

आता मानवीने खाली वाकून तिच्या पाया कडे पहिले.. तिच्या शूज चे ठसे जो फोटोशूट चा व्हाईट प्लॅटफॉर्म होता त्यावर उमटले होते.. तिने वळून आजूबाजूला पहिले तर मॉडेल्स च्या पायातले तर हिल्स नवे कोरे  होते आणि अगदी फोटोग्राफर पण without शूज त्या  व्हाईट प्लॅटफॉर्म वर सॉक्स घालून उभा होता..

"ओह माय गॉड.. "ज्या मॉडेल नि पाणी मागितले होते ती ते ठसे पाहून म्हणाली.. तशी मानवी भानावर येत तिथून बाहेर येऊ लागली पण तिच्या पायातल्या शूज मुळे अजून ठसे उमटले..

"Just remove your shoes for god's sake!!" ती मॉडेल पुन्हा बोलली..

तसे मानवीने पटकन शूज काढले आणि तिथून बाहेर आली.. आता तिच्या पायाकडे तिचे लक्ष गेले तिचा सॉक्स अंगठ्याच्या इथे थोडा फाटला  होता आणि त्यातून तिचे बोट बाहेर डोकावत होते.. राहुल चे पण लक्ष आता तिच्या कडे च होते.. तिने पटकन दुसरा पाय अंगठ्यावर ठेवत ते झाकण्याचा प्रयत्न केला.. तिच्या चेहर्या कडे पाहत तो म्हणाला..

"लिफ्ट मध्ये तुम्हीच होता ना ?"

तिने काही न बोलता मान खाली घातली.. सीमा मॅम त्याच्या शेजारीच उभ्या होत्या त्या तिला सावरून घ्यायला म्हणाल्या..

"मी तिला आधीच कल्पना द्यायला हवी होती.. I am sorry.. ती आजच जॉईन झालीये आपल्या टीम मध्ये त्यामुळे तिला अजून सगळं माहिती नाहीये.. "

"मी तिला सगळ्या टीम मेंबर्स चे introduction होत होते तेव्हा पण नाही पहिले.. हि बाई आपल्या टीम चा पार्ट नाहीये ना..? " तिला असं एकदम बाई म्हटलेलं बघून सीमा मॅम ला पण वाईट वाटलं.. त्या म्हणाल्या..

"ती अजून पर्मनंट एम्प्लॉयी नाहीये मे बी त्यामुळे नसेल सकाळी introduction च्या वेळी .. ३ महिन्यांच्या साठी management डिपार्टमेंट मधून तिची इकडे ट्रान्सफर करून घेतली आहे.. "

"what a relief.. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय कि हिचा - माझा काही संबंध येणार नाही.. असल्या लोकांच्या सोबत काम करायला मला अजिबात आवडत नाही.. "

एवढंच बोलून तो तिथून निघून दुसरं काही चेक करायचे आहे का ते बघायला निघून गेला.. आता मानवीने मान वर करून सीमा मॅम कडे पहिला.. त्या म्हणाल्या..

"अशा प्रकारच्या चुका खपवून घेतल्या जात नाहीत एवढं तर तुझ्या लक्षात आलंच असेल.. आजचा तुझा पहिलाच दिवस होता म्हणून जाऊ दिलं .. पुन्हा असं होऊ देऊ नकोस.. "

मानवीला मेल्या हुन मेल्या सारखं झालं..

"सॉरी मॅडम.. परत असं नाही होणार.. " ती खाली मान घालून म्हणाली.. सीमा मॅम तिथून त्यांच्या कामाला निघून गेल्या.. त्या गेल्यावर विशाल मानवी जवळ गेला..

"दीदी.. एवढं मनाला नको लावून घेऊस.. इट'स ओके.. इथून पुढे मला विचारत जा काही विचारावंस वाटलं तर.. ओके..? " मानवीचा पडलेला चेहरा बघून विशाल तिची समजूत काढत बोलला.. मानवी त्याच्या कडे बघून होकारार्थी मान हलवली.. पण त्या नंतर पूर्ण शूट मध्ये ती एकदाही राहुल च्या नजरेसमोर आली नाही..

थोड्या वेळाने लोला मॅम ची एन्ट्री झाली.. त्या आल्या बरोबर त्यांच्या पुढे मागे करत सगळे जण त्यांची खिदमतदारी करू लागले.. त्यांचे रिलेशन्स  सगळ्यांना माहिती असल्याने त्यांना मस्का थोडाफार तरी सगळ्यांना लावावा लागतच होता..

त्यांनी आल्यावर सगळी फोटोशूट ची प्रोग्रेस पाहिली.. राहुल शी २ शब्द बोलल्या.. इतक्यात सगळे outfits हँगर ला लावत उभी असलेली मानवी त्यांना दिसली.. त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या सीमा मॅम ना त्यांनी विचारले.. "हि कोण आहे? बोलवा तिला.. " सीमा मॅमनि मानवीला हाक मारून बोलावले.. तोवर त्यांनी मानवी आजच जॉईन झाल्याचे सांगितले.. मानवीने जवळ गेल्यावर स्वतःला इंट्रोड्युस करून दिले.. पण त्यांचं पूर्ण लक्ष तिच्या केसांवर च होत.. त्या काही बोलत नाहीयेत हे पाहून मानवीचा हात नकळत तिच्या केसांवर गेला.. आणि ती त्यांना चोपून बसवायचा प्रयत्न करू लागली.. आणि शेवटी त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर आलेच..

"तुझे केस.. एका फॅशन एम्प्लॉयी चे केस हे असे.. मला त्यांच्या कडे बघून च कसे तरी होतंय.. "

"हां ? ओह.. सॉरी.. माझे जन्मतः च असे आहेत केस.. " काय बोलावे ते न कळून ती बोलली.. राहुल कामात होता पण जेव्हा त्याने तिचे हे explanation ऐकले तेव्हा त्याने तिच्या कडे मागे वळून पहिले.. मानवी केस हाताने दाबून बसवायचा प्रयत्न करत अवघडून बोलत होती.. 

"हे बघ मुली तू इथे ३ महिन्यांच्या साठी आहेस कि ३ तासा साठी आहेस.. याने मला काही फरक नाही पडत.. पण जोवर तू या डिपार्टमेंट मध्ये काम करशील, या टीम मध्ये आहेस तोवर तुला थोडं तरी fashionable राहावं लागेल.. ते जमत नसेल तर निदान थोडी तरी presentable राहा.. ठीके?"

मानवीने होकारार्थी मान हलवली आणि बाजूला झाली..  थोड्या वेळानी शूट संपले आणि finally त्यांची सुट्टी झाली..

आजचा दिवस मानवी साठी खूप मोठा होता.. physically आणि mentally ती पूर्ण पणे थकली होती.. ती बस स्टॉप वर येऊन बस ची वाट पाहत राहिली.. इतक्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू आला..

स्नेहल तिला घ्यायला आली होती.. तिचे कपडे घरातले दिसत होते म्हणजे ती घरी जाऊन पुन्हा तिला घ्यायला आली होती.. मानवी काही न बोलता गाडीत येऊन बसली.. तिचा पडलेला चेहरा बघून स्नेहल नि सरळ गाडी एका ice cream parlor जवळ नेऊन थांबवली..  स्नेहल जाऊन ice cream घेऊन आली.. तिने मानवीच्या हातात ते दिला आणि म्हणाली..

"आता सांग काय झालं.. गाडीत बसल्या पासून १ शब्द नाही बोललेलीस तू.. "

"काय बोलू मी.. " एवढं बोलून मानवीचा गळा भरून आला..

"काय बोलला तो तुला? काही झालं का? "

मानवीने दिवसभरात जे काही झालं ते तिला ice cream खात खात सांगितलं.. आणि म्हणाली..

"बायको यार मला कसं जमणार ३ महिने असे काढायला.. आजच्या सारखा जर का प्रत्येक दिवस असेल तर मी मरून जाईन..  "

"shut up यार.. हे जरा अति होतंय तुझं.. "

"तो जवळ असताना मी श्वास कसा घ्यायचे हे विसरतीये.. that's right.. माझं मरण फिक्स आहे.. माझं १ शेवटचं काम करशील?"

"काय आता ?"

"माझ्या १०व्याला कावळा शिवला नाही तर.. at least चिकन nuggets ठेवशील.. अरे हो.. नॉन व्हेज चालणार नाही ना त्यावेळी.. मग सुरळीची वडी आणि दही वडा फिक्स ठेवशील.. कावळा नक्की शिवेल.. "

स्नेहल नि तिच्या  डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाली..

"म्हणून तुला म्हटलेलं हे पहिलं प्रेम आणि ट्रू लव्ह सारख्या फालतू गोष्टी डोक्यात ठेवू नकोस.. आता घरी जाऊया.. तुझ्या मुळे आता मला चिकन nuggets खावेशे वाटू लागलेत.. ते ऑर्डर करूयात.. परवाची बिअर आहे शिल्लक ती पी आणि शांत झोप.. नको ते विचार करू नकोस.. "असे म्हणून स्नेहल मानवीला घरी घेऊन आली..

पण अजून रात्र संपली न्हवती.. आजचा दिवस मानवी साठी खरंच खूप मोठा ठरणार होता..

************

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all