Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 30

Read Later
माझी मानवी... 30

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

स्नेहल आज शॉपिंग करायला आली होती.. एका designer बुटीक मध्ये जिथे Pradaसारखे ब्रॅण्ड्स मिळतात तिथे ती एका प्लॅटफॉर्म stilettos शूज वर तिचा तिचा जीव आला होता.. तिच्या बरोबर तिची नेहमीची पर्सनल shopper पण होती.. ती तिला त्या शूज कडे बाकीचे शूज पाहत असली तरी वळून येताना पाहत होती.. शेवटी तिने विचारलंच..

"मॅम तुम्हाला खूपच आवडलाय का हा पीस?"

"हो ना.. खूपच सुंदर आहे.. मी बाकीचे पण घेतेच पण हा माझ्या साईझ मध्ये पॅक करून द्याच.. "

"मी म्हणूनच तुम्हाला हा recommend करत न्हवते मॅम कारण हा सिंगल पीस राहिलाय आणि हा तुमच्या साईझ मध्ये पण नाहीये.."

"ओह.. पण किती सुंदर आहे हा.. " तो शूज हातात घेऊन ती म्हणाली..

"असुदे.. द्या हाच.. "

"पण मॅम पाय तुमचे बसणार नाहीत.. ०. ५ % तरी लहान आहेच हा.."

"मग मी घालून फाकवेल त्याची साईझ.. द्या हाच पीस.. "

"ठीके मॅम " असं म्हणून ती स्नेहल ने घेतलेले बाकीचे items पण पॅक करायला गेली.. इतक्यात स्नेहल ला तिला महागड्या गाडीतून सोडायला आलेला त्याचा फोन आला..

"hi स्नेहल.. "

"हां बोल रे.. " बाकी अजून काही आवडतंय का ते पाहत स्नेहल त्याच्या शी बोलत होती..

"आज जाऊयात डेट वर?"

 "नाही.. आज मी एका खास ठिकाणी चाललीये.. "

"खास ठिकाणी? कुठं?"

 "आहे एक जागा.. माझी सगळ्यात आवडती.. सो.. मी बी नेक्स्ट time.. "

"ओह.. ओके.. " तिने कॉल कट केला आणि ती सेल्स गर्ल परत आली.. आणि म्हणाली.. "मॅम मी माझ्या मॅनेजर कडून एका कन्फर्म करायला विचारलं त्या म्हणाल्या हे तुम्ही विकत घेतलंत तर तुम्हाला रिटर्न करता येणार नाही.. If you wear this, you will get hurt mam.."

"ओह.. डोन्ट वरी.. मी आज वर जे घेऊन गेलीये त्यातलं कधी काही रिटर्न केलंय?I am the type of person that needs to get everything I set my heart on.." स्नेहल ने हसून उत्तर दिलं.. स्नेहल शॉपिंग करून डायरेक्ट मानवीच्या आई बाबांच्या घरी गेली.. मानवीने तिला सांगितले होते कि मी निवांत येते कपडे धुवून आणि सोमवारची तयारी करून.. तू हो पुढे.. त्यामुळे स्नेहल आधी गेली.. ती गेली तोवर ७. ३० तर संध्याकाळचे वाजले होतेच.. स्नेहल ने अर्थात रेड ड्रेस घातला होता..  

स्नेहल ने पाहिले प्रेस मधली light अजूनही चालू होती.. ते पाहून ती आधी मानवीच्या बाबांना भेटायला गेली.. ती नुसती दारातून आत डोकावली तर मानवीचे बाबा कुणाशी तरी फोन वर बोलत होते.. जसे त्यांचे स्नेहल कडे लक्ष गेले तसा त्यांनी कॉल आटोपता घेतला आणि त्यांच्या पुढे बाहुली सारख्या पोज देत उभ्या असलेल्या स्नेहल कडे बघत आनंदाने म्हणाले..

"अरे वाह.. लेक आली माझी.. "

"कसे आहात काका? मला मिस केलं?"

"हो ग राणी.. माझ्या लेकीला मी रोज मिस करतो.. चल आज मी तुझ्या आवडीचं चिकन ६५ केलंय.. हा कॉल आला म्हणून आलो.. चल घरात जाऊया.. माझी बाहुली अगदी रोडावलीये.. खात नाहीस का ग काही?"

स्नेहल ने नुसता हसून त्यांचा हात धरला आणि त्यांच्या बरोबर घरात आली.. मेधा ने जोरात ओरडून तीच स्वागत केलं आणि तिच्या आरड्या ओरड्याने मानवीच्या आईला स्नेहल आल्याचं कळालं.. हॉल मध्ये खालीच अंगत पंगत करून ते बसणार होते जेवायला.. मानवी येईपर्यंत जेवायला वाढून घेऊया.. असं ठरवून ते सगळं स्वयंपाकघरातून ते हॉल मध्ये खाली मांडून ठेवत होते.. माशाचे आणि चिकन चे बरेच स्टार्टर्स केलेले होते.. आणि मेन कोर्स ला नावाला व्हेज पुलाव केला होता..

मानवी येईपर्यंत स्नेहल आणि मेधा शेजारी शेजारी बसल्या होत्या.. त्या दोघींच्या समोर मानवीचे आई बाबा बसलेले.. आणि मानवी साठी त्यांनी सेंटर ला जागा सोडलेली.. त्यांनी वाढून घेतलं न्हवत.. पण स्नेहल ला टेस्ट तर करून बघ हा १ पीस असं करत त्यांचं प्रत्येक डिश मधलं १-१ भरवणं चालू होत.. मानवी येऊन उभी राहिली तरी तिच्या कडे त्यांचं लक्ष गेलं नाही, स्नेहल लाड करून घेण्यात मग्न होती आणि सगळे तिचे लाड करण्यात.. मानवीने जेव्हा जोरात टाळ्या वाजवून म्हटलं..

"छान!! माझ्या साठी पार्टी आहे नई मी यायच्या आतच तुम्ही सुरु पण केलंत?"

तसे सगळे.. "अरे वा.. आली का तू?" "उशीर झाला ग.. " "ये बस बस.. " "चला आता सुरुवात करूया.. " असं बोलून तिला मनवू लागले.. मानवी साठी हे नवीन न्हवतं.. त्यामुळे तिने पण मला पण भरवायचं असा हट्ट करून तिच्या बाबांच्या कडून तिने लाड करून घेतले..

त्यांचं जेवण झालं तस मानवीचे बाबा हळूच या दोघींना प्यायची action करत म्हणाले..

"१ छोटासा होऊन जाऊदे का?" तसे मानवीची आई म्हणाली..

"अहो.. पोरींना गाडी चालवायचीये.. कशाला काही देता.. आणि अजून ती परिपक्व नाही झालेली वाईन.. त्यामुळे तुम्हाला पण नाही मिळणार.. " तसे छोटासा चेहरा करत त्यांनी जाऊदे मग अशी action केली.. तशा त्या दोघी हसल्या..

मानवीच्या बाबांना वाईन चा शौक पहिल्या पासून होता पण त्यांच्या कडची सगळी महागडी वाईन जेव्हा त्यांची सगळी संपत्ती गेली तेव्हाच गेली.. पण यावर पण त्यांनी उपाय शोधून काढला होता.. त्यांच्या अंगणात १ मोठं जांभळाच झाड होत.. त्याची मोठी टपोरी जांभळ २ वर्षातून एकदा यायची.. त्यांनी त्या जांभळाची वाईन कशी करायची याची पद्धत शोधून काढली होती आणि गेली कित्येक वर्ष त्यांचा हाच एक शौक होता.. मानवी आणि स्नेहल ला त्यांनी बाहेरून कुणा कडून आग्रह व्हायच्या आत आणि त्यांची उत्सुकता वाढून त्यांनी त्यांच्या पेरेंट्स पासून लपवून काही उद्द्योग करायच्या आत त्यांना या ड्रिंकिंग culture ची ओळख करून दिली होती.. याचा फायदा मानवी पेक्षा स्नेहल ला सगळ्यात जास्त झाला होता.. तिला तिच्या वडिलांच्या बरोबर पार्टी मध्ये म्हणा किंवा तिच्या मित्र मैत्रीणींच्या circle मध्ये या गोष्टीचा फार उपयोग झाला होता.. ज्या गोष्टी मुलं आई वडिलांच्या पासून लपवायचा प्रयत्न करतात त्या सगळ्या गोष्टी या मुली आपल्या बाबांच्या कडे येऊन ते प्रेस मध्ये काम करताना बोलायच्या.. मानवीच्या बाबांनी मानवी आणि मेधाला च नाही तर स्नेहल ला सुद्धा वडिलांची माया देऊन तिचा विश्वास मिळवला होता.. आत्ता सुद्धा त्यांच्या अशाच गप्पा गोष्टी होत जायची वेळ आली.. आणि मानवीच्या आईने मानवीला आठवण करून दिली,

"आग तुला कुठलासा पायजमा घेऊन जायचा होता ना?"

"अरे हो.. बरी आठवण केलीस.. मी शोधते जाऊन.. तुम्ही बसा तोवर गप्पा करत.. "

मानवी च सगळं सामान तस म्हणायला गेलं तर त्यांच्या रूम वर च होत.. त्यामुळे तीच जे लहानपणीच सामान आणि इतर काही होत ते मानवीच्या आईने वेगवेगळ्या बॉक्स मध्ये भरून ठेवलं होत..

ती त्या बॉक्स मधून तिची पॅन्ट शोधत सगळे बॉक्स खाली वर करत होती.. आणि त्या उचक पचकी मध्ये बरेच बॉक्स खाली पडले.. पॅन्ट तर सापडली पण ते सगळे बॉक्स आवरून ठेवताना मानवीला तिचा लहानपणीच बॉक्स सापडला.. ज्यात राहुल नि अमेरिकेवरून पाठवलेली पत्र होती आणि तिला कथाकथन स्पर्धे मध्ये मिळालेली सर्टिफिकेट्स होती.. जेव्हा तिला अशाच एका स्पर्धेच्या वेळी तुला मोठी होऊन काय व्हायला आवडेल असं विचारलं होत तेव्हा तिने अभिमानाने उत्तर दिल होत..

"मला मोठं झाल्यावर लहान मुलांच्या साठी गोष्टीची पुस्तकं लिहायची आहेत.. अशा फेरी टेल्स मध्ये सगळं काही श्यक्य असत.. तुम्ही पंखांच्या शिवाय आकाशात उंच भरारी घेऊ शकता.. जगाचा फेरा एका दिवसात पूर्ण करू शकता.. जादूगार होऊन हवे ते बनवू शकता.. माझं स्वप्न आहे कि अशा गोष्टीं लिहून लहान मुलांच्यात आणि मोठ्यांच्यातल्या लहान मुलांना आनंद द्यायचा.. खूप खूप आनंद.. "

मानवीला त्या बॉक्स मध्ये तिने लिहिलेलं १ गोष्टीच पुस्तक पण सापडलं.. साध्या वही मध्ये च तिने लहान लहान बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या.. त्याच १-१ पान उघडून बघताना तिलाच हसायला आलं.. "किती cute आहे हे.. " वाचताना तिला त्यातल्या चुका बघून पण हसायला येत होत.. असच पान उलटताना त्या वही मधून तिच्या मांडीवर काहीतरी पडलं.. राहुल नि तिला दिलेला तो पझल मधला तुकडा होता.. "हा अजून आहे माझ्या कडे?" त्याच्या पाठीमागे छोट्याशा छत्रीच चित्र काढलं होत.. राहुल नि लिहिलेल्या अनेक पत्रातल्या पैकी एका पात्रात त्याने लिहिलं होत ते तिला आठवलं.. "जेव्हा पावसामध्ये मला श्वास घ्यायला पण त्रास होत होता तेव्हा तू माझी छत्री झालीस आणि मला वाचवलंस.. जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा मी तुझ्यासाठी तुझी छत्री होऊन तुला नको असलेल्या सगळ्या पावसापासून वाचवेन.. " तिला त्या तुकड्या कडे पाहत ते आठवलं मात्र ती म्हणून गेली.. "जेव्हा तू हे दिलेलं, तेव्हा मी हे इमॅजिन पण केलं न्हवतं कि मी तुला अशी भेटेन.."

सगळं आवरून झाल्यावर स्नेहल च्या गाडीतून त्या दोघी पुन्हा त्यांच्या घरी चालल्या होत्या.. स्नेहल तक्रार करत होती..

"बायको तू मला थांबवलं का नाहीस.. मी किती खाल्लंय याची काही कल्पना आहे का? हे बघ अक्षरशः पोट बाहेर आलंय माझं.. "

"हम्म.. सुंदर माणसं तक्रार करायचं बंद च करत नाहीत.. " तिच्या कडे बघून मानवीने तिला चिडवलं..

"मी एवढ्या कॅलरीज consume केल्यात.. त्याच काय करू? आपण घरी जायच्या आधी पार्क मध्ये जाऊया.. तिथे ते ओपन जिम इन्स्टॉल केलंय ना? तिथे आधी व्यायाम करून जाऊया.. "

"भरलेल्या पोटी शतपावली करतात ग.. व्यायाम काय करतेस.. "

"आह्ह्ह... " स्नेहल चा तक्रारीचा सूर काही संपत न्हवता इतक्यात तिला कॉल आला.. unknown no होता तरी मानवीने फोन उचलला..

"हॅलो?"

"मानवी मी बोलतीये.. तू आपल्या ऑफिस पासून जवळच राहतेस ना..?"

"हां ? कोण बोलतंय?"

"तू माझा नंबर पण सेव्ह नाही केलास? मी ब्युटी टीम मधली रिया बोलतीये.. "

"ओह.. हां.. बोल ना रिया.. आज संडे ला काय काम पण ? आज तर सगळ्यांनाच सुट्टी असते ना?"

"हो सुट्टी असते.. पण माझं अगदी छोटंसं काम होत.. मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे आणि इथून हलू शकत नाही म्हणून तुला कॉल केला ना.. "

प्रत्यक्षात रिया एका ब्युटी पार्लर मध्ये बसून manicure pedicure करत बसली होती.. technically बोलायचं झालं तर ती हालू शकत न्हवती पण ती काही कुठल्या मीटिंग मध्ये नक्कीच न्हवती..

"ओह.. ओके.. "

"हां.. तर तू ऑफिस मध्ये जा आणि मला काही फाइल्स सेंड कर ई-मेल वर.. "

"आत्ता? पण रात्र होऊन गेलीये.. "

"आपलं कामच असतं तस.. कुणी अडवणार नाही तुला.. जा बिनधास्त.. तिथे माझ्या डेस्क वर युसबी ड्राईव्ह आहे एक त्यात आजच्या डेट चा १ फोल्डर आहे त्यातल्या सगळ्या फाइल्स पाठव.. "

"हो.. ठीके.. "

"आणि मानवी या बद्दल कुणाला सांगू नको हां.. ठीके ना?"

"हो.. ठीके.. मी नाही सांगणार कुणाला.. "

"थँक्यू.. " म्हणून तिने कॉल कट केला..

स्नेहल गाडी चालवत होती पण तिने सगळा कॉल ऐकलं आणि भडकून म्हणाली..

"तुला तिची उष्टी काढायची काय गरज आहे? संडे ला तू कुणाच्या बापाचं देणं लागत नाहीस.. "

"ठीके ग.. तस पण ऑफिस ऑन द वे च आहे.. "

"तिला आधी कॉल कर आणि म्हणावं जमणार नाही मला.. "

"चालत ग तेवढं स्नेहल.. हे बघ आपल्या आवडीचं गाणं लागलं रेडियो वर.. "

"तू ना गरजे पेक्षा चांगली आहेस.. she will think of you as a pushover..असल्या गोष्टींना end नसतो मानवी.. " स्नेहल बडबडत होती आणि मानवी रेडिओ वर गाणं लागलं होत त्याच्या बरोबर गाणं म्हणत होती..

"जब जब चूड़ी खनके रे

जब जब पायल छनके रे

जब जब सावन बरसे रे

 बोले बोले बोले

बोले बोले बोले बोले जिया..

ओ स्नेहल.. "

स्नेहल नि पण आता मानवी ऐकणार नाही हे बघून तिच्या बरोबर गाणं म्हणायला सुरुवात केली..

"पिया पिया ओ पिया पिया

पिया पिया ओ पिया

सुबह शाम करे मेरा जिया

जिया जिया जिया जिया

 

न जाने क्यों दिल धड़के

घडी घडी ये क्यों तड़पे

हो बेदर्दी तूने

इसको दर्द ये कैसा दिया

पिया पिया ओ पिया पिया

पिया पिया ओ पिया

पिया पिया ओ पिया पिया

पिया पिया ओ पिया"

 

हे गाणं म्हणत म्हणत दोघी मानवीच्या ऑफिस च्या इथे पोहोचल्या.. स्नेहल तिथेच खाली थांबली आणि मानवी वर ऑफिस मध्ये गेली..

 

 

************

क्रमशः

 

************

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..